// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 14/2015
दाखल दिनांक : 30/01/2015
निर्णय दिनांक : 23/04/2015
श्रीमती सोनाली राजेश उर्फ राजु पंचबुध्दे
वय 26 वर्षे, व्यवसाय – घरकाम
रा. वार्ड नं. 2, नुतन चौक, धामणगांव रेल्वे,
ता. धामणगांव रेल्वे जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं.लि.
रा. ए-501, गणेश प्लाझा, नवरंगपुरा, अहमदाबाद
गुजरात ३८०००९
- विभागीय व्यवस्थापक युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं.लि.
बडनेरा रोड, अमरावती
ता.जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. जाधव / अॅड. तायडे
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. थोरात
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 23/04/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तिचे पती राजेश यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून रुरल अॅक्सीडेंड पॅकेज पॉलिसी अंतर्गत विमा पॉलिसी काढली होती. (यापुढे विमा पॉलिसी असे संबोधण्यात येईल) पॉलिसीची मुदत दि. १०.११.२०११ ते ९.११.२०१५ होती.
3. तक्रारदाराचे पती हे दि. ६.९.२०१३ रोजी मोटर सायकलने जात असतांना बस क्र. एमएच-12/टि.एफ- 6437 ने त्यास धडक दिली त्यात तक्रारदाराच्या पतीचा मृत्यु झाला. त्याबद्दलची फीर्याद पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे देण्यात आली असता बसच्या चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
4. पती मयत झाल्यावर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेकडे विमा पॉलिसी अंतर्गत रक्कम मिळण्यासाठी दि. ५.१२.२०१३ रोजी अर्ज सादर केला. 10 महिने होऊन सुध्दा विरुध्दपक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तिला सांगितले की, तिचा अर्ज विरुध्दपक्ष क्र. 1 कडे
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..3..
पाठविण्यात आला आहे. बराच अवधी होऊन तिच्या अर्जावर निर्णय घेवून पॉलिसी अंतर्गत देय होणारी रक्कम देण्याचे विरुध्दपक्ष यांनी टाळाटाळ केल्याने तिने दि. ११.९.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली, ती मिळूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे तिने हा तक्रार अर्ज दाखल करुन त्यात पॉलिसी अंतर्गत देय होणारी रक्कम व विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केल्यामुळे तिला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केला.
5. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 11 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, मय्यत राजेश यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विमा पॉलिसी काढली होती व तिची मुदत दि. १०.११.२०११ ते ९.११.२०१५ पर्यंत होती. त्यांनी असे कथन केले की, दि. ५.१२.२०१३ रोजी तक्रारदाराचा दावा अर्ज मिळाला त्यानंतर तिचे पतीचा अपघाती निधन झाले ही माहिती त्यांना मिळाली. तक्रारदाराने दाखल केलेला अर्ज विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे मंजूरी करीता पाठविला आहे. नुकसान भरपाई त्वरीत मिळावी यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 प्रयत्न करीत आहे, ही माहिती तक्रारदाराला दिलेली आहे. तिचा दावा अर्ज हा नामंजूर केलेला नाही. तक्रारदाराने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्ष
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..4..
क्र. 1 कडे पाठविण्यात आली आहे. तक्रारदार हिने मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्चाबाबत केलेली मागणी त्यांनी नाकारुन शेवटी तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली.
6. तक्रारदाराने निशाणी 14 ला पुरसीस देवून प्रतिउत्तर दाखल करावयाचे नाही असे कथन केले. विरुध्दपक्षा तर्फे निशाणी 15 ला पुरसीस देण्यात येऊन त्यांना कोणताही पुरावा द्यावयाचा नाही असे कथन त्यात केले.
7. तक्रार अर्ज, लेखी जबाब, तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. जाधव व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. थोरात यांचा युक्तीवाद ऐकला त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- विमा पॉलिसी अंतर्गत तक्रारदार ही विमा
रक्कम मिळण्यास पात्र आहे का ? .... होय
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली
आहे का ? ... विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द शाबीत
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..5..
कारणमिमांसा ः-
8. विरुध्दपक्ष यांचा निशाणी 11 लेखी जबाब पाहता हे स्पष्ट होते की, तक्रारदाराचे मय्यत पती यांनी विमा पॉलिसी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे काढलेली होती जी दि. ९.११.२०१५ पर्यंत अस्तीत्वात आहे. या पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यु झाल्यास रु. १,००,०००/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. युक्तीवाद दरम्यान विरुध्दपक्षा तर्फे अॅड. थोरात यांनी असे कथन केले की, विरुध्दपक्ष हे तक्रारदाराला या पॉलिसी अंतर्गत रु. १,००,०००/- देण्यास तयार आहे. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, पॉलिसी अंतर्गत रु. १,००,०००/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. यावरुन मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
9. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. थोरात यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराची विमा पॉलिसी अंतर्गत रक्कम मिळण्याचा अर्ज विरुध्दपक्ष क्र. 2 ला प्राप्त झाल्यावर त्यांनी तो लगेच विरुध्दपक्ष क्र. 1 कडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला व त्याबद्दलची सूचना तक्रारदाराला देण्यात आली होती. विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्या अर्जावर योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. रेकॉर्डवर उपलब्ध दस्त पाहता अॅड. श्री. थोरात यांचा हा युक्तीवाद
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..6..
स्विकारण्यात येतो. असे जरी असले तरी विरुध्दपक्षाच्या कथना प्रमाणे तक्रारदाराने दि. ५.१२.२०१३ रोजी पॉलिसी अंतर्गत रक्कम मिळण्याचा अर्ज विरुध्दपक्ष क्र. 2 कडे केला होता जो त्यांनी लगेच विरुध्दपक्ष क्र. 1 कडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असे असतांना त्या अर्जावर योग्य त्या कालावधीत निर्णय घेण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्र. 1 यांची होती, परंतु बराच कालावधी होऊन अद्याप त्यांनी त्या अर्जावर निर्णय घेतला नाही. तसेच तक्रारदाराने दि. १७.९.२०१४ रोजी नोटीस पाठविली जी विरुध्दपक्ष क्र. 1 यांना मिळूनही त्यांनी त्या अर्जावर आजपर्यंत निर्णय घेतला नाही व तक्रारदाराच्या नोटीस प्रमाणे कार्यवाही केल्याचे निष्पन्न होत नाही. बराच महिन्याच्या कालावधीत निर्णय न घेणे व नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी उत्तर न देणे ही त्यांची कृती सेवेतील त्रुटी ठरते त्यामुळे तक्रारदाराला जो मानसिक त्रास झाला त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेवर येते. सबब मुद्दा क्र. 2 ला असे उत्तर देण्यात येते की, विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे.
10. वरील नमूद कारणावरुन मुद्दा क्र. 1 व 2 ला दिलेल्या उत्तरावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार ही विमा पॉलिसी अंतर्गत रु. १,००,०००/- नुकसान भरपाई मिळण्यास
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..7..
पात्र ठरते व ती देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांची संयुक्तीक आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेत जी त्रुटी केली आहे त्यामुळे ते या देय रक्कमेवर दि. ५.१२.२०१३ पासुन व्याज देण्यास जबाबदार ठरतात. सबब खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंतशः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मय्यत राजेश यांच्या विमा पॉलिसी अंतर्गत देय होणारी रक्कम रु. १,००,०००/- त्यावर दिनांक ५.१२.२०१३ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने तक्रारदाराला द्यावे या निकालाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत द्यावे, अन्यथा त्यावर द.सा.द.शे. 10 टक्के व्याज देय होईल.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराला या तक्रार अर्जाचा खर्च रु. ३,०००/- द्यावे व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
ग्राहक तक्रार क्रमांकः 14/2015
..8..
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु. ३,०००/- नुकसान भरपाई द्यावी.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 23/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष