Vasant Madhavrao Binorkar filed a consumer case on 28 Jul 2014 against The Manager Kranti Sayakar in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/14/266 and the judgment uploaded on 12 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
__________________________________________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-266/2013
तक्रार दाखल तारीख :-26/09/2013
निकाल तारीख :- 23/01/2015
__________________________________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य.
_________________________________________________________________________________________________________________________
प्रविण पि. कृष्णराव पाटील,
रा.148, व्हीलेज राजंनगाव, ता.गंपापूर,
जि. औरंगाबाद …….. तक्रारदार
विरुध्द
श्रीराम जनरल इंश्युरन्स कंपनी लि.,
ब्रँच ऑफिस अॅट उसमानपुरा रोड,
दशमेशनगर, औरंगाबाद
मार्फत – ब्रँच मॅनेजर ........ गैरअर्जदार
______________________________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. एस.टी.अग्रवाल
गैरअर्जदारातर्फे – अॅड.एम.सी.मेने
______________________________________________________________________________________________________________________
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने त्याची गाडी महिंद्रा स्कॉर्पिओकरिता गैरअर्जदाराकडून private car package policy—zone B घेतली होती. त्याकरिता रु.24,493/- इतके प्रीमियम भरले होते. त्याचा कालावधी दि.16/1/11 ते 15/1/12 इतका होता. दि.9/12/11 रोजी सदर वाहनाचा नागपुर –मुंबई हायवेवर अपघात झाला. तक्रारदाराने दि.10/12/11 रोजी FIR नोंदवला. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदारांला 18001807474 या toll free no वर फोन करून घटनेची माहिती दिली. गैरअर्जदाराच्या सल्यानुसार अपघातग्रस्त गाडी सर्विस सेंटरला नेली. गैरअर्जदारास गाडीचा सर्वे करण्यासाठी सर्व्हेयर पाठवण्याची अनेक वेळा विनंती तक्रारदाराने केल्यानंतर दि.23/12/11 रोजी त्याने गाडीचा सर्वे केला. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे क्लेम सादर केला. तसेच गाडीची IDV value रु.7,00,000/- असताना देखील तक्रारदाराने रु.5,50,000/- ही रक्कम full and final settlement म्हणून घेण्याची तयारी दर्शवली. तसे consent letter लिहून दि.11/4/12 रोजी गैरअर्जदारास दिले. परंतु दि 13/4/12 रोजी गैरअर्जदाराने विलंबाचे कारण दाखवून तक्रारदाराचा क्लेम रद्द केला. त्यामुळे तक्रारदार विम्याची रक्कम व नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराच्या गाडीचा अपघात दि. 9/12/11 रोजी झाला. तक्रारदाराने 14 दिवसांनंतर म्हणजे दि.23/12/11 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीस त्याबाबत कळवले. त्यानंतर गैरअर्जदाराने सरव्हेयर पाठवून अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली. तक्रारदाराने 14 दिवस उशीरा कळवले आहे व विमा पॉलिसी नियम क्रं 1 व 8 याचा भंग केला आहे. तसेच घटनेच्या वेळेस अपघातग्रस्त गाडीच्या ड्रायव्हरकडे valid and effective लायसेन्स नव्हते. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
तक्रारदाराने त्याचे विम्याचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर विमा पॉलिसीचा कालावधी दि.16/1/11 ते दि.15/1/12 पर्यंतचा आहे. गाडीची IDV रु.7,20,000/- ची आहे. गाडीचे उत्पादनीय वर्ष 2006 आहे. गाडीचा अपघात दि.9/12/11 रोजी झालेला होता ही बाब दाखल केलेल्या FIR व spot panchnama वाचल्यावर दिसून येते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने अपघात झाल्यानंतर ताबडतोब toll free क्रमांकावर फोन करून गैरअर्जदारास कळवले होते. गैरअर्जदाराने दि. 13/4/12 च्या पत्राने तक्रारदारास कळवले की, क्लेम दाखल करण्यास 14 दिवसांचा उशीर झाल्यामुळे क्लेमची रक्कम मिळणार नाही. दि.23/12/11 रोजी क्लेम दाखल केल्यानंतर गैरअर्जदाराने सरव्हेयरला पाठवून नुकसानीचा अंदाज काढलेला आहे. तक्रारदारास क्लेम प्रस्ताव दाखल करण्यास 14 दिवसांचा उशीर झालेला असला तरी त्याने पोलिस स्टेशनला ताबडतोब FIR नोंदवला आहे. गैरअर्जदारास क्लेम उशीरा कळवल्याने विमा पॉलिसीच्या नियमाचा भंग झाला आहे, हे जर खरे असते तर त्यांनी सरव्हेयरला पाठवून नुकसानीचा अंदाज घेण्याची तसदी घेतली नसती. परंतु तक्रारदाराने टेलिफोनच्या toll free क्रमांकावर अगोदरच अपघाताबाबत कळवलेलेले असल्यामुळे गैर अर्जदाराने क्लेम प्रस्ताव दाखल झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज काढण्यासाठी सरव्हेयरला पाठवले. सरव्हेयरने अपघात ग्रस्त वाहनाची तपासणी केल्याचे गैरअर्जदाराने लेखी जवाबात म्हटलेले आहे. यावरून असे दिसून येते की, अपघात झाल्याची बाब गैरअर्जदारास मान्य आहे. सर्वेयरने नुकसानीचे अंदाज काढल्यानंतर गैरअर्जदारांनी विलंबाचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यामुळे विमा प्रस्ताव रद्द करण्याचे कारण संशयास्पद असल्याचे दिसून येते. तक्रारदाराने ताबडतोब गैरअर्जदारांच्या toll free क्रमांकावर फोन करून कळवले अपघाताच्या दुसर्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, यावर आम्ही विश्वास ठेवतो.
तक्रारदाराने विमा पॉलिसी करिता रु.24493/- भरलेले आहेत. गाडीची IDV व उत्पादनीय वर्ष पाहता गाडीच्या नुकसानीचे रु.1,80,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करतो.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.किरण.आर.ठोले) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या सदस्य अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.