Maharashtra

DCF, South Mumbai

CC/308/2014

PANDHARINATH KALURAM THAKUR - Complainant(s)

Versus

THE MANAGER, CANARA BANK - Opp.Party(s)

VINAYAK A. KOLI

28 Nov 2017

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/308/2014
 
1. PANDHARINATH KALURAM THAKUR
...
...........Complainant(s)
Versus
1. THE MANAGER, CANARA BANK
...
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. G.K. RATHOD PRESIDENT
 HON'BLE MR. S.R. SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Nov 2017
Final Order / Judgement

दक्षिण मुंबई जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोरील कामकाज,

पुरवठा भवन, 1ला मजला, जनरल नागेश मार्ग, एम्.डी.कॉलेजसमोर,

परळ, मुंबई - 400 012.

तक्रार अर्ज क्रमांक : सीसी/308/2014             

दाखल दिनांक :  16/12/2014

आदेश दिनांक :  28/11/2017

 

श्री. पं ढरीनाथ काळूराम ठाकूर,

पत्‍ता – मौ. शिवाजीनगर, पोस्‍ट गव्‍हाण,

तालुका – पनवेल, जिल्‍हा - रायगड                 .... तक्रारदार.

        विरुध्‍द

1.मा. व्‍यवस्‍थापक,

कॅनरा बॅंक, (भारत सरकारचा उपक्रम)

विशेषी कृत बचत  शाखा, माझगाव

मुंबई – 10.

 

2. श्री. अशोक नामदवे जगदाळे,

मु्. संगीता अपार्टमेंट, पहिला माळा रुम नं. बी-4,

म.फुले नगर, मो‍होने, आंबिवली,

ता. कल्‍याण, पिनकोड – 421 102.                    .... सामनेवाला.

 

तक्रारदारातर्फे        -          वकील श्री. विनायक कोळी/वकील श्री.जे.टी.पाटील

सामनेवाला क्र. 1  तर्फे -     वकील श्रीमती. फातिमा लकडावाला-काद्री 

सामनेवाला 2         -    एकतर्फा

// निकालपत्र //

द्वारा – श्री. जी.के. राठोड, अध्‍यक्ष

 

तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की,

तक्रारदार व सामनेवाला क्र. 2 हे माझगाव डॉक लिमीटेड या भारत सरकारचा उपक्रम असलेल्‍या कंपनीत कार्यरत होते.  सामनेवाला 2 यांनी सामनेवाला 1 यांचेकडून रक्‍कम रु. 1,50,000/- चे कर्ज घेतले व त्‍याचे जामिनदार तक्रारदार हे होते. सामनेवाला 1 यांनी कर्जाचे काही हप्‍ते दि. 22/9/2006 ते दि. 21/11/2007 पर्यंत दिले व त्‍यांची कर्जाची पूर्ण परतफेड होत नसल्‍याने, सामनेवाला 1 यांनी सामनेवाला 2 व तक्रारदार यांना नोटीस पाठवून कर्ज परत फेडीकरिता नोटीसा दिल्‍या. सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांना दि. 21/1/2013 व दि. 4/2/2013 रोजी नोटीसा दिल्‍या तसेच त्‍यांच्‍यासोबत दि. 25/2/2013 रोजी मिटींग करुनसुध्‍दा कर्जाची परतफेड झाली नाही व सामनेवाला 1 यांच्‍याकडून कर्जाची परतफेड होत नसल्‍याने तक्रारदार यांच्‍या बचत खात्‍यातून दि. 19/3/2013 रोजी रु. 3,46,446/- परस्‍पर कर्जाची रक्‍कम म्‍हणून वसुल केली.  सामनेवाला 1 यांनी सामनेवाला 2 यांच्‍याविरोधात रिकव्‍हरी सूट दिवाणी सत्र न्‍यायालय मुंबई येथे सूट नं. 4737/2009 कर्जाची रक्‍कम परतफेड झाल्‍यामुळे दि. 5/10/2013 रोजी विड्रॉल केला.  तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे की कर्जाची रक्‍कम सामनेवाला 2 यांच्‍याकडून सामनेवाला 1 यांनी वसुली त्‍यांची  स्‍थावर मालमत्‍ता विकून करावयाची होती तसे न करता, ती परस्‍पर तक्रारदार यांना माहित नसताना परस्‍पर त्‍यांच्‍या बचत खात्‍यामधून ते निवृत्‍त  झालेल्‍या ग्रॅच्‍यूईटी रिटायरमेंट व इतर रकमेतून वजा केली म्‍हणून  सामनेवाला 1 यांनी त्‍यांचे आर्थिक नुकसान केले.  ती रक्‍कम त्‍यांना परत मिळावी व नुकसानभरपाई व खर्चाची अशी एकूण रक्‍कम रु. 5,81,167/-  व बँकेची पूर्ववत सेवा त्‍यांना मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. त्‍यासोबत त्‍यांनी त्‍यांच्‍या बँक खात्‍याचा खातेउतारा सामनेवाला 2 यांच्‍या कर्ज खात्‍याचा उतारा, कर्जाचा अर्ज व नोटीसाच्‍या प्रती दाखल केल्‍या. 

(2)       सामनेवाला 1 व 2 यांना नोटीस मिळाल्‍यानंतर, सामनेवाला 2 गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला.

(3)       सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांच्‍या तक्रारीस आपले उत्‍तर दि. 20/7/2015 रोजी दाखल केले. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रार ही खोटी आहे त्‍यामधील मजकूर त्‍यांना अमान्‍य आहे व ही तक्रार मुदतीबाहेरील असून या तक्रारीमधील विषय हा सिव्‍हील कोर्टाचा विषय असून या कोर्टाला तो निकाली काढण्‍याचा अधिकार नाही तसेच त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारदार हे सामनेवाला 2 यांचे सामनेवाला 1 कडून घेतलेल्‍या कर्जाचे जामिनदार होते व सामनेवाला 2 यांनी कर्जाची रककम परत न केल्‍यामुळे सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांच्‍या खात्‍यातून कर्जाच्‍या रकमेची वसुली केली.  सामनेवाला 1 यांनी यासंदर्भातील कराराच्‍या प्रती तसेच इतर दस्‍तऐवज ज्‍यावर सामनेवाला 2 व तक्रारदार यांच्‍या सहया असलेले दस्‍तऐवज सामनेवाला 1 यांनी दाखल केले.  करारामधील अटीनुसारच, कायदेशीर कारवाई करण्‍यात आली आहे. तक्रारदार व सामनेवाला 2 यांना सामनेवाला 1 तर्फे दि. 4/9/2009 रोजी थकीत कर्जाची परतफेड करावी म्‍हणून नोटीस दिली  व प्रत्‍यक्षात सुध्‍दा मिटींग झाली व त्‍यानंतरसुध्‍दा दि. 26/10/2007, दि. 12/2/2008, दि. 4/6/2008 अशा ब-याच नोटीसा पाठवून सुध्‍दा कर्जाची परतफेड होत नव्‍हती म्‍हणून सिव्‍हील सूट क्र. 3218/2009 दाखल करण्‍यात आला व त्‍यानंतर सामनेवाला 1 यांनी दि. 21/1/2013 रोजी तक्रारदार यांना नोटीस पाठविली व त्‍यांचे अकौंट नंबर 266810103854 मधून रक्‍कम रु. 3,35,000/- परस्‍पर वसूल करण्‍याकरिता ब्‍लॉक करण्‍यात आले असे कळविण्‍यात आले. तसेच दि. 4/2/2013 रोजी सामनेवाला 2 व तक्रारदार यांना 21 दिवसात कर्जाची परतफेड करावी म्‍हणून नोटीस पाठविली.  त्‍याबाबतच्‍या दि.21/1/2013, दि. 4/2/2013 नोटीसा दाखल केलेल्‍या आहेत.  सामनेवाला 1 व तक्रारदार यांनी समक्ष भेट दिली तसेच दि. 25/2/2013 रोजी पत्र पाठविले  व सामनेवाला 2 यांनी 10-15 दिवसांची मुदत मागितली व  दि. 10/3/2013 पर्यंत रकमेची परतफेड करण्‍यात येईल असे सांगितले. दि.18/3/2013 रोजी सामनेवाला 2 यांनी थकीत कर्जाची रक्‍कम रु. 3,46,446/- हे परत केले नाहीत म्‍हणून दि. 19/3/2013 रोजी रक्‍कम रु. 3,46,446/- हे तक्रारदारांच्‍या बचत खात्‍यातून परस्‍पर वसुल करण्‍यात आले तसेच त्‍यांना दि. 20/3/2013 रोजीच्‍या पत्राने कळविण्‍यात आले व म्‍हणून त्‍यांचे अकौंट बंद करण्‍यात आले.  दि. 19/3/2013 नंतर तक्रारदार आणि सामनेवाला 2 कधीही बँकेत आले नाहीत.  दि.29/10/2014 रोजी तक्रारदार यांच्‍या वकीलांची नोटीस आली की, सामनेवाला 1 यांनी तक्रारदार यांच्‍या खात्‍यामधून परस्‍पर रक्‍कम वळती करण्‍याबाबतचा खुलासा करावा. सामनेवाला 1 यांचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारीमधील सर्व मजकूर त्‍यांच्‍याविरोधातील खोटा आहे व सामनेवाला 1 यांना मंजूर नाही. तसेच त्‍यांचे म्‍हणणे आहे की, या केसच्‍या बाबी सिव्‍हील कोर्टातील असून व सिव्‍हील सूट कोर्टात पेंडींग असताना व कर्जाची परतफेड झाल्‍यानंतर तो सूट विड्रॉ करण्‍यात आला.  जर तक्रारदारास या आदेशाविरोधात काही तक्रार किंवा तो आदेश मान्‍य नसल्‍यास त्‍यांनी त्‍या आदेशाविरोधात मा. वरिष्‍ठ न्‍यायालयात दाद मागावयाची होती परंतु तसे न करता, त्‍यांनी या मंचामध्‍ये ही खोटी तक्रार दाखल केली आहे म्‍हणून त्‍यांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.

(4)       तक्रारदाराची तक्रार, जाबदेणार यांचा लेखी जबाब, दाखल कागदपत्रे, दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले पुरावे यावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचाराधीन आहेत. 

अ.क्र.

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत का?

नाही.

2.

सामेनवाला 1 यांनी तक्रार यांना सेवा देण्‍यात  त्रुटी तसेच अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केा आहे का ?

नाही.

3.

आदेश ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा :-

(5)       तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, त्‍यातील मजकूर दस्‍तऐवज, शपथपत्र, कागदपत्रे तसेच त्‍यांनी दाखल केलेले मा. उच्‍च न्‍यायायाचा निकाल ए.आय.आर. 1993 तसेच सामनेवाला 1 यांनी दाखल केलेले लेखी जबाब, शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच वरील बाबींवरुन स्‍पष्‍ट होते की, हे प्रकरण कर्जमाफीच्‍या परतफेडीचे असल्‍यामुळे तसेच ते सिव्‍हील कोर्टात प्रलंबित होते व कर्जाची परतफेड झाल्‍यानंतर दि. 5/10/2013 रोजी विड्रॉ करुन घेण्‍यात आले. या आदेशाविरोधात तक्रारदार यांनी वरिष्‍ठ न्‍यायालयात दाद मागावयाची होती तसे न करता त्‍यांनी या मंचात केस दाखल केली हे प्रकरण कर्जाच्‍या रकमेचे रिकव्‍हरीचे असल्‍यामुळे ही बाब स्‍पष्‍ट होते की,  तक्रारदार यांचे मुद्दा क्र. 1 व 2 याबाबत सकारात्‍मक उत्‍तर मिळू शकत नाही कारण सामनेवाला 1 यांनी केलेली कारवाई कराराप्रमाणे केलेली आहे व हा विषय या मंचाच्‍या अखत्‍यारित येत नाही म्‍हणून तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार ही खारीज करण्‍यालायक आहे, या  सामनेवाला 1 यांच्‍या म्‍हणण्‍यास वाव मिळतो म्‍हणून या तक्रारीमधील विषय या मंचाच्‍या अखत्‍यारित बसत नसल्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात येते.   

(6)       वरील विवेचनावरुन व  निष्‍कर्षांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहे.          

// आदेश //

(1) तक्रार खारीज करण्‍यात येते.

(2) तक्रारीचा खर्च दोन्‍ही पक्षकारांनी आपआपला सोसावा.

(3) निकालाच्‍या प्रमाणित प्रती दोन्‍ही पक्षकारांना     

    नि:शुल्‍क पुरविण्‍यात याव्‍या.

                  sd/-xxx                                       sd/-xxx

                        (श्री. एस.आर.सानप)        (श्री. जी.के. राठोड)

  सदस्‍य                         अध्यक्ष

 

 

 
 
[HON'BLE MR. G.K. RATHOD]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.R. SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.