Maharashtra

Kolhapur

CC/12/16

Gajanan Bandu Patil - Complainant(s)

Versus

The Manager,The Reliance General Insurance Co.Ltd - Opp.Party(s)

C.B.Kore

26 Apr 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/12/16
 
1. Gajanan Bandu Patil
Vadakshiwale.Tal.Karveer,Kolhapur.
...........Complainant(s)
Versus
1. The Manager,The Reliance General Insurance Co.Ltd
Pune Br.Office :-Pushpam Plaza,Ground Floor,135/B,Tadiwala Road,Pune. Kolhapur Br.Office:- 517/AZ RD Vichare Complex,Jemstone,Shop no.71 to74,Kolhapur.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:C.B.Kore, Advocate for the Complainant 1
 Kolekar, Advocate for the Opp. Party 1
ORDER

निकालपत्र :- (दि.26/04/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍या मुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- तक्रारदार यांचा मालकीचा टाटा ट्रक सन2011 मॉडेलचा रजि. क्र.MH-09-BC-8197 चा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला आहे. सदर विमा पॉलीसीची मुदत दि.18/01/2011 ते 17/01/2012 अखेर होती.तक्रारदार यांनी ओन डॅमेज करिता रक्‍कम रु.9,016.58/- इतका प्रिमियम विमा कंपनीकडे भरलेला आहे. सदर गाडीची आय.डी.व्‍ही. किंमत रु.5,96,923/- इतकी आहे. तक्रारदार यांचे भाऊ श्री कृष्‍णात बंडू पाटील यांनी दि.18/05/2011 रोजी चाकणहून कोल्‍हापूरकडे येत असताना सदर तारखेदिवशी रात्री 00.30 वाजता नाशिक पुणे हायवेरोड, जुन्‍या गजानन पेट्रोल पंपासमोर, भोसरी मध्‍ये भोसरी पोलीस स्‍टेशनच्‍या हद्दीत अपघात झाला. सदरचा अपघात स्‍टेशन डायरी रजिस्‍टर नं.3/2011 याखाली नोंद आहे. ड्रायव्‍हर वर गुन्‍हा नोंद नाही. अपघातानंतर सदर ट्रक कोल्‍हापूर येथील डिलर चेतन मोटर्स यांचेकडे डॅमेज सर्व्‍हेकरिता आणणेत आला. सदर अपघाताची माहिती सामनेवाला विमा कंपनीला तक्रारदार यांनी कळवली व सदर अपघातग्रस्‍त ट्रक चेतन मोटर्स,कोल्‍हापूर यांचेकडे आणल्‍याचेदेखील कळविले होते. त्‍यानंतर विमा कंपनीने स्‍वत: अपघातातील ट्रकचा सर्व्‍हे करणार असल्‍याचे सांगितले. सदर ट्रकचा सर्व्‍हे चेतन मोटर्स,कोल्‍हापूर यांनी करुन दि.20/05/2011 रोजी सर्व्‍हे रिपोर्ट तक्रारदार यांचेकडे दिला होता. सदर सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे ट्रक दुरुस्‍तीकरिता रक्‍कम रु.2,26,644/- इतका मजुरीसह खर्च आहे. सदरचा सर्व्‍हे रिपोर्ट व पोलीस पेपर्स तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे दिले होते. सामनेवाला यांनी डॅमेज क्लेम नाकारत असल्‍याबाबतचे पत्र दि.30/07/2011 रोजी तक्रारदार यांना पाठवून सदर पत्रामध्‍ये टाटा ट्रक चालकाचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स हे एल.एम.व्‍ही.चे आहे तरी सदर चालकाचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स हे एल.एम.व्‍ही. ट्रान्‍सपोर्टचे नाही म्‍हणून असे कारण देऊन तक्रारदार यांचे डॅमेज क्‍लेमची जबाबदारी नाकारली.
 
           सदर अपघात हा ड्रायव्‍हरचे चुकीमुळे झालेला नाही. तसेच ड्रायव्‍हरचे ड्रायव्‍हींग लायसन्‍समध्‍ये Tractor with Trailer असे नमुद असताना इन्‍शुरन्‍स कंपनीला डॅमेज क्‍लेम नाकारता येत नाही. सबब तक्रारदारास ईस्‍टीमेट रिपोर्टप्रमाणे रक्‍कम रु.2,26,644/- मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, कार टोईंग खर्च रु.15,000/-, असे एकूण रक्‍कम रु.2,66,644/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदाराचे मालकीच्‍या टाटा ट्रक क्र. MH-09-BC-8197 ची इन्‍शुरन्‍स पॉलीसी व आर. सी. बुक, अपघात घटना स्‍थळाचा पंनामा, ड्रायव्‍हींग लायसन्‍स, ईस्‍टीमेशन रिपोर्ट, रेशन कार्ड इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.  
 
(4)        सामनेवालाने दाखल केलेल्‍या म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्‍य केले कथनाखेरीज परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदारांचा टाटा ट्रक क्र.MH-09-BC-8197 या कमर्शिअल वाहनाचा विमा उ‍तरविलेला होता हे मान्‍य आहे. परंतु सदरचा ट्रक हा व्‍यापारी कारणासाठी म्‍हणजेच ट्रान्‍सपोर्ट/मालवाहतूकीचे धंदयाकरिता वापरत होते. त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयामधील ग्राहक या व्‍याख्‍येमध्‍ये येत नसलेने मे. कोर्टात चालणेस पात्र नाही. तक्रारदारांनी सदरील वाहन माल वाहतूकीसाठीच खरेदी केले होते व अपघातावेळीही तक्रारदार हे माल वाहतूक करत होते. सबब तक्रारदाराचे कथनाप्रमाणे तक्रारदाराचे लायसन्‍स नं.83/6813/केएल हे लाईट मोटर व्‍हेईकल(नॉन ट्रान्‍सपोर्ट)साठी वैध असेल तर अपघाताचे वेळी तक्रारदार हे मालवाहतूकीचे वाहन चालवत असलेने तक्रारदाराचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स हे टाटा ट्रक या मालवाहतूक ट्रकसाठी वैध नव्‍हते व अपघातावेळी वाहनाचे ड्रायव्‍हरकडे योग्‍य व वैध ड्रायव्‍हींग लायसन्‍स असलेखेरीज मोटार वाहन कायदयाप्रमाणे तसेच पॉलीसीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे क्‍लेम देता येत नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला आहे. सदर निर्णय हा पूर्णपणे योग्‍य व कायदेशीर आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
 
(5)        सामनेवालांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ पूर्वाधार दाखल केलेले आहेत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे वकीलांनी केलेला युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार सदर मंचास चालणेस पात्र आहे का?      --- होय.
2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे का?                  --- नाही.
3. काय आदेश ?                                                          --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणेमधील कलम 2 मध्‍ये व्‍यापारी कारणासाठी सदर ट्रकचा वापर केला असलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र नसलेचा आक्षेप घेतलेला आहे. सदर आक्षेपाचा विचार करता विमा सेवा या विविध कारणासाठी विमा संरक्षण देत असतात. यामध्‍ये व्‍यक्तीच्‍या जीवन संरक्षण, मेडिक्‍लेम, पशुविमा, वाहनाचा विमा तसेच विविध कारणास्‍तव वेगवेगळया प्रकारच्‍या विमा सेवा देतच असतात. प्रस्‍तुत तक्रारीमधील तक्रारदाराच्‍या मालकीच्‍या ट्रकचा विमा उतरविलेला होता. सदरचा विमा हा अपघातामध्‍ये ट्रकचे नुकसान झालेस सरंक्षणासाठी उतरविलेला होता. सदर बाबींचा विचार करता वाहनाच्‍या अपघाती नुकसानीपासून संरक्षण व्‍हावे हा हेतू आहे यामध्‍ये कोणताही व्‍यापारी हेतू नाही; सबब प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 व 3 :- तक्रारदाराचे मालकीचा ट्रक हा टाटा कंपनीचा असून नेांदणी क्र. MH-09-BC-8197आहे. सदर तक्रारदाराचे ट्रकचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता हे सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये मान्‍य केलेले आहे. दाखल विमा पॉलीसीप्रमाणे नमुद वाहनाची आयडी व्‍हॅल्‍यू रक्‍कम रु.5,96,923/- असून पॉलीसीचा कालावधी हा दि.18/01/2011 ते 17/01/2012 अखेर आहे. सदर पॉलीसी कालावधीत तक्रारदार यांचे भाऊ श्री कृष्‍णात बंडू पाटील यांनी दि.18/05/2011 रोजी चाकणहून कोल्‍हापूरकडे येत असताना सदर तारखेदिवशी रात्री 00.30 वाजता नाशिक पुणे हायवेरोड, जुन्‍या गजानन पेट्रोल पंपासमोर, भोसरी मध्‍ये भोसरी पोलीस स्‍टेशनच्‍या हद्दीत अपघात झाला. सदर ट्रकची पाहणी करुन चेतन मोटर्स,कोल्‍हापूर यांनी दि.20/05/2011 रोजी ट्रक दुरुस्‍तीकरिता रक्‍कम रु.2,26,644/- इतक्‍या (ईस्‍टीमेट) अंदाजीत खर्चाचे पत्रक दिलेचे दिसून येते.
 
           तक्रारदाराने सामनेवालांकड वाहन नुकसानीची मागणी केली असता दि.31/07/2011 रोजी सामनेवाला यांनी नमुद वाहनाचा ड्रायव्‍हर कृष्‍णा पाटील यांचेकडे विमा उतरविलेले वाहन जे अपघातग्रस्‍त झालेले आहे ते चालवणेचा अधिकृत वैध चालक परवाना नसलेमुळे क्‍लेम नाकारलेला आहे. नमुद कृष्‍णा पाटील यांचेकडे असणारे लायसन्‍स D/LNo.83/6813/KL L.A. Kolhapur  हे L.M.V. N.T. साठीचा चालक परवाना आहे. तर अपघातग्रस्‍त झालेले वाहन हे हेवी मोटर व्‍हेईकल अंतर्गत मोडते. तक्रारदाराकडे नमुद ट्रक चालवणेचा अधिकृत चालक परवाना नसलेची वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.
 
           तक्रारदाराचे वकीलांनी नमुद कृष्‍णा बंडू पाटील यांचेकडे असणारे लायसन्‍स हे ट्रॅक्‍टर विईथ ट्रेलर कवहर सायकल वुईथ गिअर लाईट मोटर व्‍हेईकल (L.M.V.) शिक्‍क्‍यासाहीत असलेचे दाखवून दिेलेले आहे. सबब नमुद ड्रायव्‍हरकडे ट्रॅक्‍टर वुईथ ट्रेलर चालवणेचा परवाना असलेने तो ट्रक चालवू शकतो. तसेच झालेला अपघात हा ड्रायव्‍हरचे चुकीमुळे झालेला नाही. नमुद अपघातामध्‍ये वाहनाची नुकसानी झालेली आहे. त्‍यामुळे नॉन स्‍टॅन्‍डर्ड बेसीसचे आधारे क्‍लेम आदा करणेबाबत जोरदार युक्‍तीवाद केलेला आहे. त्‍यासाठी तक्रारदाराचे वकीलांनी 2008(1) TAC 812 (S.C.), 2000ACJ 319 (S.C.), 2010(2) TAC 661 (Ovi), 2008 (1) ACC 768,  2002 ACJ 252,  2006 TAC 1016 पूर्वाधार दाखल केलेले आहेत.
 
           सामनेवाला यांचे वकीलांनी यास जोरदार हरकत घेतलेली आहे. तसेच सामनेवाला यांचे वकीलांनीही 2008ACJ627 S.C., 2008 ACJ 2161 S.C., 2009(2)SCR 329 S.C., 2010 ACJ 2706, Kaut H.C., 2012 ACJ 474 Chatisgar H.C., 2009 ACJ 666 S.C>, III (2010) CPJ 256 N.C., 2010 ACJ 2044 S.C. पूर्वाधार दाखल केलेले आहेत.   
 
           तक्रारदाराने दाखल केलेला 2008 (1) T.A.C. 812 (S.C.) SUPREME COURT- NATIONAL INSURANCE CO.LTD. Vs. ANNAPPA IRAPPA NESARIA & OTHERS – मध्‍ये  एल.एम.व्‍ही. लाईट मोटर वहेईकलचे लायसन्‍स हे लाईट गुडस व्‍हेईकलसाठी वैध असलेचा निर्वाळा दिलेला आहे. सबब प्रस्‍तुत प्रकरणातील वाहन हे ट्रक असून ते हेवी गुडस व्‍हेईकल आहे. त्‍यामुळे प्रस्‍तुत पूर्वाधार हा या प्रकरणी लागू होत नाही असे या मंचाचे मत आहे. तसेच 2000 ACJ 319 Supreme Court- Civil Appeal No.4490 of 1996 decided on 2.9.1999- Ashok Gangadhar Maratha Vs. Oriental Insu. Co.Ltd  या पूर्वाधाराचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणी चालकाकडे असलेला लाईट मोटर व्‍हेईकल परवाना तसेच तो चालवत असलेला माल वाहतूक करणारे अपघातग्रस्‍त वाहन हे अपघातावेळी 6000 किग्रॅ. पेक्षा कमी वजनाचे असेल  तर त्‍यासाठी एल.एम.व्‍ही. परवाना ग्राहय धरता येईल असा निर्वाळा दिलेला आहे. मात्र सामनेवाला यांनी दाखल केलेले 2008 ACJ 627 Supreme Court- C.A.No.5539,5540, and 5541 of 2007 decided on 30.11.2007- New India Insurance Co. Ltd. Vs. Prabhu Lal –Motor Vehicles Act, 1988, sections 149 (2) (a) (ii), 2 (14), 2 (47) and 3 (1)-Motor insurance-Driving  licence-Liability of insurance company-Truck damaged in accident and insured lodged claim with insurance company-Insurance company repudiated the claim on the ground that person who driving the vehicle had no valid licence-Insured filed complaint under Consumer Protection Act and contended that one ‘MJ’ who was driving the vehicle had licence to drive ‘ light motor vehicle’ and ‘ heavy motor vehicle’-F.I.R. stated that vehicle was being driven by one ‘RN’ –District Forum held that ‘RN’ was driving the vehicle and not ‘MJ’ ; ‘RN’ had licence to drive ‘light motor vehicle’ and he could not have driven a ‘transport vehicle’ and dismissed the complaint-State Commission held that since the gross weight of the vehicle was 6800 kg and did not exceed permissible limit of 7500 kg nor it was carrying goods at the time of accident, it was a ‘light motor vehicle’ and insurance company was liable-National Commission confirmed the order of the State Commission-Apex Court observed that according to permit issued by the transport Authority, vehicle was a goods carrier and it was a transport vehicle falling under section 2(47)-Whether the District Forum was justified in holding that driver who had licence to drive ‘light motor vehicle’ without any endorsement entitling him to drive transport vehicle was not authorized to drive the truck which is a goods vehicle and insurance company is not liable.  
 
                        प्रस्‍तुत पूर्वाधारामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी अशोक गंगाधर मराठा पूर्वाधाराचा उल्‍लेख केलेला आहे. सबब तक्रारदाराचा पूर्वाधार प्रस्‍तुत प्रकरणी विचारात घेता येणार नाही. तर सामनेवाला यांनी दाखल केलेले मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा पूर्वाधाराचा विचार करता तक्रारदाराकडे ट्रक चालवणेचा परवाना नव्‍हता ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. सबब सामनेवाला विमा कंपनी नमुद अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या नुकसानीसाठी रक्‍कम देणेस जबाबदार नाही या‍ निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तक्रारदाराचे वकीलांनी 2010 STPL (Web) 212 SC Amalendu sahoo Vs. Oriental Insu. Co. Ltd. चा पूर्वाधाराचा आधार घेऊन नॉन स्‍टॅन्‍डर्ड बेसीसवर क्‍लेम मिळावा असा युक्‍तीवाद केलेला आहे. प्रस्‍तुत पूर्वाधारात मा. राष्‍ट्रीय आयोग, दिल्‍ली यांनी न्‍यु इंडिया एशो. कं. लि. विरुध्‍द नारायणप्रसाद आप्‍पाप्रसाद पाठक(2006 सीपीजे144 एनसी) चा उल्‍लेख केलेला आहे. प्रस्‍तुत पूर्वाधारानुसार
 

Sr.No.
Description
Percentage of settlement
(i)
Under declaration of licensed carrying capacity
Deduct 3 years diferene in premium from the amount of claim or deduct 25 % of claim amount, whichever is higher
(ii)
Overloading of vehicles beyond licensed carrying capacity
Pay claims not exceeding 75% of admissible claim
(iii)
Any other breach of warranty/condition of policy including limitation as to use
Pay upto 75% of admissible claim  

प्रस्‍तुत 75 टक्‍के नॉन स्‍टॅन्‍डर्ड बेसीसवर रक्‍कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय याचा विचार करता प्रस्‍तुत पूर्वाधारानुसार Clause iii चा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणी ट्रक चालवणेचा परवाना नसलेने मुलभूत अटीचा (Breach of Fundamental Condition)  भंग झालेला आहे. तसेच प्रस्‍तुतचे क्‍लेम हे लिमिटेशन अॅज टू यूजसाठीही देता येत असलेचे नमुद केले आहे. मात्र प्रस्‍तुत प्रकरणी तशी परिस्थिती नसलेने प्रस्‍तुत पूर्वाधार सदर प्रकरणी लागू होत नाही. सबब तक्रारदार हा नॉन स्‍टॅन्‍डर्ड बेसीसचे आधारे क्‍लेम मिळणेस पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेले इतर पूर्वाधारसुध्‍दा प्रस्‍तुत प्रकरणी लागू होत नाहीत.
 
           सामनेवाला यांनी दाखल केलेले2008 ACJ 627 Supreme Court- C.A.No.5539,5540, and 5541 of 2007 decided on 30.11.2007- New India Insurance Co. Ltd. Vs. Prabhu Lal  हा पूर्वाधार प्रस्‍तुत प्रकरणी तंतोतंत लागू होतो. सबब वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
 
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
 
 
 
[HON'ABLE MR. Mr.M.D.Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.