Maharashtra

Nagpur

CC/493/2017

SUNIL BHALCHANDRA SINNARKAR - Complainant(s)

Versus

THE MANAGING DIRECTOR, SONY INDIA PVT. LTD. HEAD OFFICE - Opp.Party(s)

ADV. SANJAY T. MOON

31 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/493/2017
( Date of Filing : 09 Nov 2017 )
 
1. SUNIL BHALCHANDRA SINNARKAR
R/O. PLOT NO. 35, SANT SAI KRUPA HOUSING SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGING DIRECTOR, SONY INDIA PVT. LTD. HEAD OFFICE
OFF. AT- A-31, MOHAN COOPERATIVE INDUSTRIAL ESTATE, MATHURA NEW DEHLHI 110044
DELHI
UP
2. THE REGIONAL BRANCH OFFICE, SONY INDIA PVT. LTD
OFF. AT 002-GROUND FLOOR, MARWAH HOUSE, KRISHANLAL MARWAH MARG, ANDHERI (E), MUMBAI-400072
MUMBAI
MAHARASHTRA
3. THE BRANCH SERVICE IN-CHARGE, SONY INDIA PVT. LTD. NAGPUR BRANCH
OFF. AT. ARTEFACT TOWERS, BLOCK NO. 109, 6TH FLOOR, KH. NO. 54/3, CHATRAPATI SQUARE, WARDHA ROAD, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
4. SAI SYSTEM AUTHORISED SERVICE CENTER SONY INDIA PVT. LTD. THROUGH PROPRIETOR / MANAGER
OFF. AT SHOP NO. 3, PLOT NO. 11, TULSIVIHAR, ABHYANKAR NAGAR, PATHAK HOUSE, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
5. CITY COLLECTION, THROUGH PROPRIETOR / MANAGER
OFF. AT SHOP NO. 2, NEEL KAMAL COMPLEX, MAHAJAN MARKET, SITABULDI, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकतर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडुन सोनी एक्‍सपेरीया (कलर व्‍हाईट) हॅन्‍डसेट ज्‍याचा आय.एम.ई.आय. नंबर ३५९०५७०६१४१३४३८, रिटेल इनव्‍हाईस नंबर १६/१७-०००१७६, दिनांक १/४/२०१६ अन्‍वये रुपये २३,९६०/- इतक्‍या  किंमतीमध्‍ये विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने सदर मोबाईल हॅन्‍डसेट विकत घेतल्‍यानंतर आठ महिण्‍याच्‍या आत मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये ओव्‍हर हिटींग चा प्रॉब्‍लेम येत होता त्‍यामुळे कॅमेरा व इतर फंक्‍शन बरोबर काम करीत नव्‍हते. तक्रारकर्त्‍याने हॅन्‍डसेट मधील ओव्‍हर हिंटीग प्रॉब्‍लेम करीता कंपनीचे अधिकृत दुरुस्‍तीकार विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे मोबाईल हॅन्‍डसेट दिनांक २/१/२०१७ ला दुरुस्‍ती करीता दिला. रिटेल इनव्‍हॉईस नंबर s५९/fy१७-०१/००००३१५ अन्‍वये अधिकृत दुरुस्‍तीकाराने काही पार्टस बदलवुन मोबाईल हॅन्‍डसेट मधील प्रॉब्‍लेम दुरुस्‍ती केला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍ती करुन तक्रारकर्त्‍याला दिनांक २०/१/२०१७ ला हस्‍तांतरीत केला. तक्रारकर्त्‍याला हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन दिल्‍यावर पुनःश्‍च तोच प्रॉब्‍लेम मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये दिनांक २८/२/२०१७ ला आला. त्‍यामुळे कॅमेरा व इतर फंक्‍शन बरोबर काम करीत नव्‍हते. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुनःश्‍च मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे रिटेल इनव्‍हॉईस नंबर s59/fy१७-०३/००००१३८  अन्‍वये दुरुस्‍ती ला टाकला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट मधील काही पार्टस बदलवून  तक्रारकर्त्‍याला मोबाईल हॅन्‍डसेट दिनांक १०/०३/२०१७ ला दुरुस्‍ती  करुन दिला. परंतू मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍ती करुन दिल्‍यावर त्‍यामध्‍ये पुनःश्‍च पाच दिवसात तोच प्रॉब्‍लेम निर्माण झाला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुनःश्‍च सदर मोबाईल हॅन्‍डसेट विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे सर्व्हिस जॉब शिट क्रमांक W117031400483 Vide Ticket No. 17031400483, dated 14/03/2017 अन्‍वये दुरुस्‍तीला टाकला. त्‍यामध्‍ये  Heating, Over heating, Camera, Video playing time, 3G, 4G, Network Problem होते. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मोबाईल हॅन्‍डसेट मधील दुरुस्‍त करु शकला नाही. तक्रारकर्त्‍याने वारंवार तोंडी विनंती विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ ला केली. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मोबाईल हॅन्‍डसेट मधील प्रॉब्‍लेमचे निराकरण करु शकले नाही. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या  मोबाईल हॅन्‍डसेट मधील दोष न काढल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नविन मोबाईल हॅन्‍डसेट विकत घ्‍यावा लागला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विनंती करुन मोबाईल हॅन्‍डसेट मधील दोष काढुन दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत विनंती केली. परंतू विरुध्‍द पक्षाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ४ ला दिनांक १९/४/२०१७ ला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याद्वारे मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत विनंती केली. परंतू विरुध्‍द पक्षाने मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन दिला नाही किंवा मोबाईल ची किंमत परत केली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला आदेशीत करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याने विकत घेतलेल्‍या हॅन्‍डसेट ची किंमत रुपये २३,९६०/-, २४ टक्‍के  व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावी.
  2. तक्रारकर्त्‍याने दिनांक २८/२/२०१७ ला घेतलेल्‍या नविन मोबाईल ची किंमत रुपये १०,९९९/- परत करण्‍याचे आदेशीत करावे.
  3. मानसिक व शारीरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही कंपनी अॅक्‍ट १९५६ अंतर्गत रजिस्‍टर्ड कंपनी असुन तिचे रजीस्‍टर्ड कार्यालय न्‍यु दिल्‍ली येथे आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ या विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या शाखा आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे अधिकृत दुरुस्‍ती  व सेवा केंद्र आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक ५ हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे अधिकृत विक्रेता आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन सोनी एक्‍सपेरीया (कलर व्‍हाईट) हॅन्‍डसेट विकत घेतला, ज्‍याचा आय.एम.ई.आय. नंबर ३५९०५७०६१४१३४३८ हा आहे. मोबाईल हॅन्‍डसेट विकतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मोबाईल चे फीचर फंक्‍शन, अप्‍लीकेशन चा डेमो दाखविला आणि मोबाईल चे वॉरंटीचे शर्ती आणि अटी बाबत माहिती दिली होती.  विरुध्‍द पक्षकार वस्‍तुची (मोबाईल हॅन्‍डसेट ची) एक वर्षाची वॉरंटी वस्‍तु विकत घेतलेल्‍या तारखेपासून पूरवितो व वॉरंटी व्‍दारे देण्‍यात आलेल्‍या शर्ती व अटी अन्‍वये जबाबदारी लादल्‍या  जाते. वॉरंटीच्‍या स्‍कोप च्‍या बाहेरची मागणीची जबाबदारी लादल्‍या जाऊ शकत नाही.
  3. तक्रारकर्त्‍याने नऊ महिणे मोबाईल हॅन्‍डसेटचा वापर केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये ओव्‍हर हिंटींग आणि कॅमेरा बाबत प्रॉब्‍लेम आल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे मोबाईल घेऊन दिनांक २/१/२०१७ ला संपर्क साधला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी काहीही उशीर न करता तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईल तपासला व दुरुस्‍त करुन तक्रारकर्त्‍याला हस्‍तांतरीत केला. सदरची दुरुस्‍ती कोणतीही दुरुस्‍ती शुल्‍क न आकारता करण्‍यात आली. त्‍यानंतर पुनःश्‍च तक्रारकर्ता दिनांक २८/२/२०१७ ला विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे मोबाईल हॅन्‍डसेट मधील ओव्‍हर हिंटीग व हॅन्‍गींग प्राब्‍लेम करीता संपर्क साधला. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट मधील यु.एस.बी. बोर्ड बदलविला व मोबाईल हॅन्‍डसेट कोणतीही दुरुस्‍ती शुल्‍क न आकारता तक्रारकर्त्‍याला दुरुस्‍त करुन दिला.त्‍यानंतर तक्रारकर्ता पुनःश्‍च दिनांक १४/३/२०१७ ला मोबाईल हॅन्‍डसेट मधील नेटवर्क प्रॉब्‍लेम व 4G Not Supporting करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचेकडे संपर्क साधला. विरुध्‍द पक्षाने तात्‍काळ मोबाईल हॅन्‍डसेट तपासला व विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांनी मोबाईल हॅन्‍डसेट मधील बोर्ड बदलवुन दिला. त्‍यावेळी सुद्धा विरुध्‍द पक्षाने कसलीही दुरुस्‍ती शुल्‍क लावले नाही.
  4. प्रत्‍येकवेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला निशुल्‍क तसेच तात्‍काळ सेवा दिली आहे. परंतू तक्रारकर्त्‍याने प्रत्‍येकवेळी मोफत सेवा उपभोगुन सुध्‍दा  सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल केली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मोबाईल बदलवुन आणि खरेदी किंमत देण्‍याबाबत ऑफर दिली होती व सदर बाब (Issue Solved करण्‍याचा) सोडविण्‍याचा प्रयत्‍न केला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ४/८/२०१७ ला पञ पाठवुन खरेदी किंमतीचे पैसे परत करण्‍याबाबत ऑफर दिली होती परंतू तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने दिलेली ऑफर डावलून Unreasonable Demand  केली. तक्रारकर्त्‍याचा विरुध्‍द पक्षाकडुन Wrongful gain  घेण्‍याचा उद्देश दिसतो.
  5. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये Inherence Defect असल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही आहे. तक्रारकत्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये कोणताही निर्मीती दोष असल्‍याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही आहे. कोणत्‍याही सबळ पुराव्‍या अभावी सदर तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. मोबाईल हॅन्‍डसेटच्‍या दुरुस्‍तीबाबत विरुध्‍द पक्षाने तात्‍काळ सेवा तक्रारकर्त्‍याचे हॅन्‍डसेट बाबत दिलेली आहे त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला दिली नाही आहे. विरुध्‍द पक्षाने राष्‍ट्रीय आयोग यांनी पंजाब ट्रॅक्‍टर लिमीटेड वि.विर  प्रताप, (1997) II CPJ 81(NC) मधील न्‍यायनिवाडे व ईतर न्‍यायनिवाडे अभिलेखावर दाखल केले आहेत.
  6. उभयपक्षाने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता व उभयपक्षांच्‍या वकीलांनी केलेला तोंडी युक्‍तीवाद एकूण घेतल्‍यावर मंचाने खालिल मुद्दे विचारात घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नोंदविले आहेत. 

 अ.क्र.                           मुद्दे                                                                 उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

                दिली काय ?                                                                                होय

  1. काय आदेश ?                                                          अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन सोनी एक्‍सपेरीया (कलर व्‍हाईट) हॅन्‍डसेट ज्‍याचा आय.एम.ई.आय. नंबर ३५९०५७०६१४१३४३८, रिटेल इनव्‍हाईस नंबर १६/१७-०००१७६, दिनांक १/४/२०१६ अन्‍वये रुपये २३,९६०/- इतक्‍या  किंमतीमध्‍ये विकत घेतला. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द  पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वापरात असलेला मोबाईल हॅन्‍डसेट अनुक्रमे दिनांक २/१/२०१७, २८/२/२०१७, १४/०३/२०१७ रोजी जॉबशिट अन्‍वये दुरुस्‍ती करीता विरुध्‍द पक्षाकडे दुरुस्‍तीला टाकला. प्रत्‍येकवेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या  मोबाईल मधील दोष काढुन मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍त करुन तक्रारकर्त्‍याला कोणतेही शुल्‍क  न आकारता हस्‍तांतरीत केला. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या  मोबाईल हॅन्‍डसेट मध्‍ये वारंवार बिघाड होत असल्‍यामुळे व त्‍यातील दोष न काढल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला दिनांक १९/०४/२०१७ ला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याद्वारे मोबाईल हॅन्‍डसेट खरेदी रकमेची मागणी केली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ४/८/२०१७ ला पञ पाठवून तक्रारकर्त्‍याला त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट खरेदीपोटी खर्ची घातलेली रक्‍कम रुपये २३,९६०/- परत करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव पाठविला होता. परंतू तक्रारकर्त्‍याला सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडुन देण्‍यात आली नाही. तक्रारकर्त्‍याने मंचाचे अभिलेखावर मोबाईल हॅन्‍डसेट मधील निर्मीती दोष असल्‍याबाबत तज्ञ अहवाल सादर केला नसला तरी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ४/८/२०१७ ला पञ पाठवुन दोषपूर्ण मोबाईल हॅन्‍डसेट चा पुरवठा केल्‍याबाबत अप्रत्‍यक्षपणे कबुल केले आहे व तक्रारकर्त्‍याला खरेदी किंमत रुपये २३,९६०/- देण्‍याची तयारी दर्शविली होती. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येत आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याने मोबाईल हॅन्‍डसेट पोटी खरेदी साठी खर्ची घातलेली रक्‍कम रुपये २३,९६०/- या रकमेवर दिनांक ४/८/२०१७ पासुन ७ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावी.
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरीक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- अदा करावे.
  4. नादुरुस्‍त मोबाईल विरुध्‍द पक्षाने आपल्‍याकडे (स्‍वतःकडे ) ठेवावा.  
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.