निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 19.09.2009 तक्रारनोदणीदिनांकः- 01.10.2010 तक्रारनिकालदिनांकः- 18.03.2010 कालावधी 5 महिने 29 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकातबी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ कचरुलाल हिरालाल कुमावत अर्जदार वय 58 वर्षे धंदा व्यापार रा.गणेश कॉलनी, ( अड आर.बी.वांगीकर ) मेन रोड मानवत जि.परभणी. जि.लातूर विरुध्द ब्रॅच मॅनेजर गैरअर्जदार भारतीय जिवन बिमा निगम ( अड अतुल पालीमकर ) ब्रॅच ऑफीस सेलू ता.सेलू, जि.परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाताजोशी सदस्या 3) सौ.अनिताओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) आयुर्विमा पॉलीसी मधील अपघात नुकसान भरपाईचा लाभ आयुर्विमा महामंडळाने दिला नाही म्हणून प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे अर्जदार रा. मानवत जि. परभणी येथील रहिवाशी आहे. त्याची पत्नी शंकुतलाबाईचे नावे गैरअर्जदाराकडून एकूण तीन आयुर्विमा पॉलीसी घेतल्या होत्या त्याचा पॉलीसी क्रमांक 983411515, 982909526 आणि 982914601 याप्रमाणे होता.दिनांक 21.06.2008 रोजी अर्जदार व त्याची पत्नी देव दर्शनासाठी मोटार सायकल क्रमांक एम.एच.22/के 4500 वरुन गंगामसला येथे गेले होते. देवदर्शनाहून परत येत असताना रस्त्यात मोटारसायकल स्लीप झाल्याने अपघात होवून मोटार सायकल च्या पाठीमागे बसलेली अर्जदाराची पत्नी चालत्या मोटार सायकलवरुन खाली पडल्यामुळे डोक्याला जबर दुखापत झाली होती. यशोदा हॉस्पिटल, नांदेड येथे तिला उपचारासाठी अडमिट केले होते. परंतू उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. मानवत पोलीस स्टेशनला पत्नीच्या अपघाती मृत्यूची खबर दिल्यानंतर अपघाती मृत्यू रजिष्टर क्रमांक 21/2008 प्रमाणे पोलीसानी नोंदवून घेताला. स्थळ पंचनामा प्रेताचा इनक्वेस्ट पंचनामा वगैरे पोलीसानी केला त्यानंतर अर्जदाराने मयत पत्नीचे पश्चात विमा पॉलीसीची रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक कागदपत्रासह विमा दावा दाखल केल्यावर गैरअर्जदारान फक्त रक्कम रुपये 1,00,000/- प्रत्येक पॉलीसीपोटी मंजूर केले आणि दिनांक 20.07.2009 चे पत्र देवून अर्जदारास असे कळविले की, मयत शंकुतलाचा मृत्यू तिला मधुमेहाचा अजार होता त्या कारणामुळे झाला असल्याने Double Accident Benefit क्लेम नुकसान भरपाईचा लाभ पॉलीसी अंतर्गत देता येणार नाही म्हणून अपघात नुकसान भरपाई क्लेम देण्याचा नाकारला. अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याच्या पत्नीचा मृत्यू हा तिला मधुमेहाचा अजार होता या कारणाने झालेला नसून चालत्या वाहनावरुन खाली पडल्याने डोक्याला जबर जखम होवून अपघाती मृत्यू झालेला होता ही वस्तूस्थिती असताना गैरअर्जदाराने बेकायदेशीर कारण दाखवून अर्जदारास अपघाता नुकसान भरपाईचा लाभ देण्याचे टाळले आहे. अर्जदारास तिन्ही पॉलीसी पोटी रुपये 3,00,000/- दिले मात्र अपघाती दुप्पट रक्कमेचा लाभ देण्याचे जाणूनबुजून टाळले म्हणून तिची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदाराकडयून तिन्ही पॉलीसीतील अपघात नुकसान भरपाईची रक्कम रुपये 3,00,000/-गैरअर्जदाराकडून मिळावेत याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- सह द.सा.द.शे व्याजासह मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 5लगतदिनांक 21.07.2009 चा गैरअर्जदाराने क्लेम नाकारल्याचे पत्र. पोलीस स्टेशन पाथरी अपघात रजि. क्रमांक 21/2008 मधील खबरी जबाब, अकस्मात मृत्यू खबरी रिपोर्ट, घटना स्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचना, पी.एम.रिपोर्ट इत्यादी एकूण9 कागदपत्रे जोडलेलीआहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर दिनांक 06.03.2010 रोजी त्यानी लेखी म्हणणे नि.15 दाखल केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, मयत शंकुतला हिने गैरअर्जदाराकडून पॉलीसी घेते वेळी आजारपणाविषयीची माहिती लपवून ठेवली होती. तिला मधुमेहाचा आजार होता आणि स्वतःच्या निष्काळजीपणामुळे तिचा मुत्यू.झाला असल्यामुळे Double Accident Benefit मिळण्यास ती पात्र नाही. गैरअर्जदाराचे पुढे असाही खुलासा केला आहे की, मयत शंकुतलाच्या पी.एम.रिपोर्ट तपशील क्रमांक 21 चे पुढील नोंदीतून तिने अपघाता पूर्वी जवळ जवळ आठ तास अन्न ग्रहण केलेले नव्हते त्यामुळे ती मोटार सायकल वरुन खाली पडली असावी यावरुन तीचा अपघाती मृत्यू तिच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने पॉलीसीतील हमीची Double Accident Benefit ची रक्कम देता येणार नाही. मयत शंकुतला दिनांक 28.12.2007 पासून मधुमेहाने आजारी होती असे आढळून आले. तक्रार अर्जातील इतर सर्व विधाने गैरअर्जदाराने साफ नाकारली आहेत आणि अर्जदाराला मयत शंकुतलाच्या डेथ क्लेमची Double Accident Benefit नुकसान भरपाई ची रक्कम नाकारण्या बाबतीत गैरअर्जदाराकडून सेवा त्रूटी झालेली नाही. नियमानुसार क्लेम नामंजूर केलेला आहे म्हणून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. प्रकरणाच्या अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. वांगीकर आणि गैरअर्जदारातर्फे तर्फे अड. अतुल पालीमकर यानी नि. 17 व 18 च्या पुरससी दाखल करुन निवेदने व शपथपत्रे हाच लेखी युक्तिवाद समजावा अशी पुरशीस सादर केल्या आहेत. . निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये खालीलप्रमाणे. मुद्ये उत्तर 1 मयत शंकुतला कुमावत हिच्या तीन आयुर्विमा पॉलीसी मधील तीच्या अपघाती मृत्यू नंतर पॉलीसी हमीप्रमाणे Double Accident Benefit नुकसान भरपाई देण्याचे गैरअर्जदाराने नाकारुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 Double Accident Benefit ची नुकसान भरपाई मिळणेस अर्जदार पात्र आहे काय ? होय कारणे मुद्या क्रमांक 1 ते 2 - अर्जदाराच्या मयत पत्नीने गैरअर्जदाराकडून 983411515, 982909526 आणि 982914601यानंबरच्या एकूण तीन आयुर्विमा पॉलीसी घेतल्या होत्या त्यामध्ये Double Accident Benefit सह प्रिमीयम भरले होते ही अडमिटेड फॅक्ट आहे. दिनांक 21.07.2008 रोजी अर्जदार व तीची पत्नी शंकुतला मोटार सायकलवरुन गंगामसला येथे देवदर्शनासाठी गेले होते व देव दर्शनाहून परत येताना मोटार सायकल रस्त्यात घसरली व अपघात झाला आणि मोटार सायकलच्या पाठीमागे बसलेली अर्जदाराची पत्नी खाली पडून तीच्या डोक्याला जबर जखम झाली होती. नांदेड येथे यशोदा हॉस्पिटल मध्ये तिला अडमिट केले होते परंतू उपचार चालू असताना तीचा मृत्यू झाला. ही वस्तूस्थिती गैरअर्जदारानेही नाकारलेली नाही. अपघातानंतर अर्जदाराने पाथरी पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहीती दिली होती त्यानुसार पोलीसानी अ.रजि.क्र. 21/08 नोंदविला होता व घटना स्थळी भेट देवून घटना स्थळाचा व प्रेताचा इनक्वेस्ट पंचनामा केला होता त्याची कागदपत्रे पुराव्यात दाखल केली आहेत त्यामध्ये नि. 5/3 वर खबरी जबाब, नि. 5/5 वर अकस्मात मृत्यू खबरी रिपोर्ट, नि.5/6 वर घटना स्थळ पंचनामा, नि. 5/7 वर इनक्वेस्ट पंचनामा दाखल केला आहे त्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता मयत शंकुतला हीचा मृत्यू मोटार सायकल रस्त्यात स्लिप होवून पाठीमागच्या सिटवर बसलेल्या अर्जदाराची पत्नी खाली पडल्याने डोक्याला जबर जखम होवून तीचा अपघाती मृत्यू झाला होता हे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे कागदपत्राच्या नोंदीतून स्पष्ट दिसते. गैरअर्जदाराने पॉलीसी होल्डच्या मृत्यू नंतर अर्जदारास तीन पॉलीसी मुळ हमी रक्कम प्रमाणे प्रत्येकी रुपये 1,00,000/- असे एकूण रुपये 3,00,000/- दिले मात्र तिन्ही पॉलीसी Double Accident Benefit सह असताना अपघाती मृत्यूचा लाभाची नुकसान भरपाई न देता मयत शंकुतला मधुमेहाने आजारी होती व मृत्यूपूर्वी ती जेवलेली नव्हती असे कारणे पुढे करुन ती नुकसान भरपाई नाकारली होती. क्लेम नामंजूरीचे दिलेले कारण मुळातच ग्राहय धरता येणार नाही कारण मयत शंकुतला हीचा मृत्यू हा रस्त्यावरील अपघातात डोक्याला जबर जखम झाल्यामुळे झालेला होता हे पुराव्यात नि. 5/9 वर दाखल केलेल्या पी.एम.रिपोर्टचे तपशील क्रमांक 22 मध्ये मृत्यूचे कारणापुढे Head injury असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. अर्जदार हीला मधुमेहाचा आजार होता हे क्षणभर ग्राहय धरले तरी पॉलीसी होल्डरचा झालेला मृत्यू ज्या कारणामुळे झाला त्याचेशी मधुमेहाच्या आजाराचा अर्थोअर्थी काही संबंध नाही. मधुमेहाच्या आजारामुळे मृत्यू झाला असा कोणताही ठोस पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर सादर केलेला नाही त्यामुळे पॉलीसी हममाणे अपघात नुकसान भरपाई बेकायदेशीररित्या नाकारुन गैरअर्जदाराने निश्चीतपणे सेवा त्रूटी केलेली आहे. अर्जदाराने पॉलीसी घेते मधुमेहाचा आजार लपवून ठेवला होता हे सिध्द करणारा ही पुरावा गैरअर्जदाराने मंचापुढे सादर केला नसल्यामुळे लेखी जबाबामध्ये घेतलेला बचाव ग्राहय धरता येणार नाही Double Accident Benefit नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच केवळ गैरअर्जदारानी जाणुनबुजून खोटे कारण पुढे करुण ती नुकसान भरपाई देण्याचे नाकारुन अर्जदारावर अन्याय केला आहे असाच यातून निष्कर्ष निघतों त्यामुळे पॉलीसी हमीप्रमाणे तीन पॉलीसीची अपघाती नुकसान भरपाईचा लाभ अर्जदार मिळण्यास पात्र ठरतो सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार यानी आदेश तारखे पासून 30 दिवसाचे आत अर्जदाराच्या मयत पॉलीसी होल्डर शंकुतला कुमावत हिने घेतलेल्या आयुर्विमा पॉलीसीज क्रमांक 983411515, 982909526 आणि 982914601 ची अपघाती (Double Accident Benefit ) ची नुकसान भरपाई प्रत्येकी रुपये 1,00,000/- द.सा.द.शे.9 % व्याज दराने क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दिनपांक 21.07.2009 पासून व्याजासह अर्जदारास द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 3000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 2000/- आदेश मुदतीत द्यावी. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |