(दिः 23/02/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रार क्र.143/2008 या प्रकरणी मंचाने 18/07/2009 रोजी पारित केलेल्या आदेशासंदर्भात सदर दरखास्त दाखल करण्यात आली. मंचाच्या आदेशाविरुध्द मा. राज्य आयोगासमोर 1251/2009 दाखल करण्यात आले याचा निकाल 25/02/2010 रोजी लागला. अपिलातील आदेशानुसार मंचाच्या अंतीम आदेशाच्या परिच्छेद 2 मध्ये 1,97,789.61 ऐवजी रु.1,15,000/- ऐवढा बद्दल करण्यात आलेला आहे. मंचाच्या आदेशातील इतर भाग राज्य आयोगाने कायम ठेवला. गैरअर्जदारांतर्फे किशोर मोहिते यांनी प्रतीज्ञापत्र दाखल केले व आदेश पुर्तता करण्यात आलेली आहे असे नमुद केले. रु.1,00,000/- मा. राज्य आयोगाकडे रक्कम जमा करणेत आली ती रक्कम अर्जदाराने काढण्यास हरकत नाही असे पत्र दि.19/04/2010 रोजी त्याला पाठविण्यात आले. रु.66,569/- विरुध्द पक्षानी दि.30/04/2010 रोजी त्याला दिले. संपुर्ण रक्कम रु.1,66,569/- त्याला मिळाल्याची पावती दि.22/11/2010 रोजी अर्जदाराने दिली. त्यामुळे आदेशाची पुर्तता झालेली आहे असे त्यांनी नमुद केले.
... 2 ... (दरखास्त क्र. 153/2009(143/2008)) 2. आदेशान्वीत रक्कमेचा तपशिल दि.19/04/2010 रोजीच्या पत्रात त्यांनी अर्जदाराला कळवलेला आहे. त्या पत्राची प्रत मंचासमक्ष दाखल करण्यात आली तसेच अर्जदाराच्या सहीचे पेमेंट वावचर प्रती व इतर संबंधीत कागदपत्रे दाखल करण्यात आले. विरुध्द पक्षानी दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे ही बाब स्पष्ट होते की त्यांनी मंचाच्या आदेशाची पुर्तता केलेली आहे व संपुर्ण रक्कम अर्जदारांना दिलेली आहे. अर्जदार हा सातत्याने मंचासमोर गैरहजर होता. ही बाब नमुद करणेत येते.
3. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो - आदेश 1.मुळ तक्रार प्रकरणातील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षानी केल्याने सदर दरखास्त निकाली काढण्यात येते. 2.न्यायिक खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 23/02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |