ग्राहक तक्रार क्रमांकः-311/2007 तक्रार दाखल दिनांकः-19/07/2007 निकाल तारीखः-16/08/2008 कालावधीः-01वर्ष00महिने28दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
मेसर्स.लक्ष्मी टेक्स्टाईल्स्, तर्फे प्रोप्रा.श्रीमती रेणू एम.अगरवाल, ऑफिस पत्ता- हाऊस नं.714 सिटीझन कंपाऊंड, प्रदीप हॉटेल समोर, नारपोली, भिवंडी 421 302 जिल्हा ठाणे. ...तक्रारकर्ता विरुध्द 1.दि मॅनेजर, चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लि., युनिट 1, 6वा मजला, सोलीटरी कार्पोरेट पार्क, 167,घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई 400 093 ...वि.प.1
2.दि मॅनेजर, चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लि., आयसी आयसीआयसीआय बँके लि.वर, हिरो होंडा शोरुम समोर, मुरबाड रोड, कल्याण (प)421 301 जि.ठाणे ... वि.प.2 2/- गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः- श्री.अविनाश मोरे. विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.बी.जी.पाटील निकालपत्र (पारित दिनांक-16/08/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदर तक्रार दिनांक 19/07/2007 रोजी दाखल केली आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- 1.तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे ''बुरगलरी अन्ड हाऊस ब्रेकींग इन्शुरन्स'' सर्व प्रकारचे रिस्कसह उतरवली होती. त्याकरिता तक्रारदार यांनी करारनामा सर्व प्रकारच्या मशीनरी व माल व वस्तू याचा तपशिल दिल्यानंतर स्टॉक पाहून त्याप्रमाणे विरुध्दपक्षने मोजनी व किंमत करुन विमा उतरविला होता असा विमा 15,00,000/- रुपये चा पॉलीसी नं.पीबीजी-00004218-000-00 हा 26/08/2006 ते 25/8/2007 या कालावधीकरता उतरविला होता. त्यांची कागदपत्रे नि. ''ए'' वर दाखल केली आहेत. तक्रारदार यांचा ''यार्न प्रोसेसचा'' व्यवसाय अनेक वर्षापासून आहे. दि.02/10/2006 रोजी ''दसरा'' सण असतांना सर्व कर्मचारी सोबत कारखान्यात पहाटे 3.00 वाजता पुजा केली व निघून गेले. दुस-या दिवशी दि.03/10/2006 रोजी सकाळी 8.00 वाजता फॅक्टरीचे शटर आहे त्या स्थितीत व्यवस्थितरित्या बंद होते. सर्व दरवाजेही बंद होते म्हणून दरवाजा उघडून 3/- आंत गेलेअसता व पाहणी केली असता 24 त्रेडच्या बॅग 60 किलो वजनाप्रमाणे ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 20 बॅगा हरीप्रसाद किंमत आणि उर्वरीत 4 बॅग इस्टीमेट कंपनी यांच्या होत्या त्याची एकूण किंमत 2,10,000/- होती तो माल आढळून आला नाही यावरुन तक्रारदार यांचे परवानगी शिवाय सदरचा माल कोणीतरी चोरुन नेला होता यांची खात्री पटल्याने नारपोली पोलीस स्टेशनमध्ये कलम 454, 457, 380 आय.पी.सी. नुसार गुन्हा नोंदवला. 260/2006 हा 3/10/2006 रोजी दाखल केला व पोलीस स्टेशनमध्ये संबंधीत अधिकारी स्थळ पंचनामा केला.(नि.बी प्रमाणे)संबंधीत पोलीस अधिका-यांनी स्पेशल रिपोर्ट उच्चाधिकारी यांना 4/10/2006 रोजी पाठविला त्याचा जा.क्र.3496/06 दि.4/10/2006 असा असून तो नि.सी वर दाखल केला आहे. विरुध्द पक्ष यांनी घटनेबाबत सूचना दिली असता सर्व्हेअर यांची नेमणूक केली. श्री.पद्मसी टी शहा आणि कंपनी दि.6/10/2006 रोजी वैयक्तिकरित्या बाहेरुन स्थळ जागेस भेट घेतली. व मालाची किंमत केली. अनेक कागदपत्रांची मागणी अर्जात केली ती नि.डी वर दाखल केली आहे. दि.7/10/2006 रोजी उर्वरीत माला लावण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी दरवाजाचे तुटलेले कुलूप आढळून आले म्हणून त्वरीत सर्व्हे नेमलेले व वि.पक्ष पोलीस स्टेशनमध्ये कळविण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामा करण्यात आला. ते कुलूप पोलीस अधिकारी यांचे कब्जात आहे. पंचनाम्याची प्रत नि.''इ'' वर दाखल केली आहे. तक्रारदार यांनी खातेउतारा व फॅक्टरीतील चलन व अन्य कागदपत्रे दि.16/10/2006 4/- रोजी वि.पक्ष यांना देय केली व ती नि.''एफ'' व ''जी'' वर दाखल आहेत.वि.पक्ष यांनी कोणतीही योग्य दखल न घेता शंकानिरसन न करता तक्रारदार यांचा दावा नामंजूर केला. दावा नामंजूरीचे पत्र दि.7/3/2007 रोजी तक्रारदार यांना मिळाले. (नि.एच प्रमाणे) तक्रारदार यांचा दावा नामंजूर करण्यात आला, कोणतेही योग्य कारण नाही. अन्य विनंतीप्रमाणे दाखल केले परंतू त्याची दखल घेतलेली नाही.म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांनी 2,62,050/- रुपयाचे एकूण नुकसानी झाली त्याचा तपशिल अर्ज पानं.3 वर सविस्तर नमूद आहे. म्हणून विनंती की, 1)वि.पक्ष यांनी तक्रारदारांना 2,10,000/- रुपयाचे दावा मंजूर करुन दि.3/10/2006 पासून 12 टक्के व्याजासकट मंजूर करण्यात यावी.2)मानसिक, शारिरीक त्रासाकरीता नुकसान भरपाई मिळावी.3)इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी विनंती केली. 2.वि.पक्ष यांना मंचामार्फत नोटीस मिळाली वि.पक्ष यांनी 1/9/2007 रोजी नि.9 प्रमाणे लेखी जबाब दाखल केला आहे. त्याचे कथन पुढील प्रमाणेः- 3.तक्रारदार यांची तक्रार मंचात चालविण्यास पात्र नाही. वि.पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली नाही. ठरलेल्या कराराचे उल्लंघन तक्रारदार यांनी केले आहे. तक्रारदार यांचा विमा ''बुरगलरी हाऊसब्रेकींग'' करता मंजुर केला आहे. त्यातील अट ''ए'' प्रमाणे तक्रारदार यांचे करारनाम्यामध्ये ''बुरगलरी'' किंवा ''रॉबरी'' पॉलीसी कालावधीमध्ये झालेली नाही. क्लेम नं.8 प्रमाणे अपवाद दिलेले आहेत त्यानुसार काही घडले 5/- नसून चोरी डुप्लीकेट चावीने घडवून आणल्याची शक्यता आहे. तक्रारदार यांनी दि.3/10/2006 रोजी इन्शुरन्स मास्टर दिनेश आर.नागपुरे हे फॅक्टरीमध्ये सकाळी 8.00 वाजता आलेनंतर पोलीस स्टेशनमध्ये 20.30 वाजता म्हणजे 7.00 तास विलंबाने एफ.आय.आर. दाखल केले आहे. श्री महेंद्र अग्रवाल यांनी पहिल्या पंचनाम्यात कुलूप आढळून आलेले नाही असे नमूद केल्याने त्यावर गुन्हा घडलेला होता ते सिध्द होत नाही. कुलूप कोणत्या प्रकारचे होते व कोणत्या प्रकारचा किती माल होता या बाबतचा कोणताही सविस्तर तपशिल तक्रारदार यांनी पंचनाम्यात दिलेला नाही. त्यास ही सर्व घटना ही संशयास्पद आहे. सर्व्हेअर यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दि.11 नोव्हेंबर 2006 रोजी रिपोर्ट दाखल केलेला होता. त्वरीत फॅक्टरीचे मुख्य दरवाजाचे कुलूप आढळून आलेले नाही. परंतू कुलूप आढळले नाही. 24 बॅगा 60 किलोप्रमाणे दिसून आल्या नाहीत. परंतू कुलूप हे डुप्लीकेट चावीने काढण्याची शक्यता आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा दावा फेटाळला आहे हे योग्य व बरोबर आहे. बुरगलरी यामध्ये फक्त आहे वरील सर्व कारणानुसार तक्रारदार यांचा दावा फेटाळण्ो योग्य आहे म्हणून सदर दावा खर्चासह नामंजूर करावा असे नमूद केलेले आहे. 3.वि.पक्ष यांनी दिनांक 17/09/2007 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे त्यांचे थोडक्यात कथन- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा दावा नाकारला आहे. कारण ''बुरगलरी'' या व्याख्येप्रमाणे घटना घडलेली 6/- नाही. तसेच श्री. दिनेश आर.नागपुरे हे 3/10/2006 रोजी कारखान्यात सकाळी 8.00 वाजता गेले तेव्हा घटना पाहिली परंतु त्वरीत एफ.आय.आर.दाखल करता तो 19.30 वाजता दाखल केला आहे. श्री महेंद्र अगरवाल यांनीही कुलूप मिळून येत नाही म्हणून कथन केले आहे. कुलूप तोडलेचा कडी कोयंडा तोडलेचा किंवा लोखंडी गज तोडल्याचा कोणताच पुरावा आढळून आलेला नाही. म्हणून डुप्लीकेट चावी लावून उघडला असल्याचा संशय आहे. पोलीसामार्फत दुसरा पंचनामा तोडलेले कुलूप मिळालेचा दिनांक 7/10/2006 रोजी करणेत आला आहे. व त्यावेळी अन्य कापसाच्या गाठीखाली कुलूप मिळाल्याचे नमूद केले आहे. तक्रारीमध्ये व पंचनामामध्ये कुलूपांचे वर्णन नमूद केलेले नाही. सर्व्हेअर यांचे भेटीवेळी ही कुलूप मिळाले नव्हते व हे सर्व अहवालात नमूद केलेले आहे. अपवाद जबाबदारी क्लॉज 8 नुसारही घटना नसल्याने वि.पक्ष यांनी दावा नाकारला आहे तो योग्य व बरोबर आहे. 3)कारण मिमांसा 3.1तक्रारकर्ता यांचा दावा मुदतीत व दाव्याच्या कालावधीतील होता व पॉलीसी घेतलेली होती हे मुद्दे वादीत नसल्याने तक्रारकर्ता हा वि.पक्ष यांचा ग्राहक आहे हे मान्य व ग्रहीत धरणेत आले आहे. 3.2दिनांक 2/10/2006 ते 3/10/2006 च्या मध्यरात्री नमूद माल चोरीला गेला हे ही उभय पक्षकारांनी अमान्य केलेले नाही. त्यामुळे चोरी झाली असली तरी त्यावर वि.पक्ष यांनी संशय व्यक्त केला आहे म्हणून 7/- ''बुरगलरी'' या व्याख्येप्रमाणे घटना घडलेली नाही. कुलूप डुप्लीकेट चावीने उघडले असण्याची शक्यता आहे असे मान्य करुन दावा फेटाळला आहे. वि.पक्ष तर्फे 'सर्व्हेअर' हे पहाणी करण्यास गेले त्यावेळीही कुलूप आढळून आले नाही. कडी कोयंडा ग्रील तोडल्याचे आढळून आले नाही तसा रिपोर्ट दाखल झालेने दावा फेटाळण्यात आला आहे. तथापि या ठिकाणी वि.पक्ष यांनी ही बाब शंका मान्य केली आहे की, ''डुप्लीकेट चावी लाऊन दरवाजा उघडला असावा'' परंतु तो दरवाजा तक्रारदार यांनीच किंवा त्यांचे तर्फे अन्य कोणत्याही इसमानेच तोडलेले आहे असा संशय व्यक्त केलेला नाही. तसेच ज्या कारणासाठी दावा देण्याचे नाकारले ते कुलूप दिनांक 7/10/2006 रोजी मिळालेनंतर तक्रारकर्ता यांनी त्याची पुन्हा फिर्याद दाखल करुन पंचनामा केलेला आहे. त्यामुळे 'कुलूप' पुरावा करितां मिळाले नंतर विरुध्दपक्ष यांनी हया कुलुपांचे वर्णन तक्रारकर्ता यांनी फिर्यादीत व पंचनाम्यात नमूद केले नाही. म्हणून दावा देता येणार नाही. सर्व्हेअर रिपोर्ट आधी आल्याने आंता दावा देता येणार नाही असे उत्तर देवून दावा देण्याचे टाळलेले आहे. तथापि तक्रारकर्ता यांचा जेव्हा मालाखाली /गाठीखाली कुलूप मिळाले तेव्हा त्याचा पंचनामा केला व त्या पंचनाम्यात नेमके काय लिहायचे व काय नाही हे 'पोलीस' ठरवितात ती त्यांची जबाबदारी आहे, संबंधीत पोलीस अथवा ठाणेदार ज्याकुणी पंचानामा केला त्यामध्ये कुलूप वर्णन नमूद केले नाही. म्हणून दावा फेटाळता येणार नाही. कारण विरुध्द पक्ष यांनी पंचनामे, फिर्याद खोटी आहे याबाबत कोणतांच पुरावा 8/- कथन केलेले नाही. म्हणून वि.पक्ष यांनी व्यवसायीक फायदा स्वतःसाठी मिळण्यासाठीच तक्रारदार यांचा दावा नामंजूर केला आहे हे पुराव्यासह सिध्द होते. म्हणून निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व सेवेत त्रुटी केली आहे हे सिध्द झालेने वि.पक्ष हे तक्रारदार यांना दावा रक्कम नुकसान भरपाई व अर्जाचे खर्चास, व्याजासह सर्व रक्कम देण्यास पात्र व जबाबदार आहे व हे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे म्हणून आदेश. आदेश 1.तक्रारदार यांचा दावा अशंतः मंजूर करणेत आला आहे. 2.तक्रार अर्जात नमूद केलेली ''विमा पॉलीसी'' प्रमाणे विरुध्दपक्ष हे तक्रारकर्ता यांना चोरीस गेलेल्या मालाची रक्कम रुपये 2,62,050/- (रुपये दोन लाख बासष्ट हजार पन्नास फक्त) देण्यास जबाबदार व पात्र आहेत. म्हणून अशी रक्कम देय करावी. 3.तक्रारकर्ता यांचा दावा दिनांक 11/11/2006 रोजी ''क्षुल्लक'' कारणांने नाकारल्याने वि.पक्षकार हे तक्रारदार यांना वरील नमूद रकमेवर दिनांक 12/11/2006 पासून आदेश पारित तारखे पर्यंत द.सा.द.शे. 9 % व्याज दराने व्याजासह रक्कम देण्यास जबाबदार आहेत म्हणून दयावी. 4.सदर अर्जाचा खर्च 3,000/-(रुपये तीन हजार फक्त)वि.पक्षाने तक्रारकर्ता यांना दयावा. सदर आदेशाचे पालन आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळाले पासून 30 दिवसांचे आंत वि.पक्षकार यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या करुन तक्रारकर्ता यांना सर्व रक्कम 9/- परस्पर (डायरेक्ट)देय करणेची आहे. तथापि असे विहीत मुदतीत न घडलेस मुदतीनंतर वरील सर्व रकमेवर दंडात्मक व्याज म्हणून (पीनल इटंरेस्ट)द.सा.द.शे. 10 % व्याज दरांचे आकारणी व्याजासह रक्कम देण्यास वि.पक्षकार जबाबदार व पात्र आहेत. 5.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 6.तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.
दिनांकः-16/08/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.शशिकला श.पाटील ) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|