संयुक्त निकालपत्र :- (दि.20.11.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.457 ते 460/2010 या तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच चारही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र.2, 3, 5 ते 7, 11 ते 13 व 15 यांनीही एकत्रित म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.8 व 19 यांनी स्वतंत्रपणे म्हणणे दाखल केले आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदार संस्था ही सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्था आहे. सामनेवाला क्र.1 ही सहकारी बँक असून सामनेवाला क्र.2 ते 19 हे सामनेवाला बँकेचे पदाधिकारी आहेत. सामनेवाला क्र.20 व 21 हे सामनेवाला बँकेचे मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. यातील तक्रार क्र.457 व 458/10 मधील तक्रारदार संस्थेने सामनेवाला बँकेकडे इच्छापुर्ती, पुनर्गुंतवणुक व मुदत बंद ठेवीच्या स्वरुपात तर तक्रार क्र.459/10 मधील तक्रारदारांनी बचत खाते व तक्रार क्र.460/10 मधील तक्रारदारांनी मासिक व्याज उत्पन्न ठेवींच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | व्याजदर/रक्कम | व्याजासह येणे रक्कम | 1. | 457/10 | 900513 | 40000/- | 13.05.2008 | 13.05.2010 | 11% | 48066/- | 2. | --”-- | 900517 | 30000/- | 20.05.2008 | 20.05.2010 | 11% | 36050/- | 3. | --”-- | 900571 | 20000/- | 23.06.2008 | 23.06.2010 | 11% | 24033/- | 4. | --”-- | 900617 | 20000/- | 26.08.2008 | 26.08.2010 | 11% | 23116/- | 5. | --”-- | 900636 | 15000/- | 29.09.2008 | 29.09.2010 | 11% | 17200/- | 6. | --”-- | 022945 | 30000/- | 29.10.2008 | 29.10.2010 | 11% | 34400/- | 7. | --”-- | 022975 | 35000/- | 02.12.2008 | 02.12.2010 | 11% | 39170/- | 8. | --”-- | 025013 | 30000/- | 30.12.2008 | 30.12.2010 | 11% | 33575/- | 9. | --”-- | 025057 | 30000/- | 30.01.2009 | 30.01.2011 | 11% | 33300/- | 10. | --”-- | 025079 | 28000/- | 27.02.2009 | 27.02.2011 | 11% | 30823/- | 11. | --”-- | 025326 | 26845/- | 31.03.2009 | 31.03.2011 | 11% | 29305/- | 12. | --”-- | 063309 | 60000/- | 21.01.2009 | 21.05.2010 | 11% | 66600/- | 13. | --”-- | 063335 | 75000/- | 20.03.2009 | 20.06.2010 | 11% | 81875/- | 14. | --”-- | 063359 | 50000/- | 31.03.2009 | 30.06.2010 | 11% | 54583/- | 15. | 458/10 | 008395 | 59315/- | 02.07.2009 | 01.10.2009 | 7% | 61737/- | 16. | --”-- | 008394 | 56234/- | 08.08.2009 | 07.11.2009 | 7% | 57874/- | 17. | --”-- | 008393 | 119966/- | 07.09.2009 | 07.12.2009 | 7% | 122766/- | 18. | --”-- | 008397 | 101736/- | 11.05.2009 | 07.11.2009 | 9% | 107840/- | 19. | --”-- | 008398 | 62707/- | 21.05.2009 | 18.11.2009 | 9% | 66470/- | 20. | --”-- | 008396 | 80863/- | 30.06.2009 | 28.12.2009 | 9% | 85108/- | 21. | 459/10 | बचत खाते क्र.147 | 10240/- | -- | -- | 7% | 11017/- | 22. | --”-- | बचत खाते क्र.5/118 | 7100/- | -- | -- | 7% | 7638/- | 23. | 460/10 | 700478 | 30000/- | 17.07.2008 | 17.10.2009 | 6050/- | 36050/- | 24. | --”-- | 700479 | 30000/- | 17.07.2008 | 17.10.2009 | 6050/- | 36050/- | 25. | --”-- | 700480 | 30000/- | 17.07.2008 | 17.10.2009 | 6050/- | 36050/- | 26. | --”-- | 700481 | 30000/- | 17.07.2008 | 17.10.2009 | 6050/- | 36050/- | 27. | --”-- | बचत खाते क्र.1358 | 26184/- | -- | -- | 7% | 29850/- |
(4) तक्रार क्र.457 व 458/10 मधील तक्रारदार संस्थेने वरील रक्कमा या त्यांच्या दूध उत्पादक सभासदांच्या भविष्य निर्वाह निधीकरिता व दूध बिल फरकाच्या रक्कमा सामनेवाला बँकेकडे ठेवल्या आहेत. तक्रार क्र.459/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ठेवलेल्या रक्कमा या घरखर्चातून व शेतीचे उत्पन्नातून बचत केली आहे. सदरच्या रक्कमा या त्यांच्या मुलीच्या उच्चशिक्षणाकरिता आवश्यक आहेत. तक्रार क्र.460/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ठेवलेल्या रक्कमा या घरखर्चातून व मोलमजुरी करुन बचत केली आहे. सदरच्या रक्कमा या त्यांच्या मुलींच्या लग्नाकरिता आवश्यक आहेत. (5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, प्रस्तुत तक्रारदारांनी सदर ठेवी व्याजासह परत मिळणेकरिता सामनेवाला बँकेकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केली. सदर ठेवी वेळेत परत मिळाल्या नसल्याने तक्रार क्र.457 व 458/10 मधील तक्रारदार संस्थेला आपले सभासदांना व ठेवीदारांना वेळेत रक्कमा परत देता आलेल्या नाहीत. त्यामुळे दूध उत्पादक सभासद तक्रारदार संस्थेकडे दूध जमा करणार नाहीत असे दिसून आले. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.28.01.2010, दि.24.05.2010 व दि.15.07.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (6) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या, सेव्हिंग्ज खात्यांचे पासबुक इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (7) सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेतील संपूर्ण व्यवहारास अनुसरुन भारतीय रिझर्व्ह बँकेने दि.20.04.2009 रोजीचे पत्राने दि बॅंकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 चे कलम 35 ए प्रमाणे निर्बंध लागू केले होते. तदनंतर दि.16.10.2009 रोजीच्या पत्राने आर.बी.आय.ने आर्थिक निर्बंधास पुन्हा मुदतवाढ दिली. तसेच, आर.बी.आय. यांनी दि.08.02.2010 रोजीच्या आदेशान्वये सामनेवाला बँकेचा परवाना रद्द केला असून सह.आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि.04.03.2010 रोजीच्या आदेशानुसार सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळाची नेमणुक केलेबाबतचा आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे सामनेवाला बँक ही अवसायनात काढलेली असल्याने सध्या बॅंकेचे संपूर्ण कामकाज अवसायक मंडळ पहात आहे. (8) सामनेवाला क्र.1, 20 व 21 हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवीच्या रक्कमा तक्रारदारांना व्याजासह परत मिळणार आहेत; त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच, सदरचा अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नसताना सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. तसेच, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा प्रामाणिकपणे परत करणेतची इच्छा आहे. तथापि, सामनेवाला बँकेचे दुस-या मोठया सक्षम बँकेत विलीनकरणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. तक्रारदारांच्या ठेवीचा विमा संरक्षण असलेने त्यांना व्याजासहीत रक्कम तात्काळ परत मिळणेसाठी विमा महामंडळाकडे कारवाई सुरु आहे. सामनेवाला बँकेवर अवसायकांची नेमणुक झाली असून बँकेचा संपूर्ण कारभार व व्यवहार हाताळणेबाबत त्यांना आदेश झाले आहेत. परंतु, तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी अवसायक यांना पक्षकार केले नसल्याने दिवाणी व्यवहार संहिता, कोर्ट ऑर्डर-1 मधील तरतुदींनुसार बाध येतो. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. (9) सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आर.बी.आय.ने निर्बंध घातलेबाबतचे दि.20.04.2009 व दि.16.10.2009 ची पत्रे, परवाना रद्द केलेबाबतचे दि.11.02.2010 रोजीची पत्रे, अवसायक मंडळाची नेमणुकीचे पत्र दि.04.03.2010 चे पत्र, डिपॉ.इन्श्यु. अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कार्पो.यांचे दि.13.04.2010 रोजीचे पत्र, कोर्ट कामी सहीचे अधिकारबाबत दि.07.07.2010 रोजीचा ठराव इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (10) सामनेवाला क्र.2, 3, 5 ते 7, 11, 12, 13 व 15 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेवर अवसायक मंडळाची नेमणुक होवून बँकेचे वायंडींग-अप व डिझोलेशनचे प्रोसिडींग सुरु आहे. त्यामुळे सामनेवाला बॅंकेविरुध्द सहकार कायदा कलम 107 प्रमाणे कोणतेही प्रोसिडींग करता येत नाही. कलम 107 अन्वये अवसायकाशिवाय कोणासही ज्युरिडिक्शन रहात नसलेने दिवाणी कोर्ट, क्रिमिनल कोर्ट, रेव्हेन्यु कोर्टामध्ये अगर अन्य कोणतेही कायदेशीर प्रोसिडींग करता येत नसलेने अवसायकाचे कालावधीमध्ये वसुली करुन कायदेशीर क्लेम देणेचा हक्क व अधिकार अवसायक मंडळास आहे. सामनेवाला क्र. 16 ते 19 हे तज्ज्ञ संचालक होते. ते संचालक म्हणून निवडून आलेले नाहीत. त्यांचेवर कायद्याने कोणतीही जबाबदारी नाही. तसेच, अवसायक मंडळ नेमणुकपूर्वी रजिस्ट्रार यांनी संचालक मंडळाविरुध्द सहकार कायदा कलम 83, 84 व 88 प्रमाणे कोणतीही चौकशी केलेली नाही व कोणासही दोषी अगर जबाबदार ठरविणेत आलेले नाही. सामनेवाला बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आलेनंतर सामनेवाला बँकेने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे रिट पिटीशन नं.6407/2010 दाखल केली होती. शिवाय सारस्वत बँकेत सामनेवाला बँक विलीनीकरण करावी म्हणून संचालक मंडळाने प्रयत्न केले, परंतु त्यास यश आले नाही. तसेच, अवसायक मंडळ हे सामनेवाला बँकेचे सिल व मॅनेजिंग कमिटी म्हणून कार्यरत असल्याने सामनेवाला बँकेच्या संचालकांवर कोणतीही जबाबदारी राहिलेली नाही. तक्रारदारांना वसुलीकरिता सहकार कायदा कलम 101 व 105 हाच पर्याय असलेने मे.कोर्टास ज्युरिसडीक्शन नाही. (11) सामनेवाला क्र.2, 3, 5 ते 7, 11, 12, 13 व् 15 हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बॅंकेचे लायसेन्स रिझर्व्ह बँकेने दि.11.02.2010 रोजी रद्द केले आहे व दि.04.03.2010 रोजी अवसायक मंडळ नेमले आहे. तथापि, तक्रारदारांनी अवसायक मंडळास प्रस्तुत प्रकरणी पक्षकार केलेले नाही. सहकारी संस्थेच्या कलम 73 प्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, ज्याचे उत्पन्न 15,000/- चे आत असते व स्त्री संचालक घेणे बंधनकारक आहेत. तसेच, मागासवर्गीय संचालक घेणे बंधनकारक आहे यावरुन सदर संचालकांवर अमर्यादित जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी व प्रस्तुत सामनेवाला यांना प्रत्येकी रुपये 5,000/- चा खर्च देणेचा आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (12) सामनेवाला क्र.8-द्वारकाधिश लक्ष्मीनारायण सारडा व सामनेवाला क्र.19-प्रल्हादराज गिरीराज भुतडा यांनी स्वतंत्रपणे परंतु सारखेच म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला बँकेतील संपूर्ण व्यवहारास अनुसरुन भारतीय रिझर्व्ह बँकेने दि.20.04.2009 रोजीचे पत्राने दि बॅंकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 चे कलम 35 ए प्रमाणे निर्बंध लागू केले होते. तदनंतर दि.16.10.2009 रोजीच्या पत्राने आर.बी.आय.ने आर्थिक निर्बंधास पुन्हा मुदतवाढ दिली. सामनेवाला बँकेवर अवसायक यांची नेमणुक झाली असून त्यांचेच बँकेच्या व्यवहारावरती सध्या लक्ष आहे. प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला बँकेचे अनुक्रमे नविन संचालक व तज्ज्ञ संचालक असून बँकेवर अवसायक मंडळ आले असल्याने त्यांची कोणत्याही व्यवहाराची जबाबदारी येत नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येवून तक्रारदारांकडून रुपये 25,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावेत. (13) या मंचाने तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकलेला आहे. सामनेवाला हे सहकार कायद्यान्वये नोंद झालेली सहकारी बँक आहे व इतर सामनेवाले हे सदर बँकेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदत बंद, पुनर्गुंतवणुक, मासिक व्याज उत्पन्न ठेव व बचत खात्यांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता काही पावत्यांव्यतिरिक्त बहुतांश ठेव पावत्यांच्या मुदती या संपलेल्या आहेत. मुदत संपूनही तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह तक्रारदारांना अदा केलेल्या नाहीत याबाबतच्या तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2 (1)(ओ) यातील तरतुद विचारात घेतली असता सामनेवाला बँकेने त्यांच्या सभासदांच्याकडून ठेवी स्विकारलेल्या आहेत व त्या अनुषंगाने सदर ठेवीवर ते व्याज देतात. याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या तरतुदीखाली येते. सबब, प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्च न्यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्द मेसर्स युनायटेड वैश्य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे. (14) सामनेवाला बँकेवरती सद्यस्थितीत सामनेवाला हे संचालक व पदाधिकारी म्हणून कार्यरत नाहीत, तसेच सामनेवाला बँकेवर अवसायकांची नियुक्ती केली असल्याने प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 खाली दाखल करता येणार नाही या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, कलम 105 यातील तरतुदी सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यातून या मंचाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकींग रेग्युलेशन अॅक्ट 1949 कलम 35 (ए) प्रमाणे सामनेवाला बँकेवर निर्बंध घातले असल्याने या कारणावरुनही प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने दि.16.10.2009 रोजी बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 कलम 35 (ए) अन्वये निर्देश दिलेबाबतचा आदेश या मंचासमोर दाखल केले आहेत. परंतु, सदर दाखल केलेल्या आदेशाचे अवलोकन केले असता सद्यपरिस्थितीत सदरचे निर्देश संपुष्टात आलेले आहेत व सामनेवाला बँकेवरती अवसायकांची नेमणुक केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 यातील तरतुद विचारात घेतली असता सदर कायद्यातील तरतुदी या इतर अस्तित्त्वात असणा-या कायद्यास न्युनतम आणणा-या नसून पुरक आहेत. याचा विचार करता अवसायकांची नेमणुक झालेनंतर सामनेवाला बँक अथवा त्यांच्या पदाधिका-यांविरुध्द राज्य शासनाच्या सहकार खात्याचे निबंधक यांची महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, कलम 107 अन्वये पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे याबाबतचा सामनेवाला यांनी केलेला युक्तिवाद हे मंच फेटाळत आहे. उपरोक्तप्रमाणे विवेचन केलेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश संपुष्टात आलेले आहेत. तसेच, सहकार खात्याच्या निबंधकांची तक्रार दाखल करणेपूर्वी पूर्व परवानगी घेणेची आवश्यकता नाही. सदर विवेचनास हे मंच खालीलप्रमाणे पूर्वाधार विचारात घेत आहे :- Hon.National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Order dated 24th July, 2008. (1) Revision Petition No. 2528 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (2) Revision Petition No. 2529 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (3) Revision Petition No. 2530 of 2006 – Reserve Bank of India Vs. Eshwarappa & Anr. (4) Revision Petition No. 462 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Bhimsena Tukaramsa Miskin (5) Revision Petition No. 463 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Subhas (6) Revision Petition No.2254 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Ramdas Bhosale (7) Revision Petition No.2255 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Shettar (8) Revision Petition No.2256 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Saraswati R. Bhosale (9) Revision Petition No.2746 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (10) Revision Petition No.2747 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Savitri Desaigoudar 11) Revision Petition No.2748 of 2006 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Eshwarappa Ari (12) Revision Petition No.2591 462 of 2007 – Maratha Co-op.Bank Ltd. Vs. Basangouda R Kandagal (15) उपरोक्त विवेचन व पूर्वाधार यांचा विचार करता प्रस्तुतची तक्रार या मंचामध्ये चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (16) या मंचाने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार ठेवीदारांनी सामनेवाला बँकेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत व सदरच्या ठेवींच्या मुदती संपूनही सदर ठेव रक्कम व्याजासह दिलेल्या नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेमध्ये त्रुटी झाल्याचा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सामनेवाला बँकेच्या संचालक मंडळावरती महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 यातील असलेल्या तरतुदीनुसार संचालक मंडळावरती अमर्यादित दायित्व (Unlimited liability) येत नाही असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तसेच, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 83 व 88 अन्वये सहकार खात्याच्या निबंधकामार्फत चौकशी न झाल्याने संचालक मंडळावरती वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी येणार नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. परंतु, ग्राहक संरक्षण कायदा, 1986 यामध्ये असलेल्या तरतुदींचा विचार करता सामनेवाला बँक ही ठेवी स्विकारते व तसेच व्याज देते व उपरोक्त उल्लेख केलेप्रमाणे सदरची सेवा ही ग्राहक वाद होत आहे या मुद्दयाचा विचार करता तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 83 व 88 या कलमान्वये निबंधक, सहकारी संस्था यांचेमार्फत होणारी चौकशी ही संस्थेमध्ये अपहार झालेसंबंधीची चौकशी करता येते. परंतु, प्रस्तुतचा वाद हा सामनेवाला बँकेने दिलेल्या सेवेशी संबंधित आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 कलम 83 व 88 अनुषंगाने उपरोक्त विवेचन केलेले मुद्दे हे मंच फेटाळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, कलम 73(1)(ए),(बी) यातील तरतुदींचा विचार करता तक्रारदारांच्या ठेवींच्या देय रक्कमा देणेची सामनेवाला बँकेचे प्रस्तुत प्रकरणी असलेले सामनेवाला पदाधिकारी यांची जबाबदारी ही वैयक्तिक व संयुक्तिकरित्या असेल. सदर विवेचनास पूर्वाधार हा पुढीलप्रमाणे :- भुदरगड नागरी सहकारी संस्थेविरुध्द मा.राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचेकडे दाखल झालेल्या अपिल क्र. 1197/2003 व 1546/2003 - श्री.दत्तात्रय एस्. देसाई व इतर विरुध्द प्रतापराव इंगळे व इतर - यामध्ये दि.04.11.2004 रोजी मा.राज्य आयोग यांनी सामनेवाला यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार ठरविलेले आहेत. (17) सामनेवाला क्र.16 ते 19 हे सामनेवाला बँकेचे तज्ज्ञ संचालक असल्याने तक्रारदारांची ठेव रक्कम व्याजासह परत करणेकरिता त्यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, सामनेवाला क्र.20 व 21 हे सामनेवाला संस्थेचे अधिकारी असल्याने तक्रारदारांच्या ठेवी परत करणेसंबंधी त्यांना केवळ संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (18) तक्रार क्र.457/10, 458/10 व तक्रार क्र.460/10 मधील तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यां या इच्छापूर्ती ठेव, पुनर्गुंतवणुक, मुदत बंद व मासिक व्याज उत्पन्न ठेवींच्या आहेत. सदर ठेवींपैकी तक्रार क्र.457/10 मधील इच्छापूर्ती ठेव पावती क्र.22975, 025013, 025057, 025099 व 025326 यांचेव्यतिरिक्त उर्वरित सर्व ठेवींची मुदत संपलेचे दिसून येते. त्यामुळे सदर तक्रारीतील तक्रारदार हे त्यांच्या इच्छापूर्ती ठेव, पुनर्गुंतवणुक, मुदत बंद व मासिक व्याज उत्पन्न ठेव रक्कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (19) तक्रार क्र.257/10 मधील इच्छापूर्ती ठेव पावती क्र.22975, 025013, 025057, 025099 व 025326 यांच्या मुदती अ़द्याप पूर्ण झालेल्या नाहीत असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्यांच्या रक्कमा या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 30.07.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का वजाजाता होणा-या व्याजासह मिळणेस पात्र आहेत. (20) तसेच, तक्रार क्र.459/10 व 460/10 तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे सेव्हींग्ज खात्याच्या स्वरुपात रक्कम ठेवल्याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्ज खाते क्र. 5/118, 147 व 1358 वर अनुक्रमे दि.09.04.2009 व दि.24.04.2009 रोजीअखेर अनुक्रमे रुपये 7,100/-, रुपये 10,240/- व रुपये 25,184/- जमा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कम द.सा.द.शे.3.5 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (21) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांच्या तक्रारी मंजूर करणेत येतात. (2) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.20 व 21 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील इच्छापुर्ती ठेव, पुनर्गुंतवणुक, मासिक व्याज उत्पन्न ठेव व मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 457/10 | 900513 | 40000/- | 2. | --”-- | 900517 | 30000/- | 3. | --”-- | 900571 | 20000/- | 4. | --”-- | 900617 | 20000/- | 5. | --”-- | 900636 | 15000/- | 6. | --”-- | 022945 | 30000/- | 7. | --”-- | 063309 | 60000/- | 8. | --”-- | 063335 | 75000/- | 9. | --”-- | 063359 | 50000/- | 10. | 458/10 | 008395 | 59315/- | 11. | --”-- | 008394 | 56234/- | 12. | --”-- | 008393 | 119966/- | 13. | --”-- | 008397 | 101736/- | 14. | --”-- | 008398 | 62707/- | 15. | --”-- | 008396 | 80863/- | 16. | 460/10 | 700478 | 30000/- | 17. | --”-- | 700479 | 30000/- | 18. | --”-- | 700480 | 30000/- | 19. | --”-- | 700481 | 30000/- |
(3) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.20 व 21 यांनी केवळ संयुक्तिकरित्याक्र तक्रारदारांना खालील कोष्टकातील इच्छापुर्ती ठेव पावत्यांच्या रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्यांची तक्रार दाखल दि. 30.07.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्या मुदतीकरिता देय असणा-या व्याजदरातून द.सा.द.शे.1 टक्का व्याज वजाजाता होणारे व्याज द्यावे व दि.31.07.2010 रोजीपासून सदर रक्कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | 1. | 457/10 | 022975 | 35000/- | 2. | --”-- | 025013 | 30000/- | 3. | --”-- | 025057 | 30000/- | 4. | --”-- | 025079 | 28000/- | 5. | --”-- | 025326 | 26845/- |
(4) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.20 व 21 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकात नमूद त्यांच्या सेव्हिंग्ज खात्यावरील रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर कोष्टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 459/10 | बचत खाते क्र.147 | 10240/- | 24.04.2009 | 2. | --”-- | बचत खाते क्र.5/118 | 7100/- | 09.04.2009 | 3. | 460/10 | बचत खाते क्र.1358 | 26184/- | 24.04.2009 |
(5) सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.20 व 21 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना प्रत्येक तक्रारकरिता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |