तक्रार दाखल ता.15/07/2015
तक्रार निकाल ता.10/08/2016
न्यायनिर्णय
दि.10.08.2016 द्वारा:- - मा. सदस्या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने स्वत:चा दि.28.11.2014 रोजी जाबदार विमा कंपनीने driving Licence नसले कारणाने नाकारलेला विमा क्लेमची रक्कम जाबदार विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळणेकरीता दाखल केलेली आहे. तसेच सदरची क्लेम amount ही द.सा.द.शे.18 टक्के तक्रारदाराने मागितलेली आहे. सदरची तक्रार स्विकृत होऊन जाबदार यांना नोटीस आदेश झाले. आदेश झालेनंतर प्रस्तुतचे जाबदार मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे:-
तक्रारदार हे वर नमुद पत्त्यावर रहात असून तक्रारदार हा स्वत: वाहन क्र.(Truck /Lorry) रजि.क्र.एम.एच.-09-बी.सी.-9477, अशोक लेलँड असा आहे. सदरचे वाहनावरतीच तक्रारदारांची उपजिवीका अवलंबून होती. सदरचे वाहनाचा विमा पॉलीसी क्र.15120131100100007093 असा आहे. सदरचे वाहनाचे विमा पॉलीसी तक्रारदाराने, जाबदार विमा कपंनीकडे दि.24.09.2010 ते दि.28.09.2011 या कालावधीकरीता उतरविली होती. दि.13.06.2011 रोजी सदरचे वाहनाचा ड्रायव्हर अशोक महामने याने सदरचे लॉरी पेन्सील गुडसने केरळ राज्यातील या शहारात भरली कि ज्याचा कोट्टयायाम बिल नं.26, दि.13.06.2011 होता. सदरचा ट्रक गुजरातमधल्या Volgod या ठिकाणी निघाला. सदरचे बिल या Delivery Note No.0415642 असा होता. दि.13.06.2011 रोजी सदरचे लॉरीचा ड्रॉयव्हर कोटयामधून निघाला. दि.15.06.2011 रोजी सदरचे वाहन हे Poona-Banglore Road वर आले. जेव्हा सदरचे वाहन हे Kotur मधील मुळा धाब्यावर आले. तेव्हां हायस्पिड असलेने ते एका दुस-या लॉरीस धडकले. Near Dharwad की, ज्या लॉरीचा रजि.नं.एम.एच.-12-ए.आर.1419 तसेच सदरचे वाहन हे दुस-या मारुती व्हॅनवर कि ज्याचा रजि.नं.के.ए.-27-एम.-4827 असा होता. सदर धडक दिलेली दोन्हींही वाहने मुल्ला धाब्याजवळच उभी होती. ही धडक ज्यावेळी बसली त्यावेळी गाडीचा क्लीनर सुनील प्रकाश गायकवाड हा केबीनमध्ये बसलेला होता व त्याने त्याचक्षणी गाडीतून उडी मारली. त्यामुळे त्याला Severe Injuries झाल्या व त्याला KIMS Hospital, Hubali येथे नेणेत आले व तदनंतर डी.वाय.पाटील, हॉस्पीटल, कोल्हापूर येथे नेणेत आले. मात्र, त्याचा त्यामध्ये मृत्यु झाला.
3. तक्रारदारांची संपूर्ण उपजिवीका सदरचे वाहनावरच असलेने त्याने ते वाहन (Tow) करुन कोल्हापूर येथील गॅरेजमध्ये आणून स्वत:चे नातेवाईकांकडून पैसे घेऊन सदरचे वाहन दुरुस्त केले.
4. तक्रारदारांनी पॉलीसचे कालावधीमध्येच सदरचा अपघात झालेने तसेच सदरचे वाहन हे योग्य त्या सर्व्हेअरकडे सर्व्हे. करुन घेतलेने तक्रारदाराने मोटर क्लेम फॉर्म, दि.23.09.2011 रोजी जाबदारास भरुन दिला. मात्र दि.28.11.2014 चे पत्राने सदरचा क्लेम सेटल करणेचे पोझीशनमध्ये नसलेने तक्रारदारास कळवले. सबब, जाबदार यांचेकडून तक्रारदारास सदरचे क्लेमची रक्कम रु.5,01,109/- देणेचे आदेश व्हावेत. तसेच सदरची रक्कम ही द.सा.द.शे.18टक्के व्याज दराने मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
5. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण 36 कागदपत्रे जोडलेली आहेत. त्यामध्ये विमा पॉलीसी, अॅशुरन्स कंपनीचे पत्र, बिले, सी.सी.45/12 चे आदेशाची प्रत, एफ.आय.आरर्स्., चार्जशीट व स्टेटमेंट, फॉल्स रिपोर्ट, मयताचा मृत्यु दाखला, लॉरी मालकाचा पुरावा, जयभारत ट्रान्सपोर्ट यांचे पत्र, पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार, पंचनामा रिपेार्ट, अॅक्सीडेंट मॅप, आदेशाच्या प्रतीं, वगैरे कागदपत्रे या कामी दाखल केलेली आहेत.
6. जाबदार यांना नोटीस आदेश होऊन ते या मंचासमोर हजर झाले.
7. जाबदार यांचे कथनानुसार, सदरचे तक्रार अर्जातील काही कथनाखेरीज इतर कथने जाबदार विमा कंपनीने परिच्छेदनिहाय नाकारलेली आहेत. सदरची तक्रार खोटी असून ती जाबदार यांना मान्य नाही. सदरचे वाहनावर तक्रारदारांनी उपजिवीका चालत होती हे म्हणणे जाबदार यांना मान्य नाही. तक्रार अर्जात नमुद केलेल्या कथनांच्या दाखल, तक्रारदाराने पुरावा दाखल केलेला तक्रारदाराने कलम-3, 4 मध्ये केलेली कथने जाबदार यांना मान्य व कबुल नाहीत. पोलीस पेपर्सवरुन सुनील गायकवाड हा क्लीनरच गाडी चालवत होता ही बाब शाबीत होते व त्यास valid effective driving licence नव्हते. तक्रारदाराने लायसन्स नसणा-या व्यक्तीकडे वर नमुद वाहन सोपविलेने सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा.
8. जाबदार यांनी आपले म्हणणेसोबत 2016 (2) KCCR 1599 चे न्यायनिर्णय दाखल केलेली असून काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9. तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे व जाबदार यांचे कथन व दाखल पुरावे यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1)(डी) चे खाली ग्राहक होतो का ? | होय |
2 | जाबदार विमा कंपनीने, तक्रारदारास दुषीत सेवा दिली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार हा जाबदार यांचेकडून त्याने मागितलेली विमा रक्कम मिळणेस पात्र आहे का ? | होय |
4 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन:-
मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा पॉलीसी उतरविलेली होती व तिचा पॉलीसी क्र.15120131100100007093 असा आहे. सदर पॉलीसी दि.29.09.2010 ते दि.28.09.2011 या कालावधीकरीता उतरविलेली होती व याबद्दल जाबदार विमा कंपनीनेही उजर निर्माण केलेला नाही व तक्रारदाराने विमा पॉलीसीही दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झालेची बाब शाबीत झालेली आहे. सबब, तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1)(डी) खाली ग्राहक होतो. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे दि.29.09.2010 ते दि.28.09.2011 या सालाकरीता आपले वर नुद ट्रकची विमा पॉलीसी उतरलेली होती. याबद्दल उभय पक्षांमध्ये वाद नाही. वादाचा मुद्दा फक्त इतकाच आहे की, जाबदार विमा कपंनीचे कथनानुसार अपघाताचेवेळी तक्रारदाराने कथन केलेप्रमाणे क्लीनर सुनील गायकवाड हा क्लीनर नसून म्हणजेच तो क्लीनर साईडला बसलेला नसून तो ड्रायव्हींग करीत होता व त्यांचेकडे ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. इतकेच नव्हे तर जाबदार विमा कपंनी तर्फे Authorized Signatory म्हणून गणेश लक्ष्मण आपटे यांनी वर नमुद अपघातावेळी मयत सुनील गायकवाड हा गाडी चालवत होता आणि त्यांचेकडे ड्रायव्हींग लायसन्स नव्हते असे शपथपत्राद्वारे कथन केले आहे. तसेच एसढेच नव्हेतर तक्रारदाराने आपले स्वत:चे वाहन हे Unlicensed person कडे चालविणेसाठी दिले होते. सबब, पॉलीसी टर्म्स अॅन्ड कंडीशन्सनुसार, It’s a breach of Policy, Terms and Conditions, सबब सदरची तक्रार काढून टाकणेत यावी असे कथन आपले शपथपत्राद्वारे केलेले आहे व दि.28.11.2014 चे पत्रानुसार,
We are in receipt of your letter, dated, 26.11.2014 demanding original bills of repiry of above accidental vehicle. You are aware that this claim is pending for reason of Driving Licence. If the original bills are not produced or returned to you as per your request, please note that we will not be in a position to settle the claim. You are requested to note and if you agree to this, we will return the original bills to you असे कथन केले आहे.
तथापि तक्रारदार यांचे कथनानुसार, ड्रायव्हर अशोक महामणे हा अपघातावेळी ड्रायव्हींग करीत होता व सुनिल गायकवाड हा क्लीनर होता व तो ड्रायव्हर केबीनमध्ये ड्रायव्हरशेजारी बसलेला होता व अपघाता होताना त्याने उडी टाकली व या कारणास्तव तो गंभीर जखमी झालेने त्याला प्रथम धारवाड येथील हॉस्पीटलमध्ये व तिथून पुन्हा डी.वाय.पाटील हॉस्पीटल, कोल्हापूर येथे हलविण्यात आले असे कथन केले आहे. सबब, अशोक महामणे ड्रायव्हिंग करीत होता असे तक्रारदाराचे कथन आहे. मात्र जाबदार विमा कंपनीने जरी शपथपत्राद्वारे वर नमुद कथन केले असले तरीसुध्दा सदरचा क्लेम /विमा दावा हा वाहनाचा अपघात विमा असलेने, “स्वत: तक्रारदाराने वर नमुद वाहन हे unlicensed person ला hand over केले”. या जाबदार यांनी केलेल्या कथनाशी हे मंच सहमत नाही. तक्रारदार हा स्वत: अपघाताचेवेळी म्हणजेच त्या वाहनाबरोबर नव्हता ही बाब स्वयंसिध्द आहे. तक्रारदाराने सदरचे वाहन ज्या अशोक महामणे नावाच्या ड्रायव्हरला चालविणेसाठी दिले होते. त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तक्रारदाराने या कामी दाखल केलेले आहे.
जाबदार विमा कंपनीने पोलीसांसमोर झालेले जबाब या कामी दाखल केलेले आहेत. मात्र, पुराव्याचे कामी सदरची कागदपत्रे हे मंच ग्राहय धरत नाही. मात्र तक्रारदाराने या कामी अजित अरुण साळसकर यांचे सरतपासाचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच तक्रारदाराने सदरचे तक्रार अर्जाचे कामी काही वरीष्ठ न्यायालयाचे पुर्वाधारही दाखल केलेले आहेत.
2016 (2) KCCR 1599 Karnataka High Court
New India Assurance Co. Ltd., Bangalore …Appellant
Versus
Sri Srinivasa Babu Reddy, Bangalore & ors. …Respondents
सबब, वर नमुद पुर्वाधारामधील कलम-147 व कलम-149 याचा विचार करता,
A combined reading of the aforesaid two Sections will show that if a risk is factually covered under the insurance policy or is required to be covered under Section 147 of the Act, the insurer cannot avoid indemnifying the insured of the liability insured by him in respect of such a risk to the extent of the liability covered under the policy or required to be covered under Section 147 of the Act, unless the insurer has proved any of the defences available to an Insurer under Section 149 of the Act. There is no other legal ground for an Insurer to avoid the liability.
सदरचा पुर्वाधार हा या तक्रार अर्जास लागू होत असून अपघाताचे वेळी ड्रायव्हरकडे लायसन्स होते किंवा नाही अगर ड्रायव्हर कोण होता ही बाब महत्त्वाची नसून सदरचा अपघात हा विमा पॉलीसीचे कालावधीमध्ये झाला आहे ही बाब महत्त्वाची आहे. इतकेच नव्हे तर तक्रारदाराने ज्याला ड्रायव्हर म्हणून नेमले होते अथवा ज्याचेकडे ड्रायव्हर म्हणून वाहन स्वाधिन केले होते, त्यांचे ड्रायव्हींग लायसन्स ही दाखल केले आहे. सबब, जाबदार कंपनीने दि.28.11.2014 चे पत्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आपला क्लेम पेंडींग असलेचे नमुद केले आहे. तथापि तक्रारदाराने ड्रायव्हिंग लायसन्स दाखल केले आहे. सबब, जाबदार यांनी सदरचा क्लेम पेंडींग ठेवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
तसेच तक्रारदाराने घेतलेला लिमीटेशनचाही मुद्दा हे मंच फेटाळून लावत आहे. तक्रारदाराने सदरचा अर्ज हा प्रथमत: धारवाड ग्राहक कोर्टात दाखल केला होता व सदरचा तक्रार अर्ज हा Jurisdiction चे मुद्दयावरुन निकाली काढणेत आला. सबब, तेव्हांपासून नविन cause of action सुरु होते. सबब हा तक्रार अर्ज मुदतीत आहे.
मुद्दा क्र.3 व 4:- सदरचे वाहनावरतीच तक्रारदारांची उपजिवीका अवलंबून होती. सबब, त्याने सदरचे वाहन दुरुस्तीसाठी Tow करुन महाकाली गॅरेज, कोल्हापूर इथे आणले व त्या संदर्भातील सर्व खर्चाची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सबब, वर नमुद सर्व बाबीं विचारात घेता, तक्रारदाराचा असणारा विमा क्लेम मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
सबब, हे मंच तक्रारदाराने मागितलेली विमा दाव्याची रक्कम रु.5,01,109/-(अक्षरी रक्कम रुपये पाच लाख एक हजार एकशे नऊ फक्त) देणेचे निष्कर्षाप्रत येत आहे. तसेच तक्रारदाराने मागितलेली व्याजदर या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने व्याजापोटी द.सा.द.शे.9टक्के देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराला नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 जाबदार विमा कंपनीने, तक्रारदारांना सदरची विम्याची रक्कम रु.5,01,109/- (अक्षरी रक्कम रुपये पाच लाख एक हजार एकशे नऊ फक्त) अदा करावी.
3 जाबदार विमा कंपनी यांनी तक्रारदारांना सदर विम्याची रक्कम संपूर्ण रक्कम तक्रारदारांच्या हाती पडेपर्यंत विमा अर्ज नाकारले तारखेपासून म्हणजेच दि.28.11.2014 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने अदा करावी.
4 जाबदार विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईपोटी त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
5 जाबदार यांनी तक्रारदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
6 सदर आदेशाची पूर्तता वि.प.यांनी 45 दिवसांत करणेचे आहे.
7 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
8 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.