तक्रार क्रमांक – 401/2008 तक्रार दाखल दिनांक –20/09/2008 निकालपञ दिनांक – 05/12/2009 कालावधी - 01 वर्ष 02महिना 15 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. चंद्रकांत श्रीरंग मोहिते रा. एम-9/6, कशीश पार्क, राजमाता को.हॉ.सो.लि., एल.बि.एस रोड, मुलुंड चेकनाक्या जवळ , ठाणे (प). .. तक्रारदार विरूध्द दि मॅनेजर आय.सी.आय.सी.आय लोमबार्ड जनरल इंशुरन्स, नितीन कं.समोर पाचपाखाडी, ठाणे(पश्चिम). 2.आय.सी.आय.सी.आय बँक लि., जे.बि नगर, अंधेरी, मुंबई. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल श्री.यु.एस.जगदाळे वि.प तर्फे वकिल श्री. आशिष गोगटे आदेश (पारित दिः 05/12/2009) मा. सदस्य श्री. पी. एन. शिरसाट, यांचे आदेशानुसार 1. तक्रारदाराने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालील प्रमाणेः- तक्रारदाराने टवेरा शेवहरलेट बि 3(टि परमिट) साठी मेसर्स उदित मोटर्स वागळे इन्डस्टिङयल इस्टेट, ठाणे 400 604 यांच्या कडुन दि.10/05/2007 रोजी रु.7,93,138/- एवढया किमतीस विकत घेतली. गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर एम-एच-43-डी-3586 चेसिस नं.MA-6AB-6G-767 H.C-54061 नंबर 3CG53732 .. 2 .. सदर गाडीचा विमा काढला होता. विम्याप्रित्यर्थ तक्रारदाराने रु.33,610/- विमा प्रिमियम दिला होता. विमा समाप्तीचा कालावधी दि.09/05/2008 रोजी पर्यंत कार्यान्वीत होता. सदरच्या गाडीला टुरिष्ट परमिट असल्यामुळे ति गाडी श्री.आनंदा महादेव धनावडे यांचे बरोबर दि.14/05/2007 रोजी करार करून चालविण्यास दिली. करारनाम्यानुसार आनंदा धनावडे यांनी तक्रारदारास रु.11,386/- द्यावे व आय.सी.आय.सी.आय बॅकेच्या हप्त्यापोटी रु.15,615/- द्यावे असे एकुण रु.27,001/- द्यावे असे ठरले होते. सदरची गाडी दि.25/07/2007 रोजी 11.30 ते दिनांक 26/07/2007 रोजी सकाळच्या 10 वाजेच्या दरम्यान चोरीला गेली. गाडी चोरीचा एफ.आय.आर नंबर 19181 नुसार दिनांक 27/07/2007 रोजी दिला. गाडी चोरीची माहिती आर.टी.ओ, ठाणे, नवि मुंबई तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी ठाणे यांनी सदरची गाडी चोरीची लिखीत माहिती ट्रान्सपोर्ट कमिश्नर न्य अडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग, 4था माळा, गव्हर्नमेंट कॉलनी, मुंबई 400 051 येथे दि.02/08/2008 रोजी पोलिसांनी पंचनामा केला व संपुर्ण सोपस्कार पुर्ण केले. विमा रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने विरुध्द पक्षकाराकडे अर्ज केला. परंतु विरुध्द पक्षकाराने संबंधीत न्यायालयाकडुन कागदपत्रे आल्यानंतर कार्यवही करुन असे सांगितले मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी पत्र क्रमांक 171/07 दिनांक 12/10/2007 नुसार 'अ' समरी असा आदेश पारीत करण्यात आला. विमा दावा रक्कम मिळण्यासाठी पुन्हा सर्व कागदपत्रासह विरुध्द पक्षकाराकडे पाठविला. परंतु विरुध्द पक्षकाराने त्याचे पत्र क्रमांक 785 दिनांक 11/02/2008 नुसार सदरचे वाहन HIRE & REWARD साठी वापरले आहे. त्यामुळे विमा दावा नाकारण्यात येत आहे असे कळविले. गाडी चोरी झाल्यामुळे तक्रारदाराने आगावु दिलेले धनादेश वटवु नयेत म्हणुन तक्रारदाराने विरुध्द पक्षकारास कळवुनही त्याचे वकिलाचे दि.25/08/2008 रोजीचे पत्रानुसार ते .. 3 .. तक्रारदाराविरुध्द भारतिय दंडविधान 138 व 420 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे कळविल्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार या मंचात दाखल केली असुन तक्रार 2 वर्षाचे कालावधीच्या सिमेत आहे व तक्रारीचे कारण ठाणे येथे घडले आहे. आर्थिक सिमाक्षेत्रही रु.20,00,000/- च्या आत असल्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः- 1.विरुध्द पक्षकारांनी विमा रक्कम रु.7,66,137/- व त्यावर 18% द.सा.द.शे व्याज तक्रार दाखला तारखेपासुन द्यावेत. 2.विरुध्द पक्षकारांनी मानसिक व शारिरीक नुकसानीपोटी रु.2,50,000/- द्यावे. 3.विरुध्द पक्षकारांनी तक्रारीचा खर्च रु. 10,000/-(रु. दहा हजार फक्त) द्यावा. 4.अन्य हुकुम तक्रारदारांच्या लाभात व्हावेत.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटिस निशाणी 6 नुसार विरुध्द पक्षकारास पाठविली. विरुध्द पक्षकाराने निशाणी 7 नुसार पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी 8 वर लेखी जबाब दाखल केला. निशाणी 9 वर वकिलपत्र दाखल केले. निशाणी 10 वर तक्रारदाराने आय.सी.आय.सी.आय बँकेला आवश्यक पक्षकार म्हणुन शामिल करण्यासाठी दुरूस्ती अर्ज दाखल केला. मंचाने आदेश पारीत करुन अर्ज मंजुर करण्यात आला. तक्रारदाराने प्रतिज्ञापत्र निशाणी 10अ नुसार दाखल केले. निशाणी 11 वर प्रत्युत्तर दाखल केले. विरुध्द पक्षकाराने निशाणी 12 वर अर्ज दुरूस्तीस आक्षेप घेतला. विरुध्द पक्षकार नं. 2 ला नोटिस पाठविण्यास तक्रारदाराने निशाणी 13 वर अर्ज केला. निशाणी 14 नुसार विरुध्द पक्षकारास नोटीस पाठविण्यात आली. निशाणी 15 वर तक्रारदाराने सुधारित तक्रार अर्ज दाखल केला. निशाणी 16 वर मंचाची नोटीस विरुध्द पक्षकारास पाठविली. विरुध्द पक्षकार नं. 1 ने निशाणी 17 वर .. 4 .. लेखी जबाब दाखल केला तोच जास्तीचा लेखी जबाब समजावा अशी पुरसीस दाखल केली. निशाणी 18 वर विरुध्द पक्षकार 2 ने वकिलपत्र दाखल केले. विरुध्द पक्षकार नं. 2 ने लेखी जबाब निशाणी 19 वर दाखल केला. विरुध्द पक्षकार नं. 2 ने निशाणी 20 वर प्रतिज्ञापत्र दाखल केले. विरुध्द पक्षकार नं. 1 ने निशाणी 21 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्द पक्षकार नं. 2 ने निशाणी 22 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराने निशाणी 23 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदाराने निशाणी 24 वर पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. तक्रारदाराने निशाणी 25, 26, 27, 28 वर कागदपत्रे दाखल केले. विरुध्द पक्षकाराने दाखल केलेल्या लेखी जबाबातील व लेखी युक्तीवादातील कथन खालील प्रमाणेः- विरुध्द पक्षकार नं. 1 नुसार सदरचे वाहन भाडयाने देऊन वाणिजीक उपयोग केल्यामुळे फायदा कमविण्यासाठी वाहन वापरल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 नुसार कलम 2(ड) नुसार तक्रारदार ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. त्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. विमा मॅन्युअल नुसार विरुध्द पक्षकार नं. 1 ने तक्रारदारास विमा पॉलिसीच्या अटि व शर्थिनुसार विमा पॉलिसी दिली. परंतु तक्रारदाराने प्रथम पासुनच सदरचे वाहन HIRE & REWARD या तत्वावर वापरले असल्यामुळे आपोआपच विमा पॉलिसी रद्द ठरते. सदरचे वाहन श्री.आनंदा धनावडे यांचे बरोबर करारनामा करुन वापरण्यास दिले व त्याचे ताब्यात असतांना वाहन चोरी झाली वाहन HIRE & REWARD साठी वापरले. फायदा कमविण्यासाठी वापरले म्हणुन विमा दावा मान्य करणे विरुध्द पक्षकारावर बंधनकारक नाही. तक्रार खोटी, बनावट तापदायक असुन या मंचात तक्रार चालण्यास पात्र नाही. म्हणुन कलम 26 नुसार तक्रार रद्द ठरवुन त्याची रक्कम विरुध्द पक्षकारास द्यावी व न्याय द्यावा. विरुध्द पक्षकार नं. 2 च्या लेखी जबाबातील व लेखी युक्तीवादातील निवेदन खालील प्रमाणेः
.. 5 .. सदरचे वाहन हे विरुध्द पक्षकार नं. 2 च्या सौजन्याने (हायपोथिकेशन) ने घेतले असल्यामुळे जोपर्यंत संपुर्ण रक्कम व्याजासहित तक्रारदार विरुध्द पक्षकार नं. 2 ला परत करत नाहीत. तोपर्यंत कायदेशिररीत्या विरुध्द पक्षकार नं. 2 हेच मालक ठरतात. तक्रारदार मालक ठरत नाहीत. यदाकदाचित हे मंच नुकसान भरपाई देण्याचे आदेश देत असतील तर विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी नुकसान भरपाई हि विरुध्द पक्षकार नं. 2 ला द्यावी. तक्रारदाराने मंचाकडुन सत्य घटना लपवुन ठेवली आहे. प्रथमपासुनच तक्रारदार हे सदरचे वाहन व्यापारी उद्देशासाठी वापरत होते व त्यावर फायदा मिळवित होते त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 कलम 2(ड) नुसार तक्रारदार या संज्ञेत मोडत नाहीत. म्हणुन हि तक्रार ग्राहक न्यायालयाच्या कार्यकक्षेत्रात येत नाही. म्हणुन या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. तक्रार खोटी, बनावट, तापदायक आहे, त्यामुळे कलम 26 नुसार तक्रार रद्द ठरवुन विरुध्द पक्षकारास त्याची मोठी रक्कम द्यावी व न्याय द्यावा.
3. सदरच्या तक्रारीसंबंधी उभय पक्षकाराने दाखल केलेले कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, लेखी युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्यायिक प्रक्रियेसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात ते येणे प्रमाणेः- अ)तक्रारदाराचा विमा दावा HIRE & REWARD या कारणास्तव नामंजुर करणे योग्य व कायदेशीर होईल काय? उत्तर – नाही. ब)तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास तसेच न्यायिक खर्च मिळण्यास पात्र ठरतात? उत्तर – होय. कारण मिमांसा अ)स्पष्टिकरणाचा मुद्दाः- तक्रारदाराने दि.10/05/2007 रोजी मेसर्स उदित मोटर्स, वागळे इन्डस्ट्रीयल इस्टेट, ठाणे 400 604 या कडुन रु.7,93,138/- एवढया किमतीस टवेरा सेव्हरलेट बि3 हि गाडी विकत घेतली. गाडीचा तपशिल खालील प्रमाणेः- .. 6 .. शेव्हरलेट टवेरा बि 3 रजि. नं. MH-43-D-3586 इजिन नं. 3CG53732 चेसिस नं. MH6AB6G767HC54061 सदर गाडीच्या विम्या प्रित्यर्थ विरुध्द पक्षकारानी रु.33,610/- विमा प्रिमियम रक्कम तक्रारदाराकडुन वसुल करुन घेतली. विरुध्द पक्षकाराने passenger carrying Vehicle साठी कव्हर नोट नं. PCVE 5204612 प्रदाण केली. कव्हर नोटच्या प्रथम परिच्छेद मध्ये खालील प्रमाणे माहीती स्पष्टपणे लिहिली आहे. The Insured described in Form “52” referred to above having proposed for insurance in respect of the Motor vehicle(s) described herein and having paid the sum of Rs.33,510/- as premium, the risk is hereby covered under the terms of the Company's usual form of PACKAGE Policy applicable thereto (subject to any special conditions mentioned below).Unless the cover be terminated by the Company by notice in writing in which case the Insurance will thereupon cease and a proportionate part of the premium otherwise payable for such Insurance shall be charged for the time of the company has been at risk. वरील स्पष्टिकरणामध्ये सदर वाहन HIRE & REWARD चा कोठेही उल्लेख नाही. तसेच विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराकडुन रु.33,610/- एवढा विमा प्रिमियम स्विकारला त्या अर्थी उभयतामध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्यामुळे कन्सीडरेशनही होते व आहे. त्या अर्थी तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम2(ड) अन्वये ग्राहक या संज्ञेत मोडतात. विरुध्द पक्षकाराने प्रिमियम रक्कम स्विकारल्यामुळे ते विमा रक्कम दावा देण्यास कायद्यानुसार बांधील आहेत. विरुध्द पक्षकाराने चुकीच्या तत्वावर विमा दावा नाकारला असल्यामुळे त्यांनी सेवेमध्ये .. 7 .. त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे सिध्द होते. विमा दावा नाकारणे न्यायोचित व विधियुक्त नाही तसेच नैसर्गिक न्यायाचे दृष्टिकोनातुनही संयुक्तिक नाही. सबब विमा दावा पारीत करणे विरुध्द पक्षकारास कायद्यानेही बंधनकारक आहे. ब)स्पष्टिकरणाचा मुद्दाः- तक्रारदाराचा विमा दावा गाडी चोरी झाल्यामुळे व त्यासंबंधी पोलिस स्टेशनमध्ये एफ.आय.आर नोंदविला, पंचनामा केला व मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सदरच्या तक्रारीचे रुपांतर पत्र क्र.171/2007 नुसार दिनांक 12/10/2007 रोजी सदरची तक्रारीवर 'अ' समरी असा आदेश पारीत केला. वरील सर्व कागदपत्रे विरुध्द पक्षकारास दाखल केली. तरीही विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास आश्वासन देऊनही विमा दावा मंजुर न केल्यामुळे तक्रारदारास मंचामध्ये दावा दाखल करावा लागला. त्यांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला. त्याची परतफेड करणे विरुध्द पक्षकाराचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे. तक्रारीमध्ये तथ्ये व सत्य आढळुन आल्याने हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 401/2008 हि अंतशः मंजुर करण्यात येत आहे. 2. तक्रारदाराचा विमा दावा रक्कम रु.7,66,137/- (रु. सात लाख सदुसष्ट हजार एकशे सदोतिस फक्त) व त्या रकमेवर 9% द.सा.द.शे व्याज तक्रार दाखल तारखेपासुन मंजुर करण्यात येत आहे. वरील रकमेपैकी विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी विरुध्द पक्षकार नं. 2 यास रु.5,51,000/- (रु. पाच लाख एक्कावन्न हजार फक्त) व त्यावर 9% द.सा.द.शे व्याज तक्रार दाखल तारखेपासुन द्यावी. उर्वरित रक्कम तक्रारदारास प्रदाण करावी. 3. विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी तक्रारदारास रु.10,000/- (रु. दहा हजार फक्त) मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी. 4. विरुध्द पक्षकार नं. 1 यांनी तक्रारदारास रु.5,000/- (रु. पाच हजार फक्त) न्यायिक खर्च द्यावा.
.. 8 .. 5. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षकार यांनी आदेशाची सही शिक्कयाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत परस्पर (direct) देय करावयाचे आहे तसे न घडलेस वरील रकमेवर 3% दंडात्मक व्याज आदेश पारीत तारखेपासुन देय होईल. 6.वरील आदेशाची साक्षांकित प्रत उभय यपक्षकारास निःशुल्क देण्यात यावी.
7.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. 8.यदाकदाचित उभय पक्षकारामध्ये पैशाची देवाण घेवाण करतांना आदेशामध्ये फरक पडत असल्यास उभयतांनी हिशोब तपासणी/पडताळणी करुन त्याप्रमाणे रक्कम वळती/वजा/अधिक करण्याची जबाबदारी आहे व त्याची खात्री एकमेकात/आपसात करुन घ्यावी.
दिनांक – 05/12/2009 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.शशिकला श.पाटील ) सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|