Maharashtra

Additional DCF, Thane

RBT/CC/19/115

MR. SUNIL JAYANTIBHAI PATEL - Complainant(s)

Versus

THE MANAGER, THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

20 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. RBT/CC/19/115
 
1. MR. SUNIL JAYANTIBHAI PATEL
RESIDING AT- D-503, HORIZON TOWER, SECTOR-46, SEAWOOD, NERUL, NAVI MUMBAI 400614
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER, THE NEW INDIA ASSURANCE CO. LTD.
HAVING REGISTERED OFFICE- 9TH FLOOR, NEW INDIA CENTRE, 17/A COOPERAGE ROAD, MUMBAI 400030 BRANCH OFFICE- VINDHY COMPLEX, SECTOR-11, 2ND FLOOR, CBD BELAPUR, NAVI MUMBAI
2. THE MANAGER, AUTOMOTIVE MANUFACTURERS PVT. LTD.
D-234, TTC INDL., AREA, MUMBAI PUNE ROAD, SHIRAVANE VILLAGE, NERUL, NAVI MUMBAI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Aug 2019
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचे वकील हजर.

सामनेवाले क्रमांक 1 तर्फे प्रतिनिधी हजर.

सदरची तक्रार या मंचाने तारीख 17/06/2016 रोजी गुणवत्‍तेवर रद्द केली होती. सदर आदेशावर नाराज होऊन तक्रारदाराने मा. राज्य आयोग येथे अपिल क्रमांक ए/16/961 दाखल केले होते. सदरचे अपिल तारीख 01/02/2019 रोजी या मंचाने पारीत केलेला आदेश रद्द करुन अंशतः खालील अटीवर मंजूर करण्‍यात आले. सदर आदेशाप्रमाणे तक्रारदाराचे वकील विजय शिंदे यांनी सामनेवाले क्र. 1, विमा कंपनीस खर्चाची रक्‍कम रुपये 10,000/- या मंचात तारीख 12/03/2019 रोजी हजर होऊन देणेबाबत, तसेच वरील तारखेस सामनेवाले क्र. 1 विमा कंपनी गैरहजर राहील्‍यास  खर्चाची रक्‍कम रुपये 10,000/- ही या मंचात जमा करण्‍याचे आदेशित केले होते. वरीलप्रमाणे आदेशाची पूर्तता केल्‍यानंतर तक्रारदार व उभय सामनेवाले यांनी अतिरिक्‍त पुरावा देणेकामी संधी देण्‍यात आलेली होती व आहे. परंतु तारीख 12/03/2019 रोजी तक्रारदाराचे वकील विजय शिंदे हजर झाले नाहीत, व त्‍यांनी हजर राहण्‍याबद्दल पुरसीसही दिली नाही. जेव्‍हा मा. राज्‍य आयोगाने वर नमूद केल्‍याप्रमाणे आदेश केला तेव्‍हा वरील वकीलांनी स्‍वतःहून हजर होऊन मा. राज्‍य आयोगाच्‍या आदेशाची पूर्तता करणे अभिप्रेत होते. सदर आदेशाची पूर्तता करणे ही सक्‍तीची अट होती, तिची पूर्तता झाल्‍यानंतरच पुरावा देण्‍याची संधी देण्‍यात आली होती. आजपावेतो सदर आदेशाची पूर्तता तक्रारदाराच्‍या वरील विधिज्ञांनी केली नाही. विशेष म्‍हणजे तक्रारदाराचे वकील त्‍यांच्‍या इतर नविन वकीलांसह दररोज इतर प्रकरणात मंचात हजर राहतात, वरीलप्रमाणे पूर्वीही तारीख 12/03/2019 रोजी व नंतरही हजर होते व आहेत. तरीही त्‍यांनी आदेशाची पूर्तता केली नाही म्‍हणून तारीख 25/04/2019 रोजी प्रकरण जेव्‍हा या मंचासमोर आले, त्‍यादिवशी फक्‍त सामनेवाले क्र. 1 हजर झाले होते. तक्रारदार व त्‍यांचे वकील नेहमीप्रमाणे गैरहजर राहीले, म्‍हणून तक्रार पुन्‍हा तारीख 22/05/2019 पावेतो प्रलंबित होती. त्‍या दिवशी सामनेवाले क्र. 2 यांना नोटीस बजावणेबाबत आदेश पारीत करण्‍यात आला होता. तसेच अतिरिक्‍त पुराव्‍यासाठी तारीख 20/06/2019 पर्यंत नेमण्‍यात आली होती. तारीख 20/06/2019 रोजी पुन्‍हा तक्रारदार व त्‍यांचे वकील नेहमीच्‍या सवयीप्रमाणे गैरहजर राहीले. त्‍यामुळे त्‍यांना मा. राज्‍य आयोगाच्‍या तारीख 12/03/2019 च्‍या आदेशाची पूर्तता न केल्‍याबद्दल लेखी खुलासा करण्‍याचा आदेश पारीत केला होता. परंतु आज रोजी वरील विधिज्ञ हजर राहीले नाहीत, व त्‍यांनी मा. राज्‍य आयोगाच्‍या आदेशाचे पालन केले आहे किंवा नाही, याबाबतीत मंचास अवगत केले नाही. सामनेवाले क्रमांक 1 च्‍या वकीलांनी मा. राज्‍य आयोगाच्‍या आदेशाची पूर्तता तक्रारदाराचे वकील विजय शिंदे यांनी न केल्‍याबद्दल मंचास अवगत केले नाही. त्‍यावेळी सामनेवाले क्रमांक 1 च्‍या वकीलांनी आज रोजी तक्रार रद्द करणेकामी अर्ज‍ दिला. सदर अर्जावर तक्रारदाराचे हजर असलेले वकील शर्मिला घनवट यांचे म्‍हणणे मागितले असता त्‍यांनी कोर्टाचा व मंचाचा वेळ वाया घालवला. त्‍यावर वरील वकीलांनी आज रोजी तक्रार तक्रारदाराच्‍या अतिरिक्‍त पुराव्यासाठी आहे, परंतु ते गैरहजर असल्‍याने त्‍याबाबत माफी मागितली आहे, अर्ज नामंजूर, सबब मा. राज्‍य आयोगाने पारीत केलेला तारीख 12/03/2019 च्‍या आदेशाची पायमल्‍ली केल्‍याची बाब स्‍पष्‍ट झाली आहे. सबब वरील सर्व कारणास्‍तव तक्रार रद्द करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही.म्हणून हे मंच खालील प्रमाणे आदेश देत आहेत –

                                                                                                              आदेश

1.  तक्रार वर कथन केलेल्‍या कारणास्‍तव रद्द करण्‍यात आली.

 2. सामनेवाले क्रमांक 1 यांना रुपये 10,000/- खर्चाची रक्‍कम मा. राज्‍य आयोगाने तारीख 01/02/2019 रोजी अपिल क्रमांक ए/16/961 मध्‍ये पारीत केलेल्‍या आदेशाप्रमाणे व कायद्याप्रमाणे वसूल करण्‍याची मुभा सामनेवाले क्रमांक 1 यांना देण्‍यात आली आहे.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.