(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी सदरील तक्रार दिनापंक 14/5/2008 रोजी मंचात दाखल केली होती. त्याचा निकाल मंचानी दिनांक 29/11/2008 रोजी दिला. त्याची ऑपरेट ऑर्डर खालीलप्रमाणे आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी इन्शुरन्स कंपनीकडे क्लेमची सर्व कागदपत्रे, आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयाच्या आत इन्शुरन्स कंपनी (करारातील इन्शुरन्स कंपनी) यांच्याकडे पाठवून तक्रारदाराच्या क्लेमची रक्कम देववावी. त्यानंतर तक्रारदाराने अंमलबजावणी अर्ज क्र 20/2009 दाखल केला. त्यामध्ये तहसिलदार यांनी मंचाच्या आदेशानुसार सदरील क्लेम नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला तो त्यांना दिनांक 18/1/2008 रोजी प्राप्त झाला. तक्रारदाराने, क्लेमची रक्कम प्राप्त झाली नाही म्हणून मंचात पुन्हा एकदा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला पक्षकार केले. रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने त्यांचा लेखी जवाब दाखल केला. परंतु त्या कालावधीत रिलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे पॉलिसी नव्हती म्हणून तक्रारदाराने नॅशनल इन्शुरन्सला पक्षकार केले. त्यामुळे रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला वगळण्याचा आदेश पारित करण्यात आला. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे असे म्हणणे आहे की, शेतक-याचा अपघाती मृत्यू दिनांक 15/7/2007 रोजी झाला. पॉलिसीचा कालावधी दिनांक 15/7/2006 ते 14/7/2007 असा आहे. त्यामुळे हा क्लेम देता येणार नाही. गैरअर्जदारानी शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारानी प्रथम दिनांक 14/5/2008 रोजी मंचात तक्रार दाखल केली होती. विमाधारकाचा मृत्यू दिनांक 15/7/2007 रोजी झाला. पॉलिसीचा कालावधी दिनांक 15/7/2006 ते 14/7/2007 असा होता. परंतू शासनाच्या परिपत्रकानुसार एक महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे. पॉलिसी दिनांक 14/7/2007 रोजी संपते. विमाधारकाचा मृत्यू त्याच्या दुस-याच दिवशी दिनांक 15/7/2007 रोजी झाला त्यामुळे विमाधारकास पॉलिसीचे संरक्षण मिळते व गेरअज्रदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने हया पॉलिसीच्या क्लेमची रक्कम द्यावी असा मंच आदेश देतो. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीस हा क्लेम दिनांक 18/1/2008 रोजी प्राप्त झाला. तेंव्हापासून पॉलिसी रक्कम रु 1 लाखावर 9 टक्के व्याज द्यावे तसेच तक्रारीचा खर्च रु 1000/- द्यावा. इतर गैरअर्जदारास कुठलाही आदेश नाही. वरिल विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनीने क्लेमची रक्कम रु 1 लाख दिनांक 18/122008 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने, तसेच तक्रारीचा खर्च रु 1000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत द्यावा. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |