// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 35/2015
दाखल दिनांक : 25/02/2015
निर्णय दिनांक : 22/06/2015
अॅड. इंद्रपाल जयदेव मेश्राम
रा. जयभारती निवास बापटवाडी,
अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- द मॅनेजर,
आनंद इंडिया कार्पोरेशन लि.
बंगलो नं. 1 दीपक हॉस्पीटल लाईन
सिध्दार्थ मंगल मुरर्ती सीएचएस जवळ,
महाविर नगर, मिरा रोड (ई)
मुंबई ०७
- होम शॉप 18,
हेडकॉटर 7 वा मजला, एफसी 24 सेक्टर,
16 ऐ फील्मसिटी नोयडा,
उत्तर प्रदेश. : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : स्वतः
विरुध्दपक्षातर्फे ः एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 22/06/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 35/2015
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्षाने दुरदर्शन वरील होम शॉप 18 या चॅनलवर दि. २२.१.२०१४ रोजी “DYNAMO” HD Wireless CCTV Camera with 2.5” TFT LCD Screen यापुढे यास (सीसीटीव्ही कॅमेरा असे संबोधण्यात येईल) याची जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीनुसार तक्रारदाराने सीसीटीव्ही कॅमेरा उपकरण खरेदी करण्याची ऑर्डर विरुध्दपक्ष यांचेकडे दिली होती. त्यानंतर विरुध्दपक्षराकडून पार्सल व्दारे सदरचे उपकरण पाठविण्यात आले. ज्याची किंमत रु. ३५४०/- तक्रारदाराने कुरीअरला देवून ते पार्सल सोडवून घेतले.
3. तक्रारदाराने ते पार्सल उघडल्या नंतर त्यात सीसीटीव्ही कॅमेरा, चार्जर, बॅटरी, मेमरी कार्ड होते परंतु त्यात मॅन्युअल नव्हते या सीसीटीव्ही कॅमेरा वर 6 महिन्याची वारंटी होती. विरुध्दपक्षाने कॅमेरा सोबत मॅन्युअल पाठविले नाही. तक्रारदाराच्या असे निदर्शनास आले की तो कॅमेरा व्यवस्थित काम करीत नाही. याबद्दल तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांच्या ग्राहक सेवा केंद्रात फोन व्दारे वेळोवेळी संपर्क साधला परंतु विरुध्दपक्ष
ग्राहक तक्रार क्रमांकः 35/2015
..3..
यांचेकडून त्यास योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. 8 महिने वाट पाहिल्यानंतर सुध्दा जेव्हा विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तक्रारदाराने दि. २७.९.२०१४ रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली. नोटीस मिळून सुध्दा विरुध्दपक्षाने कोणताही प्रतिसाद तक्रारदारास दिलेला नसल्याने शेवटी त्याने तक्रार अर्ज दाखल करुन विरुध्दपक्षाने त्यास पुरविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा बदलवून द्यावा, झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्चाची मागणी केली.
4. विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली असता त्यांना ती नोटीस मिळून सुध्दा त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने दि. ६.५.२०१५ च्या आदेशानुसार प्रकरण एकतर्फा पुढे चालविण्यात आले.
5. तक्रारदाराने निशाणी 11 ला लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. तक्रार अर्जात नमूद बाबी या विरुध्दपक्षाने नाकारल्या नसल्याने त्याबद्दल त्याचा कोणताही वाद नाही असे गृहीत धरावे लागेल. तक्रारदाराने निशाणी 3 सोबत दस्त दाखल केले. त्यावरुन सीसीटीव्ही कॅमेरा बाबत तक्रार अर्जात त्याने ज्या तक्रारी केल्या त्याला पृष्टी मिळते. तक्रारदाराने निशाणी 3/4 ला
ग्राहक तक्रार क्रमांकः 35/2015
..4..
शितल इलेक्ट्रॉनिक्स यांनी सदरचा सीसीटीव्ही कॅमेरा व बॅटरी तपासणी बाबत दाखला दिला तो दाखल केला. त्यावरुन हे शाबीत होते की, विरुध्दपक्षाने कॅमेरा सोबत दिलेली बॅटरी ही योग्य त्या गुणवत्तेची नव्हती तसेच सीसीटीव्ही कॅमेरा हा योग्य दर्जाचा नव्हता व त्यात त्रुटी असल्याचे दिसते. तक्रारदाराने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्ष यांना मिळून सुध्दा त्यांनी त्याबाबत कोणतीही योग्य ती कार्यवाही केलेली नसल्याने व जाहिराती प्रमाणे तक्रारदारास योग्य त्या दर्जाची वस्तु दिलेली नसल्याने विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो.
7. तक्रारदाराने जरी रु. २,००,०००/- नुकसान भरपाई व या तक्रारीचा खर्च रु. ६,०००/- मागितला असला तरी ती मागणी अवास्तव वाटते. परंतु विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केल्याने व योग्य त्या दर्जाची वस्तु तक्रारदाराला न पुरविल्याने तक्रारदार याला जो मानसिक त्रास झाला व हा तक्रार अर्ज दाखल करावा लागला त्याबाबत नुकसान भरपाई मिळण्यास तो पात्र ठरतो. त्यामुळे तक्रार अर्ज हा मंजूर करुन पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 35/2015
..5..
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला आधीच्या “DYNAMO” HD Wireless CCTV Camera with 2.5” TFT LCD Screen एैवजी नविन द्यावा. त.क. यांनी CCTV कॅमेरा मिळाल्यानंतर जुना विरुध्दपक्ष यांना परत करावा. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्या पासुन 30 दिवसात आत करावे.
- विरुध्दपक्ष 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारदारास रु. १०,०००/- (दहा हजार फक्त) नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु. २,०००/- (दोन हजार फक्त्) द्यावे.
- आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य द्यावी.
दि. 22/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष