Maharashtra

Pune

CC/10/525

Supriya Surednra Dev - Complainant(s)

Versus

The Manager NIIT - Opp.Party(s)

S.Kasbekar5

19 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/10/525
 
1. Supriya Surednra Dev
Rohan Prarthana Building,A 24, Near Gandhi Bhavan,Kothrud Pune 411038
Pune
Maha
...........Complainant(s)
Versus
1. The Manager NIIT
Tilak road centre,4th floor, Business square,In front of S.P. College,Tilak road,Pune 411030
Pune
Maha
2. The Manager NIIT,Regional Office
Arora tower,6th floor, Camp,Pune 411001
Pune
Maha
3. The Manager NIIT,Corporate office
Plot no.85, Sector no.32, Institutional area, Gurgaon 122001
Pune
Maha
4. The Manager NIIT House
C 125, Okhala, Phase no. 1,New Delhi
New Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S. M. KUMBHAR MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

अॅड श्रीधर कसबेकर तक्रारदारांकरिता
अॅड निलेश काळे जाबदेणारांकरिता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-  
द्वारा- मा. श्री. व्‍ही. पी. उत्‍पात, अध्‍यक्ष
 
   :- निकालपत्र :-
    दिनांक 19/ऑगस्‍ट/2013
 
प्रस्‍तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार संस्‍थे विरुध्‍द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.        तक्रारदार या गृहिणी असून त्‍या कोथरुड येथे रहातात. जाबदेणार संस्‍था ही वेगवेगळी इन्‍फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी मधील कोर्सेस चालविते. जाबदेणार क्र 1 हे ट्रेनिंग सेंटर असून जाबदेणार क्र 2 हे रिजनल ऑफिस आहे तर जाबदेणार क्र 3 हे कार्पोरेट ऑफिस आहे. जाबदेणार क्र 4 हे रजिस्‍टर्ड ऑफिस आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांचेशी संपर्क साधून इंटर कनेक्‍टींग नेटवर्क डिव्‍हायसेस कोर्स साठी प्रवेश घेतला होता. सदर कोर्सचा कालावधी 80 तासांचा असून तो 28/05/2008 ते नोव्‍हेंबर 2008 या मुदतीत संपणार होता. यासाठी तक्रारदार यांनी सुरुवातीस रुपये 16,231/- टयुशन फी व रुपये 500/- अॅडमिशन फी म्‍हणून भरले होते. यातील काही रक्‍कम त्‍यांनी बँक ऑफ इंडिया, पौड रोड शाखा, पुणे या बँकेवरील चेकने दिलेले होते. सदर कोर्सचे वर्ग सुरु झाल्‍यानंतर उरलेली रक्‍कम रुपये 15,729/- तक्रारदार यांनी चेकने दिलेली आहे. अशा प्रकारे तक्रारदारांनी संबंधित कोर्सची एकूण फी रुपये 31,960/- जाबदेणार यांच्‍याकडे भरलेली आहे. संपूर्ण फी मिळाल्‍यानंतर देखील जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे वर्ग नियमित पणे घेतले नाही. वर्ग नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये संपले. जाबदेणार क्र 1 यांनी नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये तक्रारदार यांची परिक्षा घेतली नाही. तक्रारदारांनी यासंबंधी चौकशी केली असता त्‍यांना असे कळविण्‍यात आले की सदरची परिक्षा ऑक्‍टोबर 2008 मध्‍ये त्‍यांच्‍या पतीच्‍या नावे झालेली आहे व त्‍यांनी परिक्षेस हजर रहाण्‍यास नकार दिलेला होता. तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांचे कडे परिक्षा घेण्‍याबाबत पाठपुरावा केल्‍यानंतर मार्च 2009 मध्‍ये केन्‍द्र प्रमुख श्री. अंकलेश्‍वर यांनी त्‍यांना कळविले की त्‍यांनी रुपये 12,200/- अधिक रक्‍कम भरावी मगच त्‍यांची परिक्षा 21/12/2009 रोजी घेण्‍यात येईल. त्‍यानुसार तक्रारदार यांनी रुपये 12,200/- चेकने दिनांक 08/07/2009 रोजी भरले. सदरची परिक्षा तक्रारदार यांनी दिली परंतू त्‍यांना सं‍बंधित परिक्षेचा निकाल कळविण्‍यात आला नाही. जाबदेणार क्र 1 यांच्‍या सांगण्‍यानुसार तक्रारदारांनी दिनांक 6/4/2010 रोजी पिअरसन अॅप ग्राहक सेवा यांना ईमेल पाठविला. त्‍यावेळी तक्रारदारांना असे कळविण्‍यात आले की त्‍यांच्‍या परिक्षेची कुठलीही माहिती किंवा स्‍कोअर रेकॉर्ड उपलब्‍ध नाही. तसेच तक्रारदारांना असेही कळाले की सन 2008 व 2009 मध्‍ये कुठलीही परिक्षा घेण्‍यात आलेली नव्‍हती. तक्रारदारांनी पुन्‍हा जाबदेणार यांच्‍याकडे संबंधित परिक्षा व निकाल पत्राबाबत माहिती विचारली. परंतू जाबदेणार यांनी त्‍यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांची फसवणूक केली. म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल करुन त्‍यांनी भरलेली फी रक्‍कम रुपये 42,160/-, शैक्षणिक कालावधीचे नुकसान, मानसिक त्रास व इतर खर्च सर्व मिळून एकूण रक्‍कम रुपये 1,00,000/- मागितले आहेत.
2.        या प्रकरणात जाबदेणार यांनी हजर राहून आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. त्‍यात त्‍यांनी तक्रारीतील सर्व मजकूर नाकारलेला आहे. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांची परिक्षा घेतली असून त्‍या सदर परिक्षा उत्‍तीर्ण झालेल्‍या नाहीत. जाबदेणार यांच्‍यातर्फे तक्रारीतील संपूर्ण कथने स्‍पष्‍टपणे नाकारलेली आहेत. जाबदेणार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी योग्‍य ती सेवा दिलेली होती. तक्रारदार यांनी स्‍वत: परिक्षेला न बसल्‍यामुळे सुरुवातीला संधी गेली होती. त्‍यानंतर त्‍यांना परिक्षेला बसण्‍याची संधी दिली होती परंतू त्‍या परिक्षा उत्‍तीर्ण झाल्‍या नाहीत. जाबदेणार यांनी असे कथन केले आहे की जाबदेणार व तक्रारदार यांच्‍यात ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार चालण्‍यास पात्र नाही म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
3.        दोन्‍ही पक्षकारांची लेखी कथने, कागदोपत्री पुरावा व युक्‍तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्‍यात येत आहेत. सदर मुद्ये, त्‍यावरील निष्‍कर्ष व कारणे खालील प्रमाणे-

अ.क्र
मुद्ये 
निष्‍कर्ष
1
जाबदेणार यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न देऊन सेवेमध्‍ये त्रुटी निर्माण केली आहे काय  
होय 
2   
अंतिम आदेश   
तक्रार अंशत: मंजूर

 
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
          तक्रारदार यांच्‍या कथनानुसार त्‍यांनी वेळोवेळी जाबदेणार यांनी सांगितल्‍याप्रमाणे फी ची रक्‍कम जमा केली होती परंतू त्‍यांची परिक्षा जाबदेणार यांनी घेतली नाही. तक्रारदारांना असे कळविण्‍यात आले की सदरची परिक्षा त्‍यांच्‍या पतीच्‍या नावे नोंदणी केलेली आहे. त्‍यानंतर असेही सां‍गण्‍यात आले की त्‍यांनी दिलेल्‍या परिक्षेमध्‍ये त्‍या अनुत्‍तीर्ण झालेल्‍या आहेत. परंतू यासंबंधी कोणताही पुरावा तक्रारदारांना देण्‍यात आलेला नाही. प्रस्‍तुतच्‍या प्रकरणातील कथने व पुराव्‍या वरुन असे स्‍पष्‍ट होते की जाबदेणार यांनी तक्रारदार यांना अंशत: सेवा दिलेली होती. त्‍याचप्रमाणे तक्रारदार यांनी मान्‍य केल्‍याप्रमाणे पाठपुरावा केल्‍यानंतर त्‍या संबंधित कोर्सच्‍या परिक्षेस बसल्‍या होत्‍या परंतू त्‍यांना निकाल कळविण्‍यात आला नाही. अशा परिस्थितीत जरी जाबदेणार यांनी सेवा देतांना त्रुटी निर्माण केलेली असली तरी तक्रारदार त्‍यांनी जमा केलेली संपूर्ण रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र नाहीत. तक्रारदारांचे जरी एक वर्षाचे नुकसान झाल्‍यामुळे, त्‍याचप्रमाणे शारिरीक व मानसिक त्रास झाल्‍यामुळे त्‍यापोटी नुकसान भरपाई मिळण्‍यास त्‍या पात्र आहेत. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे रुपये 42,160/- फी जमा केली होती. त्‍यापैकी रुपये 20,000/- फी जाबदेणार यांनी त्‍यांना परत दयावी त्‍याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाचे नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासाच्‍या नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चा पोटी रुपये 10,000/- एकूण रुपये 40,000/- दयावेत असे आदेशित करणे न्‍यायोचित ठरेल.
          वर उल्‍लेख केलेल्‍या विवेचनावरुन मुद्यांचे निष्‍कर्ष काढण्‍यात येऊन खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे-
                        :- आदेश :-
     1.   तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.
     2.   जाबदेणार यांनी तक्रारदारांना अंशत: सेवा देऊन सेवेत त्रुटी
निर्माण केलेली आहे असे जाहिर करण्‍यात येत आहे.
3.   जाबदेणार क्र 1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या
तक्रारदारांना रक्‍कम रुपये 20,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावी.
4.   जाबदेणार क्र 1 ते 4 यांनी वैयक्तिकरित्‍या आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना शैक्षणिक वर्षाचे नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासाच्‍या नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चा पोटी रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत अदा करावी.
5.   उभय पक्षकारांनी मा. सदस्‍यांसाठी दिलेले संच आदेशाच्‍या दिनांकापासून एका महिन्‍याच्‍या आत घेऊन जावेत अन्‍यथा संच नष्‍ट करण्‍यात येतील.
 
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
स्‍थळ- पुणे
दिनांक 19 ऑगस्‍ट 2013
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S. M. KUMBHAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.