Maharashtra

Kolhapur

CC/14/139

Chandrakant Krishna Pharane - Complainant(s)

Versus

The Manager, Fiat Group Automobile India Pvt.Ltd., - Opp.Party(s)

Sau.S.A.Patil

10 Aug 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/139
 
1. Chandrakant Krishna Pharane
R/o. 613, E Ward, 2nd Lane, Shahupuri, Kolhapur.
Kolhapur
2. Ruturaj Chandrakant Pharane
As above
...........Complainant(s)
Versus
1. The Manager, Fiat Group Automobile India Pvt.Ltd.,
R/o.Benefice, 3rd, Floor, Mathurdas Mill Compound, Lower Parel (W) Mumbai-13
2. The Manager, Marvelous Motors Pvt.Ltd.,
Ro.Plot No.170/176, Gokul Shirgaon, Pune-Banglore Road, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
Adv.S.A.Patil, Present
 
For the Opp. Party:
O.P.No.1-Adv.Rahul Desai, Present
O.P.No.2-Adv.A.C.Shaha, Present
 
Dated : 10 Aug 2016
Final Order / Judgement

तक्रार दाखल ता.05/05/2014    

तक्रार निकाल ता.10/08/2016

न्‍यायनिर्णय

द्वारा:- - मा. सदस्‍या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.

1.           सदरची तक्रार तक्रारदाराने जाबदार फियाट ग्रुप अॅटोमोबाईल इंडिया प्रा.लि. कंपनीने त्‍याने जाबदार यांचेकडून घेतलेल्‍या Car Linea Emotion Sedam RHD 1248 C C Diesel BSIV Engine या गाडीची वारंवार दुरुस्‍ती करुनही ती दुरुस्‍त न झालेने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली आहे.

 

2.          तक्रारदारांची थोडक्‍यात तक्रार खालीलप्रमाणे:-

      तक्रारदार हे वर नमुद पत्‍त्‍यावर रहात असून तक्रारदार क्र.2 यांनी Car Linea Emotion Sedam RHD 1248 C C Diesel BSIV Engine हे वाहन आपले वडीलांचे नावावर जाबदार क्र.2 यांचेकडून खरेदी केले.  तसेच जाबदार क्र.1 हे सदर वाहनाचे उत्‍पादक आहेत. प्रस्‍तुतची तक्रार ही तक्रारदाराने उत्‍पादीत दोषाबद्दल दाखल केलेली नाही.  तक्रारदाराने फियाट इमोशन पॅक या कारचे बुकींग केले. मात्र जाबदार क्र.2 यांनी मॉडेल इमोशन घेणेसाठी सुचित केले.  सदरची कार तक्रारदाराने दि.08.01.2013 रोजी खरेदी केली की, जिचा Invoice No.Mar MoPo-1213-00951 असा आहे. सदरचे कारचा टॅक्‍स रक्‍कम रु.91,779.33paise, total amount including the tax the car is purchased for Rs.8,26,014/- मात्र सदरचे लग्‍झरी कारचा आनंद कारचे बॅड सर्व्हिसेस अॅन्‍ड सेल्‍समुळे कधीही होऊ शकला नाही.  सदरची कार विकत घेतलेल्‍या दुस-याच महिन्‍यापासून प्रॉब्‍लेम्‍स सुरु झाले.  तक्रारदार क्र.2 ने कित्‍येकदा जाबदार क्र.2 यांचे  सर्व्हिस स्‍टेशनला आजपर्यंत व्हिझीट दिल्‍या. मात्र तरीसुध्‍दा सदरचे वाहनाच्‍या समस्‍या अद्यापही तशाच आहेत असे तक्रारदाराचे कथन आहे. वर नमुद कारचे स्‍टेअरींग कठीण येणे, टायर तसेच बुट लॉक प्रॉब्‍लेम, कार खरेदी केल्‍यापासून बुट लॉक प्रॉब्‍लेम सुरु झालेला आहे. तसेच डोअर नॉईज प्रॉब्‍लेम, महिन्‍यामध्‍येच सदरचे कारची बॅटरीही वीक झालेली आहे. त्‍याचबरोबर, water leakage problem, shock absorb noise, side wall leakage. Fuel flap problem, इत्‍यादी ब-याचशा तक्रारी सदरचे वाहनामध्‍ये असलेचे दिसून येतात. तक्रारदाराने सदरच्‍या कारचे वारंवार दुरुस्‍ती करुनही ही तक्रार कायम राहीलेने तक्रारदाराने मेलद्वाराही तक्रारीची माहिती जाबदार यांना दिलेली आहे. मात्र, फक्‍त अपॉलॉझी मागण्‍यापलीकडे जाबदार यांनी काहीही केलेले नाही. सबब, तक्रारदारास सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे. सदरची कार ही सर्व्‍हेअर रिपोर्टवरुन सेकंडहॅन्‍ड कार असलेचे दिसून येते.  सबब, तक्रारदारास चांगली तसेच जलदसेवा न पुरविल्‍याने जाबदार यांना तक्रारदारांनी द्यावयाचे सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. 

 

 खाली नमुद परिशिष्‍ठात कारचे झालेला खर्च नमुद केलेला आहे.

 

Particulars of Claim

 

Nos.

Rs.

Particulars

1

8,26,014/-

The value of Car.

2

78,582/-

Expenses barred by Complainant of the defective car after delivery

3

5,000/-

Surveyor Report Fee

4

2,00,000/-

Mental Agony

 

11,09,596/-

Total amount of claim

 

तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- मागितलेली आहे. 

 

3.          तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत बिल ऑफ सर्व्‍हे., सर्व्‍हे.रिपोर्ट, रजि.नं.एम.एच.-09-सी.एम.7720, लिगल नोटीस बाय अॅडव्‍होकेट, नोटीस पोहोच झालेची पोहोच पावती, ई-मेल एक्‍स्‍ट्रॅक्‍ट, नोटीसीस उत्‍तर तसेच दि.19.03.2015 रोजीचे तक्रारदाराचे शपथपत्र, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

4.          जाबदार यांना नोटीस आदेश होऊन ते मंचासमोर हजर होऊन त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले. त्‍यांचे कथनानुसार, जाबदार क्र.1 यांनी सर्व कथने परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहेत. सदरची तक्रार कायद्याने चालणेस पात्र नाही. सदरची तक्रार ही misconceived, vexatious, misleading असून सदरचे तक्रारदाराचा तक्रार अर्ज हा manufacturing defect करता असलेचे शाबीत करता आलेली नाही.  तक्रारदाराने कथन केलेले गाडीचे प्रॉब्‍लेम्‍स सुरुवातीपासूनच एक्‍सपर्टने सपोर्ट केलेले नाहीत. यासाठी सदरचे जाबदराने Hon’ble National Commission Tata Motors Versus Sunil Bhusisn & Chandesmur Kumar Versus Telure हे दोन पुर्वाधार दाखल केलेले आहेत. तक्रारदाराने हे लक्षात ठेवले पाहीजे की, Bhukti Knitting Co. Versus DHL World Wide Express Courier या मध्‍ये मा.सुप्रिम कोर्टने जर तक्रारदारा कॉन्‍ट्रक्‍ट साईन करीत असेल तर त्‍याच्‍या अटी व शर्तीशी तो बांधील राहील असे कथन केलेले आहे.  तसेच Manufacturing defect is a defect without which is a vehicle cannot function असेही कथन केलेले आहे.  

             

5.          तक्रारदाराने नुकसानभरपाई टोटललॉस याबद्दल मागितलेली रक्‍कम कुठेही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.  जाबदाराबद्दल कोणताही पुरावा तक्रारदाराने मा.मंचासमोर आणलेला नाही.  सदरचे कोणतेही Privity of Contract हे जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांचेमध्‍ये झालेले नाही.  सबब, जाबदार क्र.1 हा तक्रारदारास मिळालेल्‍या सेवेतील त्रुटीबाबत जबाबदार रहात नाही. वर नमुद वाहनामध्‍ये कोणताही उत्‍पादीत दोष असलेचे दिसून येत नाही. सबब, तसेच जाबदार क्र.1 ही Renowned Car ची manufacturing कंपनी असून ती Strict amlity test, follow करीत असते. खरेदी करतेवेळी तक्रारदाराने कोणतीही तक्रार केलेली नाही. 

 

6.         जाबदार कंपनीचे Legal Head and Company Secretary and Authorized Officer, Mr.Harsh Mishra यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.

 

7.          तसेच सदरचे कामी साक्षीदार म्‍हणून सर्व्‍हेअर श्री.सतिश शहापुरकर यांनाही तपासण्‍यात आले आहे.

 

8.         तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे तसेच जाबदार यांचे पुरावे, कथन व युक्‍तीवाद यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

क्र.

मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार हा ग्राहक होतो का ?

होय

2

जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेमध्‍ये अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला आहे का ?

होय

3

जाबदार हा त्‍याने मागितलेल्‍या मागण्‍यां मिळणेस पात्र आहे काय ?

होय, अंशत:

4

आदेश ?

खालीलप्रमाणे

 

विवेचन

 

मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने वर नमुद वाहन हे जाबदार कंपनीकडे घेतलेले आहे. तसेच सदर वाहनाचा टॅक्‍स इनव्‍हॉईसही दाखल केलेला आहे.  सदर वाहनाचे खरेदीचे संदर्भातील दि.29.01.2014 रोजीचे ई-मेल एक्‍स्‍ट्रॅक्‍ट दाखल केलेला आहे व तसे जाबदार यांनी आपले म्‍हणणेमध्‍ये मान्‍यही केले आहे. सबब, तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-2(1) (डी) नुसार जाबदार कंपनीचा ग्राहक होतो. या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2 ते 4:- तक्रारदारांनी जाबदार कंपनीकडे Linen Emotion Sedan RHD 1248 CC Diesel BSIV Engine, 5 Speed transmission Regd. No.MH-09-CM-7720 ही कार तक्रारदार क्र.1 यांचे नावावर खरेदी केली. याबद्दल उभय पक्षांमध्‍ये वाद नाही व तसा टॅक्‍स इनव्‍हाईसही दाखल आहे.

 

            तक्रारदाराने वर नमुद वाहन हे खरेदी केलेल्‍या दुस-या महिन्‍यापासूनच प्रॉब्‍लेम सुरु झाले हे कथन आपल्‍या तक्रार अर्जाच्‍या कलम-5 मध्‍ये नमुद केले आहे आणि सदरच्‍या सर्व तक्रारी या आजपर्यंत चालू आहे हेही कथन केले आहे. वर कलम-2 मध्‍ये नमुद केलेप्रमाणे सदर वाहनाच्‍या तक्रारीं या सातत्‍याने सुरुच आहेत व सदरच्‍या तक्रारींचे संदर्भात जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांना तक्रारदाराने दि.08.02.2014 रोजी नोटीस पाठविलेचेही दिसून येते. मात्र तरीही जाबदार यांनी योग्‍य ती दखल घेतलेली दिसून येत नाही. तसेच S.R.Shahapurkar (Insurer Surveyors, Loss Assessors- Value’s) यांचे दि.29.03.2014 रोजीचे सर्व्‍हे.रिपोर्टवरुन शेवटी त्‍यांनी हेही निरीक्षण नोंदविलेले आहे की,

Hence as per road test of Fiat Linea 1.3 Emotion Diesel Sedan Car BS-IV in question and verifying service history alongwith Pre delivery inspection & certificate of Warranty we are hereby confirm that the Fiat Linea 1.3 Emotion Diesel Sedan Car BS-IV bearing Registration Number MH-09-CM-7720 is a defective Car delivered to Mr.Chandrakant Krishna Pharane with Odometer Reading 1500 kms having major problems in Steering, AC, Suspension, Body Alignment, etc.

 

                  तक्रारदाराने सदर वाहनाचे संदर्भात दुरुस्‍तीसाठी केलेल्‍या इनव्‍हॉईसेस तसेच Pandit Automobiles  कडील (दि.08.01.2014) Tob Slip  ची अशा खर्च करणेत आलेल्‍या रिसीटस दाखल केलेल्‍या आहेत व जाबदार यांनी यातील ब-याचशा तक्रारी मान्‍यही केलेल्‍या आहेत. तसेच रेअर सिट बेल्‍टला वॉशर पार्ट हा कार उत्‍पादन करताना बसविलेला नव्‍हता. ही वस्‍तुस्थिती जाबदार क्र.2 यांनी मान्‍यही केलेली आहे. तक्रारदारचा नोटीसीस दिलेल्‍या उत्‍तरामध्‍ये जाबदाराने हे ही मान्‍य केले आहे कि, सदरची कार वारंवार आपल्‍याकडे दुरुस्‍तीसाठी येत होती.

 

                  जाबदार क्र.1 यांनी सर्व्‍हेअरचा उलटतपास घेतलेला आहे व यामध्‍येही जाबदार यांनी रिपोर्ट नाकारलेली नाही. तसेच जाबदार क्र.2 यांनीही सदरचा रिपोर्ट आपले म्‍हणणेत अगर प्रतिज्ञापत्रात नाकारलेला नाही. सबब, सवर्हेअर रिपोर्टमधील सर्व कथने जाबदार यांना मान्‍य आहेत ही बाब यावरुन शाबीत होते.

 

            तक्रारदाराने दाखल केले इन्‍शुरन्‍स पॉलीसीवरुन सदरची कार ही प्रथम एका ग्राहकास विकलेली कार आहे ही ही बाब शाबीत होते.

 

                  वर नमुद सर्व बाबीं विचारात घेता, जाबदार यांनी कोणत्‍याही बाबीं नाकारलेल्‍या नाहीत. सबब, जाबदार यांनी Unfair Trade Practice केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

                  सबब, तक्रारदाराने टॅक्‍ससहीत केलेल्‍या रक्‍कम रु.8,26,014/- ची मागणी मान्‍य करणेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. कारण तसा दि.08.01.2013 चा टॅक्‍स इनव्‍हाईस दाखल केलेला आहे. तक्रारदाराने या संदर्भात काही मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे पुर्वाधार दाखल केलेले आहेत.

 

             State Commission 2007 (SC)

Hyundai Motors India Ltd.                                                      …Appellant

Versus

Affiliated East West Press (P) Ltd. & M/s. Rama Motors        …Respondent

 

                        वर नमुद पुर्वाधारांचा विचार करता, तक्रारदार सदरची रक्‍कम रु.8,26,014/- (रक्‍कम रुपये आठ लाख सव्‍वीस हजार चौदा फक्‍त) मिळणेस पात्र आहे असे या मंचाचे ठाम मत आहे. तसेच जर सदरचे वाहन तक्रारदाराचे ताब्‍यात असेल तर त्‍याने ते जाबदारास परत करावे. तसेच तक्रारदाराने मागितलेली मानसिक त्रासापोटीची रक्‍कम व अर्जाचे खर्चापोटीची रक्कम मा.मंचास संयुक्तिक वाटत नाही. मात्र तक्रारदारास या गोष्‍टींचा निश्चितच त्रास झालेला आहे. सबब, मानसि‍क त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- (रक्‍कम रुपये पन्‍नास हजार फक्‍त) व अर्जाचे खर्चापोटी तसेच गाडीचे खर्चापोटी रक्‍कम रु.50,000/- (रक्‍कम रुपये पन्‍नास हजार फक्‍त) देणेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचा आदेश हा जाबदार क्र.1 तसेच जाबदार क्र.2 यांचेवर वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या बंधनकारक आहे. कारण जाबदार क्र.1 ही उत्‍पादित कंपनी असून जाबदार क्र.2 हा डिलर (विक्रेता) आहे.    

 

आदेश

 

1     तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.

2     जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांनी वैयक्तिक‍ /संयुक्तिरित्‍या तक्रारदारांना Linea Emotion Sedan RHD 1248 C C Diesel BSIV Engine, 5 Speed Transmission   Regn No.MH-09-CM-7720  या कारची टॅक्‍ससहीत एकूण रक्‍कम रु.8,26,014/-(रक्‍कम रुपये आठ लाख सव्‍वीस हजार चौदा फक्‍त) ही तक्रारदारास अदा करावी. तसेच तक्रारदाराने सदरची कार जाबदार कंपनीस परत करावी.

3     जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांनी वैयक्तिक‍ /संयुक्तिरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- (रक्‍कम रुपये पन्‍नास हजार फक्‍त) देणेचे आदेश करणेत येतात.

4     जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांनी वैयक्तिक‍ /संयुक्तिरित्‍या तक्रारदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.50,000/- (रक्‍कम रुपये पन्‍नास हजार फक्‍त) देणेचे आदेश करणेत येतात.

5     सदर आदेशाची पूर्तता जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांनी 45 दिवसांत करणेचे आहे.

6     विहीत मुदतीत जाबदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.

7     आदेशाच्‍या सत्‍यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.