Maharashtra

Nagpur

CC/506/2017

M/S. SHREE MAHALAXSHMI TOURS AND TRAVELS, THROUGH PROPRIETOR MANGESH M. CHORE - Complainant(s)

Versus

THE MANAGER, TATA MOTORS - Opp.Party(s)

ADV. MOHAMMED MOIN

12 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/506/2017
( Date of Filing : 15 Nov 2017 )
 
1. M/S. SHREE MAHALAXSHMI TOURS AND TRAVELS, THROUGH PROPRIETOR MANGESH M. CHORE
R/O. KILLA ROAD, NEAR KENDRIYA VIDYALAYA, MAHAL, NAGPUR-32
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER, TATA MOTORS
NARANG TOWER, 2ND FLOOR, CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. THE MANAGER, TATA AIG GENERAL INSURANCE CO. LTD.
REG. OFF. 15TH FLOOR, TOWER-A, PENINSULA BUSINESS PARK, GANPATRAO KADAM MARG, OFF. SENAPATI BAPAT MARG, LOWER PARALE, MUMBAI-400014
MUMBAI
MAHARASHTRA
3. M/S. A.K. GANDHI CARS
25, BAIDYANATH SQUARE, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MOHAMMED MOIN, Advocate for the Complainant 1
 
Dated : 12 Apr 2022
Final Order / Judgement

 मा. सदस्‍याश्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम  12 अन्वये दाखल केली आहे.
  2. तक्रारदाराने पांढ-या रंगाची टाटा इंडीगो ECS LS TDI ज्याचा नोंदणी क्रमांक MH49-F-0649,व चेसिस क्रमांक MAT607331FPC14355 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14CUYP17169 असुन दिनांक 24.2.2016 रोजी अग्रीम राशी 1,10,000/- मध्‍ये खरेदी करण्‍याचे ठरले व उर्वरित रक्कम देण्‍याकरिता तक्रारदाराने वि.प.कडुन कर्ज घेतले ज्याचा मासिक हप्ता रुपये 14,140/- इतका असुन तो चार वर्षापर्यत भरणा करावयाचा होता. तक्रारदाराने सदरचे वाहनाचा विमा युनायटेड इंडीया इन्श्‍युरन्स कंपनी लि. कडुन काढला होता व विमा क्रमांक 2301053115P114585154 असा असुन विमा पॉलीसीचा कालावधी 24.2.2016 ते 23.2.2017 मध्‍यरात्रीपर्यत होता. तसेच वि.प.ने आश्‍वासन सुध्‍दा दिले होते की, विमापॉलीसीचा पॉलीसीची रक्कम मासिक हप्त्यामधे समाविष्‍ट असेल. त्यामूळे तक्रारदाराने वि.प. कडुन परत विमा पॉलीसी काढली व तिचा पॉलीसी क्रमांक 015657226600 असा असुन कालावधी  31.1.2017 ते 30.1.2018 चे मध्‍यरात्री पर्यत होता. तक्रारदाराने त्या विमा पॉलीसी पोटी रक्कम 28,705/- वि.प.कडे जमा केली व त्यानंतर दिनांक 15.12.2017 रोजी रिन्व्हील रक्कम रुपये 27,175/- जमा केली त्याचा कालावधी 31.1.2018 ते 30.1.2019 मध्‍यरात्रीपर्यत होता. असे असुन सुध्‍दा वि.प.क्रं.2 कडुन आजतागायत मूळ (original) विमा पॉलीसीची प्रत प्राप्त झाली नाही. तक्रारदाराने वि.प.कडुन विमा पॉलीसी घेतेवेळी वि.प.ला वाहनाचे इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, आर सी बुक इत्यादी दिले. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 11.2.2017 रोजी विम्याची मुळ प्रत मिळण्‍याकरिता पुन्हा अर्ज केला व र्इ-मेल व्दारे संपर्क करण्‍याचा प्रयत्न केला असता वि.प.ने विमा दाव्याची मूळ प्रत न देता त्यांची  झेरॉक्स प्रत तक्रारदाराला दिली. त्यात तक्रारदाराला असे दिसून आले की, त्याचे वाहन क्रमांक्र MH49-F-0649,व चेसिस क्रमांक MAT607331FPC14355 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14CUYP17169 असा असुन वि.प.ने MH31-EQ-0406, व चेसिस क्रमांक MAT607331FPD18193 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14DUYP22316, असा नमुद आहे. त्यामूळे तक्रारदाराचे वाहन दिनांक 24.2.2017 पासुन म्हणजे 7 महिन्यापासुन उभे आहे व त्यामूळे सदरचे वाहन तकारकर्ता रस्त्यावर चालवू शकत नाही. तकारदाराचा उदरनिर्वाहाचा केवळ हा एकच मार्ग होता. त्यामूळे तकारदाराने या चुकीबाबत वि.प.क्रं.2 ला दिनांक 29.4.2017 रोजी ई-मेल व्दारे वाहनाचे नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकामधे दुरुस्ती करण्‍याबाबत सांगीतले. तक्रारकर्ता पूढे असे नमुद करतो की, त्यांनी सदरचे वाहन भाडेतत्वावर टेलीकॉम नेटवर्क कंपनी, छत्रपती चौक, नागपूर यांना दरमाह 28,000/- रुपये याप्रमाणे भाडयाने दिले होते. परंतु वि.प.क्रं.2 च्या या घोडचुकीमूळे तक्रारदाराचा भाडेतत्तवाचा कॉन्ट्रक्ट रद्द झाला व तक्रारदाराचे दिनांक 24.2.2017 पासुन दरमहा रुपये 28,000/- चे नुकसान झाले त्यामूळे तक्रारदाराने दिनांक 26.8.2017 रोजी वि.प.क्रं.1 ते 3 यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्त होऊन सुध्‍दा वि.प.ने सदर नोटीसला प्रतीसाद दिला नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. तक्रारदाराने परिच्छेद क्रमांक 7 मधे नमुद केल्याप्रमाणे रुपय 17,42,120/-, द.सा.द.शे. 48 टक्के दराने व्याजासह वि.प.कडुन मिळावे.
  3. तक्रार दाखल करुन वि.प.क्रं.1 ते 3 यांना नोटीस काढण्‍यात आली. परंतु नोटीस मिळुनही वि.प.क्रं.3 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन तक्रार त्यांचे विरुध्‍द दिनांक 7.6.2018 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. वि.प.क्रं.1 व 2 तक्रारीत हजर झाले व त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले.
  4. वि.प.क्रं.1 यांनी आपल्या लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा महालक्ष्‍मी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्हल या नावाने व्यवसाय करतात व व्यावसायिक कारणाकरिता वाहनांचा वापर करतात. तसेच सदरचे वाहन हे तक्रारदाराने वैयक्तीक वापराकरिता घेतलेले नसुन ते व्यावसायिक कारणाकरिता घेतले आहे. त्यामूळे ते ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 2 डी प्रमाणे ग्राहक होत नाही. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक 5 मधे स्वतः नमुद केले आहे की, त्याने सदचे वाहन टेलीकॉम नेटवर्क कंपनी, छत्रपती चौक, नागपूर यांना रुपये 28,000/- दरमहा भाडेतत्वावर दिले आहे त्यामूळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी. तसेच तक्रारदाराने युनायटेड इंडीया इंन्श्‍युरन्स कंपनी यांचेकडुन सदरचे वाहनाचा विमा काढलेला आहे. त्यामूळे वि.प.क्रं.1 यांचा या तक्रारीशी काहीही संबंध नाही. सदरचे वाहनावर वि.प.क्रं.1 यांनी कर्ज दिले होते व वि.प.क्रं.2 यांनी विमा काढला होता व त्यांची मासिक किस्त परस्पर तक्रारदाराचे बॅक खात्यातुन वळते होत होते याबाबत अभिलेखावर दस्तऐवज दाखल आहेत. वि.प.क्रं.1 हे कर्जपुरवठा करणारे व वि.प.क्रं.2 हे विमा कंपनी आहे. तसेच वि.प.क्रं.3 मे. ए के गांधी हे वाहनांचा पुरवठा करणारे (डिलर) आहेत, हे दर्शविण्‍याकरिता तक्रारदाराने अभिलेखावर दस्तऐवज दाखल आहेत. वि.प.क्रं.1 हे पूढे नमुद करतात की, तक्रारदाराने त्यांचे इंजिन व चेसिस नंबरच्या दुरुस्तीकरिता वारंवार फोन व ई-मेल केले होते, परंतु वि.प.क्रं.1 ही केवळ कर्जपूरवठा करणारी वित्तीय संस्था असल्यामूळे त्यांना इंजिन व चेसिस क्रमांक बदलविण्‍याचा अधिकार नाही. जर तक्रारदाराने त्यांच्या वाहनाचे दुरुस्तीपत्रक वि.प.क्रं.1 ला आणून दिले असते तर त्यांनी तक्रारदाराचे नावे दुरुस्ती केली असती. त्यामूळे वि.प.क्रं.1 यांची तक्रारदाराचे प्रती सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. करिता वि.प.क्रं.1 विरुध्‍दची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विंनती केली आहे. 
  5. वि.प.क्रं.2 आपले उत्तरात नमुद करतात की, त्यांनी उपरोक्त सदर वाहनाचा विमा दिनांक 15.12.2017 रोजी काढला होता. त्याकरिता तक्रारदाराने रिनीव्हयुल रक्कम रुपये 27,175/- वि.प.क्रं.2 कडे जमा केली व त्याचा कालावधी 31.01.2018 ते 30.01.2019 असा असुन, त्याचा पॉलीसी क्रमांक 015657226601 असा आहे. सदरची विमा पॉलीसी वि.प.क्रं.2 यांनी 26.12.2017 रोजी तक्रारदाराला पाठविली होती व सदर पॉलीसी दिनांक 30.12.2017 रोजी तक्रारदाराला मिळाली.  नि.क्रं.-ई वर सदरचे दस्तऐवज दाखल केले आहेत. वि.प.क्रं.2 यांनी वाहन क्रमांक MH-31-EQ-0406 या वाहन कमांकावर वाहनाचा विमा नोदंणीकृत केला व दिनांक 15.3.2018 रोजी तक्रारकर्त्याने वि.प.क्रं.1 यांना विमा पॉलीसी कोणत्या वाहनावार नोंदणीकृत केली याबाबत विचारणा केली असता वि.प.क्रं. 2 यांच्या कार्यालयातील पदाधिका-यांनी वाहनाचे आरसीबुक दिले.  तक्रारदाराने त्यांना सदरच्या चुकीचा वाहन व इंजिन,चेसिस क्रमांकांची नोंदणी केलेल्या वाहनाची विमा पॉलीसी रद्द करण्‍याकरिता विंनती केली असता पदाधिका-यांनी त्यांना कळविले की, सदर विमा पॉलीसी रद्द करता येणार नाही परंतु ती विमा पॉलीसी अन्य वाहनावर वळता करता येईल. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.2 ला यासंबंधी वारंवार ई-मेल पाठविले परंतु अन्य दुस-या कोणत्याची वाहनाची माहिती तक्रारदाराने दिली नाही. त्यामुळे वि.प.क्रं.2 यांच्या विरुध्‍द कोणतेही तक्रारीचे कोणतेही कारण घडले नाही. त्यामूळे  वि.प.क्रं.2 यांनी त्यांचे सेवेत तक्रारदाराचे प्रती कोणतीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रादारास झालेल्या त्रासाकरिता वि.प.क्रं.2 जबाबदार नाही. त्यामुळे सदर तक्रार या आयोगासमक्ष चालू शकत नाही म्हणुन  सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  6. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी  युक्तीवाद बघता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले

मुद्दे                                                                      उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                                   होय
  2. विरुध्‍द पक्ष क्रं.2 व 3 ने  तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिल आहे काय ?              होय          
  3. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने तक्रारकत्याला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?            नाही          
  4. काय आदेश                                                                                                       अंतिम आदेशानुसार                                                                                                                                        

कारणमिमांसा

  1. तक्रारदाराने वि.प.क्रं.3 कडुन पांढ-या रंगाची टाटा इंडीगो ECS LS TDI ज्याचा नोंदणीकृत क्रमांक MH49-F-0649,व चेसिस क्रमांक MAT607331FPC14355 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14CUYP17169 असुन दिनांक 24.2.2016 रोजी अग्रीम राशी 1,10,000/-  मध्‍ये खरेदी केली व उर्वरित रक्कम देण्‍याकरिता तक्रारदाराने वि.प.कडुन कर्ज घेतले ज्याचा मासिक हप्ता रुपये 14,140/- इतका असुन तो चार वर्षापर्यत भरणा करावयाचा होता. तक्रारदाराने सदरचे वाहनाची विमा पॉलीसी युनायटेड इंडीया इन्श्‍युरन्स कंपनी  लि. कडुन काढली होती व तिचा कालावधी 24.2.2016 ते 23.2.2017 मध्‍यरात्रीपर्यत होता. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.क्रं.2 कडुन परत विमा पॉलीसी काढली. तिचा कालावधी  31.1.2017 ते 30.1.2018 चे मध्‍यरात्री पर्यत होता, त्याकरिता तक्रारदाराने त्या विमा पॉलीसीपोटी रक्कम 28,705/- वि.प.कडे भरले होते तरीसुध्‍दा वि.प.क्रं.2 कडुन तक्रारदाराला आजतागायत मूळ (original) विमा पॉलीसीची प्रत दिली नाही. तक्रारदाराने वि.प.कडुन विमा पॉलीसी घेतवेळी वि.प.ला वाहनाचे इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, आर सी बुक इत्यादी दिले. वि.प.ने विमा दाव्याची मूळ प्रत न देता त्यांची झेरॉक्स प्रत तक्रारदाराला दिली. त्यात तक्रारदाराला असे दिसून आले की, त्याचे वाहन क्रमांक्र MH49-F-0649,व चेसिस क्रमांक MAT607331FPC14355 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14CUYP17169 असा असुन वि.प.ने चूकीचे वाहन क्रमांक  MH31-EQ-0406, व चेसिस क्रमांक MAT607331FPD18193 असुन त्याचा इंजिन क्रमांक 475IDT14DUYP22316, असे नमुद केले आहे. त्यामूळे तक्रारदाराचे सदरचे वाहन  दिनांक 24.2.2017 पासुन  म्हणजे 7 महिन्यापासुन जागेवरच उभे असल्याने ते वाहन रस्त्यावर चालवू शकत नाही. तकारदाराचा उदरनिर्वाहाचा हा केवळ एकच मार्ग होता. त्यामूळे तकारदाराने या चुकीबाबत वि.प.क्रं.2 ला दिनांक 29.4.2017 रोजी ई-मेल व्दारे कळविले व वाहनाचे नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकामधे दुरुस्ती करण्‍याबाबत कळविले. तक्रारदाराने सदरचे वाहन भाडेतत्वावर टेलीकॉम नेटवर्क कंपनी,छत्रपती चौक, नागपूर यांना दरमाह 28,000/- रुपये याप्रमाणे भाडयाने दिले होते परंतु वि.प.क्रं.2 च्या या घोडचुकीमूळे तक्रारदाराचा सदरचा कॉन्ट्रक्ट रद्द झाला व त्यामूळे तक्रारदाराचे दिनांक 24.2.2017 पासुन दरमहा रुपये 28,000/- चे नुकसान झाले. परंतु वि.प.क्रं.1 ने आले जवाबात नमुद केले की, तक्रारकर्ता हा महालक्ष्‍मी टुर्स अॅण्‍ड ट्रॅव्हल या नावाने व्यवसाय करतात व व्यावसायिक कारणाकरिता वाहनांचा वापर करतात. तसेच सदरचे वाहन हे तक्रारदाराने वैयक्तीक वापराकरिता घेतलेले नसुन ते व्यावसायिक कारणकरिता घेतले आहे. त्यामूळे ते ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 2 डी प्रमाणे ग्राहक होत नाही परंतु तक्रारर्त्याने त्याचे तक्रारीतील परिच्‍छेद क्रमांक 5 मधे स्वतः नमुद केले आहे की, तक्रारकर्ता हा सदरचा व्यवसाय स्वतःचे उपजिवीका चालविण्‍याकरिता करतो. त्यामूळे तक्रारदार हा ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 2 डी प्रमाणे ग्राहक होतो. 
  2. वि.प.क्रं.1 हे आपले लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारदाराने त्यांचे इंजिन व चेसिस नंबरच्या दुरुस्तीकरिता वारंवार फोन व ईमेल केले होते. परंतु वि.प.क्रं.1 हे केवळ कर्जपूरवठा करणारी वित्तीय संस्था असल्यामूळे ते इंजिन व चेसिस क्रमांक बदलविण्‍याचा अधिकार नाही. हे खरे आहे की, तक्रारदाराने त्यांच्या वाहनाचे दुरुस्तीपत्रक वि.प.क्रं.1 ला आणून दिले असते तर त्यांनी तक्रारदाराचे नावे दुरुस्ती केली असती. परंतु तक्रारदाराने/वि.प.क्रं.3 यांनी वि.प.क्रं.1 यांना वाहनाची योग्य माहिती पूरविली नाही त्यामूळे वि.प.क्रं.1 यांची तक्रारदाराचे प्रती सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब त्यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करणे योग्य आहे.
  3. वि.प.क्रं.2 यांचे म्हणण्‍यानूसार तक्रारदाराने वि.प. कडुन पॉलीसी काढली त्या विमा पॉलीसी पोटी रक्कम 28,705/- वि.प.कडे जमा केली व सदर पॉलीसीचा  कालावधी  31.1.2017 ते 30.1.2018 चे मध्‍यरात्री पर्यत होता. पुन्हा तक्रारदाराने दिनांक 15.12.2017 रोजी नुतनिकरण रक्कम रुपये 27,175/- वि.प.क्रं.2 कडे जमा केली,त्याचा कालावधी 31.1.2018 ते 30.1.2019 मध्‍यरात्रीपर्यत होता. असे असुन सुध्‍दा वि.प.क्रं.2 कडुन आजतागायत मूळ (original) विमा पॉलीसीची प्रत प्राप्त झाली नाही. हे नि.क्रं.ई वर दाखल दस्तऐवजावरुन स्पष्‍ट होते. सबब वि.प.क्रं.2 यांनी विम्याची रक्कम मिळाल्यानंतरही तक्रारकर्ते यांना मूळ पॉलीसीची कागदपत्रे दिली नाही म्हणुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्याचे दिसून आणि त्याबाबत वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्ते यांना नुकसानभरपाई म्हणुन रक्कम रुपये 10,000/- देणे योग्य आहे असे आमचे मत आहे.
  4. वि.प.क्रं.2 यांनी सदरची विमा पॉलीसी वाहन क्रमांक MH-31-EQ-0406 यावर नोदंणीकृत केली होती. तक्रारदाराने त्यांना सदरच्या वाहनावरील विमा रद्द करण्‍याकरिता विंनती केली असता  वि.प.क्रं.2 यांच्या कार्यालयातील अधिका-यांनी त्यांना कळविले की, सदर विमा रद्द करता येणार नाही परंतु तो अन्य वाहनावर वळता करता येईल. परंतु वि.प.क्र.3 यांनी वि.प.क्रं.2 यांना दुरुस्तीकरुन वाहनाबाबतची योग्य माहिती पूरविलेली नाही आणि म्हणुन तक्रारदाराला विमा रक्कम दिल्यानंतरही विमा सरंक्षणाचा लाभ घेता आला नाही आणि सदरहू वाहनाचा उपभोग घेता आला नाही आणि यासाठी वि.प.क्रं.3 हे सर्वस्वी जबाबदार आहे आणि म्हणुन वि.प.क्रं.3 यांनी तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्‍ट दिसून येते.
  5.  वास्तविकतः तकारदाराने वि.प.क्रं.3 मे.ए के गांधी कार्स (डिलर) यांचे कडुन सदरचे वाहन विकत घेतले. त्यामूळे वाहनाचा अचूक नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक योग्य प्रकारे नोंदविण्याची जबाबदारी वि.प.क्रं.3 यांचीच आहे. जो वाहन क्रमांक वि.प.क्रं.3 हे तक्रारदाराचे नावे नोंदणी करुन देतील, त्याच वाहनाचे नोंदणी क्रमांकावर, आरटीओ, कर्जपूरवठा करणारी, संस्था, विमा काढणारी कंपनी या सर्व संस्था कर्ज पूरवितील व विमा नोंदणी करतील. कर्ज पूरविणारी संस्था किंवा विमा काढणारी संस्था कोणताही वाहन क्रमांक, इंजीन क्रमांक, चेसिस क्रमांक स्वत्ःहून  बदल करु शकत नाही. यासर्व बाबींकरिता वि.प.क्रं.3 हेच जबाबदार आहे आणि म्हणुन तक्रारकर्ते यांचेकडुन विमा पॉलीसीसाठी दिलेली एकूण रक्कम रुपये 55,880/- ही तक्रारकर्ते यांना विमा सरंक्षणाचा लाभ न मिळाल्यामूळे वि.प.क्रं.2 परत करण्‍यास जबाबदार आहेत म्हणुन वि.प.कं.2 व 3 यांनी सेवेत त्रुटी केल्यामूळे मुद्रदा क्रं.2 वर होकारार्थी उत्तर नोंदवित आहोत आणि मुद्दा क्रं.3 वरील नकारार्थी उत्तर नोदविण्‍यात येते आहे.

   सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.   

अंतीम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार वि.प.क्रं. 2 व 3 यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.3 यांनी तक्रारकर्त्याचे नावे अचुक वाहन क्रमांक, इंजीन क्रमांक, चेसिस क्रमांक तक्रारदाराचे नावे नोंदणी करावी तसेच सदरचे अचुक वाहनाचा क्रमांक, इंजीन क्रमांक व चेसिस क्रमांक तक्रारकर्ते यांना पूरवावी आणि सदरहू वाहनाची योग्य कागदपत्रे तक्रारकर्ते यांना देण्‍यात यावी.
  3. वि.प.क्रं.2 यांनी तक्रारकर्ते यांना मानसिक व आर्थीक नुकसानीबाबत रक्कम रुपये 10,000/- द्यावे.
  4. वि.प.क्रं.3 यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली एकुण रक्कम रुपये 55,880/-, परत करावी आणि सदरहू रक्कमेवर दिनांक 31.01.2017 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतेा द.सा.द.शे.12 टक्के व्याजदराने येणारी तक्रारदारास परत करावी.
  5. विरुध्‍द पक्ष क्रं.3 ने तक्रारदारास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  6. वि.प.क्रं.1 यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.
  7. विरुध्‍द पक्ष क्रं.2 व 3 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत  करावी.
  8. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  9. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.