तक्रार क्रमांक 596/2008 तक्रार दाखल दिनांक – 30/12/2008 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01वर्ष 03 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. संतोष आर.चौरसीया शिवदर्शन, शांती नगर, वागळे इस्टेट, ठाणे(पश्चिम). .. तक्रारदार विरूध्द 1.दि मॅनेजर मे. डायना हिटेक पावर सिस्टम स डयना हाऊस, स्ट्रीट 1, Pol A-St, एम.आय.डी.सी, अंधेरी(पुर्व). 2. दि मॅनेजर एमको बॅटरीज,45 A to Z, इंडस्ट्रीयल इस्टेट, गनपत राव कदम मार्ग, लोवर परेल मुंबई. 3. श्री.बकुलभाई, कपुर बॅटरीज हाऊस, 5, धनलक्ष्मी अर्पाटमेंट मनोर पाडा, एस.टी.वर्कशॉप जवळ, ठाणे 400 601. .. विरुध्दपक्ष समक्ष -सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्ष सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल सुनील जी.परांजपे वि.प तर्फे वकिल ए.आर.आपटे एकतर्फा आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री संतोष चौरसीया यांनी मॅनेजर मे. डायना हायटेक पॉवर सीस्टम व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे यामध्ये त्यांनी विरुध्द दिनांक –17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
1. सदरहु तक्रार श्री संतोष चौरसीया यांनी मॅनेजर मे. डायना हायटेक पॉवर सीस्टम व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडुन घेतलेल्या दोषयुक्त बॅटरी बदलुन मागितली आहे.
2. तक्रारदार यांनी AMCO बॅटरी 12 Volt साठी AH अनु.क्र.1245 विरुध्द पक्षकार कपुर बॅटरीज हाऊस यांचेकडुन रु.9,500/- किंमत देऊन विकत घेतली व सदर डिलरने त्यांचे 18 महिन्यापर्यंत वॉरंटीही दिली. तक्रारकर्ता यांनी सदरची बॅटरी त्यांच्या घरातील ईन्व्हरटरसाठी .. 2 .. दि.21/04/2007 रोजी खरेदी केली होती व विरुध्द पक्षकार यांनी त्यांना किंमत मिळाल्याबद्दल कॅशमेमो नं. 021 दिले.
3. तक्रारकर्ता यांचे इन्व्हरटर सदर बॅटरीतील दोषामुळे चालु शकल नाही. त्याबद्दल निष्णात इलेक्ट्रीशनचे निदान होते कि सदर बॅटरीत मॅन्युफॅक्चरींग दोष असावा किंवा बॅटरीतील निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले असावे म्हणुन ताबडतोब वॉटरीकाळात तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार कडे त्याबद्दल तक्रार दाखल केली. परंतु त्यांच्याकडुन सदर बॅटरी दुरुस्तीसाठी कोणी उपलब्ध झाले नाही म्हणुन तक्रारकर्ता यांनी दि.06/06/2008 रोजी स्वतःच ती वॉटरी विरुध्द पक्षकार यांचेकडे नेली व रिर्सी नं 1995 विरुध्द पक्षकार यांचे कडे नेली व रिसिट नं.1915 विरुध्द पक्षकार यांचे कडुन घेतला व बॅटरी दुरूस्तीसाठी कोणी उपलब्ध झाले नाही म्हणुन तक्रारकर्ता यांनी दि.06/06/2008 रोजी स्वतःच ती बॅटरी विरुध्द पक्षकार यांचे कडे नेली व रिसीट नं.1915 विरुध्द पक्षकार यांचे कडुन घेतली. तसेच बॅटरी दुरूस्त न झाल्यास ती बदलुन मिळावी असा आग्रह केला. परंतु विरुध्द पक्षकार यांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणुन दि.21/07/2008 रोज तक्रारकर्ता यांनी वकीलातर्फे विरुध्द पक्षकार यांना नोटीस पाठवली होती.
4. विरुध्द पक्षकार नं. 2 व 3 यांना नोटीस बजावणी करुनही ते मंचासमोर हजर राहीले नाहीत म्हणुन त्यांचे विरुध्द दि.24/03/2009 रोजी 'नो डब्ल्यु एस' आदेश मंचाने पारीत केला.
5. विरुध्द पक्षकार नं.1 यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.24/03/2009 रोजी मंचापुढे दाखल केली. विरुध्द पक्षकार हे AMCOबॉटरीचे डिस्ट्रीब्युटर आहेत ते पुढे म्हणतात त्यांनी मे. कपुर बॅटरीज हाऊस यांना 63 नं. इन्व्हरटर बॅटरीज दिल्या होत्या. परंतु त्यामध्ये त्यांनी कधीही Sr.No.1245 दिलेली नव्हती. त्यामुळे तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार बॅटरीला चालण्यासाठी डिस्टील वॉटर लागते ते नियमितपणे न मिळाल्यास बॅटरी ड्राय होते व नादुरूस्त होते. तसेच बॅटरी नियमीत चार्ज केली नाही तरीही बल्ज होऊन बाहेर येते आणि अशाप्रकारे बॅटरी वापरताना घ्यावयाची काळजी जर घेतली गेली नाही तर वॉटरीच्या काळात ती कव्हर होत नाही.
6. उभयपक्षकारांची शपथपत्रे, लेखी कैफीयत, पुरावे, लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहिले. विरुध्द पक्षकार नं. 2 व 3 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश झाला आहे पुढील एकमेव प्रश्न मंचापुढे येतो. .. 3 .. प्र. विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का? वरील प्रश्नांचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा विरुध्द पक्षकार नं.1 डिस्ट्रीग्युटर AMCO यांनी सदर दोषयुक्त बॅटरी त्यांनी सप्लाय केलेलीच नव्हती असे म्हटले आहे. कारण त्यांनी पाठवलेल्या 63 जणांच्या यादीमध्ये सदर बॅटरीचा Sr.No.1245 नव्हता परंतु त्याबद्दलचा ठोस पुरावा मंचापुढे सादर नाही बॅठरी बिघडण्याबाबतच्या 2 प्रकारच्या शक्यता विरुध्द पक्षकार यांनी मांडल्या आहेत परंतु सदर दोषयुक्त बॅटरीमध्ये नक्की कोणत्या कारणाने बिघाड निर्माण झाला याबाबत केलेले कोणतेही सदर बॅटरी संबंधातील तांत्रिक परिक्षण व निष्कर्ष विरुध्द पक्षकार यांनी मंचासमोर दाखल केलेले नाहीत व तसा ठोस पुरावाही सादर केलेला नाही, किंवा बॅटरी दुरुस्तीबाबतही विरुध्द पक्षकार यांनी निष्काळजीपणा दाखवला म्हणुन हे मंच तक्रारकर्ता यांची सदर दोषयुक्त बॅटरी बदलुन देण्याची मागणी मान्य करुन पुढील आदेश पारीत करत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 596/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.500/- (रु.पाचशे फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांच्याकडुन दोषयुक्त बॅटरी परत घेऊन नवीन बॅटरी बदलुन द्यावी. विरुध्द पक्षकार नं. 1 ते 3 यांनी स्वतंत्रपणे किंवा एकत्रीतपणे आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
|