निकालपत्र
(पारीत दिनांक 14 आक्टोंबर, 2010)
व्दारा श्रीमती अलका उ. पटेल, सदस्या.
तक्रारकर्ता श्री नरेश कन्हैयालाल वालेचा यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,
1. तक्रारकर्ता व त्यांच्या पत्नीच्या नांवे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये संयुक्त खाता आहे. खाता क्रमांक 20118317778 असा आहे. तक्रारकर्ता आपल्या कुटूंबासोबत दिनांक 12/02/2010 ला मुंबईला फिरायला गेले असता दिनांक 15/02/2010 ला लोकल ट्रेनमध्ये
..2..
..2..
त्यांची पर्स चोरीला गेली व त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा उल्हासनगर, मुंबई येथे रुपये 2,000/- काढण्यासाठी स्वतः Self चे धनादेश दिले परंतू त्यांना ओळखपत्राची I D Proof ची मागणी केली व ओळखपत्र नसल्यामुळे धनादेशचे रुपये दिले नाही. तक्रारकर्ता मागणी करतात की, शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 5,000/- व न्यायालयीन खर्च रुपये 2,000/- विरुध्दपक्षातर्फे मिळावे.
2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांना विद्यमान मंचाची नोटीस प्राप्त होवून ही विद्यमान मंचात हजर झाले नाही व त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही अशा परीस्थितीत विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांच्या विरोधात दिनांक 04/10/2010 ला प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश पारीत झाला आहे.
कारणे व निष्कर्ष
3. तक्रारकर्ता यांचा बँक ऑफ महाराष्ट्र, गोंदिया येथे संयुक्त खाते आहे. परंतू त्यांची मुंबई येथे पर्स हरविल्यामुळे पैसे काढण्याची आवश्यकता पडल्यावर बँक ऑफ महाराष्ट्र, उल्हासनगर, मुंबई येथे धनादेश वटविण्यासाठी ओळखपत्राची मागणी करण्यात आली व त्यांना रुपये दिले नाही. परंतू बँकेची संपूर्ण भारतात संगणक सेवा (On Line Service) उपलब्ध असल्यामुळे व स्वतःचे Selfधनादेश असल्यामुळे स्वतः हजर असतांना बँकतर्फे धनादेशाची रक्कम तक्रारकर्त्याला न देणे ही त्यांच्या सेवेतील न्युनता आहे असे मंचाचे मत आहे.
असे तथ्य व परीस्थीत असतांना सदर आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष यांनी शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 2,000/- तर न्यायालयीन खर्च रुपये 1,000/- दयावे.
2. आदेशाचे पालन विरुध्दपक्ष यांनी आदेश पारीत झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(श्रीमती अलका उ. पटेल) (श्री अजितकुमार जैन) (श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे)
सदस्या, सदस्य, अध्यक्षा,
जिल्हा ग्राहक मंच,गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया जिल्हा ग्राहक मंच, गोंदिया.