View 17540 Cases Against Bajaj
Dilip S/o Mangilal Jadhav filed a consumer case on 09 Jan 2015 against The Mananger Bajaj Finances in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/468 and the judgment uploaded on 12 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
___________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :- 468/2014 तक्रार दाखल तारीख :- 10/10/2014
निकाल तारीख :- 09/01/2015
___________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलींगे,सदस्य श्री.किरण.आर.ठोले,सदस्य.
दिलीप मांगीलाल जाधव,
रा. वडगांव कोल्हाटी, गंगोत्री पार्क
औरंगाबाद __________________________________ तक्रारदार
विरुध्द व्यवस्थापक,
बजाज फाईनान्स, बाबा पेट्रोलपंपाजवळ,
औरंगाबाद_____________________________________गैरअर्जदार
तक्रारदार स्वत: .
गैरअर्जदार एकतर्फा.
__________________________________________________________________________
निकालपत्र
(घोषित द्वारा – श्री.किरण आर.ठोले,सदस्य)
तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार ही गैरअर्जदार वित्त पुरवठा करणार्या कंपनीच्या विरोधात अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला म्हणून दाखल केली आहे.
तक्रारदाराने 32 इंची एलईडी टीव्ही किम्मत रु 25000/- खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार वित्त पुरवठा करणार्या कंपनी कडून कर्ज घेतले होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार कंपनीने तक्रारदारास कल्पना न देता तक्रारदाराची एक विमा पॉलिसी काढली व दर महिन्याला रु 1660/- या प्रमाणे विमा पॉलिसी चा हप्ता तक्रारदाराच्या खात्यातून कापला आहे. तक्रारदाराच्या हे लक्षात आल्यावर त्याने गैरअर्जदार यांना सदर विमा पॉलिसी त्वरित रद्द करण्याची व परस्पर नावे टाकलेल्या विमा हप्त्याची रक्कम परत करावी अशी विनंती केली. गैरअर्जदार वित्त पुरवठा करणार्या कंपनीने व विमा कंपनीने तक्रारदाराच्या तक्रारीची दाखल घेतली नाही. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
गैरअर्जदार नोटीस मिळूनही गैरहजर राहीले म्हणून त्यांच्या विरोधात मंचाने एकतर्फा आदेश पारित केला आहे.
तक्रारदाराने त्याच्या खाते उतार्याची प्रत दाखल केली आहे. त्यावरून त्यांच्या खात्यातून रु 1660/- नावे पडल्याचे दिसून येते. वित्त पुरवठा करणार्या कंपनीने तक्रारदारास रु 25000/- चा टीव्ही खरेदी करण्यासाठी कर्ज दिले. परंतु इतक्या किरकोळ कर्जासाठी रु 1660/- मासिक हफ्त्याची विमा पॉलिसी जेमतेम परिस्थिति असलेल्या तक्रारदारास घ्यावयास लावणे हेच मुळात अनुचित व्यापार पद्धतीचे द्योतक आहे. येथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की सदर विमा कंपनी तक्रारदारास वित्त पुरवठा करणार्या कंपनीची सहयोगी कंपनी आहे. म्हणजे आपल्या सहयोगी कंपनीची विमा पॉलिसी तक्रारदाराची संमती न घेता त्याच्या माथी मारली आहे. गैरअर्जदार यांची ही कृती अनुचित व्यापार पद्धतीत मोडते. नोटिस मिळूनही गैरअर्जदार गैरहजर राहिले याचा अर्थ तक्रारदाराने केलेले आरोप गैरअर्जदार यांना मान्य आहेत व स्वत:च्या बचावात गैरअर्जदार यांना काहीही सांगायचे नाही. म्हणून हा मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलींगे) (श्री.किरण आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.