तक्रार क्रमांक – 547/2008 तक्रार दाखल दिनांक – 08/12/2008 निकालपञ दिनांक – 20/02/2010 कालावधी - 01 वर्ष 02महिने 12दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मे. प्लॅटिनयम कंप्युटर सिस्टीम शॉप नं.1, बेसमेंट, सिध्दि विनायक, संकुल, स्टेश रोड, कल्याण(पश्चिम) जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द 1.दि. मॅनेजर नॅशनल इंशुरन्स कं. लि., जसराज कमर्शियल कॅप्लेक्स दुसरा मजला, वाली पीर रोड, कल्याण(पश्चिम) 421301, जिल्हा - ठाणे. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल ए.बि.मोरे वि.प तर्फे वकिल आर.एस.चहल आदेश (पारित दिः 20/02/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार मे. प्लॅटिनयम तर्फे नंदकुमार सोनावणे यांनी मॅनेजर नॅशनल इंशुरन्स कं.लि व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत भरपाई रु.7,44,781/- 12% व्याजासकट मागितले आहे.
2. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकाराकडे स्टँर्डड फायर स्पेशल्स इंशुरन्स पॉलीसी नं.253200/11/04/3102168 रु.23,00,000/- ची घेतली होती. त्याचा व्हॅलीड काळ दि.26/08/2004 ते दि.25/08/2005 पर्यंत होता. त्यांचा कॉप्युटरचा बिझनेस शॉप नं. 1, बेसमेंट, सिध्दी विनायक संकुल, कल्याण(पश्चिम) येथे ऑक्टोबर 2001 पासून होता. दि.26/07/2005 रोजी आलेल्या मुसळधार पावसाने पाणी बेसमेन्ट मध्ये शिरले ते 3 ते 4 फुट भरले त्यामुळे आतील सर्व कंप्युटरचा माल खराब झाला त्याचे फोटो लावले आहेत. तदनंतर विरुध्द पक्षकार नं.1 ने पाठविलेल्या सर्व्हेअरने सदर जागेचे इन्सपेक्शन करुन परिक्षणानंतर ठरवलेले नुकसान रु.7,44,781/- होते. परंतु दि.15/02/2007 रोजी विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदाराचा .. 2 .. क्लेम नाकारला कारण त्यांचे धंद्याचे जागेचा पत्ता पॉलीसीतील लिहिलेल्या पत्यापेक्षा वेगळा आहे. सदर धंदा बेसमेंटमध्ये अस्तांना पॉलीसीतील पत्यात तो ग्राऊंड फ्लोर दाखविलेला आहे. प्रत्येक्षात ग्राऊंड फ्लोरला G-001 to 042 पर्यंत आहे व तक्रारदाराचे दुकानाचा पत्ता शॉप नं.1, बेसमेंट आहे. पॉलीसी मध्ये risk is covered for computers, PUS, PCS, Keyboard etc., असुन ति मेसर्स प्लॅटिनम कंप्युटर सिस्टीमच्या नावे आहे. त्यामुळे पाणी नक्की त्याच जागेत घुसल्यामुळे सदरचे नुकसान झाले होते असा सर्व्हेअरचा रिर्पोट हि आहे. सुरवातीला पॉलिसी घेतांना सदर जागेचे इन्सपेक्शन विरुध्द पक्षकार 1 व 2 यांनी केले होते. विरुध्द पक्षकार 2 कडे सदर जागा लोनसाठी हायपोथिकेशन मध्ये होती. त्यामुळे तक्रारदाराच्या मते सदरचा क्लेम मिळणे कायदेशिर आहे कारण पत्ता चुकीचा लिहिने हा विरुध्द पक्षकारांचा निष्काळजीपणा आहे.
3. विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.12/02/2009 रोजी मंचापुढे दाखल केली यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि तक्रारदाराचा पॉलीसीप्रमाणे धंदा Educational and Research Institute imparting training in various crafts असा होता. शिवाय त्यांना विरुध्द पक्षकार नं.2 कडे हायपोथिकेशन झाले आहे त्याबद्दल काहीही माहिती नाही. तसेच पाणी बेसमेंट मध्ये शिरले असे तक्रारदारांचे म्हणणे असतांना पॉलीसीतील पत्याप्रमाणे शॉप ग्राऊंड फ्लोरवर आहे त्यामुळे दोन्ही पत्यांनमध्ये विसंगती आढळल्यामुळे सदरचा क्लेम विरुध्द पक्षकार यांनी दि.15/02/2007 रोजी नाकारला.
4. विरुध्द पक्षकार नं.2 यांनी लेखी कैफीयत दि.29/01/2009 रोजी दाखल केली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तक्रारदाराच्या धंद्याचा नोंदणीकृत पत्ता फक्त सिध्दी विनायक संकुल, शिवाजी पथ कल्याण(पश्चिम) इतकाच आहे व त्यांनी विरुध्द पक्षकार नं. 1 इंशुरन्स कंपनीला दि.01/02/2006 रोजी पत्र पाठवुन कळविले होते कि पॉलीसीतील पत्ता हा शॉप नं 1 बेसमेंट सिध्दी विनायक संकुल, न्यु स्टेशन रोड कल्याण(पश्चिम) आहे. व यामध्ये सिध्दी विनायक संकुल ह्यात फक्त शॉप नं.1 एवढेच आहे. त्यामुळे पत्त्यामधील विसंगती बदलुन न घेण्याचा निष्काळजीपणा विरुध्द पक्षकार नं. 1 यांनीच दाखविलेला आहे त्यामुळे विरुध्द पक्षकार नं. 2 यांच्या सेवेत त्रृटी रहात नाही.
5. उभय पक्षकारांची शपथपत्रे, पुरावाजन्य कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहिले असता पुढील एकमेव प्रश्न निर्माण होतो. प्र.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे योग्य व कायदेशीर आहे का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नाकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे.
.. 3 .. कारण मिमांसा तक्रारदाराचा क्लेम नाकारण्याचे मुख्य कारण पॉलीसीतील दुकानाचा पत्ता व प्रत्येक्षातील पत्ता हा वेगळा होता. पॉलीसीमध्ये रिस्क कव्हर या मुद्दयाखाली स्पष्ट होते कि धंदा व दुकानातील माल कंप्युटरशी संबंधीत होता. पावसामुळे मालाचे नुकसान झाले याबद्दल उभय पक्षात वाद नाही व तसा सर्व्हेअर रिर्पोट व फोटोग्राफ मंचासमोर दाखल आहे. पॉलीसी हि मे. प्लॉटिनयम कंप्युटर सिस्टीम यांच्या नावे होती व पॉलीसी दुकानातील संपुर्ण स्टॉकची होती. विरुध्द पक्षकार नं.2, बँकेने दि.01/02/2006 रोजी पॉलीसीतील चुकीचा पत्ता दुरुस्त करण्याबाबत पत्र पाठविले होते. पॉलिसी घेण्याआगोदर विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी सदर दुकानाच्या जागेचे इन्शपेक्शनही केले होते. त्यामुळे पत्ता चुकीचा लिहिणे किंवा त्यात वेळेवर दुरूस्ती न करुन घेणे हा विरुध्द पक्षकार नं. 1 यांचाच निष्काळजीपणा दिसतो. मंचाच्या मते सर्व्हेअर रिर्पोट नंतर तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे योग्य व कायदेशिर म्हणता येणार नाही म्हणुन हे मंच पुढीलप्रमाणे अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 547/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी तक्रारदारास पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे रु.7,44,781/- (रु.सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे एक्यांशी फक्त) एवढी रक्कम तक्रार दाखल तारखेपासुन 6% व्याजाने द्यावे. या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्याचे आत करावे अन्यथा वरील रक्मेवर 3 % ज्यादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार न. 1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) द्यावे. 4. विरुध्द पक्षकार नं. 2 विरुध्द कोणतेही आदेश नाही. 5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
6.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 20/02/2010 ठिकान - ठाणे
(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|