Maharashtra

Nagpur

CC/383/2020

ABHAY KRUSHNARAO BHALE - Complainant(s)

Versus

THE MANAGER, IFFCO TOKIO GENERAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

ADV. CHETAN D. THAMKE

15 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/383/2020
( Date of Filing : 30 Sep 2020 )
 
1. ABHAY KRUSHNARAO BHALE
R/O. PLOT NO.8A, PURV BALAJI NAGAR, MANEWADA ROAD, AYODHYA NAGAR, NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER, IFFCO TOKIO GENERAL INSURANCE CO. LTD.
H.OFF.AT, 2ND FLOOR, A.F.L. HOUSE, LOKBHARTI COMPLEX, MAROL MAROSHRI ROAD, NEAR MAROL FIRE BRIGED, MAROL, MUMBAI-440059
MUMBAI
MAHARASHTRA
2. THE BRANCH MANAGER, IFFCO TOKIO GENERAL INSURANCE CO. LTD.
OFF.AT, 7TH FLOOR, FIDVI TOWER, OPP. SARAFA CHEMBER, MOUNT ROAD, SADAR, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. CHETAN D. THAMKE, Advocate for the Complainant 1
 ADV. CHETAN KSHIRSAGAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 15 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ची विरुध्‍द पक्ष 2 ही शाखा आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीचे  दुचाकी वाहन अॅक्टिवा  क्रं. MH-49-N4807 चा विरुध्‍द पक्ष 2 कडून विमा पॉलिसी क्रं. 1-TDFAWSS P400 अन्‍वये दि. 05.08.2018 ते 04.08.2019 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 29,000/- करिता विमाकृत केली होती. तक्रारकर्ता दि. 29.09.2018 ला आपल्‍या वाहनाने कार्यालयाच्‍या ठिकाणी वाहन पार्क करुन कर्तव्‍यावर गेल्‍यानंतर काही वेळाने बाहेर आले असता त्‍याचे वाहन जागेवर आढळले नाही, म्‍हणून आजुबाजुला वाहनाचा शोध घेऊन आढळले नाही, म्‍हणून वाहन चोरीला गेल्‍याची तक्रार गणेशपेठ पोलीस स्‍टेशन येथे दि. 04.10.2018 ला तक्रार नोंदविली. संबंधित पोलीस स्‍टेशनमधील अधिका-यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा शोध घेतला परंतु वाहन मिळून आले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडे  दि. 16.10.2018 रोजी विमा दावा मिळण्‍याकरिता अर्जासह एफ.आय.आर.कॉपी, गाडीची 2 चाबी, दोन पासपोर्ट फोटो, आय.डी.बी.आय.बॅंकेचे रद्द धनादेश, बयाणा कॉपी, वाहन आर.सी.बुक, इंश्‍युरंस पॉलिसी, वाहन खरेदी बिल, बंधपत्र, आर.टी.ओ.विभागाचे वाहन विवरणपत्र  इत्‍यादी दस्‍तावेज सादर केले होती. त्‍यानंतर देखील विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याबाबत कळविले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 02.01.2020 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दावा मुल्‍य रक्‍कम रुपये 29,000/- व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.  

 

  1.       विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने आपल्‍या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा मागणी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 07.12.2018, 26.12.2018, 22.01.2019, 27.02.2019 व दि. 11.04.2019 रोजी पत्र पाठवून विमा रक्‍कम मिळण्‍याकरिता लागणारे आवश्‍यक सर्व दस्‍तावेज तसेच चोरीला गेलेल्‍या वाहनाच्‍या दोन्‍ही चाब्‍या,  पोलिसांनी कोर्टात सादर केलेला फायनल रिपोर्ट (ए समरीची सत्‍यप्रत) विरुध्‍द पक्षाकडे सादर करण्‍यास सांगितले होते. परंतु तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या पत्राची पूर्तता केली नाही व प्रतिउत्‍तर ही दिले नाही. करिता दि. 21.08.2020 रोजी तक्रारकर्त्‍याला पत्र पाठवून वरील कारणाने विमा दावा नाकारल्‍याचे कळविले.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन दि.29.09.2018 रोजी चोरी गेल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे. परंतु वाहन चोरी गेल्‍याची तक्रार त्‍याच दिवशी नोंदविली नाही व सदर वाहन चोरीची तक्रार 5 दिवसांनी दि. 04.10.2018 रोजी गणेशपेठ पोलीस स्‍टेशन, नागपूर येथे नोंदविली व तक्रारकर्त्‍याने सदर चोरीची सूचना विरुध्‍द पक्षाकडे 8 दिवसानंतर म्‍हणजेच दि. 07.10.2018 रोजी दिली. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे अट क्रं. 1 “notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accidental loss or damage and in the event of any claim.......in case of the theft or other criminal act with may be the subject of claim under this policy the insured shall give immediate notice to the police and cooperate with company in securing the conviction of the offender”   चा भंग केला आहे. तक्रारीतील वादाचे कारण दि. 29.09.2018 ला घडले असून तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार दि. 13.03.2020 रोजी दाखल केली आहे. प्रस्‍तुत तक्रार ही कालबाहय असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.    

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय.

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या Honda Activa 110 या दुचाकी वाहन क्रं. MH49 N-4807 चा विरुध्‍द पक्षाकडून विमा पॉलिसी क्रं. 1-TDFAWSS P400 अन्‍वये दि. 05.08.2018 to 04.08.2019  या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 29,000/- करिता विमाकृत केली होती हे नि.क्रं. 2 (9) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारकर्ता दि. 29.09.2018 रोजी आपल्‍या कामावर गेला असता त्‍या ठिकाणाहून वाहन चोरीला गेले असल्‍याची तक्रार दि. 04.10.2018 रोजी रात्री 20.10. वा. गणेशपेठ पोलीस स्‍टेशन, नागपूर येथे एफ.आय.आर. अन्‍वये  नोंदविली असल्‍याचे नि.क्रं. 2(2) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. वाहन चोरीला गेल्‍यानंतर प्रथमतः व्‍यक्‍ती वाहन चोरीला गेले असल्‍याचा इतरत्र शोध घेतो व त्‍यानंतरच पोलिस स्‍टेशनला वाहन चोरीला गेल्‍याची तक्रार नोंदवितो. तक्रारकर्त्‍याने संबंधित पोलीस स्‍टेशनला त्‍याचे वाहन चोरीला गेल्‍याची तक्रार नोंदविली व त्‍यानंतर  दि. 16.10.2018 ला विरुध्‍द पक्षाकडे वाहन चोरी गेल्‍याबाबतची सूचना विमा दावा अर्जा सोबत एफ.आय.आर.कॉपी, गाडीची 2 चाबी, दोन पासपोर्ट फोटो, आय.डी.बी.आय.बॅंकेचे रद्द धनादेश, बयाणा कॉपी, वाहन आर.सी.बुक, इंश्‍युरंस पॉलिसी, वाहन खरेदी बिल, बंधपत्र, आर.टी.ओ.विभागाचे वाहन विवरणपत्र  इत्‍यादी दस्‍तावेज सादर केले होते हे नि.क्रं. 2(1, 7 व 8 ) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे अट क्रं. 1 चे कोणत्‍याही प्रकारे उल्‍लंघन केले नाही.
  2.       तक्रारकर्त्‍याची दुचाकी गाडी चोरीला गेल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सुरुवातीला  गाडीचा शोध घेतला व त्‍यानंतर पोलीस स्‍टेशनला एफ.आय.आर. नोंदविली आणि त्‍यानंतर वाहन चोरीबाबत विरुध्‍द पक्ष यांना माहिती देण्‍यात आली होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 07.12.2018, 26.12.2018, 22.01.2019, 27.02.2019 व दि. 11.04.2019 रोजी पत्र पाठवून विमा रक्‍कम मिळण्‍याकरिता लागणारे आवश्‍यक सर्व दस्‍तावेज पुरविण्‍याकरिता पत्र दिले असल्‍याचे जबाबात नमूद केले आहे, परंतु आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ कुठलेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेले नाही.
  3.      याकरिता आयोगाने  मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओम प्रकाश विरुध्‍द रिलायन्‍स जनरल इन्‍श्‍युरन्‍स आणि इतर Civil Appeal No. 15611/2017 या प्रकरणातील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.   तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे वाहन चोरीच्‍या अनुषंगाने विमा दावा मिळण्‍याकरिता आवश्‍यक असणारे सर्व दस्‍तावेज विहित मुदतीत पुरविले असतांना देखील कागदपत्राची पूर्तता न केल्‍याचे खोट कारण दाखवून तक्रारकर्त्‍याचा वैध, वाजवी व योग्‍य असलेला विमा दावा नाकारुन तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

                 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या Honda Activa 110 या वाहनाची विमा मुल्‍य किंमत रुपये 29,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच दि. 30.09.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.