Maharashtra

Nagpur

CC/279/2021

PRASHANT SHARAD CHANDRATRE - Complainant(s)

Versus

THE JAIN GROUP, THROUGH PROPRIETOR, MR. MANOJ JAIN - Opp.Party(s)

ADV. ULHAS M. AURANGABADKAR

29 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/279/2021
( Date of Filing : 10 Jun 2021 )
 
1. PRASHANT SHARAD CHANDRATRE
R/O. 293, SHANKAR NAGAR, B/Y NEW WOCKHARDT HOSPITAL, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE JAIN GROUP, THROUGH PROPRIETOR, MR. MANOJ JAIN
OFF. VENKATESH APARTMENT, SHUKARVARI TALAB JHULELAL MANDIR, OPPOSITE SUBHASH ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ULHAS M. AURANGABADKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 29 Dec 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्षाचा स्टील डोअर, विंडो डोअर्स, सॉलिड पीव्हीसी डोअर, होम फर्निचर आणि ऑफिस फर्निचर बनविण्याचा व पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याला त्याच्‍या घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे बदलावयाचे असल्‍यामुळे त्याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला असता त्‍याला दरवाजा बदलवून देण्‍याकरिता रुपये 12,900/- चे एस्टिमेट दिले व वाटाघाटी नंतर संपूर्ण काम रुपये 12,500/- मध्‍ये करुन देण्‍याचे उभय पक्षात ठरले.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला चांगली सेवा देण्याचे आश्वासन दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला एफआरपी डोअर्स, डब्‍ल्‍यूपीसी फ्रेम व डोअर किटचा पुरवठा करण्याबाबत ऑर्डर दिला व संपूर्ण रक्कम प्राप्त झाल्यानंतर डोअरचा पुरवठा करण्याचे उभय पक्षात ठरले होते. त्यानुसार तक्रारकत्याने दिनांक 07.02.2019 ला रुपये 6000/- विरुद्ध पक्षाचे अधिकृत कर्मचारी श्रीमती अर्चना निमजे यांच्‍या सूचनेनुसार त्‍यांची मुलगी वैष्णवी निमजे यांच्या खात्यात गुगल पेज द्वारे रक्‍कम जमा केले व त्याबाबतची पावती विरुद्ध पक्षाने दिली  आणि त्याच दिवशी विरुद्ध पक्षाने बाथरूम व टायलेटचे दरवाजाचे मोजमाप करिता कारागीर तक्रारकर्त्याच्या घरी पाठविले व मोजमाप घेऊन गेले. त्‍यानंतर विरुद्ध पक्षाने तक्रारकर्त्याला उर्वरित रक्कम रुपये 6500/- ची मागणी केली त्यानुसार तक्रारकर्त्याने दि. 12.02.2021 रोजी गुगल पे द्वारे उर्वरित रक्कम रुपये 6,500/- अदा केली आणि त्‍याच दिवशी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्‍या घरी दरवाजे बसविण्याकरिता 2 कारागीर पाठविले आणि हे दोन्‍ही कारागीर दरवाजाच्‍या मोजमापाकरिता आलेल्‍या कारागीरां पेक्षा वेगळे होते. विरुद्ध पक्षाचे कारागिरांनी दरवाजे बसविल्यानंतर तक्रारकर्त्याने बसविलेल्या दरवाजांची पाहणी केली असता निदर्शनास आले की, वि.प.च्‍या कारागीराने व्‍यवस्थित मोजमाप न करता दरवाजे बसविल्‍यामुळे दरवाजाच्‍या खालच्‍या भागाला व बाजुला बरेच अंतर  दिसत होते व दरवाजाचे हॅन्‍डल सुध्‍दा व्‍यवस्थिती बसविण्‍यात न आल्‍यामुळे दरवाजा बंद होत नव्‍हता याबाबत त.क.ने दरवाज्‍यांचे फोटो वि.प.कडे पाठविले व त्‍याबाबतची तक्रार केली असता त्‍याने त्‍याची दखल घेतली नाही.  म्‍हणून त.क.ने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍याकडून घेतलेली रक्‍कम 18 टक्‍के व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 03.12.2021 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले  व त्‍यावरील निष्‍कर्ष  खालीलप्रमाणे नोंदविले.

             मुद्दे                                           उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ           होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ॽ             होय

 

  1.  काय आदेश ॽ                               अंतिम आदेशानुसार     

                

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने घरातील बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे बदलविण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडून रुपये 12900/- चे इस्‍टीमेट दिले होते व संपूर्ण कामकाज हे रुपये 12,500/- मध्‍ये करण्‍यात येणार असल्‍याचे उभय पक्षात ठरले होते, हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे कर्मचारी श्रीमती अर्चना निमजे यांच्‍या खात्‍यात गुगल पे द्वारे दि. 07.01.2021 रोजी रुपये 6,000/- अदा केले असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते व उर्वरित रक्‍कम रुपये 6,500/- दि. 12.02.2021 ला गुगल पे द्वारे अदा केली असल्‍याचे नि.क्रं. 2(2) वरुन दिसते. वि.प च्‍या कारागारांनी त.क.च्‍या घरचे योग्‍य मोजमाप न करता दरवाजे बसविण्‍यात आल्‍यामुळे दरवाज्‍यात अंतर असल्‍याचे दाखल छायाचित्रावरुन दिसून येते. याबाबत त.क.ने विरुध्‍द पक्षाकडे तक्रार करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या घरात बसविलेले दरवाज्‍याची दुरुस्‍ती करुन दिली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे दिसून येते.  म्‍हणून नुकसान भरपाई देणे योग्‍य आहे असे आमचे मत आहे.

             सबब  खालीलप्रमाणे अंतिम  आदेश  पारित.

                                 अंतिम आदेश

  1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

2.   विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करण्‍यात येते.

3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या नुकसान भरपाई करिता रुपये 15,000/- आणि शारीरिक, मानसिक करिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या करावी.

 

5.तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.