Maharashtra

Thane

CC/814/2014

Umeshkumar Baranwal - Complainant(s)

Versus

The Manager, HDFC Dysnfst ligr Insurance company Ltd, - Opp.Party(s)

24 Aug 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/814/2014
 
1. Umeshkumar Baranwal
At. F.No. A/101, 1st floor, Mahavir Aarambh, Mahavir Residency, Pasthal , Boisar, Talluka, Palghar, Dist Thane 401504
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Manager, HDFC Dysnfst ligr Insurance company Ltd,
At. Boisar, Thane duy 401504
Palghar
Maharashtra
2. The Managing Director, HDFC Stndard life Co Ltd.
At/ 12th ,13th floor, Lodha Execlus, Apollo Mills, company, N M Joshi Rd, Mahalaxmi, Mumbai 400011
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Aug 2016
Final Order / Judgement

               (द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

1.          तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कडुन ता. 30/09/2009 रोजी दोन HDFC Unit Linked Young star Plus II Policy No. 13147943 & 13147916  अनुक्रमे रक्‍कम रु.50,000/- व रु. 49,999/- एवढी रक्‍कम भरणा करुन घेतल्‍या. 

 

2.          तक्रारदारांना सदर पॉलीसीचा लॉकींग कालावधी 3 वर्षाचा असल्‍याबाबतची तसेच विमा पॉलीसी मधील जमा रक्‍कम 5 वर्षाच्‍या कालावधीत रक्‍कम रु. 5 लाख withdraw करणे शक्‍य असल्‍याबाबतची माहि‍ती विमा पॉलीसी घेत असतांना सामनेवाले यांनी दि‍ली होती.

 

3.          तक्रारदारांनी दोन वर्षानंतर विमा पॉलीसीच्‍या जमा रकमेची विचारणा सामनवेाले यांचेकडे केली असता एकुण रक्‍कम रु. 1,50,000/- जमा असल्‍याचे समजले.  तक्रारदारांच्‍या आर्थिक परिस्थितीमुळे त्‍यांना पैशाची आवश्‍यक्‍ता होती.  त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांच्‍या संबंधित अधिका-यांना भेटुन एवढी कमी रक्‍कम जमा असल्‍याबाबत विचारणा केली परंतु सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.  सबब प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदारांनी दाखल केली आहे.

 

4.         सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांची तक्रार मुदतबाह्य आहे,  तक्रारदारांनी सदर पॉलीसी 2009 मध्‍ये घेतल्‍या असून तक्रार सन 2014 मध्‍ये दाखल केली आहे.  तक्रारदारांनी सन 2009 मध्‍ये पॉलीसीची प्रत प्राप्‍त झाल्‍यानंतर उपलब्‍ध असलेल्‍या “Free Look Period” मध्‍ये पॉलीसीच्‍या अटी व शर्ती मान्‍य नसल्‍यास परत करणे शक्‍य होते. तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही.

 

5.          तक्रारदारांनी सदर युनिटलिंक (मार्केट लिंक) विमा पॉलीसी नफा (speculative gain) मिळविण्‍यासाठी घेतलेली असल्‍यामुळे ग्राहक मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही.

 

6.          सामनेवाले यांनी ता. 25/09/2009 रोजी तक्रारदारांना दोन्‍ही पॉलीसीची विमा रक्‍कम (sum assured ) कमी करण्याबाबतचे पत्र पाठवले.  तक्रारदारांनी सदरची बाब मान्‍य केली.

 

7.          तक्रारदारांच्‍या दोन्‍ही विमा पॉलीसी सन 2009 पासून 18 वर्ष कालावधीच्‍या असून  तक्रारदारांनी फक्‍त 3 वर्ष कालावधीच्या प्रिमीयमची रक्‍कम सामनेवाले यांचेकडे भरणा केली.  तक्रारदारांनी चौथ्‍या प्रिमियमची रक्‍कम ता. 30/09/2012 रोजी पर्यंत भरणे आवश्‍यक होते तथापी ग्रेस पिरिअड देवुनही प्रिमियमची रक्‍कम भरणा न केल्‍यामुळे पॉलीसीचे स्‍टेटस “Paid up” असे करण्‍यात आले विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे ता. 04/04/2013 कालावधीपर्यंत विम्याची सुरक्षि‍तता तक्रारदारांना दिली आहे.

 

8.          विमा पॉलीसीच्‍या clause 15 अन्‍वये minimum fund value पेक्षा fund Value कमी असेल तर पॉलीसी रद्द करण्‍याचे अधिकार सामनेवाले यांना आहेत.  अशा परिस्थ‍ितीस फक्‍त “unit fund value” ची रक्कम तक्रादारांना देय आहे.  तक्रारदाराच्‍या दोन्‍ही विमा पॉलीसीची fund value ता. 04/04/2013 रोजी अनुक्रमे रक्‍कम रु. 74,776.96/- व 74,778.81/- देय असल्‍यामुळे ता. 10/04/2013 रोजीच्‍या दोन चेकद्वारे सदर रकमा त्‍यांना  पॉलीसी रद्द झाल्याची माहीती देवून रजि. पोस्‍टाने पत्र पाठविण्‍यात आली.  सदर चेक अपुर्ण पत्‍याच्‍या शे-यासह परत आले.  तक्रारदारांनी ता. 29/09/2014 व ता. 07/10/2014 रोजी सामनेवाले यांचे कडे संदर्भात तक्रार केली.  सामनेवाले यांनी ता. 10/10/2014 रोजीच्‍या मेलद्वारे सविस्‍तर खुलासा दि‍ला.

 

9.          तक्रारदारांची तक्रार, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच समानेवाले यांचे लेखी म्‍हणणे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचा स्‍वतःचा व सामनेवाले यांच्‍या वकीलांचा युक्तिवाद ऐकला. यावरुन मंच खालील प्रमाणे निष्‍कर्ष काढत आहे.  

 

10.                     कारणमिमांसा

अ) तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे विमा पॉलीसी नं. 13147916 व 13147916 व 13147943 ता. 30/09/2019 रोजी 18 वर्ष कालावधी करीता रु. 2,78,000/- (sum assured) एवढया किमतीच्‍या विकत घेतल्‍या.  तक्रारदारांनी 3 वर्ष कालावधीकरीता दोन्‍ही विमा पॉलीसीची अनुक्रमे रु. 49,999/- व रु. 50,000/- प्रत्‍येक वर्षी सामनेवाले यांचेकडे भरणा केल्‍याची बाब उभय पक्षांना मान्‍य आहे.

ब) सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार दोन्‍ही पॉलीसीचा चौथा वर्षाचा प्रिमीयम भरणा करण्‍यासाठी ता. 30/09/2012 दिलेली असून तक्रारदारांनी ग्रेस कालावधीमध्‍ये सदर प्रिमियमची रक्कम जमा केली नाही.  त्‍यामुळे सदर दोन्‍ही पॉलीसीचे स्‍टेटस “paid up” पॉलीसी आहे.

तक्रारदारांच्‍या दोन्‍ही विमा पॉलीसीच्‍या प्रती, प्रपोजल फॉर्मची प्रत मंचात दाखल आहे.  तक्रारदारांची “unit Linked young Star Plus II” प्रकारच्‍या या दोन विमा पॉलीसी घेतल्‍या होत्‍या.  सदर विमा पॉलीसीतील clause 15 प्रमाणे paid up policy मध्‍ये fund value (accumulated units) ची रक्कम minimum paid up रकमेपेक्षा कमी असेल तर पॉलीसी रद्द होते व विमा पॉलीसी रद्द होण्‍याचे वेळी असलेली Net Asset Value (Fund Value) रक्‍कम विमाधारकाला देय आहे.

Clause 15 प्रमाणे minimum fund value

i) The Fund value of the policy will be monitored on every Monthly Renewal Date and when partial withdrawals are made.  The fund value will be determined in accordance with provision of clause 9(iv). 

Provision of 9(xiv) described as follows.

 For the purpose of monitoring against the minimum fund value in accordance with provision 15 we will use the latest available unit prices to determine the value of the funds in your policy.

            If we cancel your policy in accordance with Provision of 15, we will use the latest available unit prices to cancel units from your policy.

विमा पॉलीसीच्‍या वरील अटी व शर्तीची प्रत मंचात दाखल आहे.        

            तक्रारदारांच्‍या दोन्‍ही पॉलीसीची minimum Fund Value ची रक्‍कम पॉलीसी घेतल्‍यानंतर तीन वर्षानी रु. 75,000/- होती. ता. 04/04/2013 रोजी Fund Value ची रक्‍कम दोन्‍ही पॉलीसीची अनुक्रमे रु. 74,766.96 व रु. 74,778.81 अशी होती.  सदर रकमांचे ता. 10/04/2013 रोजीचे दोन चेक तक्रारदारांना सामनेवाले यांनी रजि. पोस्‍टाने पाठलेले होते.  परंतु अपुर्ण पत्‍याच्‍या शे-यासह सदर चेक परत आले.  तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार विता पॉलीसीमध्‍ये नमुद पत्‍यावर राहत नसल्‍यामुळे त्‍यांना चेक प्राप्‍त झाले नाहीत.  सामनेवाले यांनी विमा पॉलीसीच्‍या वरील अटी व शर्तीनुसार तक्रारदारांना देय असलेल्‍या रकमेचे चेक पाठविण्‍याचे तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन स्‍पष्‍ट होते.

क) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर विमा पॉलीसी घेतांना सामनेवाले यांच्‍या अधिका-यांनी प्रिमीयमची रक्‍कम तीन वर्ष कालावधीकरीता भरणा केल्‍यानंतर पाच वर्षांनी म्‍हणजे 30 सप्‍टेंबर 2014 मध्‍ये रक्‍कम रु. 5 लाख देय असल्‍याचे सांगितले.  तथापी विमा पॉलीसीमध्‍ये सदर बाब नमुद नाही.  तक्रारदार व संबंधित अधि‍कारी यांचे तोंडी बोलणे काय झाले? याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही. सबब तक्रारदारांचे म्‍हणणे ग्राह्य धरता येत नाही तक्रारदारांनी इंजिनि‍अरिंग विषयामध्‍ये पदवी घेतल्‍याची बाब प्रपोजल फॉर्म मध्‍ये  नमुद आहे.  विमा पॉलीसीचा कालावधी रक्‍कम वगैरे तपशील पॉलीसीमध्‍ये नमुद आहे. तक्रारदारांनी विमा पॉलीसी प्राप्‍त झाल्‍यानंतर 15 दिवसांच्‍या “Free lock period” मध्‍ये पॉलीसी मागे घेण्‍याची संधी उपलब्‍ध होती परंतु तक्रारदारांनी या संदर्भात कोणताही आक्षेप न घेता दोन्ही पॉलीसीची पुढील तीन वर्षाच्या कालावधीत प्रिमीयमची रकम भरणा केली आहे.  यावरून तक्रारदारांना दोन्‍ही विमा पॉलीसी मान्‍य असून विमा करारातील अटी व शर्ती त्‍यांच्‍यावर बंधनकारक आहेत असे मंचाचे मत आहे.  

ड) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांची फसवणुक केली आहे.  तक्रारदारांनी सदर अधिका-यांना प्रस्‍तुत प्रकरणात सामाविष्ठ केले नाही. तसेच तक्रारदारांच्‍या विमा पॉलीसीवरील स्‍वाक्षरी त्‍यांची नसल्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल नाही. तसेच सदरची बाब गाहक मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही.

इ) तक्रारदारांच्या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांना सामनेवाले यांनी पाठवलेल्‍या रकमेचे चेक प्राप्‍त झाले नाहीत.  सामनेवाले यांनी सदर चेक तक्रारदारांना प्राप्‍त झाल्‍याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केला नाही.  सामनेवाले यानी तक्रारदारांना ता. 04/04/2013 रोजी देय असलेली दोन्‍ही विमा पॉलीसीच्‍या fund Value ची रक्‍कम अनुक्रमे रु. 74,776.96 व रु. 74,778.81/- तक्रारदारांना देणे बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे.

 

11.     सबब तक्रारदारांचे म्‍हणणे ग्राह्य धरता येत नाही.

                          आ दे श

      1. तक्रार क्र. 814/2014  अंशतः मंजुर करण्‍यात येते.

2. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना दोन्‍ही विमा पॉलीसीच्या Fund Value ची रक्कम अनुक्रमे रु. 74,776/- (रु. चौ-याहत्‍तर हजार सातशे शहात्‍तर फक्‍त) व रु. 74,778/- (रु. चौ-याहत्‍तर हजार सातशे अठ्ठयात्‍तर फक्‍त)  ता. 04/04/2013 पासून ता. 30/09/2016 पर्यंत द.सा.द.शे 9% व्‍याजदराने द्यावी. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास ता. 01/10/2016 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे 12% व्‍याजदारासह दयावी.

3. तक्रारीमध्‍ये नमुद केलेल्‍या तक्रारदारांच्‍या इतर मागण्‍या फेटाळुन लावण्‍यात येतात.

4. खर्चाबाबत आदेश नाही.

5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात    याव्‍यात.

6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम अंतर्गत विनियम 2005 मधील विनियम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारांना परत करण्‍यात यावेत.

 

दिनांक – 24/08/2016.

ठिकाण – ठाणे

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.