(घोषित दि. 16.10.2014 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
अर्जदाराने सदरची तक्रार तिला गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची रक्कम न दिल्यामुळे दाखल केल्याचे दिसून येते.
अर्जदाराने त्यांच्या अर्जात असे नमूद केले आहे की, ती मौजे पोखरी ता.जाफ्राबाद जि.जालना येथील राहणारी असून ती शेती व्यवसाय करते. अर्जदार हिचे पती बबन ऊर्फ बाबासाहेब शिंदे हे शेतकरी होते दिनांक 25.12.2012 रोजी संध्याकाळी 9.00 वाजता लघवीला गेले असता जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ त्यांना सर्पदंश झाला. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे प्राथमिक उपचार करुन भरती केले व पुढील उपचारा करिता सिव्हील हॉस्पीटल जालना येथे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी दिनांक 26.12.2012 रोजी उपचारा दरम्यान सकाळी 10.00 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्या नंतर शवविच्छेदन झाले. त्याच प्रमाणे पोलीस स्टेशनला सुध्दा गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2012 नुसार नोंद घेण्यात आली. अर्जदाराचे मयत पती हे मौजे पोखरी येथील गट क्रमांक 70 व 41 या मधील काही जमिनीचे मालक होते.
अर्जदार मयत पती बबन ऊर्फ बाबासाहेब शिंदे यांचा महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत विमा योजने मार्फत विमा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे काढला होता. त्यामुळे अर्जदार हिने सदरचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे मंजूरीसाठी दाखल केला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराला दिनांक 10.08.2013 रोजी पत्र देवून व्हिसेरा रिपोर्टची मागणी केली. त्यानुसार दिनांक 24.04.2013 रोजी अर्जदार हिने त्याची पुर्तता केली. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे तिचा विमा दावा देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत अशी तक्रार विद्यमान मंचात अर्जदार हिने दाखल केली आहे. तसेच सदर प्रकरणात जिल्हा कृषी अधिकारी जालना यांना सुध्दा पक्ष म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कोणत्याही प्रकारचा लेखी जवाब प्रकरणात सादर केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द No W.S. Order पारीत करण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदार हिचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 कडे पुढील कार्यवाहीसाठी दिनांक 28.03.2013 रोजी दाखल केल्याबाबत कळविले. तसेच या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचा लेखी जवाब निशाणी क्रमांक 6/1 वर दाखल केला व सदर रक्कम अर्जदार हिला दिनांक 29.11.2013 रोजी दिल्याचे कळविले.
वरील सर्व मुद्यांचा विचार करता विद्यमान मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे येतात.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी
दिली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमिमांसा
मौजे पोखरी ता.जाफ्राबाद जि.जालना येथील राहणारी असून ती शेती व्यवसाय करते. अर्जदार हिचे पती बबन ऊर्फ बाबासाहेब शिंदे हे शेतकरी होते दिनांक 25.12.2012 रोजी संध्याकाळी 9.00 वाजता लघवीला गेले असता जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ त्यांना सर्पदंश झाला. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे प्राथमिक उपचार करुन भरती केले व पुढील उपचारा करिता सिव्हील हॉस्पीटल जालना येथे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी दिनांक 26.12.2012 रोजी उपचारा दरम्यान सकाळी 10.00 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्या नंतर शवविच्छेदन झाले. त्याच प्रमाणे पोलीस स्टेशनला सुध्दा गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2012 नुसार नोंद घेण्यात आली. अर्जदाराचे मयत पती हे मौजे पोखरी येथील गट क्रमांक 70 व 41 या मधील काही जमिनीचे मालक होते.
अर्जदार मयत पती बबन ऊर्फ बाबासाहेब शिंदे यांचा महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत विमा योजने मार्फत विमा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे काढला होता. त्यामुळे अर्जदार हिने सदरचा विमा दावा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे मंजूरीसाठी दाखल केला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदाराला दिनांक 10.08.2013 रोजी पत्र देवून व्हिसेरा रिपोर्टची मागणी केली. त्यानुसार दिनांक 24.04.2013 रोजी अर्जदार हिने त्याची पुर्तता केली. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे तिचा विमा दावा देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करीत आहेत अशी तक्रार विद्यमान मंचात अर्जदार हिने दाखल केली आहे.
अर्जदाराच्या अर्जाचे अवलोकन केले असता अर्जदार हिने तिचा अर्ज दिनांक 20.12.2013 रोजी दाखल केला आहे व त्यामध्ये तिच्या मयत पतीचा विमा दावा रकमेची मागणी रुपये 1,00,000/- ही गैरअर्जदार क्रमांक 1 कडून वसुल होऊन मिळण्याची मागणी केली आहे. याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेला नि.6/1 व 6/2 चे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, अर्जदार हिने विद्यमान मंचामध्ये तिचा तक्रार अर्ज दिनांक 20.12.2014 रोजी दाखल केला. त्याच प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास दिनांक 29.11.2013 रोजी रुपये 1,00,000/- चा धनादेश क्रमांक 001161 नुसार मंजूर केलेला आहे व तो अर्जदार हिचे खात्यामध्ये दिनांक 21.12.2013 रोजी जमा झाला आहे. हे अर्जदाराच्या नि.6/1 व 6/2 वर दाखल केलेल्या दस्तावरुन दिसून येते. तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी याबाबत शपथपत्र सुध्दा दाखल केलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी कोणतीही चुकीची सेवा अर्जदार हिला दिली नसल्याचे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच अर्जदार हिला तिच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा रुपये 1,00,000/- मिळाल्याचे दिसुन येते. त्याच प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी सुध्दा सदर प्रकरण त्यांचे विरुध्द त्वरीत निकाली काढणे बाबतचा अर्ज नि.14 प्रकरणात दाखल केला आहे. त्यामुळे आता सदर तक्रारीत कोणतेही तथ्य अथवा कारण ऊरले नाही.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.