Maharashtra

Nagpur

CC/320/2017

Shri Anil Gajanan Dhunde - Complainant(s)

Versus

The Gruhalaxmi Urban Credit Sahakar Sanstha Maryadit, Nagpur Through Director/Manager/Secretary - Opp.Party(s)

Adv. Chaitanya Agrekar & Neha Sahu

27 Jun 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/320/2017
( Date of Filing : 28 Jul 2017 )
 
1. Shri Anil Gajanan Dhunde
R/o. Plot No. 288, Darshan Colony, Nandanvan, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Gruhalaxmi Urban Credit Sahakar Sanstha Maryadit, Nagpur Through Director/Manager/Secretary
377, Ganesh Nagar, Nagpur 440009
Nagpur
Maharashtra
2. The Gruhalaxmi Urban Credit Sahakar Sanstha Maryadit, Nagpur Through Branch Manager
377, Ganesh Nagar, Nagpur 440009
Nagpur
Maharashtra
3. Sau. S.Keshav Kumeria, Dainik Bachat Khate Abhikarta, The Gruhalaxmi Urban Credit Sahakari Sanstha Maryadit, Nagpur
R/o. Darshan Colony, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Shri Keshav Mahadev Kumeria
R/o. Darshan Colony, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Jun 2022
Final Order / Judgement

निशाणी क्रं. 1 वर आदेश पारित

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील  यांच्‍या आदेशान्‍वये-

तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडे दैनिक बचत खाते  27.12.2013 रोजी सुरु केले. विरुध्‍द पक्ष 2 व 3 संस्‍थेचे पदाधिकारी व कमिशन एजंट आहेत. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून कर्ज घेतले नव्‍हते, तरी विरुध्‍द पक्षाचे अधिकारी  कर्जाच्‍या वसुलीकरिता तक्रारकर्त्‍याकडे आले आणि कार्यवाही टाळावयाची असेल तर रुपये 84,099/- ताबडतोब भरण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने कागदपत्रांची मागणी केली आणि विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम सुध्‍दा तक्रारकर्त्‍याला खोटया कार्यवाहीमुळे दिली नाही, म्‍हणून त.क.ने प्रस्‍तुत वर्तमान तक्रार दाखल केलेली आहे.

तक्रारकर्त्‍याने बचत खात्‍यातील रुपये 14,300/- परत मिळण्‍याकरिता आणि आर्थिक व मानसिक नुकसानीपोटी रुपये एक लाख मिळण्‍याची विनंती केली आहे.

वर्तमान तक्रार दाखल केल्‍यानंतर तक्रारकर्ता आणि त्‍यांचे वकील दाखल सुनावणीकरिता दि. 04.08.2017 पासून दि. 21.11.2017 पर्यंत गैरहजर असल्‍यामुळे शेवटी दि. 21.11.2017 रोजी प्रकरणाचे अवलोकन करुन तक्रार स्‍वीकृत करण्‍यात आली आणि नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. परंतु दि. 21.11.2017 पासून आजपर्यंत तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील मंचासमक्ष हजर झालेले नाही. वर्तमान प्रकरणात दि. 09.01.2018 रोजी तयार केलेल्‍या नोटीस विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांना बजावणीकरिता तक्रारकर्ता अथवा त्‍यांच्‍या वकिलांनी नेलेल्‍या नाहीत. तक्रारकर्त्‍याला आयोगा समक्ष हजर राहण्‍याकरिता दि. 22.12.2021 रोजी आणि दि.17.03.2022 रोजी नोटीस पाठविण्‍यात आल्‍या होत्‍या, परंतु त्‍यानंतर ही तक्रारकर्ता अथवा त्‍यांचे वकील आयोगासमक्ष उपस्थितीत झालेले नाही. सबब विरुध्‍द पक्ष यांना संधी देण्‍यात आलेली नाही, त्‍यामुळे वर्तमान तक्रारीचा निकाल गुण-दोषावर देणे अशक्‍य आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम तक्रारकर्त्‍याला देण्‍याचा आदेश एकतर्फी करता येऊ शकत नाही. कारण तक्रारकर्ते यांनीच कर्ज वसुलीच्‍या नोटीसची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. सबब तक्रार खारीज करणे उचित आहे.

         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित .

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील आयोगा समक्ष उपस्थिती नसल्‍यामुळे व सदर प्रकरणात कोणतीही उचित कार्यवाही न केल्‍याच्‍या कारणाने प्रकरण नस्‍तीबध्‍द करण्‍यात येते.

 

  1. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचा  खर्च स्‍वतः सोसावा.

 

  1. तक्रारकर्त्‍याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.