Maharashtra

Sindhudurg

cc/13/19

Shri. Ramakant Ramkrishna Masurkar - Complainant(s)

Versus

The Manager Bhrat Sanchar Nigam Ltd. & 1 - Opp.Party(s)

Shri, M.I. Sayyad & Shri. Javed M. Sayyad

28 Apr 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Sindhudurg
C-Block, Sindhudurgnagari,Tal-Kudal,Dist-Sindhudurg,Pin-416812
 
Complaint Case No. cc/13/19
 
1. Shri. Ramakant Ramkrishna Masurkar
R/O Near Vitthal Mandir,Sawantwadi Old State Bank Buliding,3rd Flor
Sindhudurg
Maharashtra
2. Nityanand Ramakant Masurkar
R/O Near Vitthal Mandir,Sawantwadi Old State Bank Building,3rd Floor
Sindhudurg
Maharashtra
3. Shashikala Ramakant Masurkar
R/O Near Vitthal Mandir,Sawantwadi Old State Bank Building,3rd Floor
Sindhudurg
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Manager Bhrat Sanchar Nigam Ltd. & 1
Office of the Telecom District Manager,Sawantwadi
Sindhudurg
Maharashtra
2. The Executive Engineer M.S.E.B. Ltd.
Sub Division Sawantwadi,Office Assistant Engineer,Near Muncipality Office,Sawantwadi
Sindhudurg
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. A.V.Palsule PRESIDENT
 HON'BLE MR. K.D.Kubal MEMBER
 HON'BLE MRS. V.J. Khan MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Exh.No.88

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग

तक्रार क्र.19/2013

                            तक्रार दाखल झाल्‍याचा दि. 17/07/2013                                                 

                            तक्रार निकाल झाल्‍याचा दि. 28/04/2015

 

1) श्री रमाकांत रामकृष्‍ण मसुरकर

वय 73 वर्षे, धंदा - व्‍यापार         

राहणार – विठ्ठल मंदीर जवळ,

सावंतवाडी, जुनी स्‍टेट बँक इमारत,

तिसरा मजला, जिल्‍हा – सिंधुदुर्ग

राज्‍य– महाराष्‍ट्र 

2) सौ.शशिकला रमाकांत मसुरकर

वय 65 वर्षे, धंदा – गृहिणी         

राहणार – विठ्ठल मंदीर जवळ,

सावंतवाडी, जुनी स्‍टेट बँक इमारत,

तिसरा मजला, जिल्‍हा – सिंधुदुर्ग

राज्‍य– महाराष्‍ट्र 

3) श्री नित्‍यानंद रमाकांत मसुरकर

वय 36 वर्षे, धंदा – डॉक्‍टर              

राहणार – विठ्ठल मंदीर जवळ,

सावंतवाडी, जुनी स्‍टेट बँक इमारत,

तिसरा मजला, जिल्‍हा – सिंधुदुर्ग

राज्‍य – महाराष्‍ट्र  .                          ... तक्रारदार

     विरुध्‍द

1) प्रबंधक,

भारत संचार निगम लिमिटेड,

टेलिकॉम डिस्‍ट्रीक्‍ट मॅनेजर सिंधुदुर्ग

यांचे कार्यालय,

मु.पो.ता. सावंतवाडी,

जिल्‍हा- सिंधुदुर्ग                      

2) कार्यकारी अभियंता,

महाराष्‍ट्र राज्‍य विदयूत वितरण कंपनी लि.

सब डिव्हिजन सावंतवाडी,

सहाय्यक अभियंता यांचे कार्यालय,

सावंतवाडी नगरपालिका कार्यालयाजवळ,

 

सावंतवाडी- 416510                          ... विरुध्‍द पक्ष.

                                                                 

                        गणपूर्तीः-  1) श्रीम. अपर्णा  वा. पळसुले. अध्‍यक्ष                                                                                                                               

                                 2) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्‍य.  

                                 3) श्रीम. वफा जमशीद खान . सदस्‍य                     

                                

तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री एम.आय. सय्यद आणि श्री एस.व्‍ही. शिरसाट               

विरुद्ध पक्ष क्र.1 तर्फे विधिज्ञ – श्री डी.डी. नेवगी

विरुद्ध पक्ष क्र.2 तर्फे विधिज्ञ – श्री एस. एम्. डिंगणकर आणि श्री. जी.एस्. वारंग

 

निकालपत्र

(दि. 28/04/2015)

 

द्वारा : मा.अध्‍यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.

1) प्रस्‍तुतची तक्रार विरुध्‍द पक्ष नं.1 व 2 यांनी तक्रारदारांना ‘ग्राहक’ म्‍हणून देण्‍यात आलेल्‍या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे.

 

2) तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे -

 

तक्रारदार नं.1 हे सेवानिवृत्‍त असून रामकृष्‍ण लॉज, सावंतवाडी येथे चालवतात.  तक्रारदार नं.1 हे मयत शक्‍ती यांचे वडील, नं.2 ही आई व नं.3 हा मोठा भाऊ आहे.  मयत शक्‍ती मसूरकर हा तक्रारदार नं.1 व 2 यांचेसोबत वर नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर राहत होता.  रामकृष्‍ण लॉजची पूर्ण जबाबदारी व व्‍यवस्‍था मयत शक्‍ती पाहत होता. वि.प.नं.1 ही टेलिकॉम कंपनी असून सावंतवाडीमध्‍ये निवासी टेलिफोन कनेक्‍शन पुरविते. सदर कंपनीचे विठ्ठल लिंगावत व नंदकिशोर कांबळी हे दोघे वायरमन घटनेचे वेळी कार्यरत होते. वि.प.नं.2 ही कंपनी कायदयाखाली नोंदलेली असून सदर कपंनी विदयूत पुरवठा करते.  सदर कंपनीने अती उच्‍च दाबाच्‍या वायर खांबावर टाकलेल्‍या आहेत. त्‍यामुळे अशा वायर्सबाबत विशेष काळजी घेणे व त्‍याबाबतची सुरक्षितता राखणे वि.प.नं.2 कंपनीचे कर्तव्‍य आहे.

 

3) तक्रारदार हे तिन मजली इमारतीमध्‍ये राहतात. दुस-या मजल्‍यावर लॉज असून ते तिस-या मजल्‍यावर राहतात. दुस-या मजल्‍यावर असलेला टेलिफोन हा ‘रामकृष्‍ण लॉज’ करिता सन 1991 पासून आहे. सदर लॉजसाठी असलेले गुमास्‍ता लायसन तक्रारदाराचे नावे आहे.  वि.प.नं.1 व 2 यांना तक्रारदार नियमितपणाने बिल भरणा करतात. सबब तक्रारदार हे वि.प.नं.1 व 2 यांचे ‘ग्राहक’ आहेत.

 

4) ता.16/1/2012 रोजी तक्रारदारांचा टेलिफोन क्र.272692 हा वायर तुटल्‍याने बंद पडलेला होता. ता.16/1/2012 रोजी त्‍याबाबत तक्रार नं.1005008536 ने तक्रार दाखल केलेली होती.  सदर तक्रारीला अनुसरुन वर नमूद केलेले दोन कर्मचारी 17/1/2012 रोजी सकाळी 11.15 वाजता तक्रारदारांच्‍या घरी आले. तक्रारदारांनी सदर कर्मचा-यांना टेलिफोनची तुटलेली वायर दाखविली. त्‍यानंतर तक्रारदाराने त्‍यांचा मुलगा शक्‍ती याला वायर दुरुस्‍तीसाठी वायरमन आल्‍याचे मोबाईलवरुन कळविले. तक्रारदारांचा मुलगा दुस-या मजल्‍यावरील बाल्‍कनीत उभा होता व तक्रारदार हे गोल्‍डन बेकरीच्‍या पश्चिम बाजूला उभे होते.  नंदकिशोर कांबळी हे टेलिफोनच्‍या खांबावर चढले व विठ्ठल लिंगवत खाली उभे होते. त्‍यांचेकडे वायरचे बंडल फेकले विठ्ठलने सदरचे बंडल घेतले व ते तक्रारदाराच्‍या बिल्डिंगजवळ नेले.  विठ्ठल हा रस्‍त्‍याच्‍या मध्‍ये उभा होता व त्‍यांने शक्‍ती याला टेलिफोनची वायर बाल्‍कनीत लोंबकळत असलेली वर खेचणेस सांगितली. लिंगवतच्‍या सुचनेनुसार तक्रारदाराचा मुलगा शक्‍ती यांने वायर खेचण्‍यास सुरुवात केली. त्‍यावेळी सदरची टेलिफोन वायर ही विजेच्‍या तारांना लागली. सदर वीजेच्‍या तारांना कोटींग नसल्‍याने त्‍यामधून वीज प्रवाह टेलिफोन वायरला लागला. त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या मुलगा शक्ती याला जोराचा झटका लागला. त्‍यामुळे  तक्रारदारांचा मुलगा खाली  पडला व त्‍याला 39 % भाजले. सदरची घटना पाहून लिंगवत व कांबळी दोघे घटनास्‍थळावरुन निघून गेले. त्‍यानंतर तक्रारदाराने त्‍यांच्‍या मुलाला तात्‍काळ हॉस्‍पीटलमध्‍ये नेले. तथापि  डॉक्‍टरनी त्‍याला मयत घोषित केले. तसेच पोस्‍टमॉर्टेम करण्‍यात आले.  डॉक्‍टरनी शक्‍ती याच्‍या मृत्‍यूचे कारण cardio respiratory failure due to electric shock असे दिले. 

5) सदर घटनेबाबत तक्रारदार नं.3 यांनी सावंतवाडी पोलीस स्‍टेशनकडे प्रथम खबर दिली. त्‍याचा पुढचा जबाब 15/2/2012 रोजी घेण्‍यात आला.  पोलीसांनी चौकशी करुन दोन्‍ही वायरमनना 18/2/2012 रोजी अटक केली. त्‍यानंतर तक्रारदारांनी माहितीच्‍या अधिकाराखाली वि.प.नं.2 यांचेकडे कागदपत्रे मागितली. तथापि सदरचा अर्ज तांत्रिक कारणावरुन नाकारला.  त्‍यानंतर तक्रारदाराने 12/4/2012 रोजी वि.प.नं.2 यांना पत्र पाठविले. 22/4/2013 रोजी तक्रारदाराने वि.प.नं.1 व 2 यांना नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून पत्र पाठविले. तथापि वि.प. यांनी नुकसान भरपाई देणेस नकार दिला. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार वि.प. यांच्‍या हयगयीने व दुलर्क्षामुळे तक्रारदारांना त्‍यांचा व्‍यवसाय करीत असलेला कमावता मुलगा गमवावा लागला. त्‍यामुळे सदरची तक्रार तक्रारदार नं.1 व 2 यांनी सेवा पुरवठा करण्‍यात त्रुटी केल्‍यामुळे तसेच दुर्लक्ष केल्‍यामुळे त्‍यांचेकडून रु.4,08,000/- मुलाच्‍या मृत्‍यूबाबत नुकसान भरपाई मिळावी. तसेच रक्‍कम रु.2,00,000/- सेवेतील त्रुटीबाबत नुकसान भरपाई म्‍हणून, मुलाच्‍या प्रेमाला मुकावे लागल्‍याने 3,00,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000,00/- तसेच अंत्‍यविधी करीता 2,000/-, लॉस ऑफ इस्‍टेट रु.2,500/- व तक्रार खर्च 50,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. 

6) वि.प.नं.1 यांनी नि.19 कडे म्‍हणणे देऊन अर्जातील सर्व मजकूर परिच्‍छेदनिहाय नाकारलेला आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या मते प्रस्‍तुतची तक्रार या मंचामध्‍ये चालणेस पात्र नाही. तसेच तक्रारदारांना सदरची तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही. तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍याने व दिलले कारण सेवा या सदरात येत नसल्‍याने तक्रारदारांना प्रस्‍तुत तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही. वि.प.हे ग्राहकांना सेवा पुरवितांना सर्व आवश्‍यक ती काळजी घेतात. तक्रारीत नमूद अपघात हा तक्रारदार यांचा मयत मुलगा याच्‍या निष्‍काळजीपणामुळे झाला. केवळ पैसे उकळण्‍याकरीता खोटी व खोडसाळ तक्रार दाखल केली आहे. वि.प. अगर त्‍यांच्‍या कर्मचा-यांचा सदर अपघाताशी काही संबंध नाही. त्‍यांनी तक्रारदाराच्‍या मयत मुलास वायर ओढण्‍यास कधीही सांगितलेले नव्‍हते.  त्‍याचदिवशी वि.प.चे कर्मचारी हे शिरोडकर यांच्‍या टेलिफोन रिपेरिंगचे काम करत होते. त्‍याचवेळी तक्रारदारांच्‍या मुलाने आपल्‍या मर्जीने वायर ओढल्‍याने अपघात झाला असावा. तथाकथीत प्रकाराबाबत  प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी, सावंतवाडी येथे फौजदारी केस दाखल केली असून ती अदयाप प्रलंबित आहे. त्‍यामुळे सदर तक्रारीस कॉज ऑफ अॅक्‍शन घडलेले नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी. सदरची घटना तक्रारदारांचा मयत मुलगा याच्‍या निष्‍काळजीपणाने घडलेली असल्‍याने वि.प.नं.1  हे कोणत्‍याही प्रकारे नुकसान भरपाई देण्‍यास बंधनकारक नाहीत. तसेच सदरची घटना वि.प.नं.1 यांच्‍या कोणत्याही सेवेमुळे घडलेली नाही. सबब सदरचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे. 

7) वि.प.नं.2 यांनी नि.18 कडे म्‍हणणे देऊन तक्रार अर्जातील सर्व मजकूर नाकारलेला आहे. वि.प.नं.2 यांचा सदर घटनेशी कोणताही संबंध नाही. तसेच सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही. सबब अधिकार क्षेत्राबाबतचा प्राथमिक मुद्दा काढणेत यावा. सदरचा अपघात हा मयताच्‍या चुकीमुळे झाला असल्‍यामुळे या अपघाताची कोणतिही जबाबदारी वि.प.नं.2 यांचेवर येत नाही. तक्रारीत नमूद वीज वाहिन्‍या संरक्षित प्रकारे बसविलेल्‍या होत्‍या. सदर कामी इलेक्‍ट्रीकल इन्‍स्‍पेक्‍टर यांनी पूर्ण चौकशी करुन वि.प.नं.2 यांची जबाबदारी नाही असे ठ‍रविलले आहे. तसेच अपघाताच्‍यावेळी पूर्ण पंचनामा करण्‍यात आलेला आहे. त्‍यामुळे वि.प.नं.2  हे कोणत्‍याही प्रकारे नुकसान भरपाई देणेस जबाबदार नाहीत. तसेच मयताने अगर वि.प.नं.1 यांचे कर्मचा-यांनी वि.प.नं.2 यांना सदर काम करणेपूर्वी कोणतिही सूचना दिलेली नव्‍हती. अपघातानंतर झालेल्‍या चौकशीमध्‍ये मयताने व वि.प.नं.1 यांच्‍या कर्मचा-याने 11000 व्‍होल्‍ट वाहिनीवर टेलिफोन वायर टाकल्‍याचे सिध्‍द झालले आहे.  सदरची बाब वि.प.नं.2 यांच्‍या नजरेस आल्‍यानंतर त्‍यांनी विदयूत प्रवाह ताबडतोब खंडीत केलेला होता.  मागीतलेली नुकसान भरपाई ही अवाजवी आहे.  इलेक्‍ट्रीकल इन्‍स्‍पेक्‍टर यांनी चौकशी करुन त्‍यांचा अहवाल दिलेला आहे. केवळ कोर्ट फी स्‍टॅप चुकवण्‍याच्‍या दृष्‍टीने सदरची तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे ती नामंजूर करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

8) तक्रारदाराने नि.4 कडे काही कागदपत्रे दाखल केली आहेत.  त्‍यामध्‍ये टेलिफोन बिलाची व गुमास्‍ता लायसन्सची प्रत, तक्रारदार क्र.1 च्‍या नावे असलेल्‍या विदयूत बिलाची प्रत, वैदयकीय अधिकारी, उपजिल्‍हा रुग्‍णालय सावंतवाडी यांनी दिलेले प्रमाणपत्र, मृत्‍यूचा दाखला, अर्जाची प्रत व त्‍यावर विरुध्‍द पक्ष 2 यांनी दिलेले म्‍हणणे, तक्रारदार यांनी दिलेल्‍या दि.12/4/2012 रोजी दिलेल्‍या अर्जाची प्रत, चार्जशिटची प्रत, तक्रारदार यांनी वि.प.ला पाठविलेली नोटीस व बजावणी झालेबाबत पोचपावत्‍या, वि.प.तर्फे नोटीशीस दिलेली उत्‍तरे, तक्रारदार यांनी दाखल केलेले रंगीत फोटोग्राफ्स, तक्रारदाराच्‍या मुलाचे नावे असलेल्‍या वाहनांच्‍या झेरॉक्‍स प्रती इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत. तसेच नि.26 कडे  रामकृष्‍ण लॉज, सावंतवाडी, बील बुक नं.53 व 54  व त्‍यावर कै. शक्‍ती याचे हस्‍ताक्षर असणारे लिखाणाची प्रत, तक्रारदार यांचे रेशन कार्डची झेरॉक्‍स प्रत, पोलीस ठाणे सावंतवाडी यांनी उपजिल्‍हा रुग्‍णालय सावंतवाडी यांना दिलेले पत्र, भारत संचार निगम लि. सावंतवाडी यांनी  पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल यांना दिलेले पत्र, विरुध्‍द पक्ष 1 यांनी जानेवारी 2012 चा दिलेला हजेरी तक्‍ता, वि.प.1 यांनी दिलेले दि.21/4/2012 चे पत्र- नादुरुस्‍त फोनचा तक्‍ता, वि.प.1 यांनी दि.21/4/2012 रोजी दिलेले पत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच नि.51 कडे सहा. अभियंता, विद्यूत निरीक्षक, सिंधुदुर्ग यांनी दिलेला जबाब, विरुध्‍द पक्ष 2 यांना पाठविलेली रजिस्‍टर्ड पत्रे व पोहोचपावत्‍यांच्‍या प्रती, तक्रारदार यांच्‍या विदयूत पंपाची बिले, विरुध्‍द पक्ष 1 यांनी पाठविलेले अंतिम टेलिफोन बील, तक्रारदार यांनी महावितरणला पाठविलेला 5/4/2011 चा अर्ज व त्‍यावर महावितरण सावंतवाडी यांनी दि.3/5/2011 ला दिलेले उत्‍तर, तसेच तक्रारदार यांनी दि.23/6/2014 रोजी काढलेले 17 फोटो अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराने  नि.28 कडे गाव नमुना 8 अ चा उतारा, तसे तीन 7/12 चे उतारे, तक्रारदारतर्फे श्री गोपाळ गणपत माळकर यांचे शपथपत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.54 सोबत फोन सर्व्‍हीस वायरचा तुकडा दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदाराने त्‍यांचे शपथेवरील पुरावा तसेच प्राथमिक मुद्दयावरील आक्षेपावरील लेखी म्‍हणणे हे नि.20 ते 25 कडे दाखल केलेले आहेत.  तसेच तक्रारदारतर्फे साक्षीदार गोपाळ गणपत माळकर यांचे शपथपत्र नि.29 कडे दाखल केले आहे.  नि.32 कडे वि.प.1 तर्फे प्रश्‍नावली नि.35 कडे वि.प.2 ची प्रश्‍नावली व सदर दोन्‍ही प्रश्‍नावलींना उत्‍तरावली नि.38 व 39 कडे दाखल केलेली आहे.  तसेच तक्रारदाराने या कामी कोर्ट कमीशनर  म्‍हणून श्री दु.रा. सबनीस, सहा. अभियंता यांची नेमणूक करणेबाबत नि.34 कडे अर्ज दिलेला होता. त्‍यानुसार कमीशन नेमणूक होऊन कमीशनचा रिपोर्ट नि.52 कडे दाखल केलेला आहे. त्‍यावर तक्रारदारातर्फे म्‍हणणे नि.55 कडे व शपथपत्र नि.59 कडे दाखल केलेले आहे.  नि.61 कडे वि.प.1 यांचे कमीशन रिपोर्टवर म्‍हणणे दाखल केलेले आहे तसेच नि.72 कडे एकूण सहा कागद दाखल केले आहेत.  ते पूढीलप्रमाणे म्‍हणजेच सहा. विदयूत निरिक्षक यांचे पत्र, विदयूत निरिक्षक  यांचेकडून महावितरण यांना दिलेले ज्ञापन, जबाब घेणा-यांच्‍या सहया नसलेले 7 इसमांचे जबाब, माहिती अधिकाराच्‍या अर्जास दिलेले उत्‍तर, सहा. विदयूत निरीक्षक हे सहा. अभियंता श्रेणी 2 म्‍हणून कार्यरत असलेबाबतचे पत्र,  श्री कुलकर्णी विदयूत निरीक्षक दि.7/6/2012 ला मुक्‍त झालेचे पत्र वगैरे कागद दाखल केलेले आहेत.  नि.57 व नि.60 कडे पुरावा संपल्‍याची पुरसीस दाखल केलेली आहे.

9) याउलट वि.प.1 यांनी प्रभाकर शंकरराव पाटील यांचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.62 कडे दाखल केले आहे.  तक्रारदारांनी प्रश्‍नावली वि.प.1 करीता नि.74 कडे दाखल केलेली आहे.  त्‍याला उत्‍तरावली दिलेली नाही तसेच वि.प.1 तर्फे नि.86 कडे एफ.आय.आर. ची सहीशिक्‍का नक्‍कल दाखल केली आहे. 

10) तसेच वि.प.2 तर्फे नितीन अभिमन्‍यू पाटील यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी प्रश्‍नावली नि.70 कडे दाखल केलेली आहे.  त्‍याला उत्‍तरावली दिलेली नाही. तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवाद नि.81 कडे व वि.प.2 कडे लेखी युक्‍तीवाद नि.87 कडे दाखल केलेला आहे तसेच तक्रारदार व वि.प.1 व 2 यांच्‍या वकीलांनी तोडी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे.  तसेच तक्रारदारांनी युक्‍तीवादासोबत बरेचसे न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.  त्‍यांचे अवलोकन या मंचाने दाखल केले आहेत.

11) तक्रारदार यांची तक्रार, पुराव्‍याचे शपथपत्र, दाखल कागदपत्रे, वि.प.1 व 2  यांचे लेखी म्‍हणणे, दाखल कागदोपत्री पुरावा, उभय पक्षांचे लेखी व तोंडी युक्‍तीवाद विचारात घेता या मंचापुढे खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.  त्‍यांची कारणमिमांसा हे मंच पुढीलप्रमाणे देत आहे.

 

अ.क्र.

                   मुद्दे

निष्‍कर्ष

1

तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

2

सदर तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ?

होय

3    

या ग्राहक मंचाला सदर तक्रार चालवणेचे अधिकार क्षेत्र आहे काय ?

होय

4

विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे ?

होय

5

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

  • विवेचन -

12) मुद्दा क्रमांक 1 -      तक्रारदार नं.1 हे मयत शक्‍ती मसुरकर याचे वडील आहेत तर तक्रारदार नं.2 या आई व नं.3  हे भाऊ आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा पाहता तक्रारदारांने वि.प.नं.1 यांचेकडून टेलिफोनचे कनेक्‍शन घेतल्‍याचे दिसून येते. त्‍यांचा टेलिफोन नं.272692 असा असून सदरचे टेलिफोन नादुरुस्‍त असल्‍याने त्‍याबाबत वि.प.1 यांचेकडे तक्रार नोंदवणेत आलेली होती. तसेच तक्रारदाराने दाखल केलेली नि.4/2, नि.51/4 चे बील पाहता तक्रारदारांचे नावे टेलिफोन कनेक्‍शन होते हे सिध्‍द होते.  तसेच नि.51/3 कडील विज आकार देयके पाहता तक्रारदाराने वि.प.2 यांचेकडून वीज कनेक्‍शन घेतल्‍याचे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) नुसार  वि.प.1 व 2 यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते.  सबब मुद्दा नं.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

      13) मुद्दा क्रमांक 2-       तक्रारीतील घटना ही ता.16/1/2012 रोजी घडलेली आहे.  वि.प. च्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरची तक्रार उशीराने दाखल केलेली आहे म्‍हणून ती मुदतीत नाही.  तथापि प्रस्‍तुतची  तक्रार दाखल दि.17/7/2013 रोजी दाखल करण्‍यात आलेली आहे. म्‍हणजेच सदरची तक्रार घटना घडलेनंतर 2 वर्षाचे आत दाखल केलेली आहे.  त्‍यामुळे सदर तक्रारीस ग्रा.सं.का. कलम 24(a)  नुसार  मुदतीत आहे.  असे या मंचाचे मत आहे.  सबब मुद्दा नं.2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

      14) मुद्दा नं.3 – वि.प. क्र.1 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये सदर तक्रार चालवणेचा अधिकार या मंचास नाही त्‍यामुळे त्‍याबाबत प्राथमिक मुद्दा काढून सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे. वि.प.च्‍या म्‍हणण्‍यानुसार अपघाताच्‍या घटनेबाबत तक्रारदारांने प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी, सावंतवाडी यांचेसमोर फौजदारी केस दाखल केलेली आहे  व ती अद्याप प्रलंबित आहे. त्‍यामुळे सदर तथाकथीत प्रकाराबाबत पुन्‍हा तसेच cause of action  दाखवून तक्रार दाखल करणेचा अधिकार तक्रारदारांना नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार या मंचासमोर चालणेस पात्र नाही असे निवेदन केलेले आहे.  तक्रारदारांनी खालील न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

 

  1. NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

 DAKSHINI HARYANA BIJLI VITRAN NIGAM LTD.  THROUGH ITS MANAGING DIRECTOR AND ANOTHER V/S PRAMILA DEVI AND OTHERS

  1. STATE  CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,  WEST BENGAL

The Station Manager V/s Smt. Namita Das as on 19/02/2014

  1. 2002 NCJ  509 (NC)

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION , NEW DELHI

Assistance Executive Engineer V/s Sri Neelakanta Goiuda

  1. 2002 525 (NC)

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION , NEW DELHI

Karnataka Electricity Board V/s Smt. Sharavva

  1. A.P. State Consumer Dispute Redressal Commission

C.C.No. 20 of 2011 T. Rajeshwari V/s The Chairman Cum Managing Director Andra Pradesh Southern Power Distribution Company Limited, Tirupathi, Chittor Dist

            6)   State Consumer Dispute Redressal Commission Addl. Bench  at Hyderabad

            F.A.466/2006

            CH.Bhimeshwara Swamy and others V/s AP Transco and others Khammam

      7) A.P.State Consumer Dispute Redressal Commission at Hyderabad

F.A.No.319/2008

A.P. Transco Ltd. And Other V/s Yanamala Mangamma and other

           8) State Consumer Disputes Redressal Commission, West Bengal

            The Station Manager V/s Smt. Nirmala Maity  on 25 May 2012

 

सदर न्‍यायनिवाडे विचारात घेता तक्रारदार हे वि.प.1 व 2 यांचे ग्राहक असल्‍याने व तक्रारदारांचा मुलगा वि.प.1 व 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे किंवा सदोष सेवा दिल्‍यामुळे अपघात होऊन मृत्‍यू पावला. त्‍यामुळे सदरची तक्रार तक्रारदार हे मयत शक्‍ती मसुरकर यांचे कायदेशीर वारस असल्‍याने ते या मंचासमोर तक्रार दाखल करु शकतात असे या मंचाचे मत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.3 बाबत हे  मंच होकारार्थी उत्‍तर देत आहे.

citation

      15) मुद्दा नं.4 –  वि.प. यांनी तक्रारदारांना ग्राहक म्‍हणून  सदोष सेवा दिली किंवा सेवेत त्रुटी ठेऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला हे निश्चित करण्‍याआधी तक्रार दाखल करणेसाठी जी घटना घडली त्‍याचा उहापोह करणे जरुर आहे.  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार ता.16/01/2012 रोजी वि.प.नं.1 यांचे ऑफिसमधून टेलिफोन वायर दुरुस्‍त करण्‍यास दोन वायरमन विठ्ठल लिंगवत व नंदकिशोर कांबळी हे दुरुस्‍त करणेसाठी आलेले होते.  त्‍यावेळी तक्रारदाराचा मुलगा शक्‍ती हा दुस-या मजल्‍यावरील बाल्‍कनीत उभा होता व तक्रारदार हे गौल्‍डन बेकरीच्‍या पश्चीम बाजूस उभे होते. नंदकिेशोर कांबळी हे टेलिफोन खांबावर चढले व विठ्ठल लिंगवत हे खाली उभे होते.  त्‍यांचेकडे वायरचे बंडल फेकले. विठ्ठलने सदरचे बंडल घेतले व ते तक्रारदाराच्‍या बिल्डिंगकडे नेले. विठ्ठल हा रस्‍त्‍याच्‍यामध्‍ये उभा होता व त्‍याने शक्‍ती याला टेलिफोनची वायर बाल्‍कनीत लोंबकळत असलेली वर खेचणेस सांगितली. लिंगवतच्‍या सूचनेनुसार सदर वायर खेचण्‍यास सुरुवात केली त्‍यावेळी सदर वायर ही वीजेच्‍या तारांना लागली. सदर विजेचा तारांना कोटींग नसल्‍याचे त्‍यामधून वीजेचा झटका बसून तक्रारदारांचा मुलगा बाल्‍कनीतच खाली पडला  व त्‍याला 39% भाजले व सदरची घटना पाहून कांबळी व लिंगवत घटनास्‍थळावरुन निघून गेले. तक्रारदाराने त्‍यांच्‍या मुलाला तात्‍काळ हॉस्‍पीटलमध्‍ये नेले तथापि डॉक्‍टरांनी त्‍याला मयत घोषित केले तसेच पोस्‍टमॉर्टेम सुध्‍दा करण्‍यात आले.  डॉक्‍टरांनी मृत्‍यूचे कारण  cardio respiratory failure due to electric shock  असे नमूद केले.  तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार वि.प.1 व 2 यांनी ग्राहकांना देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये कसूर केली. त्‍यामुळे त्‍यांचा हातातोंडाशी आलेला 28 वर्षाचा कर्तृत्‍ववान  मुलगा अचानकपणे मृत्‍यू पावल्‍याने त्‍यांचे व त्‍यांचे कुटूंबियांचे अपरिमित नुकसान झालेले आहे.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पोलीस स्‍टेशनमधील चार्जशीट व इतर कागदपत्रे यांचा विचार करता तक्रारदारांचा मुलगा इलेकट्रीक शॉक बसून मृत्‍यू पावला ही बाब शाबीत होते. तसेच वि.प. यांनी सदरची घटना नाकारली नाही. तथापि वि.प. यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांचा मुलगा स्‍वतःहून वायर वरती खेचत होता. त्‍याला कांबळी किंवा लिंगवत यांनी वायर खेचणेस सांगितले नाही. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर दोन्‍ही व्‍यक्‍ती त्‍यादिवशी तक्रारदारांचेकडे  टेलिफोन दुरुस्‍तीस गेल्‍या नव्‍हत्‍या. त्‍या त्‍याच विभागात दुस-या ठिकाणी टेलिफोन दुरुस्‍तीसाठी गेल्‍या होत्‍या. तथापि तक्रारदाराने दाखल केलेल्‍या तक्रार रजिस्‍टर, हजेरीपटाची नक्‍कल, चार्जशिट, इलेक्‍ट्रीकल इंजिनिअरचा रिपोर्ट व इतर कागदपत्र यांचा विचार करता सदर दोन इसम त्‍या दिवशी तक्रारदारांचा टेलिफोन नादुरुस्‍त असल्‍याने त्‍यांचे टेलिफोन वायर जोडणेसाठी गेले होते ही बाब सिध्‍द होते.

      16) वि.प.2 च्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर अपघातास ते कोणत्‍याही प्रकारे जबाबदार नाहीत.  कारण त्‍यांनी वायर कोटींग व्‍यवस्थित केलेले होते.  तसेच सदरची घटना घडल्‍यानंतर लगेचच वीज पुरवठा बंद झाला. तसेच वि.प.1 यांनी सदर काम करण्‍याआधी कोणतीही पूर्वसूचना वि.प.2 यांना दिलेली नव्‍हती. त्‍यामुळे वि.प.2 हे या अपघातास कोणत्‍याही प्रकारे जबाबदार नाहीत.  तथापि कमीशन रिपोर्ट नि.52 तसेच दाखल केलेले फोटोग्राफ्स व तक्रारदाराचा पुरावा यांचा विचार करता वि.प.नं.2 यांच्‍या इले‍क्ट्रीक वायरी या धनुष्‍याकृती लोंबकळत होत्‍या व त्‍यावर सुरक्षित आवरण नव्‍हते हे सिध्‍द होते. तसे आवरण नसल्‍यामुळेच टेलिफोनची वायर वर खेचतांना त्‍या वीजेच्‍या वायरींना स्‍पर्श होऊन त्‍यामध्‍ये करंट पास झाला.  तसेच वीजेच्‍या लोंबकळणा-या वायरी हया 11 के.व्‍ही.च्‍या असल्‍याने त्‍वरीत विदयूत प्रवाह टेलिफोन वायरला लागल्‍याने व वायरचे एक टोक तक्रारदाराच्‍या मुलाच्‍या हातामध्‍ये असल्‍याने तात्‍काळ शॉक बसून तक्रारदाराचा मुलगा मयत झाला. त्‍यामुळे केवळ वि.प.1 यांनी वि.प.2 यांना टेलिफोन  वायर दुरुस्‍तीबाबत कळविले नव्‍हते या कारणावरुन त्‍यांची जबाबदारी संपूष्‍टात येत नाही.  असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

      17) वि.प.2 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर घटनेची माहिती इलेक्‍ट्रीकल इन्‍स्‍पेक्‍टर जे शासनामार्फत नियुक्‍त केलेले असतात त्‍यांना ताबडतोब दिली व त्‍यांनी सदर घटनेची पूर्ण चौकशी करुन जाबजबाब नोंदविले व सदर कामी वि.प.2 यांची काहीही चूक नसल्‍याचा निष्‍कर्ष काढला. सदर चौकशीचे कागदपत्र तक्रारदाराने दाखल केलेले आहेत.  तथापि सदरची चौकशी वि.प.2 यांचे करताच करण्‍याचे असल्‍याने सदर चौकशी ही योग्‍यरित्‍या केली आहे असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे सदर चौकशीत काहीही निष्‍पन्‍न झाले असले तरीदेखील तेवढयावरुन वि.प. नं.2 यांची जबाबदारी टाळता येण्‍यासारखी नाही.  कारण 11 केव्‍ही वीज प्रवाह ज्‍या वायरींमधून पारीत केला जातो अशा वायरी सुस्थितीत व विना धोकादायक अवस्‍थेत ठेवणे ही संपूर्णतः जबाबदारी वि.प.2 चीच आहे.

      18) वि.प.1 च्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार नं.3 यांनी पोलिंसाकडे ता.17/01/2012 रोजी एफआयआर नोंदविली आहे. त्‍यामध्‍ये टेलिफोनची तुटलेली तार दाखवतांना सदरची घटना घडली असे नमूद केले असल्‍याने सदर घटनेची सर्वस्‍वी जबाबदारी तक्रारदारांची आहे.  त्‍यामुळे वि.प.1 किंवा 2 हे कोणत्‍याही प्रकारे सदर घटनेस जबाबदार नाहीत असे वि.प.चे म्‍हणणे आहे. तथापि सदरची घटना ही अचानक घटलेली असल्‍याने प्रत्‍यक्षात सदरची  एफआयआर पोलीसांनीच लिहिलेली असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  तसेच त्‍यावेळी तक्रारदारांची व त्‍यांच्‍या कुटूंबियांची असलेली मानसिक अवस्‍था विचारात घेता ते  वस्‍तुस्थिती योग्‍यरित्‍या  मांडू शकले असतील असे वाटत नाही.  त्‍यामुळे केवळ एफआयआर मधील मजकुरावर बोट ठेऊन वि.प. यांना त्‍यांची जबाबदारी टाळता येणार नाही.

      19) तक्रारदारांने दाखल केलेले पुढील न्‍यायनिवाडे तक्रारदारांच्‍या मदतीला येऊ शकतील असे या मंचाचे मत आहे.

 

      1) The Supreme Court of India

                Madhya Pradesh Electricity Board V/s Shail Kumara and others

                AIR 2002 SC 511

  1. IV(2009) CPJ 332 Pramila Devi and Others V/s Dakshini Hariyana Bijli Vitran Nigam Ltd. And others
  2. AIR 2009 SC 3104

      Sarla Verma and others V/s Delhi Transport Corporation and others

  1. 2012 (5) M.L.J. Santosh Devi V/s. National Insurance Co.

 

एकंदरीत पुरावा व तक्रारीचा आशय यांचा विचार करता तक्रारदारांना वि.प.1 व 2 यांनी त्‍यांना ग्राहक म्‍हणून देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. कारण तक्रारदारांने मागणी करुन देखील नुकसान भरपाई वि.प. यांनी देण्‍यात कसुर केलेली दिसून येते. सबब मुद्दा नं.4 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

      20) मुद्दा नं.5 –  तक्रारदार नं.1 हे स्‍वतः रामकृष्‍ण लॉज या नावाने व्‍यवसाय करतात. तसेच तक्रारदार नं.3 हे डॉक्‍टर असून वैदयकीय व्‍यवसाय करतात.  त्‍यामुळे तक्रारदार 1 व 3 हे पूर्णपणे मयत शक्‍ती याचेवर अवलंबून नव्‍हते असे दिसून येते. फक्‍त तक्रारदार नं.2 हया  मयताच्‍या  आई असल्‍या  तरी देखील त्‍या तक्रारदार नं.1 च्‍या पत्‍नी असल्‍यामुळे त्‍यांचेवर सर्वस्‍वी अवलंबून होत्‍या. तसेच तक्रारदार नं.1 व 2 यांचा कमावता मुलगा तक्रारदार नं.3 याचेवर काही प्रमाणात अवलंबून होत्‍या.  त्‍यामुळे तक्रारदार 1 ते 3 हे मयत शक्‍ती याचेवर सर्वस्‍वी अवलंबून नव्‍हते हे स्‍पष्‍ट होत आहे त्‍यामुळे या बाबींचा विचार नुकसान भरपाई मंजूर करतांना करणेत आलेला आहे.

      21)  तक्रारदारांनी दाखल केलेली कागदपत्रे  पाहता तक्रारदारांचा मुलगा हा 28 वर्षाचा अविवाहीत होता. त्‍यांचे म्‍हणण्‍यानुसार तो नोकरी करत नव्‍हता, परंतु तो त्‍यांना रामकृष्‍ण लॉजच्‍या व्‍यवसायात मदत करत होता तसेच शेती बघत होता. त्‍याबाबत 7/12 चे उतारे हजर केलेले आहेत तसेच त्‍यांच्‍या मुलाचे नावे असलेल्‍या दुचाकींचे कागदपत्र हजर केले आहेत. तसेच रामकृष्‍ण लॉजमध्‍ये ठेवलेल्‍या हिशेबाच्‍या पावत्‍यांवर  मयत शक्‍ती याच्‍या सहया असल्‍याचे दिसून येते. तसेच तो शेती काम करत असलेबाबत माळकर यांचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. त्‍यामुळे तक्रारदारांचा मुलगा हा त्‍यांना व्‍यवसायात मदत करत होता व शेती करत होता हे सिध्‍द होते.  तक्रारदारांनी आदरणीय सुप्रिम कोर्टाच्‍या सरला वर्मा विरुध्‍द दिल्‍ली ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन यामधील  मार्गदर्शक तत्‍वांचे अवलंबन करुन त्‍यानुसार नुकसान भरपाई देववावी अशी विनंती केली आहे.  सदरचा निवाडा हा उच्‍चतम न्‍यायालयाचा असल्‍याने तसेच शास्‍त्रीय आधारावर असल्‍याने तो या कामी लागू करता येईल, असे या मंचाचे मत आहे. सबब मयत इसमाचे मासिक उत्‍पन्‍न रु.3,000/- गृहीत धरुन त्‍यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ठरवावी लागेल त्‍यामुळे वार्षिक उत्‍पन्‍न रु.36,000/- त्‍यापैकी 1/3 रक्‍कम  मयत इसमाच्‍या स्‍वखर्चासाठी वजा जाता 24,000/- उत्‍पन्‍न धरावे लागेल तसेच अपघातावेळी मयत इसमाचे वय 28 वर्षे असल्‍याने मल्टिपायर 17 नुसार 4,08,000/- फ्यूनरल एक्‍सपेन्‍सेस रु.2,000/- लॉस ऑफ इस्‍टेट 2,500/- तसेच लॉस ऑफ लव्‍ह अँड अफेक्‍शन म्‍हणून रु.10,000/- असे एकूण 4,22,500/- नुकसान भरपाई हे just compensation  म्‍हणून निश्चित करणे  योग्‍य व न्‍याय्य होईल असे या मंचाचे मत आहे तसेच तक्रारदारांना देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये त्रुटी ठेवल्‍याने नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- निश्चित करणे योग्‍य होईल. तक्रारदारांनी सेवेतील त्रुटीबाबत रु.2 लाख तसेच मुलाच्‍या प्रेमाला मुकावे लागले म्‍हणून 3 लाख व मानसिक त्रासापेाटी रु.10 लाख अशी मागणी केलेली आहे. तथापि सदरची मागणी अवास्‍तव असल्‍याने व त्‍याबाबत पुरावा नसल्‍याने सदरची मागणी मान्‍य करता येणार नाही. तसेच सदरची घटना वि.प.1 व 2 यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याने वि.प.1 व 2 हे प्रत्‍येकी ½ रक्‍कम देणेस वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या  जबाबदार राहतील.  परिणामतः खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.

                     आदेश

  1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदारांना रु.4,08,000/- अपघाताची  नुकसानी भरपाई म्‍हणून, फ्यूनरल एक्‍सपेंस रु.2,000/-, लॉस ऑफ इस्‍टेट 2,500/-, तसेच लॉस ऑफ लव्‍ह अँड अॅफेक्‍शन म्‍हणून रु.10,,000/- असे एकूण 4,22,500/- (रुपये चार लाख बावीस  हजार पाचशे मात्र) दयावेत.
  3. तसेच सेवेतील त्रुटीबाबत नुकसान भरपाई म्‍हणून  रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारदारास दयावेत.
  4. वरील रक्‍कम  वि.प.1 व 2 यांनी प्रत्‍येकी अर्धी/अर्धी दयावी. 

5) वरील आदेशाची पुर्तता वि.प.1 व 2 यांनी आदेशाच्‍या दिनांकापासून 45 दिवसांत करावी तशी न केल्‍यास सदर रक्‍कमेवर अर्ज दाखल तारखेपासून म्‍हणजे 17/07/2013 पासून रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.दशे 9 % दराने व्‍याज देणेस वि.प.1 व 2 हे जबाबदार राहतील.

6) वर नमूद आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आदेशाच्‍या दिनांकापासून  45 दिवसांच्‍या आत न केलेस तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे दंडात्‍मक कारवाई करणेस  मुभा राहील.

7)मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्‍था/-3/जि.मं.कामकाज/ परिपत्रक/2014/3752 दि..05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्‍हणजेच दि.15/06/2015 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्‍यात येतात.

 

ठिकाणः सिंधुदुर्गनगरी

दिनांकः28/04/2015

 

 

Sd/-                                                     Sd/-                                        Sd/-

 

 

(वफा जमशीद खान)                    (अपर्णा वा. पळसुले)              (कमलाकांत ध.कुबल)

          सदस्‍य,                    अध्‍यक्ष,                 सदस्‍य

जिल्‍हा  ग्राहक तक्रार निवारण  मंच,  सिंधुदुर्ग

प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.

प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. A.V.Palsule]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. K.D.Kubal]
MEMBER
 
[HON'BLE MRS. V.J. Khan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.