पारित दिनांक 30.11.2010 (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी तवेरा गाडी खरेदी केली होती, त्याची इन्शुरन्स पॉलीसी गैरअर्जदाराकडून घेतली. दि.13.04.2009 रोजी परळी येथे उडडाण पुलावर समोरुन येणा-या ट्रकने धडक दिल्याने गाडीस अपघात झाला. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. तक्रारदारानी पोलीसात तक्रार नोंदविली, त्याचप्रमाणे गैरअर्जदार इन्शुरन्स कंपनीला सुध्दा कळविले, तसेच कागदपत्रासहीत क्लेम फॉर्म गैरअर्जदाराकडे पाठवून दिला. क्लेमची रक्कम मिळाली नाही म्हणून तक्रारदारानी दि.24.12.2009 रोजी लिगल नोटीस पाठविली. गैरअर्जदारानी दि.23.12.2009 च्या पत्राने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे तक्रारदारास कळविले, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून क्लेमची रक्कम, तसेच रु.1,25,000/- नुकसान भरपाई, रु.1,00,000/- मानसिक त्रासापोटी, रु.10,000/- तक्रारीचा खर्च आणि इतर दिलासा मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांनी एकत्रित लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार दि.23.12.2009 रोजी गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. गैरअर्जदारानी इन्व्हेस्टिगेटर नियुक्त केला होता, त्यांनी दिलेल्या अहवालावरुन तक्रारदार त्यांच्या गाडीचा वापर व्यावसायिक कारणासाठी करत होते. ते पॉलीसीचे अटी व शर्तीचे भंग करणारे आहेत. योग्य त्या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारानी मंचात तक्रार दाखल केल्यानंतर दि.17 ऑगस्ट 2010 रोजी गैरअर्जदाराचे अडव्होकेट यांनी सदरील तक्रार ही तडजोडीसाठी ठेवावी, यात तडजोड होईल असे सांगितले. त्यानंतर दि.27 सप्टेंबर 2010, 27 ऑक्टोबर 2010 या तारखा तडजोडीसाठी मागितल्या. त्यानंतर दि.29 ऑक्टोबर 2010 रोजी सर्वेअरच्या अहवालानुसार रक्कम रु.69,787/- चा चेक तक्रारदारास दिला. तक्रारदारानी हा चेक अंडर प्रोटेस्ट स्विकारला, तसेच गैरअर्जदारानी सुध्दा हा चेक अंडर प्रोटेस्ट दिला असे दोघांचेही म्हणणे होते. वरीलप्रमाणे गैरअर्जदारानी चेक दिला असला तरी, मंच मेरिटनुसार तक्रारीचा निकाल देत आहे. तक्रारदाराच्या गाडीचा अपघात दि.13.04.2009 रोजी परळी येथे झाला. सर्व कागदपत्रे दिल्यानंतर गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम, तक्रारदार हे सदरील गाडी व्यावसायिक कारणासाठी चालवित होते, हे पॉलीसीच्या अटी व शर्तीचे भंग करणारे आहे, म्हणून दि.23.12.2009 रोजी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला. या नामंजूरीच्या पत्रासोबत किंवा लेखी जबाबासोबत गैरअर्जदारानी कुठलाही पुरावा दाखल केला नाही. ज्यायोगे, तक्रारदारानी पॉलीसी घेतल्यानंतर एखाद्यावेळेस तरी, त्यांची गाडी हायर आणि रिवॉर्ड बेसिसवर चालविली होती, किंवा गाडीमध्ये पैसे घेऊन प्रवासी बसलेले होते, हे दाखवून दिले नाही. तसेच गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, हे सर्व त्यांनी नियुक्त केलेल्या इन्व्हेस्टिगेटरच्या अहवालावरुन केलेले आहे. तशा प्रकारचा इन्व्हेस्टिगेटरचा अहवालही मंचात दाखल केला नाही. कुठलाही पूरावा नसतांना गैरअर्जदारानी तक्रारदाराचा क्लेम दि.23.12.2009 रोजी नामंजूर केला. त्यानंतर मंचामध्ये सर्वेअरच्या अहवालानुसार रु.69,787/- चा चेक अंडर प्रोटेस्ट प्रमाणे दिला असे म्हणतात, हे मंचास मान्य नाही. ज्या कारणावरुन तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला, तेच मुळी पुराव्यासहीत सिध्द केलेले नाही. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देते की, त्यांनी रु.69,787/- दि.23.12.2009 पासून 9% व्याजदराने द्यावेत. गैरअर्जदारानी दि.29 ऑक्टोबर 2010 रोजी रु.69,787/- दिलेले आहेत, परंतू त्यावरील व्याज दिलेले नाही. म्हणून मंच रक्कम रु. 69,787/- वर दि.23.12.2009 पासून 9% व्याज सहा आठवडयाच्या आत तक्रारदारास द्यावे. व तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावेत. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांनी संयुक्तिक व वैयक्तिकपणे तक्रारदारास रक्कम रु.69,787/- वर दि.23.12.2009 पासून 9% व्याज, सहा आठवडयाच्या आत द्यावे. व तक्रारीचा रु.1,000/- द्यावेत. श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |