गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. आर. कलंत्री
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. देशमुख
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 28/05/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने दि. ४.९.२००७ रोजी रु. २०,००,०००/- विरुध्दपक्षाकडे मुदत ठेवीत जमा केले होते. त्यावर 10 टक्के व्याज विरुध्दपक्षाने द्यावयाचे होते. सुरवातीला ही रक्कम दि. ४.१०.२००८ पर्यत ठेवण्यात आली होती. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे या रक्कमेवर त्रैमासीक व्याज चक्रवाढ पध्दतीने द्यावयास पाहिजे होते. परंतु विरुध्दपक्षाने तसे केले नाही. मुदती अंती विरुध्दपक्षाने देय रक्कमेवर 8.50 टक्के ने सरळ व्याज सुरवातीच्या 1 वर्षात देवून येणारी व्याजाची रक्कम रु. १,७०,०००/- ही रु. २०,००,०००/- मध्ये जमा केली त्यामुळे मुदत ठेवीची रक्कम ही रु. २१,७०,०००/- झाली.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे या रक्कमेवर चक्रवाढ पध्दतीने व्याज न देता विरुध्दपक्षाने दि. ४.१०.२००९ ते २०.९.२०१३ म्हणजे १४४७ दिवसाचे व्याज 8.50 टक्के ने सरळ व्याजाची आकारणी करुन तक्रारदाराला दिले जे व्याजाची रक्कम रु. ९,०१,२३१/- दि. ४.१०.२००९ ते २०.९.२०१३ या कालावधीचे तक्रारदाराला दिले जे विरुध्दपक्षाने चुकीच्या पध्दतीने अवलंबून करुन केले आहे. तक्रारदाराचे वास्तविक या चुकीच्या पध्दतीमुळे
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..3..
रु. १,२६,६७८/- व्याजाचे नुकसान झाले, जर ते त्रैमासीक पध्दतीने आकारले असते. याबद्दल तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे ती चुक दुरुस्त करण्यासंबंधी पत्र दिले होते त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांचेकडे तक्रार केली ती त्यांनी बॅंकींग Ombudsman मुंबई यांचकडे पाठविली व त्यांनी दि. १७.६.२०१४ च्या पत्राप्रमाणे तक्रारदाराची तक्रार ही रद्द केली व योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागावी असे तक्रारदाराला कळविले. त्यावरुन तक्रारदाराने हा तक्रार अर्ज दाखल केला, ज्यात असे कथन केले की, विरुध्दपक्षाने त्यास रु. १,२६,६७८/- कमी व्याज दिले असून ती रक्कम त्यास 12 टक्के व्याज दराने दि. २०.९.२०१३ पासुन द्यावी तसेच रु. ५०,०००/- झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल व रु. २०,०००/- या तक्रारीचा खर्च द्यावा अशी विनंती तक्रारदाराने केली.
4. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 10 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदार यांनी दि. ४.९.२००७ रोजी 13 महिने कालावधीसाठी रु. २०,००,०००/- मुदत ठेवीत विरुध्दपक्षाकडे जमा केले होते त्यावर 10 टक्के दराने व्याज मुदती अंती देण्याचे विरुध्दपक्षाने कबुल केले. त्यानंतर
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..4..
मुदत ठेवीचा कालावधी हा 1 वर्षाने वाढविण्यात आला. परंतु त्या कालावधी नंतर तक्रारदाराने, विरुध्दपक्षाच्या कथनानुसार मुदत ठेव पावती नुतनीकरण करुन न घेतल्याने ती रक्कम बचत खात्यात ठेवण्यात आली. त्यामुळे बचत खात्यातील रक्कमेवर बचती बद्दल दर हा 4 टक्के होत. ती रक्कम विरुध्दपक्षाकडे १४४७ दिवसासाठी प्रलंबित राहिल्याने त्यावर विरुध्दपक्षाने 8.50 टक्के सरळ व्याज देवून ती रक्कम तक्रारदारास दिलेली होती. विरुध्दपक्षाने त्यामुळे कोणतीही सेवेत त्रुटी केली नाही. वास्तविक तक्रारदाराने मुदत ठेवीच्या कालावधी हा वाढवून घ्यावयास पाहिजे होता. त्याबद्दल त्यांनी विरुध्दपक्ष यांना कोणतीही सूचना दिलेली नाही. दि. ४.९.२००९ ते २०.९.२०१३ या कालावधीत ही रक्कम बचत खात्यात वर्ग करण्यात आल्यामुळे असलेल्या व्याज दराने व्याज देण्यात आले. त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
5. तक्रार अर्ज, लेखी जबाब, तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. आर. कलंत्री व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. देशमुख यांचा युक्तीवाद ऐकला. युक्तीवाद दरम्यान तक्रारदाराने दाखल केलेले निशाणी 2/2 ते 2/8 दस्तऐवजावर विरुध्दपक्षाकडून खुलासा
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..5..
मागविण्यात आला तो निशाणी 12 प्रमाणे त्यांनी दिला असून तो स्विकारण्यात येतो. त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराने मुदत ठेवीत
जमा केलेल्या रक्कमेवर व्याजाची आकारणी
योग्य पध्दतीने केली आहे का ? .... नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
6. विरुध्दपक्ष यांचा लेखी जबाब पाहता हे स्पष्ट होते की, तक्रारदाराने दि. ४.९.२५००७ रोजी १३ महिने कालावधीसाठी रु. २०,००,०००/- विरुध्दपक्षाकडे मुदत ठेव म्हणून जमा केले होते, त्यावर मुदत ठेव पावती प्रमाणे विरुध्दपक्षाने 10 टक्के व्याज त्यावर द्यावयाचे होते. तक्रारदाराने जरी असे कथन केले असले की, विरुध्दपक्षाने या रक्कमेवर त्रैमासीक व्याज द्यावयास पाहिजे होते. परंतु तसा कोणताही दस्त हे शाबीत करण्यासाठी तक्रारदाराने दाखल केला नाही. त्यामुळे त्रैमासीक व्याजाने आकारणी विरुध्दपक्षाने करावयास पाहिजे होती ती त्यांची मागणी स्विकारता येत नाही. असे जरी असले तरी हे स्पष्ट होते
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..6..
की, दि. ४.९.२००९ ते २०.९.२०१३ पर्यंत तक्रारदाराची मुदत ठेवीची रक्कम ही विरुध्दपक्षाकडे जमा होती. सुरुवातीच्या कालावधी नंतर मुदत ठेवीचे नुतनीकरण हे पुढील 1 वर्षासाठी करण्यात आले होते असे असतांना तक्रारदाराची रक्कम बचत खात्यात वर्ग करावे असे विरुध्दपक्ष यांना कळविले नव्हते तर विरुध्दपक्षाने त्या ठेव पावतीचे नुतनीकरण प्रत्येक वर्षी करावयास पाहिजे होते व तसे ते होत असते, परंतु विरुध्दपक्षाने ते केले नाही. त्यांच्या कथना प्रमाणे विरुध्दपक्षाच्या नियमानुसार जर मुदत ठेव पावतीचे नुतनीकरण केले नाही तर ती रक्कम बचत खात्यात जमा दाखविण्यात येते. बचत खात्यावर असलेले व्याज दराने त्यावर व्याज देण्यात येते. परंतु हे शाबीत करण्यासाठी विरुध्दपक्षाने कोणताही दस्त दाखल केला नाही. वास्तविक मुदत ठेवीत जमा केलेली रक्कम व त्यावरील व्याज, जर ग्राहकांनी ते पैसे न घेता बॅंकेकडे जमा ठेवले तर पुढील वर्षाचे व्याज हे आधीची मुदत ठेव पावतीची रक्कम व त्यावर देय होणारे व्याज अशी एकंदरीत रक्कम विचारात घेता पुढच्या वर्षीचे व्याज त्या एकंदरीत रक्कमेवर ठरलेल्या व्याज दराने द्यावे लागते. विरुध्दपक्षाने तसे या प्रकरणात केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार हा या
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..7..
पध्दतीने येणा-या व्याजाची रक्कम मिळण्यास पात्र होतो. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते. तक्रारदाराने जरी 12 टक्के व्याज दराने मागणी केली असली तरी त्यांचा विरुध्दपक्षासोबत व्याजा संबंधी जो करार झालेला आहे जो मुदत ठेव पावतीवरुन दिसतो, त्यानुसार त्याची ही मागणी म्रंजूर होऊ शकत नाही. तसेच मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल व तक्रार खर्च याबद्दल, त्यांनी ज्या रक्कमेची मागणी केली ती अवास्तव वाटते त्यामुळे हे मंच असा निष्कर्ष काढते की, कराराप्रमाणे विरुध्दपक्षाने वर नमुद केल्या प्रमाणे दि. ४.१०.२००८ ते २०.९.२०१३ या कालावधीत तक्रारदारास 10 टक्के व्याज द्यावयास पाहिजे होते परंतु त्यांनी 8.50 टक्के दराने व्याज दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हा व्याज दरातील फरक 1.50 टक्के यानुसार या कालावधीचे व्याज मिळण्यास पात्र होतो व दि. २१.९.२०१३ पासुन रक्कम देईपर्यंत विरुध्दपक्षाने या देय रक्कमेवर 10 टक्के ने व्याज द्यावे असा निष्कर्ष काढण्यात येतो. तक्रारदाराने नुकसान भरपाईची केलेली मागणी ही स्विकारता येत नाही. सबब खालील आदेशाप्रमाणे तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 288/2014
..8..
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंतशः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दाक्ष यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास दि. ४.१०.२००८ ते २०.९.२०१३ या
कालावधीतील त्याच्या मुदत ठेव रक्कमेवरील देय होणारे व्याज 10 टक्के दराने हे मुळ रक्कमेत जमा करुन पुढील वर्षासाठी त्या रक्कमेवर व्याज काढून ते तक्रारदाराला द्यावे व येणारी एकंदरीत व्याजाच्या रक्कमेतून त्यांनी दिलेली व्याजाची रक्कम ही वजा करुन राहिलेली रक्कम तक्रारदारास त्यावर दि. २०.९.२०१३ पासुन 10 टक्के व्याज ती रक्कम देईपर्यंत द्यावे.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला या तक्रार अर्जाचा खर्च रु. ३,०००/- द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 28/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष