तक्रार क्रमांक – 487/2008 तक्रार दाखल दिनांक – 19/11/2008 निकालपञ दिनांक – 31/03/2009 कालावधी - 00वर्ष 04 महिने 12 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. लक्ष्मण जानु मोरघा यशवंत नगर, पोस्ट विक्रमगड ता. विक्रमगड, जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द दि मॅनेजर महेंद्र अँड महेंद्र फायनानशियल सर्व्हिस लि शॉप नं. 31/32, वर्धमान वाटिका, तत्वज्ञान विद्यापिठा समोर, गोडबंदर रोड, ठाणे 400 607. .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल आशिष गोकटे वि.प एकतर्फी आदेश (पारित दिः 31/03/2009 ) मा. अध्यक्षा सौ. शशिकला पाटील, यांचे आदेशानुसार 1. तक्रारकर्ता हे आदिवासी असुन ते शेतकरी आहेत परंतु त्यासोबत अन्य उदरनिर्वाह करिता व्यवसाय असावा म्हणुन विरुध्द पक्षकार यांचे कडुन आर्थिक सहाय्य घेऊन MAXX FESTARA(SILVER) हि गाडी मे. ग्लोबल गॅलरी यांचे कडून डिलिव्हरी चलन नं. 314 दि. 06/01/2007 रोजी खरेदी केली त्याचा रजिस्ट्रेशन आरटिओ कडे आहे. विमा उतरलेला आहे. गाडी चालविण्याकरिता सुधाकर या चालकांची नेमणुक केलेली आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडून घेतलेल्या कर्जाचे नियमित इएमआय भरणा केलेला आहे. परंतु आचानकरित्या व्यवसायिक कारणाने नुकसान आल्याने काही हफ्ते भरु शकले .. 2 .. नाहीत. दि. 16/07/2008 रोजी विरुध्द पक्षकार यांनी सुधाकर यांना थांबवुन त्यांच्या ताब्यातील गाडी काढुन घेऊन काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. MAXX FESTARA (SILVER) तक्रारकर्ता हे काही रक्कम भरणा करण्यास गेले असता रक्कम भरुण घेणेस नकार दिला व गाडीचा ताबाही दिला नाही. गाडी जप्त करण्यापूर्वी किंवा थकीत रक्कमेबाबत व विक्री करणार असल्याबाबत कोणतीही कायदेशिर नोटिस विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना दिलेली नाही हे कृत्य सेवेतील त्रृटी निष्काळजीपणा, हजगर्जीपणा व अनुचित व्यापारी प्रथेचा वापर केला असल्याने तक्रारकर्ता यांचे आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास व नुकसान झालेले आहे. गाडी नसल्यामुळे दररोजचे नुकसान होत आहे. म्हणुन विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांची गाडी परत देण्यास जबाबदार आहेत. व दोन लाख 50 हजार नुकसान भरपाई मिळावी. तसेच दि. 16/07/2008 रोजी बेकायदेशीररित्या जप्त केलेली गाडी तक्रारकर्ता यांना परत मिळावी. सदरची तक्रार मंचात चालवण्याचा अधिकार आहे व अधिकार क्षेत्रात आहे. म्हणुन सदरची तक्रार दाखल करुन विनंती मागणी केली आहे कि विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना योग्य व सुस्थितीत गाडी परत देण्याचा आदेश व्हावा किंवा आजचे बाजारभावानी किंमत मिळावी. तक्रारकर्ता यांना नुकसान झाल्याने 3,00,000/- चे नुकसान भरपाई मिळावी 25,000/- सदर अर्जाचा खर्च मिळावा तसेच इतर अनुसांगिक दाद मिळावी अशी मागणी केली आहे.
2. विरुध्द पक्षकार यांना मंचामार्फत नोटिस आरपीएडी ने पाठविण्यात आली नोटिस मिळाल्यानंतर विरुध्द पक्षकार हे नेमल्या तारखेस मंचात हजर झाले नाही म्हणुन विरुध्द पक्षकार विरुध्द 'नो डब्लु एस' आदेश पारित करणेत आले व दि. 18/02/2009 रोजी एकतर्फी चौकशीकरीता नेमणेत आली. विरुध्द पक्षकार यांनी या कालावधीत हि कोणतीही दखल न घेतल्याने एकतर्फी आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
.. 3 .. 3. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला अर्ज कागदपत्र लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊ पुढील आदेश पारित केले. कारण मिमांसा 3.1. तक्रारकर्ता यांनी तक्रार अर्जाबरोबर ग्लोबल गॅलरी चे डिलेव्हरी चलन दाखल केले आहे. तसेच दि. 03/06/2006 रोजी थकीत हफ्त्या बाबत विरुध्द पक्षकार यांचे कडुन आलेले सुचनापत्र दाखल केले आहे. त्यावरुन तक्रारकर्ता यांनी घेतलेल्या कर्जाकारिता रक्कम रु. 53,651/- रक्कम हफ्त्याचे व्याजाकरिता देण्याचे होते व ति रक्कम कार्यालयात जमा करावी असे पत्र दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता यांनी घेतलेल्या कर्जाची व्याज रक्कम भरणा करणे लागत होते हे सिध्द होते.
3.2. दिनांक 16/07/2008 रोजी विरुध्द पक्षकार यांनी वर नमुद केलेली गाडी सुधाकर यांचे कडून जप्त केलेले कागदपत्र दाखल केलेले आहेत. गाडी जप्त करतांना परिस्थिती काय होती याबाबतचा खुलासा कागदपत्रात केलेला आहे.
3.3. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडुन नेमके किती कर्ज घेतले किती हफ्ते देण्याचे राहिले गाडी कुणाच्या नावे होती याबाबतचे कोणताही खुलासा तपशील किंवा कागदपत्र दाखल केलेले नाहीत. दि. 16/07/2008 रोजी पर्यंत 53,651/- रु थकीत रक्कम होती हे स्पष्ट होते. दि. 03/06/2008 रोजीच्या थकीत हप्त्या बाबत सुचना पत्रामध्ये थकीत रक्कम चार दिवसात भरणा न केलेस करारनाम्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याचा स्पष्ट उल्लेख सुचनापत्रात केलेला आहे. तथापि तक्रारकर्ता यांनी अशी रक्कम भरणा न केलेने तक्रारकर्ता यांची गाडी जप्त केलेली आहे हे स्पष्ट होतो यावरुन गाडी जप्त करतांना किंवा थकबाकीबाबत तक्रारकर्ता यांना सुचना विरुध्द पक्षकार यांनी दिली नाही असे मंचास घोषित करता येणार नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रार विनंती मागणी .. 4 .. प्रमाणे मान्य करण्यास पात्र नसल्याने खर्चासह नामंजुर करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे म्हणुन आदेश. अंतीम आदेश 1. तक्रारकर्ता यांचा तक्रार अर्ज नामंजुर करण्यात येत आहे. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत. 3.वरील आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास (निशुल्क) त्वरीत द्यावी. 4.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 31/03/2009 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ. शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|