Maharashtra

Nagpur

CC/331/2020

SHRI YASHWANT S/O NATTHUJI MESHRAM - Complainant(s)

Versus

THE MANAGER, EURECA FORBES, NAGPUR - Opp.Party(s)

SELF

23 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/331/2020
( Date of Filing : 08 Sep 2020 )
 
1. SHRI YASHWANT S/O NATTHUJI MESHRAM
R/O PLOT NO. 478, HIWARI LAY OUT, NAGPUR. T. &D. NAGPUR 440 008
NAGPUR
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER, EURECA FORBES, NAGPUR
EURECA FORBES, 5TH FLOOR, PAUL COMPLEX, AJNI, AJNI SQUARE, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
2. MR. YUGAL NARKHEDKAR, OCC. SALES OFFICER
EURECA FORBES, 5TH FLOOR, PAUL COMPLEX, AJNI, AJNI SQUARE, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:SELF, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Sep 2022
Final Order / Judgement

  मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. वि.प.चा वॉटर प्युरिफायर मशीन स्थापीत करण्‍याचा व विकण्‍याचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी माहे डिसेबर 2018 ला घाईगडबडीत वॉटर प्युरिफायरच  विकत घेण्‍याची गरज होती करिता तक्रारदाराने वि.प.क्रं.2 यांनी त्यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व त्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला आणि मशीनचे प्रात्यक्षीक दिले. तक्रारदाराने वि.प.ला मशीनची किंमत रुपये 16290/- वि.प.चे खात्यात जमा केली. तकारादाराकडुन रक्कम प्राप्त होताच वि.प.क्रं.2 ने तक्रारदाराचे घरी मशीन स्थापीत केली पंरतु वि.प.त्यांवेळी तकारदाराला बिल दिले नाही. परंतु वि.प.क्रं. 2 यांनी बिल देण्‍याचे आश्वासित केले. विप.ने तक्रारदाराचे घरी मशीन स्थापीत केल्यानंतर लगेचच त्यामध्‍ये दोष दिसुन आला त्यानंतर वि.प.क्रं.2 यांचेशी संपर्क साधला व वि.प.क्रं.2 यांनी मशीनमधील दोष काढण्‍याकरिात एका व्यक्तीची नेमणूक केली व मशीन दुरुस्त करुन दिली. त्यावेळी तकारदाराने बिलाची मागणी केली परंतु वि.प.ने तकारदाराला बिल दिले नाही.
  2. त्यानंतर तक्रारदाराने वि.प.चे भ्रमणध्वनीवर बिल व मशीनचे सव्र्हीसिंगची मागणी केली. प्रत्येकी वेळी वि.प. सेवा देण्‍यात व बिल देण्‍यात अपयशी ठरला. वि.प.ने तक्रारदाराची मशीनची सव्र्हीसिग न केल्यामूळे तक्रारकर्ता व त्याचे परिवाराला दुषीत पाणी प्यावे लागत आहे त्यामूळे तकारदाराने दिनांक 4.7.2020 वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली. वि.प.नोटीस प्राप्त होताच वि.प.ने तक्रारदाराला डेलेव्हरी कव्हर आफ मशीनची फोटोकापी पाठविण्‍यास सांगीतले व त्यानंतरच ते बिल पाठवू शकतील असे सांगीतले. तक्रारदाराने त्यानंतर वि.प.क्रं.2 यांचेशी मशीनचे सव्र्हींसिगबाबत व बिल पाठविण्‍याबाबत संपर्क करीत होते परंतु वि.प.क्रं.2 यांनी लक्ष दिले नाही व आजपर्यत बिल दिले नाही म्हणुन तकारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प.ने तकारदाराला वॉटर प्युरिफायरचे बिल पुरवावे. तसेच मानसिक व शाररिक त्रासापोटी व तकारीचे खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
  3. तकारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प. यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस मिळुनही वि.प. हजर झाले नाही म्हणुन वि.प. विरुध्‍द सदर तक्रार दि 18.2.2021 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, लेखी व तोंडी युक्तिवादाबाबतचे पूरसिस पाहता मंचाचे खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

                          मुद्दे                                                                          उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ               होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ              होय

  1. काय आदेश ॽ                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

निष्‍कर्ष

  1. तक्रारदाराने वि.प. कडुन वॉटर प्युरिफायर मशीन रुपये 16,290/- एवढया रक्कमेत  विकत घेतल्याचे तक्रारादाराने अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसुन येते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. वि.प.ने तक्रारदाराचे घरी सदरची मशीन लावल्यानंतर तक्रारदाराने वि.प.ला वॉटर प्युरिफायर मशीन विकल्याबाबतचे बिलाची मागणी केली पंरतु वि.प.ने तक्रारदाराला सदरचे बिलाची प्रत दिली नाही. त्यानंतर तकारदाराने वि.प.ला दिनांक 4.7.2020 ला सदरचे बिलाची प्रत पाठविण्‍याबाबत कायदेशिर नोटीस पाठविली. परंतु  सदर नोटीस प्राप्त होऊनही वि.प.ने तक्रारदाराला बिलाची प्रत दिली नाही. त्यामूळे तक्रारदाराला वि.प.कडुन मशीनची सव्हीसिंग न केल्यामूळे इतर सेवा घेता आली नाही. वि.प.च्या त्रुटीपूर्ण सेवेमूळे तक्रारदाराला व त्यांचे परिवाराला दुषीतपाणी प्यावे लागत आहे. वि.प.ने तक्रारदाराला दिलेल्या त्रुटीपूर्ण सेवेमूळे तक्रारकर्ता नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे.   

सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे..

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला वॉटर प्युरिफायर मशीनचे बिलाची प्रत त्वरीत द्यावी. तसेच वि.प.ने तक्रारदाराला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 3,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/- द्यावे.
  3. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.