अर्जदार/दरखास्तदार वकिलांसह गैरहजर.
आरोपी क्र. 2 स्वतः हजर, त्यांचेतर्फे अॅड उदय मालशेट्टी हजर.
आरोपी क्र. 3 यांना काढलेला समन्स प्राप्त झालेला आहे. परंतु कोव्हीड-19 च्या प्रभावामुळे आरोपी आज आयोगात उपस्थित राहू शकत नाही असे त्यांचे वकिल यांनी निवेदन केले. त्यामुळे आरोपी क्र. 3 यांची आजच्या पुरती गैरहजेरी माफ करण्याबाबतची तोंडी विनंती मान्य करण्यात आली.
आरोपी क्र. 1 ते 3 यांच्याकरीता त्यांच्या वकिलांनी आज वकालतनामा दाखल केला, स्विकृत. तसेच मूळ तक्रारीमध्ये पारीत केलेल्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणेकामी रक्कम रुपये 1,05,264/ चा धनाकर्ष क्रमांक 688236 दिनांक 22/02/2021 अॅक्सीस बॅंकेच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर केला.स्विकृत. तसेच दरखास्तदारांनी सदर रक्कमेचा धनाकर्ष स्विकारणेकामी व आरोपीने जामीनाची पूर्तता करणेकामी पुढील तारीख 12/03/2021 देण्यात येते.
विलंबाने दरखास्तदार स्वतः हजर.
आरोपीने दाखल केलेल्या धनाकर्ष रक्कम रुपये 1,05,264/- ही मूळ आदेशातील व्याजासह होणारी रक्कम असल्याने सामनेवाले यांच्या अर्जावर लेखी जबाब देवून दरखास्तदारांनी सदर धनाकर्ष स्विकारला.
आरोपीने मूळ तक्रारीतील आदेशाची संपूर्ण पूर्तता केली असल्याने दरखास्तदारांनी तक्रार मागे घेणेकामी अर्ज सादर केला. मूळ तक्रारीतील आदेशाची पूतता केली असल्यामुळे दरखास्तदारांचा अर्ज मंजूर.
मूळ तक्रारीतील आदेशाची संपूर्ण पूर्तता झाली असल्याने आरोपीविरुध्द जामीन कदबा घेण्यात आलेला नाही. दरखास्त मागे घेण्याचा अर्ज मंजूर करण्यात आल्याने सदर दरखास्त वादसूचीवरुन काढण्यात आली. प्रकरण समाप्त.