Maharashtra

Ahmednagar

CC/18/144

Sau. Swati Swarupchand Khabiya - Complainant(s)

Versus

The kopargaon Peoples Co-Op Bank Ltd. - Opp.Party(s)

Joshi

06 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/144
( Date of Filing : 03 May 2018 )
 
1. Sau. Swati Swarupchand Khabiya
Boravke Nagar, Ward No.7, Shrirampur, Tal-Shrirampur
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The kopargaon Peoples Co-Op Bank Ltd.
Kopargaon Main Office Kopargaon, Branch Rahata, Tal- Rahata
Ahmednagar
Maharashtra
2. General Manager, The kopargaon Peoples Co-Op Bank Ltd.
Kopargaon Main Office, Kopargaon, Branch Rahata, Tal- Rahata
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Joshi , Advocate
For the Opp. Party: P.B. Patni, Advocate
Dated : 06 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०६/०२/२०२०

(द्वारा मा.सदस्‍या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

___________________________________________________________

१.  तक्रारदार ही राहणार श्रीरामपूर, जिल्‍हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. सामनेवाले क्रमांक १ ही को-ऑपरेटीव्‍ह बॅंक असुन सामनेवाले क्र.२ हे मॅनेजर आहेत. तक्रारदार व तिचे मयत आजोबा भिकचंद दिपचंद पिपाडा हे सामनेवाले बॅंकेचे ग्राहक आहेत. कारण त्‍यांनी त्‍यांचे नावे सामनेवाले बॅंकेमध्‍ये मुदत ठेवी म्‍हणुन रक्‍कम गुंतविली होती. सदरहु मुदत ठेवीचा तपशील तक्रारीमध्‍ये नमुद केलेला असुन, तो खालीलप्रमाणे आहे.

नांवः पिपाडा भिकचंद दिपचंद किंवा स्‍वाती स्‍वरूपचंद खाबिया

क्रमांक

पावती नं.

डिपॉझिट तारीख

डिपॉझिट रक्‍कम रू.

देय रक्‍कम

मुदत संपली तारीख

व्‍याज दर

गुंतवणूकीचा प्रकार

१२८०७

१५.१०.२०१५

५०,०००/-

५५६५१/-

१२.११.२०१६

१० %

पुनर्गुतवणूक

१२७५१

०७.०९.२०१५

२५,०००/-

२७८२५/-

०७.१०.२०१६

१० %

पुनर्गुतवणूक

१२६०६

०६.०६.२०१५

१,००,०००/-

१११८९१/-

०७.०८.२०१६

१०.५ %

पुनर्गुतवणूक

१२७९५

०७.१०.२०१५

४६,७३६/-

५१७४३/-

२५.१०.२०१६

९.५ %

पुनर्गुतवणूक

 

 

 

 

२,४७,११०/-

 

 

 

 

     सदरची रकमा या मयत भिकचंद दिपचंद पिपाडा किंवा सौ. स्‍वाती स्‍वरूपचंद खाबिया या नावाने ठेवलेल्‍या आहेत. तक्रारदार हिचे आजोबा मयत झाल्‍यानंतर तिने सामनेवाले यांच्‍याकडे सदरची मुदत ठेवीची मुदत पुर्ती झाली, त्‍यानुसार सदरची रक्‍कम परत मागीतली. परंतु सामनेवाले यांनी रक्‍कम परत दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदार हिने दिनांक ३१-०१-२०१८ रोजी नोटीस पाठवुन   सदरचे रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी ती रक्‍कम दिली नाही. म्‍हणुन सामनेवालेकडुन रक्‍कम मिळणेसाठी तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल केली व परिच्‍छेद १२ प्रमाणे मागणी केली आहे.

२.   सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी त्‍यांची लेखी कैफीयत प्रकरणात दाखल केली. त्‍यामध्‍ये त्‍यांनी कथन केले की, भिकचंद पिपाडा हे मयत झाले, त्‍यानंतर त्‍यांचे रकमेवर अनेकांनी हक्‍क सांगितला आहे. त्‍यामुळे कायदेशीर वारस निश्चित झाल्‍यावर रक्‍कम देता येईल, या कारणास्‍तव रक्‍कम देण्‍यास नकार दिला. रकमेची मागणी करतांना वारसदारांना कायदेशीर हक्‍क निश्चित झालेला नसल्‍यामुळे रक्‍कम नाकारण्‍यामध्‍ये बॅंकेची कोणतीही चुक नाही. कारण भिकचंद पिपाडा हे मयत झाले आहे. तसेच या रकमेविषयी दोन तक्रारी कोर्टात प्रलंबित आहेत. त्‍यामुळे सदरची रक्‍कम केवळ दाव्‍यात त्‍यांचे वारस निश्चित झालेशिवाय देता येत नाही. सदरची तक्रार तसेच सदरचे रकमेवर श्री. मनोज भिकचंद पिपाडा हे हक्‍क सांगत असल्‍याचे माहित झाले असल्‍यामुळे वारस निश्चित होईपर्यंत रक्‍कम देता येणार नाही. सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिली नाही, यामध्‍ये सामनेवाले यांची कोणतीही चुक नाही, असा खुलासा सामनेवाले क्र.१ व २ ने सादर केला. 

३.  तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्‍यांचे वकील श्री.डी.व्‍ही. जोशी यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व सामनेवाले यांनी दाखल केलेला खुलासा, शपथपत्र, कागदपत्र व त्‍यांचे वकील श्री.पी.बी.पटणी यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ?

होय

(३)

तक्रारदार ही मुदत ठेवीची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे काय ?

होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

४.  मुद्दा क्र. (१) :   तक्रारदार हिने तक्रारीत कथन केले की, तिचे आजोबा भिकचंद दिपचंद पिपाडा हे मयत आहे. सामनेवाले बॅंकेत तक्रारदार हिचे आजोबा मयत भिकचंद दिपचंद पिपाडा व तक्रारदार हिचे नावे मुदत ठेव पावत्‍या  केलेल्‍या  होत्‍या. सदरहु मुदत ठेव पावत्‍यांचे तपशील व पावत्‍यांचे छायांकीत प्रती तक्रारीत दाखल केलेल्‍या आहेत व त्‍यावर दोघांचे नाव नमुद केलेले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे गुंतवणुक केली होती, याबाबत उभयपक्षात वाद नाही.  तसेच प्रकरणात दाखल असलेल्‍या ठेव पावत्‍यांची पडताळणी केली असता त्‍यावर भिकचंद दिपचंद पिपाडा किंवा तक्रारदार अशी मुदत ठेव पावत्‍यांवर नावे नमुद आहे. सदरचे मुदत ठेव पावत्‍या वाचता येऊ शकल्‍या  नसल्‍याने मंचाने सामनेवाले यांचे निदर्शनास आणुन दिले होते की सदरचे पावत्‍या प्रकरणात दाखल कराव्‍यात. सामनेवाले यांनी अर्जासोबत सदरचे दस्‍तऐवज प्रकरणात दाखल केले आहे. या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता नाव, पावती नंबर, रक्‍कम, मुदत, व्‍याजाचा दर व बॅंकेचे नाव नमुद आहे व ज्‍यांच्‍या नावे मुदत ठेव पावत्‍या आहेत ती नावे भिकचंद दिपचंद पिपाडा किंवा सौ. स्‍वाती स्‍वरूपचंद खाबिया अशी आहेत. त्‍यामुळे तक्रारदार ही सामनेवालेची ग्राहक आहे. सबब मुददा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.  

५.  मुद्दा क्र. (२ व ३)  -  तक्रारदार हिने मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर व तिचे आजोबा भिकचंद दिपचंद पिपाडा हे मयत झाल्‍यानंतर सामनेवाले यांच्‍याकडे सदरचे रकमेची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी दिली नाही, म्‍हणुन मंचात तिने तक्रार दाखल केली. सामनेवाले यांनी सदरचे तक्रारीमध्‍ये  असा बचाव घेतला की, सदरचे रकमेवर अनेक लोक हक्‍क दाखवत असल्‍यामुळे त्‍यांना वारस निश्‍चीत झाल्‍याशिवाय रक्‍कम देता येणार नाही. तसेच सदरचे रकमेवर श्री. मनोज भिकचंद पिपाडा हे हक्‍क सांगत असल्‍याचे माहित झाले असल्‍यामुळे वारस निश्चित होईपर्यंत रक्‍कम देता येणार नाही. सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रुटी दिली नाही, सामनेवाले यांची कोणतीही चुक नाही, असे कथन केले. परंतु प्रकरणात दाखल भिकचंद दिपचंद पिपाडा किंवा सौ. स्‍वाती स्‍वरूपचंद खाबिया असे नावे मुदत ठेव पावतीवर नमुद आहे. त्‍यामुळे सदरचे पावतींनुसार दोघेपैकी कोणीही सदरची रकमेवर हक्‍क दाखवु शकतो. सदरची पावतींवर भिकचंद दिपचंद पिपाडा हे मयत झाल्‍यामुळे व मुदत ठेव पावतींवर नमुद नावानुसार भिकचंद दिपचंद पिपाडा किंवा सौ. स्‍वाती स्‍वरूपचंद खाबिया यांना सदरची रक्‍कम सामनेवाले यांचेकडुन मागणेचा हक्‍क राहील, ही बाब दाखल दस्‍तऐवजावरून स्‍पष्‍ट झाली. याप्रमाणे सामनेवाले बॅंकेने सदरची रक्‍कम तक्रारदार हिला न देऊन सेवेत त्रुटी केली आहे, असे मंचाचे मत आहे.

 

वारस प्रमाणपत्र  किंवा वारस निश्चित करणेचे अधिकार हे दुसरे कोर्टाला आहे. या मंचाने केवळ तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे काय, ही बाब बघणे आवश्‍यक आहे व तक्रारदार हिने दाखल कागदपत्राप्रमाणे तक्रारदार ही ग्राहक आहे हे सिध्‍द झाले आहे. तसेच सदर रक्‍कम मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे, ही बाब दाखल कागदपत्रावरून स्‍पष्‍ट झालेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हिला सदरची रक्‍कम सामनेवाले यांनी देणे आवश्‍यक आहे. वारसाचा मुद्दा हा इतर कोर्टामध्‍ये सिध्‍द होईल. सदरचे तक्रारीमध्‍ये तक्रारदार हिने जी मागणी केली आहे, ती योग्‍य आहे. त्‍यामुळे मुदत पुर्ण होऊनही सदरची रक्‍कम तक्रारदार हिला न देणे ही निश्‍चीतच सेवेत त्रुटी दर्शविते. सदर रक्‍कम सामनेवाले यांनी तक्रारदार हिला व्‍याजासह द्यावी, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

     तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी मुदत ठेवीची रक्‍कम दिली नाही म्‍हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्‍यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्‍कम तक्रारदार हिस देणे न्‍यायाचे ठरेल.

६.  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.   

आदेश

 १.  तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२. सामनेवाले क्र.१ व २ यांनी वैक्तिगत किंवा संयुक्तिकरीत्‍या तक्रारदार यांना खालील नमुद तपशीलाप्रमाणे पुनर्गुंतवणूक मुदत ठेव पावतींमधील  रक्‍कम व त्‍यावर ठेव दिनांकापासुन तपशीलात नमूद व्‍याजदराप्रमाणे  व्‍याज संपुर्ण रक्‍कम देणेहोइपर्यंत द्यावे.

क्रमांक

पावती नं.

ठेव रक्‍कम

ठेव दिनांक 

व्‍याज दर

१२८०७

५०,०००/-

१५.१०.२०१५

१० %

१२७५१

२५,०००/-

०७.०९.२०१५

१० %

१२६०६

१,००,०००/-

०७.०७.२०१५

१०.५ %

१२७९५

४६,७३६/-

०५.१०.२०१५

९.५ %

३.  सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा.

 ४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

      ५.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

      ६.    सदर प्रकरणाची ‘क’ व ‘ब’ फाईल तक्रारदार यांना परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.