Maharashtra

Kolhapur

CC/18/105

Sandip Suresh Savant - Complainant(s)

Versus

The Manager, Bank Of India - Opp.Party(s)

A.H.Patil

07 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/105
( Date of Filing : 20 Mar 2018 )
 
1. Sandip Suresh Savant
Gargoti,Tal.Bhudargad, Dist.Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. The Manager, Bank Of India
Branch- Gargoti,Tal.Bhudargad, Dist.Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 07 Nov 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

 

      तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून रक्‍कम रु.2,63,000/- इतके गृहकर्ज दि. 6/09/2008 रोजी घेतले आहे  सदर कर्जाचा खाते क्र. 092875100003636 असा आहे.  तसेच सदर बँकेत तक्रारदार यांचे सेव्हिंग्‍ज खाते असून त्‍याचा क्र. एसबी 17584 असा आहे.  दि. 16/2/2012 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांचे अधिका-यांना त्‍यांचे कर्जखात्‍यावरील रकमेबाबत माहिती विचारुन सदरचे कर्जाची संपूर्ण फेड त्‍वरित करणार असलेचे सांगितले व त्‍याकरिता किती रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे अशी विचारणा केली असता संबंधीत अधिकारी यांनी रक्‍कम रु.46,101/- इतकी रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे असे सांगितले.  म्‍हणून तक्रारदार यांनी दि. 16/2/12 रोजी संबंधीत अधिकारी यांना रक्‍कम रु.46,101/- दिली व सदरची रक्‍कम तक्रारदार यांचे कर्जखातेवर भरणेस सांगून सदरचे कर्ज खाते बंद केलेची प्रमाणपत्राची विनंती केली.  त्‍याप्रमाणे संबंधीत अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून नेहमीप्रमाणे चलनांवर सहया घेतल्‍या व सदर गृहकर्जखाते बंद करतो असे सांगितले.  तक्रारदार यांनी सदरचा भरणा संबंधीत गृह कर्ज खातेवर त्‍वरित करणेविषयी विनंती केली असता संबंधीत अधिकारी यांनी मी तुमचे पैसे तुमच्‍या कर्जखात्‍यावर भरलेले आहेत, तुमचे कर्जखाते निल झालेले आहे, त्‍यांची पेंडींग काम पूर्ण झाल्‍यावर तशी नोंद घेतो व गृह कर्ज खाते बंद करतो असे तक्रारदार यांना सांगितले.  तदनंतर चार वर्षाचे अंतराने म्‍हणजेच दि. 6/6/2016 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे कर्जखातवेर रक्‍कम रु.34,516/- इतकी रक्‍कम देय आहे असे सांगितले.  त्‍यावेळी तक्रारदार यांनी सदर कर्ज खातेची रक्‍कम पूर्वीच फेड केलेचे वि.प. यांना सांगितले असता वि.प. यांनी तक्रारदार यांना सांगितले की तुमच्‍या सेव्हिंग्‍ज खातेवर रक्‍कम रु.16,000/- इतकी शिल्‍लक असून ती कर्ज खातेवर वर्ग करणेकरिता चलनावर सहया द्या, तुमचे कर्ज खाते बंद करतो व त्‍यास अनुसरुन तक्रारदार यांनी सेव्हिंग्‍ज खातेवर रक्‍कम रु.16,000/- वि.प. यांचे सांगण्‍याप्रमाणे वर्ग करणेकरिता संमती दिली.  तदनंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी नो डयू सर्टिफिकेची मागणी वि.प. यांचेकडे केली असता वि.प. यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले आहे.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केलेमुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदार यांचे गृहकर्जखात्‍यावरील कर्जाची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांनी फेड केली आहे असे जाहीर होवून मिळावे तसेच सदर कर्जाचा नो डयू दाखला मिळावा, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- व तक्रारअर्जाचा खर्च देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत बचत खात्याचे पासबुक, कर्जाचा खातेउतारा, कर्जखाती रकमा जमा केल्‍याच्‍या पावत्‍या, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली पत्रे, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली नोटीस, सदर नोटीसीस वि.प. यांनी दिलेले उत्‍तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

 

 

 

 

3.    वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी दि. 16/2/12 रोजी त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 मध्‍ये रक्‍कम रु.46,101/- जमा केले व वि.प. बँकेने जमा चलनाच्‍या  पावत्‍या तक्रारदार यांना दिल्‍या आहेत.  जर तक्रारदार यांनी त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खातेवरील रक्‍कम त्‍यांचे कर्जखातेवर वर्ग करणेबाबत लेखी सूचना दिली असती तर त्‍यांचे कर्जखातेवर रक्‍कम वर्ग करता आली असती.  तथापि तक्रारदार यांनी तसे केले नाही.  तक्रारदार यांना त्‍यांचे कर्ज खाते चालू असलेची माहिती होती व आजही आहे.  तक्रररदार यांचे वर्तणुकीवरुन तक्रारदार यांचे वि.प. विरुध्‍दचे तक्रारीस इस्‍टॉपल बाय कंडक्‍ट या तत्‍वाची बाधा येते.  तक्रारदारांनी वि.प. यांना दिलेल्‍या पत्रांना वि.प. यांनी उत्‍तर पाठविले आहे तसेच नोटीस उत्‍तरही पाठविलेले आहे.  तक्रारदार यांचे गृह कर्ज खातेवर आजअखेर रक्‍कम रु. 23,571/- इतकी बाकी व त्‍यावर व्‍याज येणे आहे. तक्रारअर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत तक्रारदार यांनी कर्जखाती भरलेल्‍या रकमांच्‍या पावत्‍या, बचत खात्‍यातून रक्‍कम काढलेचे चलन, कर्जखात्‍यात रक्‍कम जमा केलेचे चलन, कर्जखाते उतारा इ. कागदपत्रे तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

नाही.

3

अंतिम आदेश काय ?

नामंजूर.

 

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया शाखा गारकोटी येथून रक्‍कम रु.2,63,000/- इतके गृहकर्ज ता. 6/9/2020 रोजी घेतले होते.  सदरच्‍या कर्जाचा खाते क्र. 092875100003636 असा असून तक्रारदार यांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र.एस.बी. 17584 आहे.   सदर सेव्हिंग्‍ज खात्‍याचा उपयोग कर्जखात्‍याच्‍या अनुषंगाने तक्रारदार करीत आले आहेत. प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी हजर होवून तक्रारदार यांचे सदरचे सेव्हिंग्‍ज खाते व कर्जखाते नाकारलेले नाही.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  ता. 16/2/2012 रोजी तक्रारदार हे वि.प. बँकेत येवून गृहकर्जाची संपूर्ण फेड करीत असलेचे व सदरच्‍या कर्जफेडीपोटी किती रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे असे विचारणा केली असता वि.प. यांचे अधिकारी यांनी सदरचे कर्जफेड होणेकरिता रक्‍कम रु.46,101/- भरणे आवश्‍यक असलेचे तक्रारदार यांना सांगितले.  ता. 16/2/2012 रोजी तक्रारदार यांनी रक्‍कम रु.46,101/- वि.प. यांच्‍या संबंधीत अधिका-यांना देवून सदरची रक्‍कम गृहकर्जास भरणचे सांगून गृहकर्ज पूर्ण फेडून खाते बंद केलेचे प्रमाणपत्र नोडयू सर्टिफिकेट देणेची विनंती केली.  तथापि वि.प. यांच्‍या संबंधीत अधिका-यांनी तुमचे पैसे तुमच्‍या कर्जखात्‍यावर भरले आहेत, कर्जखाते निल झालेले आहे, पेंडींग काम पूर्ण झालेनंतर तशी नोंद घेतो व कर्ज खाते बंद करतो असे तक्रारदार यांना सांगितले.  तदनंतर 4 वर्षाने ता. 6/6/2016 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना त्‍यांच्‍या गृहकर्जखात्‍यावर रक्‍कम रु.34,516/- इतकी देय आहे असे सांगितले.  सदरचे कर्ज रक्‍कम पूर्वीच फेड केली असलेने वि.प. यांनी रक्‍कम रु. 16,000/- इतकी रक्‍कम शिल्‍लक असून ती कर्जखात्‍यात वर्ग करणेकरिता चलनावर सहया द्या, तुमचे कर्ज बंद करतो असे सांगितले.  त्‍यानुसार तक्रारदार यांनी रु.16,000/- सेव्हिंग्‍ज खातेवर वि.प. यांचे सांगणेप्रमाणे ट्रान्‍स्फर करणेकरिता संमती दिली असे तक्रारदारांनी तक्रारीत कथन केले आहे.

 

8.    तक्रारदार यांनी त्‍यानंतर वि.प. यांचेकडे वेळोवेळी येवून संबंधीत गृहकर्ज खाते बंद करणेची व नो डयू सर्टिफिकेट देणेची विनंती केली असता वि.प. यांनी तक्रारदार यांचे सदर विनंतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.  सबब, तक्रारदार यांनी गृहकर्ज खातेवरील रक्‍कम वेळोवेळी भरलेली असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना नो डयू सर्टिफिकेट अद्याप अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. 

 

9.    वि.प. यांनी ता. 17/10/18 रोजी म्‍हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांचे गृहकर्ज रक्‍कम रु. 2,63,000/- हे मान्‍य केलेले आहे.  तथापि, तक्रारदार यांचे बचत खाते क्र. 17584 याचा उपयोग तक्रारदार हे फक्‍त कर्जाच्‍या अनुषंगाने करतात हे कथन वि.प. यांनी  नाकारलेले आहे.  तक्रारदार यांनी त्‍यांचे कर्जखात्‍यावर कर्ज परतफेडीपोटी ज्‍या रकमा स्‍वतःहून जमा केल्‍या होत्‍या, त्‍या रकमेच्‍या पावत्‍या वि.प. बँकेने वेळोवेळी तक्रारदार यांना दिल्‍या आहेत.  तक्रारदार यांनी ता.16/2/12 रोजी त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 मध्‍ये रु.46,101/- जमा केली आहे व वि.प. बँकेने जमा चलनाच्‍या पावत्‍या तक्रारदार यांना दिल्‍या आहेत.  त्‍याअनुषंगाने वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणणेसोबत  ता.16/2/2012 रोजीचे तक्रारदार यांनी वि.प. बँकेकडे त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खाते नंबर 17584/- व एकूण रक्‍कम रु.45,863/- इतकी रक्‍कम जमा केलेचे चलन दाखल केले आहे.  सदरचे चलन तक्रारदार यांनी नाकारलेले नाही.

 

10.   तक्रारदार यांच्‍या तक्रारीतील कलम 5 चे अवलोकन करता 4 वर्षांच्‍या अंतराने 6/6/16 रोजी त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 वरील रक्‍कम रु.16,000/- कर्जखात्‍यावर वर्ग करणेकरिता संमती दिल्‍याचे कथन केले आहे.  सबब, प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांच्‍या कथनांचा व वि.प. यांचे म्‍हणण्‍याचा विचार करता तक्रारदार यांनी सेव्हिंग्‍ज खातेवरील नमूद रक्‍कम त्‍यांच्‍या कर्जखात्‍यावर वर्ग करणेबाबत कोणतीही लेखी सूचना वि.प. यांना दिलेली दिसून येत नाही.  तसेच सदरकामी तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केले आहे की, संबंधीत अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून नेहमीप्रमाणे चलनावर सहया घेतल्‍या व सदर गृहकर्जखाते बंद करतो असे सांगितले.  तथापि सदर ता. 16/2/2012 रोजीचे चलनाचे अवलोकन करता सदरचे चलन हे तक्रारदार यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 या खातेवर तक्रारदार यांनी चलनाने पैसे जमा केलेचे दिसत असून सदरचे चलन तक्रारदार यांनी नाकारलेले नाही. त्‍याकारणाने तक्रारदार यांचेकडून संबंधीत अधिका-याने चलनावर सहया घेतल्‍या हे तक्रारदार यांचे कथन हे आयोग विचारात घेत नाही.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी कोणताही वि.प. यांना ECS Mandate Form भरुन दिलेला नाही अथवा त्‍याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा आयोगात दाखल केलेला नाही.

 

      A duly signed ECS mandate form serve as a official authorized  document.

 

सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना सेव्हिंग्‍ज खाते क्र.17584 वरील रक्‍कम तक्रारदार यांच्‍या कर्जखाते क्र. 092875100003636 वर वर्ग करणेकरिता कोणतीही लेखी सूचना दिल्‍याचे अनुषंगाने वि.प. बँकेचे official authorized  document सदरकामी दाखल केलेले नाही ही बाब स्‍पष्‍टपणे दिसून येते. 

 

11.   तक्रारदार यांनी तक्रारीमधील कलम 5 मध्‍ये ता.16/6/16 रोजी त्‍यांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र.17584 मधील रक्‍कम रु.16,000/- कर्जखातेत वर्ग करणेकरिता संमती दिल्‍याचे कथन केले आहे.  तथापि दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी ता. 16/6/2016 रोजी सेव्हिंग्‍ज खाते क्र.17584 मधील रक्‍कम रु.16,000/- चलनाने काढलेचे दिसून येते व तदनंतर सदरची रक्‍कम त्‍याचदिवशी कर्जखाते क्र. 092875100003636 यावर रु.16,000/- जमा केलेचे दिसून येते.  सबब, सदर कागदपत्रांवरुन तक्रारदार यांना त्‍यांचे कर्जखाते चालू होते ही बाब दिसून येते.  तसेच तक्रारदार यांनीच स्‍वतः सदरची रक्‍कम सेव्हिंग्‍ज खात्‍यावरुन काढून कर्जखाती जमा केलेली आहे.

 

12.   प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्‍यांचे सेव्हिंग्‍ज बँक पासबुक दाखल केलेले आहे.  सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावर 30/5/16 रोजी रक्‍कम रु.16,337/- जमा असलेचे दिसून येते.  तसेच अ.क्र.2 ला तक्रारदार यांचा खातेउतारा दाखल केलेला आहे. सदर कर्जखाते उता-यावर ता. 16/2/2012 रोजी तक्रारदार यांनी रक्‍कम रु.46,101/- जमा केलेचे दिसून येते.  अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी सन 2010 ते सन 2012 तक्रारदार यांच्‍या कर्जखाती रक्‍कम जमा केलेच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत.  सदर पावत्‍यांचे अवलोकन करता सदर पावत्‍यावर कर्जखाते नं. 092875100003636 नमूद आहे.  तथापि तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या ता. 16/2/2012 रोजीच्‍या पावतीवर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 नमूद आहे.  सबब, सदरच्‍या दाखल पावत्‍यांवरुन तक्रारदार यांनी सन 2010 ते 2012 रोजी काही रकमा कर्जखातेस भरलेल्‍या होत्‍या तथापि रक्‍कम रु. 45,886/- इतकी रक्‍कम तक्रारदार यांनी सेव्हिंग्‍ज खातेवर भरलेली होती ही बाब दिसून येते.  तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 4/8/2017 रोजी सदरच्‍या रकमेबाबत नोटीस पाठविली असता वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांचे सदर नोटीसीस उत्‍तर दिलेले असून सदर उत्‍तराचे अवलोकन करता,

      “On 16/2/12, you had deposited cash in SB A/c No. 17584 instead of L.N. No. 3636 of housing loan account as per your receipt it is clear that you have deposited cash various time directly in your L.N. 3636 but on 16/12/20 you deposited in SB A/c we have not found any written letter/instruction/withdrawal slip duly signed with your authorized signature to transfer the funds to the above mentioned housing loan account and close the same.  It is observed that on 6/6/16 you withdrawn the money from SB Account and deposited in cash under your authorised sign in your outstanding loan account No.092875100003636.  It clarifies that you were well aware about your housing loan account outstanding position. 

 

सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांना कोणतेही लेखी पत्र अथवा सूचना तक्रारदार यांच्‍या सहीनुसार सदरच्‍या सेव्हिग्‍ज खातेवरील रक्‍कम  (Fund) तक्रारदार यांचे लोन अकाऊंटवर वर्ग करणेबाबत कळविलेले नव्‍हते ही बाब वि.प. यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी कळविलेली होती हे दिसून येते.  वि.प. यांनी त्‍यांचे लेखी युक्तिवादामध्‍ये तक्रारदार यांच्‍या ता. 22/11/20 च्‍या खातेउता-यानुसार तक्रारदार हे गृहतारण कर्जापोटी आजअखेर रु.24,418/- इतके कर्ज बाकी अधिक व्‍याज अशी रक्‍कम येणे असून सदरची रक्‍कम भागविण्‍याची तक्रारदार यांची जबाबदारी आहे असे कथन केले आहे.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता, तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील नमूद रक्‍कम त्‍यांच्‍या कर्जखात्‍यावर वर्ग करणेबाबत कोणतीही लेखी सूचना दिलेली नव्‍हती अगर तसा कोणताही कागदोपत्री पुरावा सदरकामी दाखल केलेला नाही.  तक्रारदार यांनी कर्ज रक्‍कम वर्ग करणेकरिता त्‍या त्‍या वेळी सेव्हिंग्‍ज खातेचे नावे चलन हे कर्जखातेचे जमा चलन भरुन दिले असते तर त्‍याच्‍या कर्जखातेवरील रक्‍कम वर्ग करता आली असती. तथापि तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलल्‍या कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनीच गृहकर्जाच्‍या अनुषंगाने असणा-या रकमा या वेळोवेळी सेव्हिंग्‍ज खातेवर भरलेचे दिसून येतात.  सबब, तक्रारदारांचे लेखी संमती नसले कारणाने वि.प. यांनी तक्रारदारांचे सेव्हिंग्‍ज खाते क्र. 17584 वरील रक्‍कम कर्ज खाते क्र. 092875100003636 ला वर्ग केलेली  नाही.  त्‍या कारणाने वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग नकारार्थी देत आहे.  सबब, दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी सदरचे गृहकर्जखाते अद्याप पूर्णफेड केलेची बाब  सिध्‍द होत नाही.  त्‍या कारणाने, तक्रारदार हे नो डयूज दाखला मिळणेस अपात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  त्‍याकारणाने तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग नकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

 

  1. खर्चाबाबत आदेश नाहीत.
  2.  
  3. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.