जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 702/2010.
तक्रार दाखल दिनांक : 20/12/2010.
तक्रार आदेश दिनांक : 17/11/2011.
श्री. बबन भिमराव शिंदे, रा. बोरगाव,
ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
व्यवस्थापक, श्रीराम ट्रान्सपोर्ट फा. कं. लि.,
101, 105, शिव चेंबर्स, पहिला मजला, बी विंग,
सेक्टर 11, सि.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – 400614. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. व्ही.जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: एस.आर. पाटील
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
1. यातील अर्जदार यांनी विरुध्द पक्षकार यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये तक्रार-अर्ज मंचामध्ये दि. 20/12/2010 रोजी दाखल केला आहे. तथापि, तक्रार-अर्ज दाखल केल्यापासून आजतागायत तक्रारकर्ता अथवा त्यांचेतर्फे विधिज्ञ / अधिकारपत्र चालविणार यापैकी कुणीही मंचासमोर उपस्थित राहून दाखल टप्प्यावर तोंडी युक्तिवाद (Argument for admission on admission stage)अद्यापपर्यंत न केल्याने तक्रार-अर्ज आहे त्या स्टेजला प्रलंबीत आहे. वास्तविकरित्या मा.राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचे दि.31/5/2005 रोजीचे अधिनियमातील कलम 30 (अ) व कलम 9 (8) प्रमाणे तक्रार-अर्ज सर्व त्रुटी पूर्ण करुन घेऊन 21 दिवसांत दाखल करुन घेऊन रजिस्टर नंबर देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दाखल करुन घेतलेल्या तक्रार-अर्जात दाखल टप्प्यावर युक्तिवाद ऐकून घेऊन विरुध्द पक्षकार यांना नोटीस काढणेचे आदेश पारीत करणे आवश्यक आहे. तथापि, या तक्रार-अर्जात रजिस्टर नंबर दिल्यानंतर तद्पासून आजतागायत तक्रारकर्ता यांनी तोंडी युक्तिवादच न केल्याने पुढील टप्प्यात अपूर्ण अवस्थेत अर्ज तटस्थतेने प्रलंबीत आहे. मंचाने याबाबत दि.26/7/2011 रोजी नोटीस बोर्डवर लिस्ट लावणेत आली होती. त्यानंतरही संधी देण्यात आली. तथापि, तदनंतर आजतागायत कोणतीही दाखल न घेतल्याने तक्रारकर्ता यांना सदर तक्रार-अर्ज पुढे चालविण्यास कोणतेही स्वारस्य नाही, हे सबळ पुराव्याने सिध्द झाले आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये मंचातील तक्रार-अर्जाचे प्रलंबीत तक्रार-अर्जाचे प्रमाण वाढलेने यंत्रणेचा गैरवापर होत आहे व झालेला असल्याने कोणत्याही योग्य व सबळ कारणाशिवाय कोणतेही तक्रार-अर्ज प्रलंबीत ठेवणे न्यायोचति, विधीवत व संयुक्तिक नाही. म्हणून सदर तक्रार-अर्ज आहे त्या टप्प्यावरुन (Stage) काढून टाकणेत आला आहे.
2. अन्य कोणतेही आदेश नाहीत.
3. यदाकदाचित तक्रारकर्ता यांना मंचाकडून न्यायाची अपेक्षा व गरज आहे, असे वाटल्याने कायदेशीररित्या नियमाप्रमाणे नवीन तक्रार-अर्ज दाखल करणेस मुभा / संधी राखीव ठेवणेत आलेली आहे. म्हणून केले आदेश.
(सौ. व्ही.जे.दलभंजन) (सौ. शशिकला एस. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/पुलि/161111)