::: नि का ल प ञ:::
निशाणी क्रं. 1 वर आदेश
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 29/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने वेगवेगळया कंपनी मध्ये नौकरी देण्याकरीता रु. 1685/- नोंदणी शुल्क अर्जदाराकडून घेतले. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराकडून 4,999/- रु. ट्रेनिंग करीता मागितले यावर अर्जदाराने पैसे देण्यास नाकारले व त्याची नोंदणी रद्द करुन भरलेले पैसे परत मिळावे अशी मागणी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे केली. गैरअर्जदाराने अर्जदाराला डिक्लरेशन फॉर्म मध्ये अर्जदाराच्या बॅकेच्या ट्रान्झेक्शन आयडी भरुन दयावे असे सांगितले त्यावर अर्जदाराने त्याचे डिक्लेरेशन फॉर्मवर आयडी नं. भरल्यानंतर अर्जदाराच्या बॅकेमधून रु.9,776/- कमी झाले. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराकडे विचारपूस करतांना गैरअर्जदाराने अर्जदाराला सांगितले कि, अर्जदाराचे कमी केलेले रु. त्याला 72 तासात परत मिळून जातील. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे परत संपर्क साधल्यानंतर त्यांचे कर्मचारी श्री. विवेक यांनी अर्जदाराला असे सांगितले कि, अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे कोणतेही पैसे आले नाही त्यावर अर्जदाराने वरील नमुद असलेले बॅकेंच्या व्यवहाराची माहीती गैरअर्जदाराचे कर्मचा-यांना पुरविली आाणि गैरअर्जदाराचे कर्मचा-यांनी अर्जदाराला सांगितले कि, दि. 21 जुलै 2014 पर्यंत अर्जदाराने भरलेले पैसे अर्जदाराला परत मिळणार. अर्जदराला दि. 21 जुलै 2014 ला वरील नमुद असलेली रक्कम गैरअर्जदाराकडून मिळाली नसल्यामुळे अर्जदाराने दि. 22 जुलै 2014 रोजी गैरअर्जदाराकडे त्यांचे मोबाईल नं. वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु गैरअर्जदाराचे मोबाईल नं. बंद होते त्यानंतरअर्जदाराने गैरअर्जदाराला ई-मेल व्दारे संपर्क साधला परंतु गैरअर्जदाराने त्यावरही कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून अर्जदाराला वाटले कि गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे म्हणून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
2. अर्जदाराच्या सदर तक्रारीवर प्राथमिक युक्तीवाद ऐकून खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) सदर तक्रार मंचाच्या अधिकार क्षेञात आाहे काय ? नाही.
3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
3. गैरअर्जदाराने वेगवेगळया कंपनी मध्ये नौकरी देण्याकरीता 1685/- रु. नोंदणी शुल्क अर्जदाराकडून घेतले. सबब अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते म्हणून मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
4. अर्जदाराच्या तक्रारीत गैरअर्जदाराचा पत्ता न्यु दिल्लीचा पत्ता दर्शविण्यात आलेला आहे तसेच गैरअर्जदाराच्या कंपनीचा व्यवसाय दिल्ली मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराला नोंदणीकरीता 1685/- रु. त्यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया, झाशुगोंडा शाखा – 0238 असलेले बचत खाता क्रं. 11346852532 मधून देण्यात आले होते. सबब सदर तक्रार दाखल करण्याचे कारण झाशुगोंडा येथे निर्माण झाले आहे. कलम 11 (2), बी/सी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 प्रमाणे सदर तक्रार दाखल करण्याचे कार्यक्षेञ दिल्ली किंवा झाशुगोंडा आहे सबब सदर तक्रार या मंचाच्या कार्यक्षेञात येत नसल्यामुळे मुद्दा 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
5. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
//अंतीम आदेश//
1) सदर तक्रार कलम 11 (2) बी व सी ग्राहक सरंक्षण कायदा 1986 प्रमाणे मंचाच्या कायक्षेञामध्ये येत नसल्यामुळे अस्विकृत करण्यात येत आहे.
2) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति देण्यात याव्या.
3) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 29/10/2014