Maharashtra

Additional DCF, Pune

CC/13/39

Mr. Yogesh Baban Satpute - Complainant(s)

Versus

The Manager, ICICI Lombard General Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

S.A. Maheshwari

23 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/39
 
1. Mr. Yogesh Baban Satpute
R/o.Rangnath Ghule Bopkhel,Tal_Haveli,Dist -Pune
Pune
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Manager, ICICI Lombard General Insurance Co. Ltd
Adventure Towers,2nd Floor,Opp_Oberal Hotel,Savedi road,Ahmednagar-01
Ahmednagar
Maharashtra
2. The Manager, ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
Soharat Hall, Block No.-206, Near Jahangir Hospital Chowk, Near Pune Railway Station, Pune-1
Pune.
Maharashtra
3. -
-
-
-
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

*****************************************************************


 

तक्रारदारांतर्फे                   -     अॅड.श्री. माहेश्‍वरी 


 


जाबदारांतर्फे                     -     अॅड.श्रीमती. सोमण (जोशी)


 

// निकालपत्र //


 

 


 

पारीत दिनांकः- 23/10/2013    


 

(द्वारा- अंजली देशमुख, अध्‍यक्ष


 

 


 

            तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मोटारसायकलसाठी जाबदारांकडून पॉलिसी घेतली होती, त्‍याचा कालावधी दि. 24/1/2011 ते दि. 23/1/2012 असा होता. दि. 11/4/2011 रोजी साधारण 5.00 वाजण्‍याच्‍या सुमारास संध्‍याकाळी तक्रारदाराच्‍या भावाने त्‍यांची मोटारसायकल शाह हॉस्पिटल, चाकण, पुणे येथील पार्कींग स्‍पेसमध्‍ये पार्क केली, परत आल्‍यानंतर त्‍यांना त्‍यांची मोटरसायकल तेथे नसल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी लगेचच याबद्दलची माहिती तक्रारदारास दिली आणि आजूबाजूस शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला पण मोटारसायकल आढळून आली नाही. लगेचच तक्रारदाराचे भाऊ ऊमेश हे चाकण पोलीस स्‍टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवण्‍यासाठी गेले त्‍यावेळेस तेथील पोलीस ऑफिसरने त्‍यांना आधी आजूबाजूच्‍या परिसरात तक्रारदारांनी स्‍वत:च शोध घेण्‍यासाठी सांगितले, त्‍यानंतर तक्रार दाखल करावी असा सल्‍ला दिला म्‍हणून तक्रारदाराचा भाऊ मोसायकलचा शोध घेत होते, तरी त्‍यांना मोटारसायकल सापडली नाही म्‍हणून त्‍यांनी पुन्‍हा एकदा तक्रार नोंदविण्‍याचा प्रयत्‍न केला, पुन्‍हा एकदा तोच सल्‍ला पोलीसांनी दिला त्‍यामुळे शेवटी दि. 5/5/2011 रोजी पोलीस स्‍टेशमध्‍ये तक्रार नोंदविली त्‍याचा . एफ्.आय्.आर. क्र. 103 असा आहे.  मधल्‍या काळामध्‍ये तक्रारदारांनी प्रतिभा मोटर्स, ताथवडे येथील शोरुममध्‍ये जाऊन तेथील एजंटला मोटारसायकल चोरीला गेल्‍याचे सांगितले. तसेच जाबदारांना सुध्‍दा मोटारसायकल चोरीला गेल्‍याची कल्‍पना दिली त्‍यावेळेस जाबदारांनी आवश्‍यक ती कागदपत्रे पाठविण्‍यासाठी सांगितले. तक्रारदारांनी सर्व कागदपत्रे जाबदारांना दिली. सर्व कागदपत्रे देऊनसुध्‍दा जाबदारांनी दि. 22/5/2012 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला त्‍याचे कारण तक्रारदारांनी चोरी झाली हे सांगण्‍यास विलंब लावला असे नमुद केले. 


 

 


 

            तक्रारदारांनी एच्.डी.एफ्.सी. बँकेकडून ही मोटरसायकल घेण्‍यासाठी अर्थसहाय्य घेतले होते.  मोटारसायकल चोरीला गेल्‍याबद्दल त्‍यांनी जाबदार क्र. 2 यांना कळविले, त्‍यानंतर तक्रारदारांनी जाबदारास दि.15/10/2012 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली, त्‍याचे उत्‍तर दिले नाही आणि क्‍लेमची रक्‍कमही दिली नाही म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार सदरील जाबदारांकडून रक्‍कम रु. 39,513/- 18 टक्‍के व्‍याजदराने मागतात, रक्‍कम रु.15,000/- नुकसानभरपाई आणि खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.



 

2.          जाबदार क्र. 1 व 2 यांनी दोघांतर्फे लेखी जबाब दाखल केला. जाबदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, तक्रारदाराची हीरो होंडा स्‍प्‍लेंडर ही गाडी दि. 11/4/2011 रोजी चोरीला गेली, त्‍यानंतर तक्रारदारांनी त्‍यांचा क्‍लेम दाखल केला. जाबदारांनी इनव्‍हेस्‍टीगेटींग ऑफिसर म्‍हणून मे. चार्टरहाऊस डिटेक्‍टीव्‍ह सर्व्‍हीसेस यांना नियुक्‍त केले. त्‍यांनी त्‍यांचा अहवाल दि. 15/7/2011 रोजी जाबदारांना दिला त्‍या रिपोर्टवरुन आणि तक्रारदारांनी दिलेल्‍या सर्व कागदपत्रांवरुन खालील मुद्दे आढळून आले.


 

      ए.    तक्रारदारांनी त्‍यांची मोटारसायकल चोरीला गेली त्‍याबददल पोलीस


 

            स्‍टेशनला दि. 5/5/2011 रोजी कळविले म्‍हणजेच चोरी झाल्‍यापासून


 

                        24 दिवसानंतर पोलीस स्‍टेशनला कळविले.


 

      बी.    तक्रारदारांनी जाबदारांना दि. 11/5/2011 रोजी म्‍हणजेच 31 दिवसांनी          त्‍यांची गाडी चोरीला गेल्‍याचे कळविले.


 

      सी.  पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार “Notice shall be given in writing to the                    company immediately upon the occurrence of any accident, loss or                 damage or theft in the event of any claim and the insured shall give all                such information and assistance as the company shall require. In case                     of theft or criminal act which may be the subject of a claim under this                         policy the insured shall give immediate notice to the police and                             cooperate with the company in securing the conviction of the                                     offender”.   


 

 


 

चोरी झाल्‍यानंतर त्‍वरित (immediately) लिखीत स्‍वरुपात याची नोटीस कंपनीला व पेालीसांना देणे गरजेचे असते ही अट बंधनकारक असूनही तक्रारदारांनी त्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन केले आहे. त्‍यांनी 24 दिवस विलंबाने पोलीसांत कळविले आहे आणि 31 दिवस विलंबाने जाबदारांना कळविले, या कारणावरुन जाबदारांनी दि. 22/5/2012 रोजी तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केला.  योग्‍य त्‍या कारणावरुन क्‍लेम नामंजूर केला असल्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात.  जाबदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. 


 

     


 

4.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली.  तक्रारदाराची मोटारसायकल दि. 11/4/2011 रोजी संध्‍याकाळी 5.00 वाजता शाह हॉस्पिटलच्‍या पार्कींगमधून चोरीला गेली. तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की ते दोनवेळा  पोलीस स्‍टेशनमध्‍ये गेले असता पोलीसांनी त्‍यांची तक्रार घेतली नाही त्‍यामुळे त्‍यांना पोलीसात तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला. कुठल्‍याही सामान्‍य व्‍यक्तिला आपली वस्‍तु चोरीला गेल्‍यास पोलीस स्‍टेशनमध्‍ये लगेचच तक्रार नोंदवावी ही जागरुकता असतेच. प्रस्‍तुतच्‍या तक्रारीत, तक्रारदार दोनवेळेस पोलीस स्‍टेशनमध्‍ये तक्रार नोंदविण्‍यास गेले परंतु पोलीसांनी तक्रार नोंदवून न घेता आजूबाजूस शोधण्‍यास सांगितले म्‍हणतात. अशावेळी एकतर तक्रारदारांनी, पोलीस तक्रार नोंदवून घेत  नसतील तर त्‍यांच्‍या वरिष्‍ठाकडे जावयास पाहिजे होते किंवा तिथेच तक्रार नोंदवून घेण्‍याचा आग्रह धरावयास पाहिजे होता तसे काहीही केले नाही, म्‍हणजे त्‍यात तक्रारदाराची चुक आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी इन्‍श्‍युरन्‍स कपंनीला विलंबाने का कळविले याचे स्‍पष्‍टीकरण त्‍यांच्‍या तक्रारीत दिलेले नाही. जाबदारांनी अटी व शर्ती दाखल केलेल्‍या आहेत तसेच मा. राष्‍ट्रीय आयोगाचा निकाल दाखल केलेला आहे. पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारदारांनी पोलीसात आणि इन्‍श्‍युरन्‍स कंपनीला ताबडतोब कळविले नाही. जाबदारांनी योग्‍य त्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे म्‍हणून जाबदारांनी तक्रारदारांना दिलेल्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नाही असे मंचाचे मत आहे. 


 

            वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.       


 

                               // आदेश //


 

             


 

 


 

1     तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

2     खर्चाबद्दल काही आदेश नाहीत.


 

 


 

3.      निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.


 

             


 

 


 

              (एस्.के. पाचरणे)                (अंजली देशमुख)


 

                   सदस्य                        अध्यक्ष


 

               अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, पुणे.


 

 


 

स्‍थळ : पुणे.


 

 


 

दिनांक –    23/10/2013                    


 

 


 

vns


 

 


 

 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.