जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ११५/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०९/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३
निसार शेख इस्माईल शेख. ----- तक्रारदार.
वय-४० वर्ष, धंदा-ट्रक मालक
रा.गल्ली नं.४, मोठी जामा मस्जीद जवळ,
देवपुर,धुळे.
विरुध्द
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि. ----- सामनेवाले.
देवपुर,धुळे.
नोटीसीची बजावणी,
म.मॅनेजर,युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
दिनेश कॉम्प्लेक्स, जुना आग्रा रोड, देवपुर,धुळे
यांच्यावर करावी.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.बी.पी.पवार)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.सी.के.मुगुल)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून वाहनाच्या नुकसानीकामी विमा पॉलिसीची रक्कम मिळण्यासाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची ट्रक क्रमांक केए-४८/८३४ या वाहनाचा सामनेवाले विमा कंपनीकडे फुल कॉप्रीहेन्सीव्ह विमा काढलेला आहे. तक्रारदाराने कर्नाटक पासींगची सदर मालट्रक ही दि.२०-१०-२००९ रोजी त्यांच्या नावावर केली होती. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे येथून सदर ट्रक त्यांचे नावावर झाल्याचे कागदपत्र त्यांना ताबडतोब मिळाले नव्हते, म्हणून सामनेवाले विमा कंपनीचा ट्रक विमा तक्रारदारांच्या नावावर करण्याची प्रक्रिया अपुर्ण होती. तक्रारदाराने सदर ट्रक ही आनंदा धोंडू पाटील रा.धुळे यांच्याकडून विकत घेतली, सदर ट्रक ही आनंदा धोंडू पाटील यांनी कर्नाटकातील श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांच्याकडून नुकतीच विकत आणली होती. दि.२०-१०-२००९ रोजी सदरील ट्रक तक्रारदाराच्या नांवे म.प्रादेशीक परिवहन अधिकारी धुळे यांच्या रेकॉर्डला झालेली आहे.
दि.२८-१०-२००९ रोजी सदर वाहनाचा चाळीसगांव येथे समोरुन येणा-या ट्रक बरोबर समोरासमोर ठोस होऊन अपघात झाला. त्यात सदर वाहनाचे रु.१,८०,०००/- चे नुकसान झाले आहे. त्या बाबतची माहिती सामनेवाले यांना कळविली आहे. परंतु आजतागायत सामनेवाले यांनी विमा क्लेम हा मान्य केलेला नाही. या प्रमाणे सामनेवाले यांनी ग्राहकाची फसवणूक केली आहे, त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करणे भाग पडले आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सामनेवाले विमा कंपनीकडून मालट्रकच्या झालेल्या नुकसानीबद्दल रु.१,८०,०००/- व्याजासह मिळावे व मानसिक त्रासाबद्दल रु.१०,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- मिळावेत.
(३) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा दाखल करुन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे अपघाताचे वेळी या सामनेवालेंचे ग्राहक नव्हते, त्यामुळे सदरची तक्रार या कायद्याने टेनेबल नाही. सामनेवाले कंपनीकडून श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांनी पॉलिसी घेतली असून तक्रारदार यांनी पॉलिसी घेतलेली नाही. तक्रारदाराने आनंदा धोंडू पाटील यांच्याकडून वाहन विकत घेतले असून, ते दि.२०-१०-२००९ रोजी तक्रारदार यांच्या नांवे झालेले आहे. परंतु सदर बाब ही सामनेवाले यांना लेखी कळविलेली नाही. मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १५७ प्रमाणे विमा प्रमाणपत्राचे हस्तांतरण करणे अनिवार्य आहे. या प्रमाणे अपघाताच्या दिवशी तक्रारदारांच्या नांवे पॉलिसी ही ट्रान्सफर करण्याकामी सामनेवालेंकडे अर्ज केलेला नाही, त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. सदर ट्रक दुरुस्तीचा खर्च देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची नाही. याचा विचार होता सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी नाही. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, नि.नं.५ वर छायांकीत कागदपत्र क्र.१ ते ९ , पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद आणि सामनेवालेंचा खुलासा व शपथपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी नि.नं.५/२ वर विमा पॉलिसीची छायांकीत प्रत दाखल केली आहे. सदर पॉलिसी पाहता सामनेवाले यांनी श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांना दि.३०-०६-२००९ ते दि.२९-०६-२०१० या कालावधी करिता गुड्स कॅरिंग, पब्लीक कॅरिअर पॅकेज पॉलिसी रक्कम रु.८,००,०००/- ची दिलेली आहे. या पॉलिसी प्रमाणे सामनेवाले यांनी श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांना पॉलिसी दिलेली आहे हे स्पष्ट होते.
त्यानंतर या पॉलिसीधारकाने त्याचे वाहन हे श्री. आनंदा धोंडू पाटील यांना विकलेले आहे. श्री.आनंदा धोंडू पाटील यांनी सदर वाहन हे तक्रारदार श्री.निसार शेख इस्माईल यांना दि.२०-१०-२००९ रोजी विकलेले आहे. या व्यवहाराप्रमाणे सदर वादग्रस्त वाहनाचे तक्रारदार श्री निसार शेख हे मालक झालेले आहेत. या बाबतचे आर.टी.ओ.चे वाहन नोंदणीपत्र नि.नं.५/१ वर दाखल केलेले आहे. या पत्राप्रमाणे सदर वादग्रस्त वाहनाचे मालक या सदरी नांव श्री.निसार शेख इस्माईल शेख याची नोंद झालेली आहे. तसेच हे वाहन श्री.निसार शेख यांनी श्री.आनंदा धोंडू पाटील यांच्याकडून खरेदी केलेले असून दि.२०-१०-२००९ रोजी तक्रारदाराचे मालक म्हणून आर.टी.ओ. येथे नोंद झालेली आहे. या आर.टी.ओ. च्या कागदपत्राप्रमाणे तक्रारदार श्री.निसार इस्माईल शेख हे या वाहनाचे मालक आहेत हे स्पष्ट होते.
सदर वाहनाचा श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांनी विक्रीचा व्यवहार करुन, या व्यवहारा प्रमाणे तक्रारदार हे मालक झालेले आहेत. त्यामुळे सदर वाहनाचा विमा हा देखील मालकाच्या नांवे वाहना बरोबर हस्तांतरीत होणे आवश्यक आहे. परंतु त्या प्रमाणे विमा पॉलिसी ही हस्तांतरीत झालेली नाही. हा व्यवहार बघता तक्रारदार हे वाहन खरेदी करुन आर.टी.ओ. दप्तरी मालक झालेले आहेत. त्यामुळे ते मुळ मालकाबरोबर त्यांच्या सहमतीने सदर वाहनाचे उपभोक्ता (Beneficiary) म्हणून सामनेवाले यांचे “ग्राहक” होत आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सदर वाहनाचा दि.२८-१०-२००९ रोजी अपघात झालेला आहे. त्या बाबतची फीर्याद चाळीसगांव पोलीस स्टेशनला दिलेली असून, त्या बाबतचे कागदपत्र नि.५/४ व ५/५ वर दाखल केलेले आहेत. सदर वाहनाचा अपघात झाला त्यावेळी त्या वाहनाचा विमा काढलेला होता व विमा कालावधीत अपघात झालेला आहे. या कालावधीत वाहनाचे मालक सदर तक्रारदार हे आहेत. परंतु वाहनाची विमा पॉलिसी ही श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील यांच्या नांवे होती. अपघाताच्या वेळी सदर पॉलिसी ही वाहन खरेदी केलेल्या तक्रारदार यांच्या नांवे हस्तांतरीत झालेली नव्हती.
पॉलिसी प्रमाणे अपघाताचे वेळी वादग्रस्त वाहनाची विमा पॉलिसी ही मुळ मालकाचे नांवे आहे. परंतु अपघाताचे वेळी वाहनाचे मालक श्री.निसार शेख हे आहेत. तक्रारदार यांनी वाहन खरेदी केल्यानंतर सामनेवाले विमा कंपनीकडे त्या बाबतची विमा पॉलिसी हस्तांतरीत होण्याकरिता लिखीत अर्ज विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे. या बाबत मोटार वाहन कायदा कलम १५७ प्रमाणे विमापत्राचे हस्तांतरणे करणे अनिवार्य आहे. या कायद्यातील कलम ५० प्रमाणे, खरेदी करणा-या व्यक्तीने वाहन हस्तांतर झाल्यापासून १४ दिवसांचे आत विमा कंपनीकडे अर्ज करुन विमा पॉलिसीच्या फेरबदला बाबत अर्ज केला पाहिजे. या अर्जाप्रमाणे विमा कंपनी पॉलिसी ही हस्तांतरीत करते.
या प्रमाणे सामनेवाले यांनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार यांनी वाहनाचे हस्तांतरण झाल्यापासून १४ दिवसांचे आत विमा कंपनीकडे विमा प्रमाणपत्राबाबत फेर बदल करण्याची माहिती लेखी कळविलेली नाही. त्यामुळे अपघाताच्या वेळी तक्रारदारांच्या नांवे विमा पॉलिसी नाही. परंतु तक्रारदारांच्या नांवे वाहन हस्तांतरण हे खरेदी दि.२०-१०-२००९ रोजी पासून १४ दिवसांचे आत म्हणजेच दि.०४-११-२००९ तारखेपर्यंत या कायद्याप्रमाणे विमा कंपनीकडे अर्ज करुन विमा पॉलिसी हस्तांतरीत करता येऊ शकते. परंतु सदर वाहनाचा दि.२८-१०-२००९ रोजी अपघात झालेला आहे. यावरुन असे दिसते की, वाहन खरेदी केल्यानंतर आठ दिवसांच्या अंतरामध्ये वाहनाचा अपघात झालेला आहे. वाहन मालकास वाहन हे विमा पॉलिसी हस्तांतरण करण्याच्या मुदतीमध्येच वाहनाचा अपघात झालेला दिसत आहे. याचा विचार होता वाहन मालकास १४ दिवसांची मुदत असण्याच्या कालावधीत वाहनाचा अपघात झाल्याने वाहनाची विमा पॉलिसी ही त्यांच्या नांवे हस्तांतरीत होऊ शकलेली नाही. तसेच विमा पॉलिसी हस्तांतरीत करण्याची मुदत बाकी असतांना अपघात झालेला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा पॉलिसी हस्तांतरीत करण्याचा हक्क हा अबाधीत राहत आहे. सामनेवाले यांनी सदरची पुर्तता करुन घेणे व निर्णय देणे आवश्यक होते. कारण मुळ मालक श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील हे पॉलिसी क्लेम करु शकत नाहीत, कारण ते सध्या या वाहनाचे मालक नाहीत. त्यांनी वाहन विकलेले आहे, त्यामुळे ते पॉलिसीचा क्लेम करु शकत नाहीत. सदर तक्रारदार हे वाहनाचे मालक आहेत, परंतु पॉलिसीधारक नाहीत. या सर्व तांत्रीक बाबीचा विमा कंपनीने विचार करुन निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु तसे केलेले दिसत नाही.
सदर वाहनाचे मुळ मालक श्री.यल्लप्पा गौडा बसप्पा पाटील हे आहेत, त्यानंतर तक्रारदार हे वाहन खरेदी करुन मालक झाले आहेत. सदर वाहन हे विमाकृत असून विमा कालावधीत वाहनाचा अपघात झालेला आहे. विमा पॉलिसी हस्तांतरीत करणेकामी १४ दिवस कायद्याप्रमाणे दिलेले आहेत. या सर्व बाबी सामनेवाले यांना मान्य आहेत. याचा विचार होता विमा कंपनीने या तांत्रीक कारणांचा आधार न घेता हस्तांतरण करण्याची आवश्यक असलेली पुर्तता पुर्ण करुन पॉलिसी क्लेमची पुर्तता करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी तसे केलेले दिसत नाही. केवळ तांत्रीक कारणाचा आधार घेऊन पॉलिसी नाकारलेली दिसत आहे. यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत आहे, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदर वाहनाचा अपघात झाल्याकारणाने तक्रारदार यांना वाहनाची विमा पॉलिसी ही हस्तांतरीत करता आलेली दिसत नाही. या वाहनाचे मालक तक्रारदार हे असल्याने पॉलिसी ही तक्रारदार यांचे नांवे होण्याकामी जो तांत्रीक मुद्दा आहे त्याचा सामनेवाले यांनी बचाव घेतलेला आहे. या कामी निश्चितच तक्रारदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. याचा विचार करता, सदर वाहनाच्या नुकसान भरपाईच्या खर्चाची रक्कम रु.१,८०,०००/- देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) सामनेवाले यांनी वरिष्ठ कोर्टाचा न्यायनिवाडा दाखल केलेला आहे. सदर न्यायनिवाडयाचे अवलोकन केले असता त्यातील तत्व व या तक्रारीतील कथन यात तफावत असल्याने ते या कामी लागू होत नाही असे आम्हास वाटते. या कामी आम्ही मा.वरीष्ठ कोर्टाच्या खाली नमूद केलेल्या निवाडयांचा आधार घेत आहोत.
(1) IV (2004) CPJ 17 Oriental Insurance Co.Ltd. V/s Jijaykumar Agarwal.
(2) (2002) CCJ 1036 Rajkumar V/s United India Insurance Co.Ltd.
त्यात पुढीलप्रमाणे तत्व विषद आहे.
Motor insurance – Repudiation of claim-theft of car-Insurance Company contended that Complainant had no insurable interest in the vehicle as the same was sold by the insured - policy was taken in the name of registered owner of the vehicle the complainant who purchased the vehicle had paid the premium amount – Whether the insurance Company was deficient in its service in repudiating the claim- Held -Yes-insurance company directed to pay compensation with 12 percent interest
वरील कोर्टाच्या न्यायनिवाडयाचे तत्व या तक्रारीस लागु होते असे आम्हास वाटते.
(९) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास त्यांच्या वाहनाच्या विमा पॉलिसीची रक्कम