Maharashtra

Jalna

CC/86/2013

Mauli Traders Through Its Propriter Shri.Pralhad Rambhau Mane - Complainant(s)

Versus

The Manager,The new Assurance co.Ltd. - Opp.Party(s)

P.M.Parihar

04 Mar 2014

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/86/2013
 
1. Mauli Traders Through Its Propriter Shri.Pralhad Rambhau Mane
R/o.Naya Mondha,Tq.Partur
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Manager,The new Assurance co.Ltd.
Lakkadkot,Jalna
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:P.M.Parihar, Advocate
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 04.03.2014 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)

प्रस्‍तुत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार परतूर जि.जालना येथील रहिवासी असून माऊली ट्रेडर्स या नावाने व्‍यवसाय करतात. ते मार्केट कमिटीच्‍या आवारात नवा मोंढा येथे शेतमालाची खरेदी-विक्री करतात. त्‍यासाठी त्‍यांनी सांगली अर्बन को-ऑप बॅंकेकडून कर्ज घेतले होते.

गैरअर्जदार ही विमा कंपनी आहे. तक्रारदारांनी त्‍यांचेकडून दुकानदार विमा पॉलीसी   घेतली होती. तिचा पॉलीसी क्रमांक 160501/01/10/000000126 असा असून वैधता    कालावधी दिनांक 21.04.2010 ते 20.04.2011 असा होता. दिनांक 02.07.2010 रोजी                   त्‍यांचे दुकानात 27 क्विंटल तूरडाळ, 20 क्विंटल सोयाबीन व 8 क्विंटल ज्‍वारी असा माल होता. जो त्‍यांनी शेतक-यांकडून रुपये 2,00,000/- ऐवढया रकमेने विकत घेतला होता. त्‍या दिवशी परतूर येथे जोरदार वादळ व पाऊस झाला. वादळाने दुकानावरील पत्रे उडून गेले व पावसाचे पाणी दुकानात शिरुन दुकानातील धान्‍य खराब झाले.

वरील घटनेची खबर तहसील ऑफीस परतूर यांना देण्‍यात आली. तेथील अधिकारी घटनास्‍थळी आले व त्‍यांनी पाहणी करुन दिनांक 05.07.2010 रोजी पंचासमक्ष पंचनामा केला. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे त्‍यांचा विमा दावा दाखल केला. परंतू गैरअर्जदारांनी दिनांक 24.08.2011 रोजी “विमा प्रस्‍तावात संरक्षित असलेल्‍या घटनांमुळे नुकसान झालेले नाही. पावसामुळे झालेले नुकसान विमा पॉलीसीत अंतर्भूत नाही”. या कारणाने प्रस्‍ताव नाकारला.

तक्रारदारांचे झालेले नुकसान वादळ व पावसाने झालेले आहे. सदरील नुकसान पावसाच्‍या पाण्‍यामुळे झालेले आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई देणे आवश्‍यक होते असे असताना चुकीच्‍या व अयोग्‍य कारणाने गैरअर्जदारांनी विमा प्रस्‍ताव नाकारला आहे म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

त्‍यांनी आपल्‍या तक्रारी सोबत दावा नाकारल्‍याचे पत्र, पॉलीसीची कव्‍हर नोट, त्‍यांच्‍या दुकानातील माल खरेदीच्‍या पावत्‍या, व्‍यापारी पत्रक, क्‍लेम फॉर्म, गैरअर्जदार यांच्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेरचा चौकशी अहवाल इत्‍यादि कागदपत्रे दाखल केली आहेत.

गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्‍यांच्‍या जबाबानुसार त्‍यांनी विमा करारातील अटी दाखल केल्‍या आहेत. त्‍यातील पान क्रमांक 11 वर “Perils No.-1 Fire and allied perils” असे नमूद केले आहे. तक्रारदाराच्‍या प्रस्‍तावाचे अवलोकन करता विमा करारात संरक्षित असलेल्‍या ‘Perils’ मुळे नुकसान झालेले नाही ही गोष्‍ट स्‍पष्‍ट होते. पावसामुळे झालेले नुकसान वरील पॉलीसीत समाविष्‍ट नाही. त्‍यामुळे विमा कंपनीने दावा नाकारला व तसे पत्र दिनांक 22.08.2011 रोजीच तक्रारदारांना पाठवले. यात त्‍यांची सेवेतील त्रुटी अथवा कमतरता नाही. म्‍हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.

तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला. त्‍यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.

         मुद्दे                                           निष्‍कर्ष

1.गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव

  नाकारला हे योग्‍य आहे का ?                                    नाही

 

2.तक्रारदार गैरअर्जदार यांचेकडून नुकसान

  भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत का ?                               होय

 

3.काय आदेश ?                                          अंतिम आदेशा नुसार

 

कारणमीमांसा

 

मु्द्दा क्रमांक 1 साठी – तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यात (नि.3/6) मध्‍ये “दिनांक 02.07.2010 च्‍या वादळामुळे व अती पावसामुळे दुकानावरील लोखंडी पत्रे उडाल्‍यामुळे पावसाचे पाणी दुकानात शिरले व खालूनही पाणी वाहिल्‍याने धान्‍ये खराब झाली आहेत” व सदरील मालाचे अंदाजे रुपये 2,00,000/- चे नुकसान झाले असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांच्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने दिनांक 11.03.2011 रोजी गैरअर्जदार कंपनीला पत्र पाठवले (नि.3/5) त्‍यात त्‍यांनी परतूर येथे जावून घटनेची शहानिशा केल्‍याचे व तलाठी परतूर यांनी तक्रारदारांच्‍या नुकसानीचा पंचनामा दिनांक 05.07.2010 रोजी केल्‍याचे व त्‍याची सत्‍यप्रत हस्‍तगत केल्‍याचे मान्‍य केले आहे. गैरअर्जदार यांनी सर्वेअरची नेमणूक केल्‍याचा पुरावा अथवा त्‍यांचा अहवाल मंचात दाखल झालेला नाही. तसेच गैरअर्जदार यांनी दावा नाकारल्‍याच्‍या पत्रात केवळ पावसाने झालेले नुकसान पॉलीसीत अंतर्भूत नाही या कारणाने दावा नाकारलेला आहे. प्रस्‍तुत घटना घडली नाही असा त्‍यांचा बचाव नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी दिनांक 02.07.2010 रोजी पाऊस व वादळी   वा-याने त्‍यांच्‍या दुकानातील मालाचे नुकसान झाले ही गोष्‍ट सिध्‍द केली आहे असे मंचाला वाटते. 

गैरअर्जदार कंपनीची Shopkeepers Insurance Policy (नि.13) तील अटींचे अवलोकन करता त्‍यात Fires & Allied perils या कलमात क्रमांक 6 वर Flood, Inundation, Storm, Tempest इत्‍यादि Perils अंतभूत केलेले आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पॉलीसीच्‍या कव्‍हर नोटवर (नि.3/2) Fire & Allied Perils पासून Stock in trade चा रुपये 4,00,000/- किमतीचा विमा उतरवलेल्‍याचा उल्‍लेख आहे व त्‍यासाठी रुपये 900/- ऐवढा हप्‍ता भरल्‍याचे नमूद केले आहे.

      तक्रारदारांच्‍या वकीलांनी त्‍यांच्‍या युक्‍तीवादा दरम्‍यान मा.राष्‍ट्रीय अयोगाच्‍या Oriental Insurance Co.Ltd V/s M/s R.P.Bricks 2013 (2) CPR 724 (NC) या न्‍यायनिर्णयाचा दाखला दिला. यात मा.राष्‍ट्रीय आयोगाने

      “Loss caused due to seepage following heavy rains in to insured premises would be covered under definition of flood & inundation and claim should be indemnified even though see page or heavy rains may not per se have been listed as one of the perils in the insurance policy” असे म्‍हटले आहे.

      वरील दाखला प्रस्‍तुत तक्रारीस लागू पडतो. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या दुकानातील मालाचे पावसाने व वादळी वा-याने नुकसान झाले. घटनेच्‍या दिवशी तक्रारदारांची “Shopkeepers Insurance policy” वैध होती असे असताना गैरअर्जदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव अयोग्‍यरित्‍या नाकारला आहे असा निष्‍कर्ष मंच काढत आहे व मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देत आहे.

मु्द्दा क्रमांक 2 साठी –   तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यात (नि.3/7) दुकानातील तुरीची 28 पोती, ज्‍वारीची 8 पोती व सोयाबिनची 20 पोती असा माल भिजून खराब झाल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या खरेदी बिलांवरील (एकत्रितरित्‍या नि.15) धान्‍याचे भाव व पोत्‍यातील धान्‍याचे सरासरी वजन लक्षात घेता तक्रारदारांचे खालील प्रमाणे नुकसान झालेले दिसते.

 

अ.क्रं.

शेतमालाचा प्रकार

वजन

दर

एकुण नुकसान

1.

सोयाबिन

20 क्विंटल

2,100 रुपये

42,000 रुपये

2.

तूरडाळ

28 क्विंटल

4,200 रुपये

  1,17,600 रुपये

3.

ज्‍वारी

08 क्विंटल

1,200 रुपये

9,600 रुपये

 

एकूण नुकसान – 1,69,200/- रुपये.

 

      तक्रारदार त्‍यांच्‍या मालाच्‍या (Stock in trade) झालेल्‍या नुकसानी पोटी रुपये 1,70,000/- ऐवढी रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच तक्रारदारांनी घटनेनंतर लगेचच गैरअर्जदार यांचेकडे विहीत नमुन्‍यात विमा प्रस्‍ताव दाखल केला. परंतु घटना विमा पॉलीसी संरक्षणात अंतर्भूत नाही या कारणाने गैरअर्जदारांनी आयोग्‍यरित्‍या तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नाकारला. त्‍यामुळे तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- एवढी रक्‍कम मिळण्‍यासाठी तक्रारदार पात्र आहेत असा निष्‍कर्ष मंच काढत आहे व मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहेत.

सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.

 

आदेश

  1. गैरअर्जदार विमा कंपनी यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी आदेश प्राप्‍ती पासून साठ दिवसांच्‍या आत तक्रारदारांना विमा रक्‍कम रुपये 1,70,000/- (अक्षरी रुपये एक लाख सत्‍तर हजार फक्‍त) द्यावी.
  2. गैरअर्जदार विमा कंपनी यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) द्यावे.
  3. आदेश क्रमांक 1 व 2 मधील रक्‍कम विहीत मुदतीत अदा न केल्‍यास त्‍यावर 9 टक्‍के व्‍याजदराने व्‍याज द्यावे.
  4. खर्चाबाबत आदेश नाही.
 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.