(घोषित दि. 21.11.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, तक्रारदारांचे पती काशीराम लालचंद खनसरे हे शेतकरी असुन दिनांक 23.05.2011 रोजी त्यांचे शेतातील विहीरीत पडले, सदर अपघातात ते गंभीर जखमी होवून बेशुध्द झाले. शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान दिनांक 24.05.2011 रोजी मृत्यू पावले. अपघातानंतर पोलीसांनी एम.एल.सी नंबर 7863/एस.एन.डब्ल्यू/11 नोंद करण्यात आली. तसेच क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 174 अन्वये ए.डी.नंबर 22/2011 दाखल केली. घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा करुन साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव विहीत मूदतीत व आवश्यक कागदपत्रासहित तालूक कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला. कृषी अधिका-यांनी गैरअर्जदार 1 व 2 यांचेकडे पाठवला. गैअर्जदार 2 यांनी दिनांक 08.09.2011 व 23.11.2011 रोजीच्या पत्रान्वये हॉस्पीटल डिसचार्ज कार्ड व इनव्हेस्टीगेशन पेपर्सची मागणी केली. तक्रारदारांचे पती हॉस्पीटलमध्ये मृत्यू पावल्यामूळे डिसचार्ज कार्ड मिळालेच नव्हते. इनव्हेस्टीगेशन पेपर्स गैरअर्जदार यांचेकडे दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी कोणत्याही सबळ कारणाशिवाय तक्रारदारांचा प्रस्ताव नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात तक्रारदारांनी गैरअर्जदार 1 यांना वगळण्याबाबत अर्ज दाखल केल्यानंतर दिनांक 21.11.2012 रोजी त्यांना वगळण्याबाबत आदेश करण्यात आला.
गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांना आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याकरीता अनेक वेळा पत्र पाठवले. परंतू तक्रारदारांनी सदर कागदपत्र दाखल न केल्यामूळे नूकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विद्वान वकील श्री. आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
तक्रारदारांचे पती दिनांक 23.05.2011 रोजी शेतातील विहीरीत पडल्यानंतर गंभीर जखमी झाले उपचाराकरीता शासकीय रुग्णालय बूलढाणा येथे दाखल केले असता दिनांक 24.05.2011 रोजी मृत्यू पावले. तक्रारदारांचे पती पाण्यात बुडून दिनांक 24.05.2011 रोजी मृत्यू पावले, ही बाब पोस्टमार्टम अहवालावरुन दिसून येते. अशा परिस्थितीत “डिसचार्ज कार्ड” प्रस्तावा सोबत असण्याची आवश्यकता नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात मा.तालूका दंडाधिकारी जाफ्राबाद यांना उप विभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांचेकडून पाठवलेले दिनांक 19.08.2011 रोजीचे पत्र दाखल केले आहे. सदर पत्रानूसार तक्रारदारांचे पती काशीराम लालचंद खनसरे यांचा “विहीरीत पडून पाण्यात बुडून मत्यू” झाल्याबाबत क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 174 अन्वये समरी मंजूर होणे बाबत नमूद केल्याचे दिसून येते. तसेच पोलीस निरीक्षक जाफ्राबाद यांनी दिनांक 02.08.2011 रोजी आकस्मात मृत्यूचा अखेर रिपोर्ट दाखल केला आहे. त्याच प्रमाणे इनक्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट अहवाल साक्षीदारांचे जबाब वगैरे दाखल आहे. त्यामूळे इनव्हेस्टीगेशन पेपर्स उपलब्ध असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार विमा कंपनीच्या दिनांक 08.09.2011 रोजीचे पत्रानूसार इनव्हेस्टीगेशन पेपर्स सदर प्रकरणात दाखल आहेत. तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू सरकारी दवाखान्यात उपचारा दरम्यान झालेला असल्यामूळे डिसचार्ज कार्ड तक्रारदारांकडे असणे शक्य नाही. त्यामूळे गैरअर्जदार विमा कंपनीने अयोग्य कारणास्तव तक्रादारांचा प्रस्ताव नामंजूर केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यां करीता कल्याणकारी योजना राबवलेली असून तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम लवकरात-लवकर मिळणे आवश्यक आहे. तक्रारीतील कागदपत्रे पाहता इनव्हेस्टीगेशन पेपर्स दाखल केली आहेत. तक्रारदारांचे पती शेतकरी असून विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू पावल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. त्यामूळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांना सदर योजने अंतर्गत देय असलेली नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार 2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
- वरील आदेश क्रमांक 2 मधील रक्कम वहीत मूदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.