(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे शेतकरी असून शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी आहेत. दिनांक 13/6/2008 रोजी विहीरीत पडल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. या घटनेची माहिती पोलीस स्टेशन पाचोड तालुका पैठण जि.औरंगाबाद यांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला आणि वैद्यकीय अधिका-याकडे तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिका-यानी त्यांचा अहवाल दिलेला आहे. तक्रारदार यांना अपघाताने अपंगत्व आल्यामुळे आणि शेतकरी अपघात विम्याचे लाभार्थी असल्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रासहीत तहसिलदार पैठण यांच्याकडे दिनांक 6/11/2008 रोजी क्लेम दाखल केला. अद्यापपर्यंत क्लेमची रक्कम मिळाली नसल्यामुळे सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून विम्याची रक्कम रु 50,000/- 18 टक्के व्याजदराने, रु 5000/- नुकसान भरपाई आणि रु 2000/- तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदाराने शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारानी पाठविलेला क्लेम फॉर्म आणि कागदपत्रे त्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाहीत. त्यांनी लेखी म्हणण्यासोबत शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांची पोच पावती मंचास प्राप्त तरीही ते गैरहजर म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदार हे विहीरीत पडल्यामुळे त्यांना अपंगत्व आले. अपंगत्वासाठी त्यांनी डॉ.संजय मुळे यांचे प्रमाणपत्र आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांचे इन्जुरी सर्टीफिकेट दाखल केले आहे. त्यामध्ये हेड इन्जुरी आणि इन्जुरीचे स्वरुप हे सिम्पल दाखविण्यात आले आहे. तक्रारदारानी त्यांना 50 टक्के अपंगत्व आल्याबद्दलचे कुठल्याही शासकिय रुग्णालयाचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे अद्यापपर्यंत क्लेमफॉर्म आणि कागदपत्रे आलेली नाहीत. म्हणून मंच तक्रारदारास असा आदेश देतो की, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे, क्लेमफॉर्म आणि शासकिय रुग्णालयाने दिलेले 50 टक्के अपंगत्वाचे सर्टीफिकेट 4 आठवडयाच्या आत दाखल करावे . त्यानंतर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने 6 आठवडयाच्या आत तक्रारदाराचा क्लेम सेटल करावा. आदेश तक्रारदाराने या आदेशाच्या प्राप्तीपासून 4 आठवडयाच्या आत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम फॉर्म, आवश्यक ती कागदपत्रे आणि शासकिय रुग्णालयाने दिलेले 50 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखल करावे. सदरील क्लेम मिळाल्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा क्लेम 6 आठवडयाच्या आत सेटल करावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MRS. Smt.Rekha Kapadiya] PRESIDING MEMBER | |