(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी सन 2002 मध्ये, कासलीवाल इस्टेट , देशमुख नगर, गारखेडा यांच्याकडून पॅलट क्रमांक सी 4, स्टील्ट हा घ्यावयाचे ठरविले. त्यासाठी गैरअर्जदार बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज दिला. त्यानुसार बँकेने त्यांना रु 4,20,000/- चे कर्ज मंजूर केले. कर्ज फेड 10 वर्षापर्यंत होती. त्यासाठी तक्रारदारानी त्यांची ही सदनिका सी-4, बँकेकडे तारण ठेवली. तक्रारदारानी रु 4,20,000/- या कर्जाची 7 वर्षातच परतफेड केली. तरीसुध्दा गैरअर्जदार बँक त्यांच्या सदनिकेवरील चार्ज काढत नाहीत. बँकेकडे सदनिकेच्या खरेदी खताची मूळ प्रत दिलेली आहे ती सुध्दा तक्रारदारास परत केली नाही. शेवटी तक्रारदारानी दिनांक 5/2/2010 रोजी पत्र दिले. तरीही तारण सोडविले नाही आणि खरेदीखताची मूळ प्रत त्यांना परत दिली नाही. तक्रारदाराचा मूलगा पुण्यात राहतो, हया सदनिकेची विक्री करुन त्यांना त्यांच्या मुलाजवळ पुणे येथे जाऊन रहावयाचे आहे. ते गैरअर्जदाराच्या अशा वर्तूणुकीमुळे होत नाही. सदनिकेवर बोजा असल्यामुळे त्याची विक्री करता येत नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून मूळ खरेदीखत मागतात व ती वेळेत दिली नाही म्हणून नुकसान भरपाई 6 लाख, व तक्रारीचा खर्च रु 5000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊनाही ते मंचात गैरहजर. लेखी जवाब दाखल केला नाही म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदारानी गैरअर्जदार बँकेचे Statement of Account दाखल केले. दिनांक 14/1/2010 रोजी, Loan Account closed असे नमूद केलेले आहे. त्यासाठी तक्रारदारानी, दिनांक 5/2/2010 रोजी गैरअर्जदारास पत्रही दिलेले होते. तरी सुध्दा बँकेने तक्रारदाराच्या सदनिकेचे मूळ खरेदीखत त्याना परत केले नाही ही त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्यामुळे त्याना सदनिकेची विक्री करता आली नाही. त्यासाठी ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदाराच्या सदनिकेचे मूळ खरेदीखत बोजारहित 4 आठवडयामध्ये द्यावे, नुकसान भरपाई म्हणून व तक्रारीचा खर्च म्हणून रु 3000/- द्यावेत. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदारानी या आदेशाच्या प्राप्तीपासून 4 आठवडयाच्या आत तक्रारदाराच्या सदनिकेचे मूळ खरेदी खत बोजारहित तक्रारदारास द्यावे, तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून रु 3000/- द्यावेत. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |