View 24222 Cases Against National Insurance
Sayed Salimuddin S/o Sayed Habibuddin filed a consumer case on 20 Feb 2015 against The Manager National Insurance Co in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/393 and the judgment uploaded on 17 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-393/2014
तक्रार दाखल तारीख :-25/08/2014
निकाल तारीख :- 20/02/2015
________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
________________________________________________________________________________________________
सय्यद सलीमोद्दिन पि. सय्यद हबीबोद्दीन,
रा. फलॅट नं.5, 105 अजय दिप कॉम्प्लेक्स,
एन-3, सीडको, औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
दि मॅनेजर,
नॅशनल इंश्युरन्स कंपनी,
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. एस.बी.खॉंन
गैरअर्जदारातर्फे – अॅड. एच.ए.पाटणकर
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने त्याच्या Chevrolet tavera या गाडीकरिता गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा पॉलिसी घेतली. पॉलिसीचा कालावधी दि.25/1/10 ते दि.24/1/11 पर्यन्त होता. त्याकरिता तक्रारदाराने रु.15428/- इतके प्रीमियम भरले होते. पॉलिसी ची IDV रु.454432/- इतकी होती. दि.6/1/11 रोजी मुंबई येथे गाडी नेली असताना घरासमोरून गाडी चोरीला गेली. मुंबईच्या विलेपार्ले पोलिस स्टेशनला सदर घटनेची तक्रार नोंदवली. दि.17/1/11 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीस intimation दिले. पोलिसांनी गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी मिळून आली नाही. तक्रारदाराने दि.20/9/12 रोजी गैरअर्जदारास विमा रक्कम देण्यासाठी अर्ज केला. परंतु दि.22/8/13 पर्यन्त कोणताही प्रतिसाद गैरअर्जदाराने दिला नाही. तक्रारदाराने दि.10/7/14 रोजी नोटिस देखील पाठवली. परंतु त्याचे उत्तर गैरअर्जदाराने दिले नाही. त्याकरिता तक्रारदार व्याजासहित विम्याच्या रकमेची मागणी करत आहे व तसेच त्याने नुकसानभरपाईची मागणी ही केली आहे.
गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्यांनी विमा पॉलिसी संबधित प्राथमिक बाबी मान्य केल्या आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारास सदर विम्याची रक्कम मागण्याचा अधिकार नाही. क्लेम अजून ही प्रलंबित अवस्थेत आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे याचे अवलोकन केले.
तक्रारदाराने घेतलेल्या विमा पॉलिसीचा कालावधी दि.25/1/10 ते दि.24/1/111 पर्यन्त होता. विमा पॉलिसीची IDV रु.4,54,32/- इतकी आहे. दि.6/9/11 रोजी त्याची गाडी चोरीला गेल्याची तक्रार विलेपार्ले मुंबई येथील पोलिस स्टेशनला नोंदवल्याची प्रत दाखल आहे. दि.11/2/12 रोजी सदरील गाडीचा शोध अद्याप लागला नाही याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विलेपार्ले मुंबई याचे पत्र तक्रारदारास आल्याचे मंचासमोर दाखल आहे. दि.5/9/13 रोजी तक्रारदाराने RTO ला सदर चोरीला गेलेल्या गाडीची माहिती दिल्याचे पत्र दाखल केलेले आहे.
वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, तक्रारदाराची गाडी दि.6/1/11 रोजी चोरीला गेल्याबद्दल त्याने ताबडतोब पोलिसांना कळवले व तक्रार नोंदवली. दि.17/1/11रोजी गैरअर्जदार विमा कंपनीस कळवले. तक्रारदाराने विमा दावा दाखल केल्याची बाब गैरअर्जदारांनी अमान्य केली नाही. परंतु दावा प्रलंबित अवस्थेत असल्याचा खुलासा केला. विमा दावा प्रलंबित असण्याकरिता कोणतीही त्रुटी किंवा कारण असल्याचे स्पष्ट केलेले नाही. वरील कारणामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने 30 दिवसाच्या आत विमा दाव्याचा निकाल द्यावा, असे आमचे मत आहे.
त्यामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.