Maharashtra

Mumbai(Suburban)

2007/297

SANJAY BANGA - Complainant(s)

Versus

THE MANAGER KINGFISHER AIRLINES LTD, - Opp.Party(s)

03 Feb 2012

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM MUMBAI SUBURBAN DISTRICT
3RD FLOOR, ADMINISTRATIVE BLDG., NR. CHETANA COLLEGE, BANDRA(E), MUMBAI-51.
 
Complaint Case No. 2007/297
 
1. SANJAY BANGA
R/O 12E1 CUMBALLA HILL TE.MTNL,PEDDAR ROAD,MUMBAI 400 026
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER KINGFISHER AIRLINES LTD,
KINGFISHER HOUSE, WESTERN EXPRESS HIGHWAY VILE PARLE-EAST, MUMBAI.
2. DELETED
--
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR Member
 
PRESENT:
तक्रारदार स्‍वतः हजर.
 
 
ORDER

 

                        
 
 तक्रारदार                      :  स्‍वतः हजर.
                सामनेवाले              :  वकील श्री.शिवाजीराव मसाळमार्फत हजर. 
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
 निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष          ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
 
न्‍यायनिर्णय
 
1.    सा.वाली ही विमान प्रवाशांना सेवा पुरविणारी विमान कंपनी आहे. तक्रारदारांची तक्रार एअर डेक्‍कन एअर लाईन यांचे विरुध्‍द होती. परंतु किंगफीशर एअर लाईन्‍स् यांनी ती कंपनी ताब्‍यात घेतल्‍याने तक्रारदारांनी किंगफीशर एअर लाईन्‍स् यांना सा.वाले केले व तक्रार पुढे चालविली. यापुढे केवळ सा.वाले यांना सा.वाली विमान कंपनी असे संबोधिले जाईल. तक्रारदारांनी नोव्‍हेंबर, 2006 मध्‍ये आपल्‍या आयसीआयसीआय क्रेडीट कार्ड खात्‍यामूधून 15 विमान तिकिटे स्‍वतःसाठी, त्‍यांचे कुटुंबियांसाठी व नातेवाईकांसाठी अशी खरेदी केली होती. त्‍या तिकिटांचा तपशिल, प्रवास दिनांक, फ्लाईट क्रमांक व प्रवाशांची नांवे हा सर्व तपशिल अंतर्भुत असणारी तालीका तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.1 मध्‍ये दिलेली आहे. ती येथे उधृत करण्‍यात येते.
S
N
O
Route
PNR No.
Total No
oF Persons Travelling
Date/Time
Departure
Flight No.
Name of
Passengers
1
Mumbai
Chennai
DAO-
7669018
Three
02.05.07
20.30
DN-714
SANJAY BANGA
SONIKA BANGA
SAKSHAM BANGA
2
Delhi
Chennai
DAO-
7677873
Three
03.05.07
13.00
Dn-621
VINOD DUGGAL
KIRAN DUGGAL
AASHISH DUGGAL
3
Chennai
Delhi
DAO
7667356
six
06.05.07
16.15
DN-639
SANJAY BANGA
SONIKA BANGA
SAKSHA BANGA
VINOD DUGGAL
KIRAN DUGGAL
AASHISH DUGGAL
4
Delhi
Mumbai
DAO
7667356
one
10.05.07
21.00
DN-658
SANJAY BANGA
5
Delhi
Mumbai
DAO
7671992
Two
23.05.07
18.00
Dn-666
SONIKA BANGA
SAKSHAM BANGA
 
 
2.    तक्रारदारांनी वरील तिकिट खरेदी करण्‍याकरीता प्रत्‍येक तिकिटास रु.1025/- अधिक 9/- कर असे रु.1034/- प्रत्‍येकी संपूर्णपणे अदा केले होते.
3.    तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, दिनांक 28.4.2007 तक्रारदारांना सा.वाले विमा कंपनीकडून संदेश प्राप्‍त झाला की, फ्लाईट DN-658 ही रद्द करण्‍यात आलेली आहे. व दुसरे दिवशी म्‍हणजे दिनांक 29.4.2007 रोजी तक्रारदारांना दुसरा संदेश प्राप्‍त झाला व त्‍यांना सांगणत आले की, फ्लाईट DN-639 रद्द करण्‍यात आलेले आहे. तक्रारदारांना असेही सांगण्‍यात आले की, या रद्द झालेल्‍या फ्लाईट मधील प्रवाशांना अन्‍य फ्लाईटमध्‍ये सामावून घेतले जाणार नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांचे संकेत स्‍थळावर चौकशी केली असता त्‍याना असे समजले की, फ्लाईट DN-620 हे फ्लाईट 4.05 मिनिटांनी चेन्‍नाई ते दिल्‍ली असे उपलब्‍ध होते व त्‍यामध्‍ये जागा देखील उपलब्‍ध होत्‍या. तथापी सा.वाले यांना तक्रारदारांनी DN-620 या फ्लाईटमध्‍ये सामावून घेण्‍याची विनंती केली. परंतु सा.वाले यांनी ती स्विकारली नाही. त्‍यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दोन ई-मेल पाठविले तरी देखील सा.वाले यांनी फ्लाईट क्रमांक 620 जी रद्द झालेल्‍या फ्लाईट 639 चे दरम्‍यान निघणारी होती त्‍यामध्‍ये जागा राखुन ठेवावी अशी विनंती केली होती ती देखील सा.वाले यांनी स्विकारली नाही. अंतीमतः तक्रारदारांनी दिनांक 1.5.2007 रोजी आपली आरक्षीत केलेली सर्व 15 तिकिटे रद्द केली व तिकिटाची पूर्ण भरपाई मागीतली.
4.    तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांनी जी फ्लाईट रद्द झाली त्‍यामधून परताव्‍याचे रक्‍कमेमधून रु.50/- विनाकारण वजा केले व या प्रमाणे 10 तिकिटांचे प्रत्‍येकी रु.50/- असा र्भुदंड त्‍यांना बसला. तक्रारदारांनी अन्‍य पाच तिकिटे  रद्द केलेली होती. त्‍यामध्‍ये सा.वाले यांनी प्रत्‍येक तिकिटात रु.810/- कमी केले या प्रमाणे तक्रारदारांना एकत्रित रु4550/-र्भुदंड बसला. 
5.    तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, त्‍यांनी सा.वाले यांना दिनांक 7.5.2007 रोजी नोटीस दिली व तिकिटाचा पूर्ण परतावा मिळावा व नुकसान भरपाई मिळावी अशी दाद मागीतली.
6.    तक्रारदार पुढे असे कथन करतात की, फ्लाईट रद्द करण्‍याची कार्यवाही ही केवळ नाममात्र असून कमी किंमतीस प्रवाशांनी घेतलेली ति‍किटे रद्द व्‍हावीत व प्रवाशांना ज्‍यादा दराने नविन तिकिटे खरेदी करावी लागावी असा सा.वाले यांचा हेतू होता. व सा.वाले यांनी सरसकट बरीच फ्लाईट रद्द करुन विमान प्रवाशांना या प्रकारचा र्भुदंड बसविला व ज्‍यादा उत्‍पन्‍न मिळविले. या प्रमाणे सा.वाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
7.    तक्रारदारांनी असे कथन केलें आहे की, फ्लाईट रद्द होण्‍यामागे कुठलेही तांत्रिक कारण किंवा आवश्‍यक कारण नव्‍हते व केवळ मनमानी कारणाने सा.वाले यांनी फ्लाईट रद्द  केली. व त्‍यामुळे तक्रारदारांना आर्थिक र्भुदंड सोसावा लागला व तसेच तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबीय तिरुपती बालाजी दर्शनासाठी जावू शकले नाही. व सर्वच आरक्षण रद्द करावी लागल्‍याने सुट्टीच्‍या काळातील आनंदा पासून ते वंचीत राहीले तसेच त्‍यांचे देवदर्शन हे सुध्‍दा होऊ शकले नाही. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना आर्थिक र्भुदंड व मानसिक त्रास व यातना पोहचविल्‍या असे तक्रारदारांचे कथन आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कडून त्‍या बद्दल एकत्रित नुकसान भरपाई रु.1,98,050/- अशी मागीतली.
8.    सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी नोव्‍हेंबर 2006 मध्‍ये 15 तिकिटे वेग वेगळया विमान प्रवासाकरीता आरक्षित केली होती ही बाब मान्‍य केली. सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदार व अन्‍य प्रवाशांचा काही संबंध नसून तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये जो तपशिल पुरविलेला आहे त्‍यापैकी फक्‍त फ्लॅाईट क्र.DN-714 2 मे, 2007,DN-639 दिनांक 6.5.2007 व DN-658 दिनांक 10.5.2007 हया तिन्‍ही फ्लाईट मधील आरक्षण हे तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबियाकरीता होते परंतु अन्‍य दोन आरक्षणा मधील प्रवासी हे तक्रारदारांचे कुटुंबिय नव्‍हते. त्‍यामुळे तक्रारदार त्‍यांचे वतीने नुकसान भरपाई मागू शकत नाहीत. त्‍याचप्रमाणे तक्रारदारांनी अन्‍य नाते वाईकांचे वतीने मुखत्‍यारपत्र प्राप्‍त करुन घेतलेले नसल्‍याने त्‍यांना अन्‍य नातेवाईकांचे वतीने नुकसान भरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. 
9.    सा.वाले यांनी ही बाब मान्‍य केली की, फ्लॅाईट क्र.,DN-639 दिनांक 6.5.2007 व DN-658 दिनांक 10.5.2007 हया फ्लाईट रद्द करण्‍यात आल्‍या होत्‍या. परंतु त्‍या दोन्‍ही फ्लाईट विमान कंपनीच्‍या वेळांचे बदलामुळे रद्द करण्‍यात आलेल्‍या होत्‍या. व त्‍या बद्दल तक्रारदारांना प्रवासाचे 10 दिवस पूर्वी सूचना देण्‍यात आलेली होती. सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये असे कथन केले की, विमान कंपनी व विमान प्रवासी यांचे मधील ठरलेल्‍या शर्ती व अटी प्रमाणे काही विशिष्‍ट प्रसंगी सा.वाले कंपनीस फ्लाईट रद्द करण्‍याचा अधिकार आहे. व त्‍यामधून उदभवणा-या गैरसोयीबद्दल विमान प्रवासी तक्रार करु शकत नाही. या प्रमाणे फ्लॅाईट क्र.DN-639 दिनांक 6.5.2007 व DN-658 दिनांक 10.5.2007 हया विमान कंपनीचे फ्लाईट वेळा बदलल्‍याने रद्द करण्‍यात आलेली होती. व त्‍यावरुन तक्रारदारांना सा.वाले यांचे विरुध्‍द नुकसान भरपाई मागण्‍याचा अधिकार नाही. इतर 3 फ्लाईट रद्द झाल्‍या नाहीत परंतु तक्रारदारांनी स्‍वतःहून त्‍या फ्लाईट मधील तिकिटे रद्द केल्‍याने नियमाप्रमाणे पैसे वजा करुन बाकीचे पैसे तक्रारदारांचे खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यात आलेले आहेत. सा.वाले यांनी वरील दोन्‍ही फ्लाईट रद्द करण्‍यामागे सा.वाले यांचे व्‍यापारी धोरण होते तसेच त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला या आरोपस नकार दिला. या प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला.
10.   तक्रारदार यांनी आपले पुराव्‍याचे शपथपत्र दिनांक 2.12.2011 रोजी दाखल केले. तर सा.वाले यांनी त्‍यांचे व्‍यवस्‍थापक श्री.अब्‍दुल हमीद यांचे शपथपत्र दिनांक 17.12.2011 रोजी दाखल केले. दोन्‍ही बाजुंनी आपले कथनाचे पृष्‍टयर्थ कागदपत्रे दाखल केली. तक्रारदार तसेच सा.वाले यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.
11.   प्रस्‍तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, यांचे वाचन केले. त्‍यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.
 
क्र.
मुद्दे
उत्‍तर
 1
सा.वाले यांनी तक्रारदारांना विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली ही व सा.वाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला ही बाब तक्रारदार सिध्‍द करतात काय ?
होय.
 2
तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतलेली नुकसान भरपाई वसुल घेण्‍यास पात्र आहेत काय ? 
होय. परंतु एकत्रित रुपये 75,000/-
 
 3.
अंतीम आदेश
तक्रार अंशतः मंजूर  करण्‍यात येते.
 
 
कारण मिमांसा
12.   न्‍याय निर्णयाच्‍या वरील भागातील तालीकेतील नोंदी वरुन असे दिसून येते की, तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांची वेग वेगळी तिकिटे वेग वेगळया 5 फ्लाईटमध्‍ये विभागली होती. परंतु तक्रारदारांनी ती सर्व तिकिटे नोव्‍हेंबर 2006 मध्‍ये आपल्‍या क्रेडीट कार्डमधून खरेदी केली होती. त्‍यापैकी फ्लाईट क्र.DN-639 दिनांक 6.5.2007 व DN-658 दिनांक 10.5.2007 हया रद्द करण्‍यात आल्‍या. तक्रारदार यांनी आपल्‍या पुराव्‍याचे शपथपत्रात त्‍या बाबत तसे कथन केलेले आहे. सा.वाले यांनी देखील परताव्‍याची रक्‍कम तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड खात्‍यामध्‍ये जमा केली ही बाब असे दाखविते की, सर्व तिकिटे तक्रारदारांनी क्रेडीट कार्डमधून खरेदी केलेली होती. ही बाब सा.वाले यांनी मान्‍य केलेली आहे.
13.   वरील दोन फ्लाईट रद्द होण्‍याचे संदर्भात सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयेतीचे शपथपत्रात परिच्‍छेद क्र.18 मध्‍ये असे कथन केलेले आहे की, काही विशिष्‍ट व असाधारण परिस्थितीत फ्लाईट रद्द करण्‍याचा अधिकार विमान कंपनीस असतो व तिकिटावर छापलेल्‍या शर्ती व अटी प्रमाणे त्‍या काही विशिष्‍ट परिस्थितीत फ्लाईट रद्द झाल्‍यास तक्रारदार सा.वाले विमान कंपनीकडून नुकसान भरपाई मागू शकत नाही. तक्रारदारांनी आपल्‍या कैफीयतीसोबत निशाणी RW II येथे लागू असलेल्‍या शर्ती व अटीची छायांकित प्रत हजर केलेली आहे. त्‍यातील फ्लाईट रद्द करण्‍याचे संदर्भात असलेली तरतुद सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये परिच्‍छेद क्र.18 मध्‍ये उधृत केलेली आहे, ती पुढील प्रमाणे आहे.  
     “ In case of circumstances beyond its control (including but without
            Limitation, meteorological conditions, mechanical failures, acts of
            nature, force majeure, strikes, riots, civil, commotion’s embargoes, wars,
            hostilities, disturbances, government regulations , orders, demands or
            requirements, shortage of labour, fuel or facilities, or labour diffculties
            of Carrier or others all actual, threatened or reported) Carrier may without
            notice cancel or delay a flight.
 
(i)           “Cancellations, Delays and Changes in Schedule by the Airlines – In case of circumstances beyond its control (including, but without limitation meteorological conditions, mechanical failures, acts of nature, force, majeure, strikes, riots, civil commotions, embargoes, wars, hostilities, disturbances, government regulations, orders, demands or requirements, shortage of labour, fuel or facilities, or labour difficulties of Air Deccan or others all actual, threatened or reported), Air Deccan may, without notice, cancel or delay a flight.
 
(ii) Cancellation : If due to any of the above mentioned circumstances, Air Deccan cancels a flight, the passengers has the option to :
·        Free Schedule : Travel on a flight on the same sector either 1 week prior or 1 week later from the date of cancelled flight (subject to availability ), OR
·        Take full refund for the ticket as paid for by the passenger   (if the passenger has paid by credit card, then the amount is rolled back onto his / her card within 30 working days).
 
14.   वरील तरतुदींचे काळजीपूर्वक वाचन केलें असतांना एक बाब दिसून येते की, फ्लाईट रद्द होण्‍याचे कारण कलम 1 मध्‍ये नमुद केलेल्‍या कुठल्‍यातरी एका कारणाकरीता असेले पाहीजे. तसेच ते कारण विमान प्रवासी कंपनीचे आवाक्‍याबाहेरील घटणेमुळे/बाबीमुळे (beyond its control ) घडले असले पाहिजे. त्‍याचप्रमाणे ते कारण कंपनीचे आवाक्‍याबाहेरील घटणेमुळे/बाबीमुळे घडले नसेल तर कलम 1 लागू होणार नाही. व सहाजिकच फ्लाईट रद्द होणे ही बाब कंपनीचे आवाक्‍याबाहेरील घटणेमुळे घडली असा निष्‍कर्ष नोंदविता येणार नाही. प्रस्‍तुतचे प्रकरणात तक्रारदारांचे तिकिटे असलेली दोन्‍ही फ्लाईट सा.वाले विमान कंपनीचे आवाक्‍याबाहेरील घटणेमुळे/बाबीमुळे घडले होते असे दिसून येते नाही. कलम I मधील कुठलीही घटणा किंवा कारण अस्‍तित्‍वात होते असा पुरावा नाही व कंपनीचे तसे कथनही नाही. या उलट कंपनी असे म्‍हणते की, वेळा पत्रकातील बदलामुळे वरील दोन्‍ही फ्लाईट व इतर फ्लाईट रद्द करावे लागली. त्‍यातही सा.वाले विमा कंपनीचे असे कथन नाही की, त्‍यांचे वेळापत्रक संचालक, नागरी विमान खाते (DGCA) यांचे आदेशाने बदलावे लागले. थोडक्‍यामध्‍ये सा.वाले विमान कंपनीचा वेळा पत्रक बदलण्‍याचा निर्णय स्‍वतः चा होता व तो काही अपरिहार्य कारणामुळे व कंपनीच्‍या निर्णयक्षमतेच्‍या बाहेरील घटकांमुळे घ्‍यावा लागला असे सा.वाले कंपनीचे कथन नाही व तसा पुरावाही नाही. केवळ कैफीयतमध्‍ये असे कथन करणे की, विमान कंपनीच्‍या क्षमतेबाहेरील घटणेमुळे फ्लाईट रद्द करावी लागली हे पुरेसे नाही. तर त्‍या बद्दल पुरावा द्यावा लागतो. केवळ स्‍वतःचे सोईकरीता जर फ्लाईट रद्द केली असेल तर त्‍याची जबाबदारी कंपनीवर येते. तक्रारदारांनी प्रस्‍तुतचे प्रकरणात निशाणी ल (L) वर सा.वाले विमान कंपनीने रद्द केलेल्‍या फ्लाईटची संख्‍या दिलेली आहे. त्‍याचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, सा.वाले विमान कंपनीने 1 मे, 2007 ते 30 जून, 2007 या दरम्‍यान वेग वेगळी 16 फ्लाईट रद्द केली. तक्रारदारांनी आपले पुराव्‍याचे शपथपत्र परिच्‍छेद क्र.10 मध्‍ये असे कथन केलें आहे की, वरील 16 फ्लाईट रद्द झाल्‍याने एकंदर 976 विमान उड्डाने रद्द झाली, व विमान प्रवाशांचे 43.20 कोटीचे नुकसान झाले. ही आकडेवारी क्षणभर बाजूला ठेवली तरी एक बाब ठळकपणे दिसून येते की, वरील सर्व फ्लाईट मधील काही प्रवाशांनीतरी 6 महिने पुर्वी आरक्षण केलेले असेल तर ते अतिशय कमी तिकिट दराने असणार. त्‍या सर्व प्रवाशांना चालु तिकिट दराने नविन तिकिटे विकत घ्‍यावी लागली असणार. सा.वाले विमान कंपनीने रद्द झालेल्‍या फ्लाईट मधील प्रवाशांना त्‍याच तिकिटाचे किंमतीमध्‍ये दुस-या फ्लाईटमध्‍ये सामावून घेण्‍यास नकार दिला. सहाजिकच या सर्व प्रकारामुळे तक्रारदार प्रवाशांची गैरसोय,कुचंबणा, झाली तर सा.वाले विमान कंपनीने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला.
15.   सा.वाले यांनी कैफीयतीमध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोगाच्‍या काही न्‍याय निर्णयांचा संदर्भ दिलेला आहे. परंतु त्‍या संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, वाईट हवामान अथवा काही तांत्रिक अडचण यामुळे जर फ्लार्इट रद्द करावी लागली तर त्‍यामध्‍ये विमान कंपनीचा दोष होता किंवा सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर झाली असा निष्‍कर्ष काढता येत नाही. प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये सा.वाले विमान कंपनीचे असे कोठेही कथन नाही की, वाईट हवामानामुळे अथवा तांत्रिक अडचणीमुळे किंवा नागरी विमान उड्डान खाते (DGCA) संचालक यांचे आदेशाप्रमाणे वरील दोन्‍ही फ्लाईट रद्द करण्‍यात आले होते. वर उधृत केलेल्‍या शर्ती व अटीमध्‍ये त्‍या बाबी नमुद आहेत. त्‍यापैकी नेमकी कुठली अस्‍तीत्‍वात होती हे सा.वाले यांनी नमुद केलेले नाही. सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये तसेच पुराव्‍याचे शपथपत्रात असे सर्वसाधारण विधान केलेले आहे की, वेळा पत्रकातील बदलामुळे त्‍या दोन फ्लाईट रद्द करण्‍यात आलेल्‍या होत्‍या. सा.वाले यांनी तंयार केलेल्‍या वेळा पत्रकामुळे जर एखादी फ्लाईट रद्द करावी लागली असेल तर ती फ्लाईट असाधारण परिस्थितीमध्‍ये किंवा विमान कंपनीचे क्षमतेबाहेरील बाबीमुळे ती रद्द करावी लागली असा निष्‍कर्ष काढता येणार नाही. या उलट असा निष्‍कर्ष काढावा लागेल की, विमान कंपनीने केवळ आपल्‍या सोईकरीता फ्लाईटचे वेळा पत्रक बदलले व त्‍या बदललेल्‍या वेळापत्रकामुळे या दोन्‍ही फ्लाईट रद्द कराव्‍या लागल्‍या. तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये तसेच पुराव्‍याचे शपथपत्रात असे कथन केलेले आहे की, फ्लाईटचे वेळापत्रक बदलल्‍याने जुन्‍या वेळा पत्रकातील काही फ्लाईट रद्द करुन व रद्द झालेल्‍या फ्लाईटच्‍या दिनांकास व त्‍या वेळेच्‍या जवळपास दुसरी एखादी त्‍याच विमान कंपनीचे फ्लाईट उपलब्‍ध असेल तरीदेखील विमान प्रवाशांना उपलब्‍धतेनुसार त्‍या फ्लाईटमध्‍ये जागा उपलब्‍ध असतांना देखील सामावून न घेणे यामध्‍ये सा.वाले यांचा उद्देश अन्‍य मार्गाने नफा कमविणे हा होता. व ही कृती अनुचित व्‍यापारी प्रथा ठरते असा स्‍पष्‍ट आरोप तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये तसेच पुराव्‍याचे शपथपत्रात केलेला आहे. असे कथन तक्रारदारांच्‍या दिनांक 2.12.20011 च्‍या पुराव्‍याचे शपथपत्रात परिच्‍छेद क्र.9 मध्‍ये केल्‍याचे दिसून येते. या संदर्भात तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या तसेच पुराव्‍याचे शपथपत्रात असे स्‍पष्‍ट कथन केलेले आहे की, फ्लाईट क्र.620 हे दिनांक 6.5.2007 रोजी 4.05 मिनिटांनी सुटणारी उपलब्‍ध होती. व त्‍यामध्‍ये जागा उपलब्‍ध होत्‍या. सा.वाले यांनी फ्लार्इट क्र.DN-639 दिनांक 6.5.2007 रोजी रद्द केली होती म्‍हणजेच फ्लाईट क्र.620 ही सा.मनेवाले विमान कंपनीची त्‍याच दिवशीची व त्‍या वेळची अगदी जवळपास अशी उपलब्‍ध होती. व तक्रारदारांनी असे स्‍पष्‍ट कथन केले आहे की, त्‍यामध्‍ये जागा उपलब्‍ध होती तरी देखील सा.वाले यांनी फ्लाईट क्र.620 मध्‍ये तक्रारदारांना व त्‍यांचे कुटुंबियांना समाऊन घेण्‍यास नकार दिला. तक्रारदारांचे हे आरोप तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.6 ते 10 मध्‍ये दिसून येतात. सा.वाले यांनी आपल्‍या कैफीयतीमध्‍ये परिच्‍छेद क्र.8 मध्‍ये असे कथन केले आहे की, या प्रकारे तक्रारदारांना व त्‍यांचे कुटुंबियांना फ्लाईट क्र.620 सामावून घेणे शक्‍य नव्‍हते. सा.वाले आपल्‍या कैफीयतीचे परिच्‍छेद क्र.8 मध्‍ये असे म्‍हणतात की, या प्रकारे सामावून घेण्‍याची सुविधा जर विशिष्‍ट फ्लाईट रद्द झाली असेल तर ती रद्द झालेल्‍या फ्लाईटपासून दोन तास असेल. परंतु फ्लाईट क्र.639 दिनांक 6.5.2007 ही रद्द झाल्‍याची सूचना सा.वाले यांनी तक्रारदारांना 7 दिवस आधीच दिली होती त्‍यावरुन तकारदारांना फ्लाईट क्र.620 मध्‍ये सामावून घेण्‍यात आलेले नाही. सा.वाले यांचे या प्रकारचे स्‍पष्‍टीकरण अजीबात पटणारे नाही. कारण फ्लाईट क्र.620 ही फ्लाईट 639 चे वेळेचे जवळपास उपलब्‍ध होती तर सा.वाले यांनी त्‍यामध्‍ये तक्रारदारांना सामावून घेणे आवश्‍यक होते. ज्‍यामुळे तक्रारदारांची होणारी गैरसोय काही प्रमाणात कमी झाली असती. त्‍याचप्रमाणे सा.वाले यांची या प्रकारची सर्व कार्यवाही करण्‍यामागील प्रमाणिकपणा सिध्‍द झाला असता.
16.   तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या कागदपत्रासोबत निशाणी एल  येथे सा.वाले यांनी जी फ्लाईट रद्द केली त्‍याची यादी दिलेली आहे. त्‍या यादीमधील नोंदीचे अवलोकन केले असतांना असे दिसून येते की, सा.वाले यांनी दिनांक 1.5.2007 ते 30.6.2007 या दोन महीन्‍याचे कालावधीकरीता एकंदर 16 फ्लाईट रद्द केल्‍या. त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे आरक्षण असलेले फ्लाईट क्र.639 व 658 असी दोन होती. निशाणी  मधील नोंदीमध्‍ये हया सर्व 16 फ्लाईट का रद्द करण्‍यात आलेल्‍या होत्‍या  याचा खुलासा नाही. तसेच काही असाधारण कारणामुळे अथवा संचालक, नागरी विमान उड्डान खाते (DGCA) यांचे आदेशावरुन त्‍या रद्द कराव्‍या लागल्‍या होत्‍या असा पुरावा उपलब्‍ध नाही. तक्रारदारांनी फ्लाईट क्र.639 व 658 असी दोन फ्लाईटच्‍या तिकिटाचे आरक्षण नोव्‍हेंबर, 2006 मध्‍ये म्‍हणजे प्रवासाचे 6 महिने अगोदर केले होते. त्‍यामुळे तक्रारदारांना सा.वाले विमान कंपनीची तिकिटे कमी किंमतीत मिळाली होती. वरील 16 फ्लाईट मधील आरक्षण रद्द झाल्‍याने तक्रारदारांसारख्‍या अन्‍य प्रवाशांना नविन विमानाची तिकिटे त्‍यांना आवश्‍यकता असल्‍यास त्‍यापेक्षा ज्‍यादा दराने घ्‍यावी लागली असतील.  या प्रमाणे आरक्षित विमान तिकिटांचे कमी झालेले दर व विमान प्रवाशांनी घेतलेले नविन तिकिटांचे ज्‍यादा दर यातील फरकाचा लाभ सा.वाले विमान कंपनीला झाला. ही बाब असे दर्शविते की, हा सर्व निर्णय व ही कार्यवाही सा.वाले विमा कंपनीने केली. पूराव्‍यावरुन सा.वाले विमा कंपनीने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असे सिध्‍द होते. नुकसान भरपाईचे संदर्भात तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.12 मध्‍ये असे कथन केलेले आहे की, सा.वाले यांनी तक्रारदार व त्‍याचे कुटुंबीय हयांना अन्‍य फ्लाईटमये सामावून न घेतल्‍याने तक्रारदारांनी दिनांक 1.5.2007 रोजी सर्व 15 तिकिटे रद्द केली. तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.15 मध्‍ये असे कथन केलेले आहे की, फ्लाईट क्र. DN-714 व फ्लाईट क्र. DN-666 या मधील प्रत्‍येक तिकिटाकरीता रद्द होण्‍याचे शुल्‍क रुपये 810/- प्रति निकिट अशी वजावट सा.वाले यांनी केलेली होती. DN-714 मध्‍ये तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबीय अशी तिन तिकिटे होती तर DN-666 यामध्‍ये तक्रारदारांचे कुटुंबियांची 2 तिकिटे होती. त्‍या दोन्‍ही फ्लाईट रद्द झालेल्‍या नव्‍हत्‍या. परंतु सा.वाले यांनी DN-639 व DN-658 या दोन फ्लाईट रद्द केल्‍याने तक्रारदारांचे प्रवासाचे वेळापत्रेक व कार्यक्रम विस्‍कळीत झाले. तक्रारदारांना इतर आरक्षित तिकिटावर प्रवास करुन उपयोग नव्‍हता. त्‍यामुळे विमान कंपनीने आरक्षण करण्‍याबाबतचे प्रति तिकिट रुपये 810/- पाच तिकिटाकरीता वजावट केल्‍याने तक्रारदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. सा.वाले यांनी रद्द केलेल्‍या फ्लाईट DN-639 व DN-658 यामध्‍ये तक्रारदारांची 6+1 अशी 7 तिकिटे होती. या एकत्रित 10 तिकिटांवर सा.वाले यांनी वजावट प्रति तिकिट रु.50/- अशी केली. या प्रकारे तक्रारदारांना तिकिट वजावटीमुळे रु.4,550/- आर्थिक नुकसान झाले. सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, ही वजावट नियमाप्रमाणे केली. परंतु तक्रारदारांना तिकिटे रद्द करण्‍याची कार्यवाही सा.वाले यांनी फ्लाईट क्र.DN-639 व DN-658 ही रद्द केल्‍यामुळे करावी लागली. परीणामतः तक्रारदारांना या प्रकारचा र्भुदंड सेासावा लागला.  तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांना तिरुपती बालाजी दर्शन घेणेकामी हा सर्व प्रवास दौरा नियोजित केला हेाता असे तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये नमुद केलेले आहे. सा.वाले यांनी वरील दोन फ्लाईट रद्द केल्‍याने तक्रारदारांना एकूणच दौरा रद्द करावा लागला ज्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास, कुचंबणा झाली. तक्रारदारांनी प्रत्‍येक व्‍यक्‍तीकरीता रु.7000/- नुकसान भरपाई मागीतली. परंतु तक्रारदाराचे नातेवाईक यांचेकरीता तक्रारदार नुकसान भरपाई मागू शकत नाहीत. त्‍यामुळे तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबिय असे एकंदरीत तिन व्‍यक्‍तीकरीता तक्रारदार नुकसान भरपाई मागू शकतात.
17.   तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमध्‍ये हॉटेलचे आरक्षण व टॅक्‍सीचे आरक्षण रद्द होणेकामी नुकसान भरपाई रुपये 10,000/- मागीतलेली आहे. तक्रारदारांनी ज्‍यादा दराने तिकिट खरेदी करण्‍याची नुकसान भरपाई मागीतलेली आहे. परंतु तक्रारदारांनी वरील तिकिट रद्द झाल्‍यानंतर नवीन तिकिटे खरेदी केली असे देखील कथन नाही. त्‍यावरुन ज्‍यादा दराने विमान तिकिटे खरेदी केल्‍याबद्दल नुकसान भरपाई तक्रारदारांना मिळणार नाही.
18.   तक्रारदारांनी या सर्व प्रकरणामध्‍ये सा.वाले यांचेकडे ई-मेलव्‍दारे संपर्क साधणे, तसेच पत्र व्‍यवहार करणे, याकामी वेळ खर्च करावा लागला. तक्रारदार असे कथन करतात की, अंदाजे 100 तास त्‍यांचे खर्च झाले. व त्‍याकामी त्‍यांनी रु.50,000/- ची नुकसान भरपाई मागीतलेली आहे. ती रक्‍कम निच्छितच ज्‍यादा वाटते. परंतू एकूण नुकसान भरपाईची रक्‍कम ठरविताना या बाबतचा विचार केलेला आहे.
19.   वर नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदार व त्‍यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी 6 महिन्‍यापुर्वी नियेाजित केलेला प्रवास दौरा सा.वाले यांची दोन फ्लाईट अचानक रद्द करण्‍यामुळे तक्रारदारांना संपूर्ण दैारा रद्द करावा लागला. त्‍यातही सा.वाले यांनी तक्रारदारांना अन्‍य फ्लाईटमध्‍ये सामावून घेतले नाही. सा.वाले यांच्‍या वरील कृत्‍यामुळे तक्रारदारांचे झालेले आर्थिक नुकसान, तसेच मानसिक त्रास व कुचंबणा याचा विचार करता प्रस्‍तुत मंच नुकसान भरपाई तक्रारीच्‍या खर्चाचे रक्‍कमेसह रुपये 75,000/- निच्छित करीत आहे. प्रस्‍तुत मंचाची अशी धारणा आहे की, एकत्रित रुपये 75,000/- ही रक्‍कम नुकसान भरपाईचे संदर्भात योग्‍य व न्‍याय राहील.
20.   वरील चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
                    आदेश
1.    तक्रार क्रमांक 297/2007 अंशतः मंजूर करण्‍यात येते.   
2.    सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्‍यांचे विमान प्रवासाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्‍यात कसुर केली व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करण्‍यात येते.
3.    सामेनेवाले यांनी तक्रारदारांना त्‍या बद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च असे एकत्रित रुपये 75,000/- न्‍याय निर्णयाची प्रत मिळाल्‍यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी. अन्‍यथा विहीत मुदत संपल्‍या नंतर मुदत संपलेल्‍या दिवसापासून त्‍यावर 9 टक्‍के व्‍याज द्यावे.  
4.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
 
[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.