Maharashtra

Parbhani

CC/10/124

Ashiya Bee@ Asha Bee Sk.Chand - Complainant(s)

Versus

The Manager, Life Insurance Corporation of India - Opp.Party(s)

Adv.Sk.Zaheed Ahmed

08 Mar 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/124
1. Ashiya Bee@ Asha Bee Sk.Chand R/o ShankarnagarParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. The Manager, Life Insurance Corporation of IndiaBranch-ParbhaniParbhaniMaharashtra2. Ashiyanbi Shaikh ChandShankar Nagar ParbhaniParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.Sk.Zaheed Ahmed, Advocate for Complainant

Dated : 08 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र
                        तक्रार दाखल दिनांकः- 01.04.2010
                                    तक्रार नोदणी दिनांकः- 22.04.2010
                        तक्रार निकाल दिनांकः- 08.03.2011
                                                                                    कालावधी          10 महिने16 दिवस
                                                                                                     
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी
 
अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्‍या                                                                                                सदस्‍या
सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.
-
                                                                                                     
आशीयाबी उर्फ आशाबी.भ्र.शेख चांद                         अर्जदार
वय 35 वर्षे धंदा गृहणी रा. शंकरनगर,                ( अड.शेख जहीद अहमद. )
परभणी जि.परभणी.
                       
विरुध्‍द
1     मॅनेजर                                         गैरअर्जदार
एल.आय.सी आफ इंडिया,                     ( अड अतूल पालीमकर  ) 
परभणी ब्रॅच.
 
2     आशीया बी. भ्र. शेख चांद                                          
वय 35 वर्षे धंदा गृहणी रा. शंकरनगर,           ( अड.ए.डी.खापरे   )
परभणी जि.परभणी.
 --------------------------------------------------------------------------------------
     कोरम -    1)    श्री.सी.बी.पांढरपटटे      अध्‍यक्ष
2)         सौ.सुजाता जोशी                    सदस्‍या                                                3)         सौ.अनिता ओस्‍तवाल                   सदस्‍या
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्‍यक्ष  )
 
      विमेदार पतीच्‍या मृत्‍यूनंतर विम्‍याची रक्‍कम  अर्जदारास दिली नाही म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
 
तक्रार अर्जातील थोडक्‍यात हकीकत खालीलप्रमाणे
 
      सन 1978 मध्‍ये  अर्जदाराचे शेख चांद शी लग्‍न झाले होते तीथपासून ती वरील पत्‍यावर राहात आहे. तिचा पती कृषी विद्यापीठ परभणी येथे नोकरी असताना त्‍याने गैरअर्जदाराकडून पगार बचत योजनेखाली विमा पॉलीसी क्रमांक 983771431 घेतली होती तिचा मासिक हप्‍ता 306/- रुपये होता. पॉलीसीमध्‍ये अर्जदार हीचे नाव नामिनी म्‍हणून दिलेले होते.  पतीचे तारीख 05.12.2009 रोजी निधन झाले.त्‍याच्‍या मृत्‍यूनंतर कायदेशीर वारस व नॉमिनी या नात्‍याने तिने  पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी गैरअर्जदाराचे कार्यालयात जावून मागणी केली परंतू गैरअर्जदारानी देण्‍याचे नाकारुन तिला त्रास दिला आहे. गैरअर्जदाराचे एजंट श्री. शेळके यानी गैरअर्जदाराचे कान भरुन अर्जदारास रक्‍कम देण्‍यापासून परावृत्‍त करीत आहे. अर्जदाराने तिला पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासाठी गैरअर्जदाराकडे आवश्‍यक त्‍या कागदपत्रांचा पुरावा दिला असतानाही त्‍याकडे दुर्लक्ष करीत आहे व जाणुनबुजून त्रास देत आहे  म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराला पॉलीसीची रक्‍कम रुपये 75,000/- देण्‍याचे आदेश व्‍हावेत याखेरीज सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. 
 
तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदाराचे शपथपत्र(नि. 2) पुराव्यातीलकागदपत्रातनि.7 लगत एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
तक्रार अर्ज मंचापुढे प्रलंबित असताना अर्जदार हीचे सारखेच नावं असलेली ति-हाईत व्‍यक्ति ( अर्जदाराची दुसरी पत्‍नी )  हीने मंचापुढे दिनांक 08.07.2010 रोजी अर्ज देवून मयताची ती कायदेशीर पत्‍नी असून तिलाच ती रक्‍कम मिळाली पाहीजे आणि या कामी आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामिल करुन घ्‍यावे असा नि. 17 चा अर्ज दिला त्‍यावर अर्जदारातर्फे म्‍हणणे घेवून प्रकरणाचा योग्‍य व कायदेशीर  निर्णय होण्‍यासाठी नि. 17 चा अर्ज मंजूर करण्‍यात आला त्‍यानुसार गैरअर्जदार क्रमांक 2 म्‍हणून या प्रकरणात सामिल झाले आहे.
 
तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे दाखल करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 28.06.2010 रोजी आणि गैरअर्जदार क्रमांक 2 ने दिनांक 22.12.2010 रोजी लेखी जबाब नि. 13 व नि. 34 वर दाखल केला.
 
गैरअर्जदार क्रमांक 1 ने आपले लेखी जबाबात नि. 13 दाखल करुन पॉलीसी संबधी तक्रार अर्जातील मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्‍यानी साफ नाकारली आहेत. त्‍यांचे म्‍हणणे असे की,  विमेदाराचा मृत्‍यूनंतर त्‍यानी दिनांक 23.03.2010 रोजी नॉमिनीचे नावे चेक क्रमांक 401425 तयार करुन ठेवला होता तो पाठवण्‍याचे वेळीस त्‍याच नावाची दुसरी स्‍त्री गैरअर्जदाराचे कार्यालयात येवून तिने मयताची मीच वारस आहे असा आक्षेप घेतला. त्‍यामुळे कायदेशीर  नॉमिनी/ वारसास ती रक्‍कम मिळेल म्‍हणून कायदेशीर वारस दाखला आणण्‍यास  सांगितले. पॉलीसीवर असलेली नॉमिनी या एकाच नावाच्‍या दोन स्‍त्रीयानी क्‍लेम केल्‍यामुळे गैरअर्जदारास पूर्ण खात्री झाल्‍याखेरीज चेक देता येणे शक्‍य नाही त्‍यासाठी कायदेशीर वारस दाखला हाच पर्याय ठरतो आणि तो दाखल केल्‍याखेरीज  पॉलीसी रक्‍कम देणे शक्‍य नाही आणि याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्‍याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही नामाकित  वारस/ नॉमिनी यांसबधीचा निर्णय देण्‍याचे कार्यक्षेत्र ग्राहक मंचाला नाही वरील सर्व बाबी विचारात घेवून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
 
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र नि. 14 दाखल केले आहे.
 
गैरअर्जदार क्रमांक 2 यानी   आपल्‍या लेखी जबाबात (नि 34)  अर्जदार ही मयत शेख चांद ची पत्‍नी नसून  गैरअर्जदार क्रमांक 2 हीच पत्‍नी आहे असे तिचे म्‍हणणे आहे. मयत पती  मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरीस होता व त्‍याने त्‍याच्‍या हयातीत एल.आय.सी पॉलीसी घेतल्‍या संबधीचा  तक्रार अर्जातील मजकूर  मान्‍य केला आहे. अर्जदाराने शेख चांद बरोबर निकाहनामा झाल्‍याचा दाखल केलेला पुरावा खोटा व बनावट असल्‍याचे तिचे म्‍हणणे आहे. तसेच शेख चांदच्‍या भावाने दाखल केलेले शपथपत्र देखील खोटे असून त्‍यामध्‍ये खोटे कथन केलेले आहे. अर्जदार ही शेख चांद यांची कायदेशीर वारस नाही त्‍यामुळे  मयताची कसलीही रक्‍कम मिळण्‍याचा तीला अधिकार नाही.  गैरअर्जदार क्रमांक 2 हीच मयताची पत्‍नी असून तिने परभणी दिवाणी न्‍यायालयात वारस प्रमाणपत्र मिळण्‍यासाठी कि.अर्ज 75/10 दाखल केलेला आहे.  तो प्रलंबित आहे. अर्जदार व त्‍याचे नातेवाईकानी जाणुनबुजून त्रास देण्‍याचे उद्येशाने मयताची नावाची रक्‍कम हडप करण्‍यासाठी अर्जदाराने खोटी तक्रार केलेली आहे या संदर्भात अर्जदाराने भा.द.वि.420 अन्‍वये देखील पोलीसात तक्रार केली आहे. मयताचे नावावरील एल.आय.सी कडील रक्‍कम मिळण्‍यासाठी या अगोदरच दिवाणी न्‍यायालयात वारसा प्रमाणपत्राचा अर्ज दाखल झालेला आहे व तो न्‍यायप्रविष्‍ट असल्‍यामुळे प्रस्‍तूतचा तक्रार अर्ज ग्राहक मंचात चालण्‍यास पात्र नाही सबब तो खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.35 )आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि. 24 लगत दिवाणी न्‍यायालयात प्रलबित असलेल्‍या नि. 1 ची सर्टीफाइट कॉपी दाखल केली असून नि. 20 लगत इतर 9 कागदोपत्री पुरावे दाखल केले आहेत
 
प्रकरणाचे अंतिम सुनावणीचे वेळी गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे लेखी युक्तिवाद सादर केला. अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 याना संधी देवूनही ते युक्तिवादासाठी मंचासमोर हजर न राहील्‍यामुळे मेरीटवर प्रकरणाचा  निकाल देण्‍यात येत आहे.
 
तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात.
 
मुद्ये                                                        उत्‍तर
 
1    अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 ने मयत शेख चांद याच्‍या मृत्‍यू
दाव्‍याची एल.आय.सी.पॉलीसी क्रमांक 983771431 ची रक्‍कम कायदेशीर वारस
दाखला दिल्‍याशिवाय देता येत नसल्‍याचे कारण सांगून बेकायदेशीररित्‍या
रक्‍कम रोखून ठेवली आहे काय आणि याबाबतीत  त्रूटीची सेवा केली आहे
काय  ?                                                      नाही
2     निर्णय   ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे
 
कारणे
 
मुद्या क्रमांक 1 व 2 -
.
      अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्‍तूतची तक्रार शेख चांद बी.शेख मोतीजी याने त्‍याचे हयातीत तो कृषी विद्यापीठ येथे नोकरी करीत असताना गैरअर्जदार क्रमांक 1 एल.आय.सी.कडून जिवन बिमा पॉलीसी क्रमांक 983771431 रुपये 75000/- ची घेतलेली होती त्‍या पॉलीसीची स्‍टेटस रिपोर्ट ची कॉपी अर्जदाराने पुराव्‍यात (नि.7/4) दाखल केलेली आहे.  त्‍या पॉलीसीवर अर्जदार हीचे नॉमिनी म्‍हणून नांव दिलेले होते आणि अर्जदार ही त्‍याची कायदेशीर पत्‍नी आहे असे तीचे म्‍हणणे आहे. विमेदाराचा  12.05.2009 रोजी मृत्‍यू झाल्‍यानंतर पॉलीसीवर दिलेल्‍या नॉमिनीच्‍या नावाप्रमाणे व अर्जदार ही मयताची पत्‍नी असल्‍यामुळे तिने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पॉलीसीची रक्‍कम मिळण्‍यासंबधी मागणी केली असता त्‍याच दरम्‍यान गैरअर्जदार क्रमांक 2 हिने देखील त्‍या रक्‍कमेवर मयताची पत्‍नी म्‍हणून तिलाच ती रक्‍कम मिळाली पाहीजे अशी एल.आय.सी. कडे हरकत नोंदवली होती त्‍यामुळे एल.आय.सी.ने  सक्षम कोर्टाकडून कायदेशीर वारस सर्टीफीकेट जी व्‍यक्ति  दाखल करीत त्‍यालाच ती रक्‍कम दिली जाईल म्‍हणून ती रक्‍कम रोखून  ठेवलेली आहे. ही अडमिटेड फॅक्‍ट आहे. अर्जदार हीच मयताची कायदेशीर पत्‍नी असताना गैरअर्जदार क्रमांक 1 ने बेकायदेशीररित्‍या रक्‍कम रोखून सेवा त्रूटी केली आहे म्‍हणून  अर्जदाराने प्रस्‍तूत तक्रार अर्जाव्‍दारे ग्राहक मंचाकडून दाद मागितली आहे. पुराव्‍यातील कागदपत्रांचे बारकाईने अवलोकल केले असता  अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 2 या दोंघाची नावे एकसारखीच आहेत. अर्जदाराने पुराव्‍यात नि. 7/5 ला मयत शेख चॉंद बरोबर लग्‍न केल्‍याचा निकाहनामा दाखल केला आहे तसाच गैरअर्जदार क्रमांक 2 ने देखील नि. 20/3 ला निकाहनामा दाखल केला आहे.  दोघीनीही अनुक्रमे नि. 7/2 आणि नि. 20/6 ला  रहीवासी प्रमाणपत्र दाखल केले आहे. एवढेच नव्‍हेतर अर्जदाराने एल.आय.सी. च्‍या मागणीप्रमाणे दिवाणी न्‍यायाधीक्ष कनिष्‍टस्‍तर परभणी यांच्‍या कोर्टातून किरकोळ अर्ज क्रमांक 9/2010 मधून  मिळविलेले वारस दाखल्‍याची प्रत देखील पुराव्‍यात ( नि.16/1) दाखल केलेली असून गैरअर्जदार क्रमांक 2 ने देखील मयताची वारस ठरवून मिळण्‍यासाठी दिवाणी न्‍यायाधीक्ष वरिष्‍टस्‍तर परभणी कोर्टात दाखल केलेला किरकोळ अर्ज 75/2010 ची सर्टीफाइट कॉपी देखील पुराव्‍यात ( नि.24/1) दाखल केलेली आहे. एवढेच नव्‍हेतर त्‍याच कोर्टापुढे ती मयताची पत्‍नी असल्‍याचे शपथपत्रही दाखल केले होते त्‍याची ही प्रत पुराव्‍यात नि. 20/2 ला दाखल केली आहे. एवढेच नव्‍हेतर मयता बरोबर मुलासह  तिचा एकत्रीत फोटो असल्‍याची ही छायाप्रत पुराव्‍यात ( नि.20/9) दाखल केलेली आहे. पुराव्‍यातील या वस्‍तूस्थितीवरुन आणि अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 2 या दोघांचीही नांवे एकच असल्‍यामुळे मयताची कायदेशीर पत्‍नी तथा कायदेशीर वारस दोंघीपैकी कोण हे ठरविण्‍यासाठी निश्‍चीतपणे दीर्घ व सखोल तोंडी व लेखी कायदेशीर पुराव्‍यातील शाबीतीची  गरज आहे. अर्जदार क्रमांक 2 ने सिनीअर डिव्‍हीजन परभणी कोर्टात दाखल केलेला वारस दाखला अर्जावर अर्जदाराने ही लेखी हरकत नोंदवली असल्‍याचे पुराव्‍यातील सर्टीफाइट कॉपीचे अवलोकन केले असता दिसते. संबधीत वारस दाखला अर्ज अदयापी कोर्टात न्‍यायप्रविष्‍ट आहे त्‍यामुळे वारस दाखला संबधीचा अंतिम निर्णय संबधीत कोर्टाकडून जिच्‍या बाजूने मिळेल तिलाच एल.आय.सी. कडून ती रक्‍कम मिळू शकते त्‍या वादविषयाचा निर्णय प्र‍लंबित असल्‍यामुळे प्रस्‍तूत तक्रार अर्जातून अर्जदाराने एल.आय.सी.ने रक्‍कम तिलाच  देण्‍याचा आदेश व्‍हावा म्‍हणून जी मागणी केली आहे ती वरील परिस्थितीत मुळीच मान्‍य करता येणार नाही.  गैरअर्जदार क्रमांक 1 ने जी व्‍यक्ति कायदेशीर वारस दाखला सादर करील  तिलाच पॉलीसीच रक्‍कम दिली जाईल असा जो निर्णय घेतला आहे तो कायदेशीर दृष्‍टया योग्‍य व बरोबर असून याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 1 कडून मुळीच सेवा त्रूटी झालेली नाही . वारस ठरविण्‍याची अधिकारीता ग्राहक संरक्षण कायदयाखाली ग्राहक मंचाला येत नाही. सबब वरील सर्व बाबी विचारात घेता आणि 1 ) रिपोर्टेड केस 2010 (1) सी.पी.आर.पान  366  ( उत्‍तराखंड राज्‍य आयोग ) वाद विषयासंबधी दिवाणी कोर्टात दावा चालू असताना तोच वाद ग्राहक मंचात उपस्थित करता येणार नाही. 2 ) रिपोर्टेड केस 2010 (4) सी.पी.आर.पान  329  ( हिमाचलप्रदेश राज्‍य आयोग ) दीर्घ व सखोल पुराव्‍याची ज्‍या प्रकरणात आवश्‍यकता आहे ते दिवाणी न्‍यायालयाकडेच पाठविणे योग्‍य ठरेल. तसेच 3) रिपोर्टेड केस 2008 (1) सी.पी.जे. पान 121 राष्‍ट्रीय आयोग    4) 2002 (3) सी.पी.जे. पसन 204 राष्‍ट्रीय आयोग 5) रिपोर्टेड केस पान 2000 सी.पी.जे. पान 363 महाराष्‍ट्र राज्‍य आयोग आणि 6) ए.आय.आर 2002( सुप्रीम कोर्ट ) पान 568 मध्‍ये मा. वरीष्‍ठ न्‍यायालयानी व्‍यक्‍त केलेली मते विचारात घेता प्रस्‍तूतची तक्रारीचा निर्णय वाद विषय दिवाणी न्‍यायालयात न्‍याय‍प्रविष्‍ट असल्‍यामुळे व तेच यासाठी सक्षम असल्‍यामुळे मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
 
 दे 
 
1     अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येत आहे.
2          तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदार यानी आपआपला सोसावा.
3     संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
                                                  
सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे
     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member