जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
तक्रार क्रमांक:-557/2015
दाखल दिनांक:-07/01/2016
आदेश दिनांक:-06/04/2016
निकाल कालावधी0वर्षे03म0दि
श्री.नारायण शिवाजी पेटकर,
आनंदाची मांदियाळी,1548/4ब,ताडसौंदणे रस्ता,
सुभाष नगर,बार्शी.413 401 ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
दि हिरो इलेक्ट्रिक बाईक्स,
50 ओखला इंडस्ट्रीयल अस्टेट 3,
नवी दिल्ली 110 020 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदारतर्फे विधिज्ञ :-तक्रारदार स्वत:
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-एकतर्फा
-:निकालपत्र:-
(पारीत दिनांक:-06/04/2016)
मा.श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य यांचेव्दारा :-
1. तक्रारदार यांचेतर्फे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की- तक्रारदार यांनी दि.12/8/2013 रोजी रोख रक्कम 39,150/- देऊन जी हिरो क्रूझा बाईक सामनेवाला यांचे कपंनीची खरेदी केली. त्या बाईकमध्ये दोष व त्रूटी आढळल्या आहेत. बाईक खरेदी केल्यापासून त्यामध्ये दोष आढळत होते. शेवटी तक्रारदाराने सामनेवालास दि.17/8/2015 रोजी रजिस्टर पोस्टाने पत्र पाठविले व दि.19/10/2015 रोजी तेच पत्र ई.मेल आयडीने पाठविले. मात्र तक्रारदार यांना सामनेवालास उत्तर प्राप्त झाले नाही. बाईक संबंधी तक्रार अशी की,
1)खरेदीपासून 15 दिवसातच व्हील अलाईनमेंट व व्हील बॅलसिंग यांची फारकत झाली होती.
2)दि.27/8/2013 ला नवीन बॅटरीसेट बदलून लावावा लागला.
3)दि.23/10/2013 ला बॅटरी चार्जर बदलावा लागला.
4)दि.14/9/2014 ला स्पिडोमिटर दुरुस्त करावा लागला.
(2) 557/2015
5)दि.6/8/2015 ला बाईकचे पंचर काढतांना मेकॅनिकने सांगितले गाडीचे टायर बदलले नाही तर अपघात होणेचे शक्यता आहे.
तेव्हापासून तक्रारकर्ता यांनी बाईक बंद ठेवली आहे. तक्रारकर्ता हे 76 वर्षाचे जेष्ठ नागरिक असून त्यांनी (अ) तक्रारकर्ता यांची बाईक परत घेऊन सामनेवाला याने 39,150/- परत करावे.
(ब) तक्रार खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई करावी अशी मागणी केली आहे.
2. विरुध्दपक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे ते संधी देऊनही मंचासमोर हजर राहिले नाहीत. आणि त्यांनी सदर प्रकरणात लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकर्तर्फा चौकशीचे आदेश करयात येऊन तक्रारीमध्ये सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारदार यांनी तक्रार व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1)विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त वस्तू दिली आहे काय ? होय
2)तक्रारदार गाडीची किंमत परत मिळविण्यास पात्र आहे का ? अंशत:होय
3)काय आदेश शेवटी दिल्याप्रमाणे
कारण मिमांसा
4. अभिलेखावर नि.3 कडे दाखल गाडीची खरेदी पावती क्र.12 प्रमाणे तक्रारदार यांनी हिरो इलेक्ट्रीक बाईक मॉडेल सीआरयुझेड-चेसीस नं.सी-13063080 ही विरुध्दपक्ष यांनी उत्पादीत केलेली त्यावेळचे विरुध्दपक्ष यांचे डिलर श्रध्दा बाईक्स,बार्शी जि.सोलापूर यांचेकडून खरेदी केलेचे दिसून येते. नि.3 चे अवलोकन केले असता सदर गाडीची किंमत 39,150/- असल्याचे दिसून येते व ती रक्कम तक्रारकर्ताने विरुध्दपक्षाला अदा केली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्दपक्षाचे ग्राहक ठरतात. सदर गाडी 12/8/2013 रोजी खरेदी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी दि.25/12/2013 रोजी केलेली पट्टी दुरुस्ती, दि.24/1/2014 चे सर्व्हिसिंगचे तसेच दि.5/3/2014 चे बॅटरी रोटेशनचे बिल तक्रारीसोबत जोडलेले आहे. तसेच तक्रारदार यांनी दि.17/8/2015 ला सामनेवाला कंपनीस गाडीतील दोष त्रूटीसंबंधी सविस्तर पत्र दिल्याचे दिसून येते. सदर पत्र सामनेवालास दि.20/8/2015 ला पोहोचल्याचा दि.20/10/2015 चा दाखल सदर तक्रारीसोबत दाखल केलेला आहे.
(3) 557/2015
5. विरुध्दपक्ष यांना प्रस्तुत तक्रारीची नोटीस मंचामार्फत बजावणी झालेली आहे. उचित संधि देऊनही विरुध्दपक्ष मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. वास्तविक तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे खंडण करण्यासाठी लेखी उत्तर व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यास विरुध्दपक्ष यांना योग्य व उचित संधी उपलब्ध होती. परंतु त्याप्रकारे कोणतीही दखल विरुध्दपक्ष यांनी न घेतल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यातील कथने व दाखल कागदपत्रे विरुध्दपक्ष यांना मान्य असलयाचे प्रतिकूल अनुमान काढणे न्यायोचित ठरेल असे वि.मंचास वाटते.
6. निर्विवादपणे तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांची उत्पादीत केलेली गाडी खरेदी केलेली आहे. त्या गाडीमध्ये वेळोवेळी दोष निर्माण झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागलेली आहे. तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांना गाडीच्या दोषाबद्दल कळवून देखील त्यांनी तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. वास्तविक पर्यावरण पूरक अशी नवीन गाडी बाजारात आणल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी तत्परतेने ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करुन ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक होते. परंतु अशी कोणतीही कार्यवाही विरुध्दपक्ष यांनी केलेली नसल्याने त्यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त वस्तूत विकून त्रूटी केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदर गाडीत उत्पादकीय दोष आहे हे सिध्द होते. व त्यामुळे सदर गाडीची किंमत तक्रारकर्ता परत मिळणेस पात्र आहेत. तथापि तक्रारदार यांनी सदर गाडी ही दि.12/8/2013 पासून 6/8/2015 पर्यंत कमी अधिक वापरलेली आहे. त्यामुळे प्रतिवर्षी 10 टक्के प्रमाणे घसारा (depreciation) प्रमाणे गाडीची मूळ किंमत 39ख्150/- वरती 10 टक्के घसारा दरवर्षी प्रमाणे दोन वर्षाचा विचार करता तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडून रु.31,320/- मिळण्यास पात्र आहेत या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
7. वरील सर्वर विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिले असून शेवटी खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
-: आदेश :-
1. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना रु.31,320/- (रु.एकतीस हजार तीनशे वीस रुपये फक्त) द्यावे. त्यावेळी तक्रारदार यांनी सदर प्रकरणातील गाडी विरुध्दपक्ष यांना परत करावी.
2. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
3. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी निकालाची प्रत प्राप्त झालेपासून 30 दिवसात करावी.
4. उभय पक्षकारांना या निकालाची प्रत निशुल्क पाठविण्यात यावी.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. बबिता एम.महंत-गाजरे) (श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंलि00504160