निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-********* न्यायनिर्णय 1. सा.वाली ही विमान वाहतुक करणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचे विमानाने दुबई ते मुंबई असा प्रवास दिनांक 5 मे, 2005 रोजी केला होता. तक्रारांकडे प्रवासादरम्यान 3 सुटकेस होत्या व त्यापैकी 2 सुटकेस मुंबई येथे आल्यानंतर तक्रारदारांना मिळाल्या परंतु तिसरी सुटकेस तक्रारदारांना विमानतळावर मिळाली नाही. तक्रारदारांनी त्याच दिवशी सा.वाले यांचेकडे त्या बद्दलचा अहवाल नोंदविला. तक्रारदार हे बेळगाव येथे राहणारे असल्याने तक्रारदारांनी श्री.हेमंत कानडे यांच्या नांवे मुखत्यारनामा करुन दिला. त्यानंतर तक्रारदारांनी आपली सुटकेस मिळणेकामी सा.वाले यांचेकडे सारखा पाठपुरावा केला. सा.वाले यांनी त्यांचे पत्र दिनांक 6 जुन, 2005 अन्वये तक्रारदारांना असे कळविले की, श्री.हेमंत कानडे यांनी तक्रारदारांची तिसरी सुटकेस ताब्यात घेतल्याची शक्यता आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कथनास नकार देवून दिनांक 22 जुन , 2005 रोजी कायदेशीर नोटीस बजावली व रु.1,50,000/- व्याजासह नुकसानभरपाईची मागणी केली. 2. त्यानंतर तक्रारदारांनी बेळगाव येथील ग्राहक तक्रार निवारण मंचापुढे ग्राहक तक्रार क्रमांक 177/2005 दाखल केली. परंतु सदरील ग्राहक तक्रार मंचाने आपला न्यायनिर्णय दिनांक 17 ऑगस्ट, 2006 अन्वये त्या ग्राहक मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. व तक्रारीचे कारण मंचाचे कार्यक्षेत्राबाहुर घडले आहे असा निष्कर्ष नोंदवून तक्रारदारांची तक्रार रद्द केली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल केली व 2 लाख रुपयाची नुकसान भरपाई व्याजासह मागणी केली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांचे सोबती श्री.कानडे यांनी तक्रारदारांची तिसरी सुटकेस ताब्यात घेतली व त्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी नुकसान भरपाईची केलेली मागणी ही अवाजवी असून तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. 4. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने संपूर्ण कागदपत्रांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांची तिसरी सुटकेस परत दिली नाही व त्यावरुन तक्रारदारांना सेवा सुवधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- 20 डॉलर प्रति किलो या प्रमाणे 15 किलोचे नुकसान भरपाईची रक्कम. | 3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा 5. सा.वाले यांनी आपली कैफीयतीचे शपथपत्र दाखल केले. त्यामध्ये तक्ररदारांचे मित्र श्री.कानडे यांनी तक्रारदारांची सुटकेस श्री.कानडे यांनी नेली असेल अशी शक्यता वर्तविली. वरील प्रकारचे कथन सा.वाले यांनी तक्रारदारांचे नोटीसीला दिनांक 6 जुन 2005 रोजी जे उत्तर दिलेले आहे त्यामध्ये देखील त्या स्वरुपाचे कथन आहे. त्यानंतर दिनांक 6.5.2010 रोजी प्रस्तुत मंचाने सा.वाले यांना असा आदेश दिला की, त्यांनी सा.वाले यांचे विमानाने दिनांक 5.5.2005 रोजी ज्या प्रवाशांनी प्रवास केला त्याची यादी हजर करावी. त्यानंतर सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.थॉमस राईट यांचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले की, प्रवाशांची यादी व सर्व माहिती ही 90 दिवसानंतर नष्ट करण्यात येते व प्रकरणास पाच वर्षे होऊन गेलेली असल्याने या बद्दलची कुठलीही माहिती सा.वाले यांचेकडे उपलब्ध नाही. या प्रमाणे सा.वाले हे श्री.कानडे यांनी तक्रारदारांचे सोबत दिनांक 5.5.2005 रोजी प्रवास केला ही बाब सिध्द करु शकले नाहीत. श्री.कानडे हे तक्रारदारासोबत प्रवास करणारे व्यक्ती असतील तरच ते विमानतळाचे आतील भागात उपस्थित राहू शकतात. अन्यतः विमानतळाचे दाराचे बाहेरच त्यांना थांबावे लागेल. श्री.कानडे हे तक्रारदारांसोबत विमान प्रवास करणारी व्यक्ती होते ही बाब सा.वाले सिध्द करु शकले नाहीत. त्यामुळे सा.वाले यांच्या कर्मचा-यांनी तक्रारदारांची तिसरी सुटकेस श्री.कानडे यांचेकडे सुपुर्द केली हे सा.वाले यांचे कथन सिध्द होत नाही. 6. तक्रारदारांनी आपले शपथपत्र दाखल करुन असे स्पष्टपणे कथन केले की, कानडे हे विमानतळावर आले नव्हते व त्यांनी तक्रारदारांची तिसरी सुटकेस प्राप्त ही केली नव्हती. यावरुन सा.वाले तिस-या सुटकेसच्या संदर्भात आपला बचाव सिध्द करु शकले नाहीत असा निष्कर्ष काढावा लागतो. 7. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या नुकसान भरपाईचा प्रश्न निर्माण होतो. तक्रारदारांनी विमानतळावर त्याच दिवशी सा.वाले यांचेकडे गहाळ वस्तु मिळण्याबद्दल विहीत नमुन्यात अर्ज भरुन दिली. त्यामध्ये एकंदर तिन सुटकेस एकूण वजन 40 किलो होते असे नमुद केले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये ती सुटकेस गहाळ झाल्याने 7,555/- दिनार येवढी नुकसान झाल्याचे कथन केले आहे व तक्रारीमध्ये 2 लाख रुपयाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी गहाळ वस्तु बद्दल जो फॉर्म सा.वाले यांचेकडे भरुन दिला त्यामध्ये तिस-या सुटकेसमधील वस्तुंचे वर्णन दिलेले होते. त्यात दैनंदिन उपयोगाच्या वस्तु होत्या. त्यांच्या किंमतीबद्दल पावती किंवा पुरावा तक्रारदारांकडून हजर नाही. 8. सा.वाले यांनी आपल्या युक्तीवादामध्ये असे स्पष्टपणे कथन केले आहे की, गॅरेज ऑफ एअर अक्ट च्या तरतुदीमधील नियम 22 जर लागू केला तर तक्रारदार हे जास्तीत जास्त 250 फ्रॅक्स प्रतिकिलो म्हणजे 20 यु.एस.डॉलर प्रतिकिलो येवढी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहातात. नियम 25 जर लागू झाला तर नुकसानभरपाईची ही मर्यादा लागू होत नाही. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांचे असे कथन आहे की, सा.वाले यांचे कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांची तिसरी सुटकेस गहाळ झाली व या कथनावरुन प्रस्तुत प्रकरणास नियम 22 लागू होईल. नियम 25 हा जाणीवपुर्वक जर वस्तु गहाळ केली असेल तर किंवा सा.वाले यांचे कर्मचा-यांचा प्रचंड निष्काळजीपणा असेल ( Recklessly & with knowledge ) तरच लागू होतो. त्या प्रकारचे आरोप तक्रारदारांनी केले नाहीत व तसा पुरावाही उपलब्ध नाही. यावरुन नियम 22 प्रमाणे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. 9. वरील निष्कर्षास मा.राष्ट्रीय आयोगाचादि मॅनेजर एअर इंडिया लिमिटेड विरुध्द मेसर्स. इंडिया एव्हरब्राईट शिपींग अन्ड ट्रेडिंग कंपनी या प्रकरणातील दिनांक 20.4.2001 रोजीच्या निकालाने पुष्टी मिळते. त्या निकालामध्ये मा.राज्य आयोगाने कॅरेज बाय एअर अक्टमधील तरतुदी,वॉरसा कन्हेन्शन 1929, हेग प्रोटोकॉल 1955 या सर्वाचा एकत्रित विचार केला व नियम 22 व नियम 25 या तरतुदीमधील फरक स्पष्ट केला व अंतीमतः नियम 22 लागू होतो असा निष्कर्ष काढला. त्या प्रकरणातील तरतुदी जवळपास प्रस्तुतचे प्रकरणा प्रमाणेच आहेत. 10. वरील परिस्थितीत तक्रारदारांच्या तिस-या सुटकेसचे वजन एकूण 40 किलोपैकी 15 किलो गृहीत धरुन प्रतिकिलो 20 यु.एस.डॉलर या प्रमाणे तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत असा निष्कर्ष काढावा लागतो. सा.वाले यांनी तक्रारदारांना फक्त 5 हजार रुपये देवू केले होते. परंतु वरील दराने नुकसान भरपाई देवू केली नव्हती किंवा तक्रार झाल्यानंतर ती मंचाकडेही दाखल केली नाही. सबब तक्रार दाखल तारखेपासून तक्रारदार वरील रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र राहातील. 11. वरील परिस्थितीत पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 151/2007 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईबद्दल 15 किलो गृहीत धरुन प्रतिकिलो 20 यु.एस.डॉलर या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी व त्या रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासुन 9 टक्के दराने व्याज द्यावे. 3. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्ल रु.5000/- अदा करावेत. 4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |