ग्राहक तक्रार क्र. 89/2014
दाखल तारीख : 28/04/2014
निकाल तारीख : 28/07/2015
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. शहाजी आनंदराव रितापूरे,
वय - 55 वर्षे, धंदा – शेती, सध्या काही नाही,
रा. मंगरुळ, ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय, सावरकर भवन,
शिवाजी नगर, कॉग्रेस हाऊस रोड, पुणे 422055,
व्दारा मॅनेजर,
दि.न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,
शिवाजी चौक, नाईक निवास, उस्मानाबाद.
2. मा. तालुका कृषी अधिकारी,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय, कळंब,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद,
3) डेक्कन इन्शुरन्स अॅण्ड रि.इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.,
मा. व्यवस्थापक,
मॉन्ट व्हेर्ट झेनिथ,
ऑफिस नं.201, एल जी. शोरुम समोर,
बाणेर टेलिफोन एक्सचेंज ऑफिसजवळ,
बाणेर रोड, बाणेर, पुणे -411045. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.जी.एस.कस्पटे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.ए.व्ही. मैंदरकर.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकारा क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
आपला शेतकरी अपधात विमा विमा कंपनी विरुध्द पक्षकार (विप) क्र.3 कडे उतरविलेला असताना कायमसवरुपी अपंगत्व आलेले असतात. विमा रक्कम नाकारुन विप यांनी सेवेत त्रुटी केली. म्हणून तक्रारकर्ता (तक) याने ही तक्रार ने दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढील प्रमाणे आहे.
1. तक हा मौजे मगंरुळ येथील शेतकरी असून तेथे त्यांला गट नंबर 366 मध्ये 4 हे. 87 आर. एवढी जमिन आहे. दि.10.08.2011 रोजी सांयकाळी 4 वाजता तक कळंब हून मंगरुळ येथे टमटम मध्ये बसून जात होता. टमटम डिकसळ गांवाचे पुढे आला असताना समोरुन माल वाहतूक अॅपे क्र.एम.एच.44 6182 ने जोराची धडक दिली. त्यामुळे तक च्या उजव्या मांडीस गंभीर जखम होऊन फ्रॅक्चर झाले. इतर ठिकाणी सुध्दा गंभीर मार लागला. पायांचे ऑपरेशन करुन रॉड टाकावा लागला. पोलिस स्टेशन कळंब येथे गु.र.न. 108/11 ने दोन्ही मटम चालका विरुध्द गुन्हयाची नोंद झाली. तक ने आधार हॉस्पीटल लातूर तेथे उपचार घेतला तसेच प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. दि.12.03.2013 रोजी तक ने जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे अपंग प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज दिला. तक ला कायम स्वरुपी अंपगत्व आलेले आहे. त्यांस कसल्याही प्रकारचे काम होत नाही. जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद ने तक ची तपासणी करुन पायाने 40 टक्के अपंगत्व आल्याचा दाखला दिलेला आहे.
2. विप क्र.2 ने विप क्र.3 मार्फत विप क्र.1 कडे सर्व शेतक-यांचा विमा उतरलेला आहे. तक त्यामुळे विप चा ग्राहक आहे. दि.05.11.2011 रोजी तक ने सर्व कागदपत्राची पुर्तता करुन विप क्र.2 कडे विमा प्रस्ताव दाखल केला. विप क्र.2 ने तो विप क्र.3 कडे व विप क्र.3 ने विप क्र.1 कडे पाठविला. दहा महिने झाले तरी विप ने विमा रक्कम दिली नाही अगर काहीही कळविलेले नाही. त्यामुळे वाद उत्पतीस दि.18.03.2013 रोजी कारण घडले. त्यामुळे ही तक्रार दि.13.03.2014 रोजी उशिर माफीच्या अर्जासह दाखल करण्यात आली.
3. तक ने तक्रारी सोबत क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, 7/12 उतारा,एफ.आय.आर. पंचनामा, आधार हॉस्पीटलचा दाखला, विप क्र.2 ला लिहीलेले 18.3.13 चे पत्र, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांनी दिलेला अंपगत्वाचा दाखला इत्यादी कागदपपत्राच्या प्रति हजर केलेल्या आहेत.
4. विप क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे दि.02.06.2014 रोजी दाखल केलेले आहे.विप क्र.1 चे म्हणणे की,विमा कराराप्रमाणे जर एक डोळा किंवा एक अवयव गेला तर 50 टक्के अपंगत्व येते. दोन डोळे दोन पाय, दोन हात, एक डोळा, एक पाय,एक हात गेल्यास 100 टक्के अपंगत्व येते. तक ला 40 टक्के अपंगत्व आले आहे. त्यामूळे तक हा विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक ने विमा प्रस्ताव देताना अपगत्वाचे प्रमाणपत्र दाखल केलेले नव्हते. ते प्रमाणपत्र दिड वर्ष उशिराने दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्र ची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. विमा कराराची प्रत विप क्र.1 ने हजर केलेली आहे.
5. विप क्र.2 ला नोटीस तामील झाली नाही, तक ने तजविज केली नाही. दि.29.10.14 चे आदेशाने विप क्र.2 विरुध्द तक्रार रद्द करण्यात आलेली आहे.
6. विप क्र.3 ने दि.02.06.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप क्र.2 चे म्हणणे आहे की, शेतकरी व विमा कंपनी यांचे मध्ये मध्यस्थ म्हणून विप क्र.2 ची भूमिका आहे. विप क्र.2 ला त्या बाबत कोणतीही फि मिळत नाही. विप क्र.1 ने तक कडून दि.20.03.2012 चे पत्रा द्वारे अपंगत्व प्रमाणपत्राची मागणी केलेली होती. विमा रक्कम देणे अगर नाकारणे हा विमा कंपनीचा निर्णय असतो. त्यासाठी विप क्र.2 कुठल्याही प्रकारे जबाबदार राहू शकत नाही. विप क्र.1 च्या दि.20.03.2012 च्या पत्राची प्रत विप क्र.3 ने हजर केलेली आहे.
7. तक ची तक्रा, त्यांनी दिलली कागदपत्रे, विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप यांनी सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 -
8. जे अपंगत्वाचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालय उस्मानाबाद ने दिले आहे ते 12.03.2013 या तारखेचे आहे मात्र त्यामध्ये एक वर्षाने अपंगत्व ठरवले जाईल असे म्हटलेले आहे. अपघात दि.10.08.2011 रोजी झाला. तक ने अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयास 12.3.13 रोजी अर्ज दिल्याचे दिसते. तथापि, त्यावेळेस त्यांला अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. आधार हॉस्पीटल लातूर चे प्रमाणपत्रा प्रमाणे तकने तेथे दि.11.08.2011 पासून 27.08.2011 पर्यत उपचार घेतला. पायाचे फ्रॅक्चर झालेले होते. नंतर जिल्हा रुग्णालय उस्मानाबादचे दि.08.01.2014 चे प्रमाणपत्र हजर करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे पोस्टट्रॉमेटीक आरथ्राटीस आणि डावा पाय 3 से.मिटरने कमी झाला असे म्हटले आहे. त्यामुळे 40 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे म्हटलेले आहे.
9. कायमस्वरुपी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दि.08.01.2014 रोजी मिळाल्यामुळे तक्रार करण्यास विलंब झाला असे म्हणता येणार नाही. कारण हि तक्रार दि.13.03.2014 रोजी दाखल झालेली आहे. विप क्र.1 चा बचाव असा आहे की, कराराप्रमाणे 40 टक्के अपंगत्व आल्यास काहीही विमा रक्कम देय होत नाही. चार्ट मध्ये लॉ ऑफ 1 लिंब आणि 1 आय साठी 50 टक्के भरपाई दाखवलेली आहे. परमेंनंट डिसअबलमेंट ची पण व्याख्या दिलेली आहे व त्याप्रमाणे माणसाला आपला नौकरीधंदा करणे कायमस्वरुपी अशक्य झाले तरच कायमस्वरुपी अपंगत्व मानावयाचे आहे.
10. प्रस्तुत कामी तक हा शेतकरी होता. त्यांचे वय 55 वर्ष होते दाखल्याप्रमाणे त्यांला आरर्थॉयटीस झालेला आहे. तसेच उजव्या गुडघ्यामध्ये विकृती आलेली आहे व डावा पाय 3 सेटीमिटरने कमी झालेला आहे. अशा परिस्थितीत तो शेती काम करु शकेल असे वाटत नाही. जे 40 टक्के अपंगत्व लिहीलेले आहे ते पूर्ण शरीराच्या कार्य क्षमतेचा विचार करुन लिहीलेले दिसते. मात्र डावा पाय हा काम करु शकत नाही व त्यामुळे 50 टक्के भरपाई मिळणेस तक पात्र आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 ने तक ला विमा भरपाई रु.50,000/- 1 महिन्यात द्यावी, चुकल्यास विप क्र.1 ने तक ला वरील रक्कमेवर तकार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 दराने रक्कम फिटेपर्यत व्याज द्यावे.
3) विप क्र.1 ने तक ला तकारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त)द्यावे.
2) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.