तक्रारदार : स्वतः वकीलासोबत(श्री.जैन)हजर. सामनेवाले क्र.1 : वकीलामार्फत(श्री.आयरे) हजर. सामनेवाले क्र.2 : वकीलामार्फत(श्री.विशाल बिराजदार) हजर. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 हे वाहनाचे उत्पादक आहेत. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 यांचे विपणन व्यवस्थापक आहेत. सा.वाले क्र.3 हे वाहनाचे विक्रेते आहेत. तकारदारांनी सा.वाले क्र.1 यांनी उत्पादित केलेली शेवरलेट टवेरा हे वाहन सा.वाले क्र.3 यांचेकडून दिनांक 22.4.2005 रोजी रु.8,05,292/- येवढया किंमतीस खरेदी केले, किंमत अदा केली. व वाहनाचा ताबा दि.22.4.2005 रोजी घेतला. तक्रारदारांना त्या वाहनामध्ये काही दिवसातच पुढील दोष दिसून आले. 1) डाव्या बाजुकडील दुसरे दार व्यवस्थीत बंद होत नव्हते. 2) अटोकॅट व्यवस्थीत काम करीत नव्हती. 3) वाहनाचे पुढील दिवे व्यवस्थीत प्रखर प्रकाश देत नव्हते. 4) वाहन चालु होण्यास त्रास देत होते. 5) वाहन जाहीरात केल्यापेक्षा जास्त वापरत होते. 6) वाहनाचे समोरील दुरचे दिवे व्यवस्थीत काम करीत नव्हते. 7) वाहनाचे दारामधून गळती होत होती. 2. तक्रारदारांनी या बद्दल सा.वाले यांचेकडे दि.25.6.2005 च्या पत्राव्दारे सा.वाले यांचेकडे तक्रार दिली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकामी वाहन वेळोवेळी नेले. व सा.वाले क्र.3 यांनी तक्रारदारांना असे सूचविले की, वाहनामध्ये मुलभूत दोष असल्याने तक्रारदारांनी या संबंधामध्ये दाद सा.वाले क्र.1 उत्पादक यांचेकडे मागावी. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे वाहनात मुलभूत दोष असल्यासने तक्रारदारांनी सा.वाले यांना वाहन बदलून द्यावे अशी विंनती केली. तथापी सा.वाले यांनी तकारदारांची विनंती मान्य केली नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुत मंचाकडे सदरची तक्रार दाखल केली व सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहनाची किंमत व नुकसान भरपाई असे एकंत्रितपणे रु.10 लाख अदा करावेत अशी विनंती केली. 3. सा.वाले क्र.1 उत्पादक यांनी आपली कैफीयत दाखल केली. व असे कथन केले की, तक्रारदारांनी सा.वाले क्र.3 यांचेकडे केवळ चार वेळेस किरकोळ दुरुस्तीकामी वाहन नेले होते. व त्याप्रमाणे दुरुस्त करण्यात आले. वाहनाचे दरवाजे सुरवातीला घट्ट असतात त्यामुळे ते व्यवस्थित बंद होत नव्हते. त्याचप्रमाणे समोरील दिव्यामधील उजेडाची तक्रार ती देखील दूर करण्यात आली होती. व अटोकॉर्प ही जादा सामुग्री असल्याने ती पुरविण्यात आली होती व ती व्यवस्थित चालु होती. वाहनाचे इंधनाचे खर्चाचे संदर्भात सा.वाले यांनी असे कथन केले की, वाहकाची वाहन चालविण्याची सवय, रस्त्यावरील गर्दी, रस्त्यांची अवस्था, इ. अनेक बाबीवर इंधन खर्च अवलंबून असतो. या प्रमाणे वाहनात मुलभूत दोष आहेत व वाहन बदलून मिळणे किेंवा वाहनाची संपूर्ण किंमत परत करणे आवश्यक आहे या अरोपास सा.वाले क्र.1 यांनी नकार दिला. 4. सा.वाले क्र.3 यांनी आपली कैफीयत दाखल केली. व कैफीयतीचे परिच्छेद क्र.5 मध्ये वाहन दुरुस्तीचे कामी तंयार करण्यात आलेले जॉबकार्डचा संदर्भ दिला. व परिच्छेद क्र.8 मध्ये तक्रारदारांचे वाहन ज्या तारखांना दुरुस्तीकामी आणण्यात आले होते त्या तारखांचा उल्लेख केला. सा.वाले क्र.3 यांचे कथनाप्रमाणे तक्रारदारांचे वाहनात वेळोवेळी आवश्यक ती किरकोळ दुरुस्ती करुन देण्यात आली. वाहनामूध्ये मूलभुत दोष होता हा आरोप सा.वाले क्र.3 यांनी नाकारला. या प्रमाणे सा.वाले क्र.3 यांनी देखील सा.वाले क्र.1 यांच्या कथनास पुष्टी दिली. 5. तकारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये सा.वाले क्र.1 व 2 यांच्या कैफीयतीचा समाचार घेतला. व त्यामधील कथनास नकार दिला. 6. तक्रारदारांनी पुरावे शपथपत्र दाखल केले व कागदपत्र दाखल केले. सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे विभागीय व्यवस्थापक श्री.राजीव गुप्ता यांचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले क्र.3 यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.रोहींन्टन बैरामजी यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी वाहन दुरुस्तीच्या संदर्भातील कागदपत्रे दाखल केली. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. 7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून खरेदी केलेले वाहन शेवरलेट टवेरा यामध्ये मुलभूत दोष असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहनाची किंमत व नुकसान भरपाई या बद्दल एकत्रित रु.10 लाख अदा करणे आवश्यक आहे ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 8. तकारदारांनी सा.वाले यांचेकडून वाहनाचा ताबा दिनांक 22.4.2005 रोजी घेतला. वाहन ताब्यात घेताना तक्रारदारांनी ते तपासून घेतले. तसेच व्यवस्थित असल्या बद्दलचे प्रमाणपत्रही दिले. त्याची प्रत सा.वाले क्र.3 यांनी आपल्या कैफीयतसोबत दाखल केलेली आहे. तक्रारदारांचे वाहन सा.वाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकामी दि.7.5.2005 रोजी नेण्यात आले होते. त्याची प्रत निशाणी 2, सा.वाले 3 यांचे कैफीयतीसोबत आहे. त्यामध्ये वाहनाची तपासणी केली व अटोकार्प बसविले असे नोंद आहे. दारे घट्ट झाली होती या तक्रारीबद्दल दारांना ग्रिसींग करण्यात आले अशी नोंद आहे. व वाहनाचे दिवे व्यवस्थीत नाहीत या बद्दल दुरुस्ती करण्यात आले अशी नोंद आहे. त्यानंतर वाहन दिनांक 18.5.2005 रोजी सा.वाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकामी नेण्यात आले व जॉबकार्डची प्रत सा.वाले क्र.3 यांचे कैफीयतीसोबत निशाणी 3 वर दाखल आहे. त्यावेळेस देखील अटोकार्प बद्दल तक्रार होती. आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली व वाहन त्याच दिवशी ताब्यात देण्यात आले. यावरुन असे दिसते की, ती किरकोळ दुरुस्ती होती. त्यानंतर वाहन दि.28.6.2005 रोजी पुन्हा सा.वाले क्र.3 यांचेकडे दुरुस्तीकामी नेण्यात आले. जॉबकार्डची प्रत निशाणी 4 वर आहे. वाहनाचे दारातून पाण्याची गळती होते व अटोकार्प बरोबर काम करीत नाही व दारे व्यवस्थीत लागत नाहीत अशी तक्रार होती. ती कीरकोळ दुरुस्ती करण्यात आली व वाहन त्याच दिवशी तक्रारदारांना परत देण्यात आले. त्यानंतर वाहन दिनांक 6.10.2005 रोजी पुन्हा सा.वाले क्र.3 यांचेकडे नेण्यात आले. सा.वाले यांच्या साक्षीदाराचे शपथपत्रावरुन असे दिसते की, या प्रकारच्या दुरुस्त्या हया किरकोळ होत्या. दि.6.10.2005 चे जॉबकार्ड सा.वाले यांचे कैफीयतीचे निशाणी 5 वर आहे. दि.6.10.2005 रोजी वाहनामध्ये वाहन चालु होण्याबद्दल तक्रारदारांची तक्रार होती. या व्यतिरिक्त दारातून पाणी आतमध्ये येते. वाहनाची दारे बरेाबर बंद होत नाहीत, म्युझिक सिस्टीम व्यवस्थीत कार्य करत नाही, पुढील दिवे प्रखर प्रकाश देत नाहीत, या प्रकारच्या तक्रारी होत्या. वाहन दुरुस्त करुन तक्रारदारांना दि.10.10.2005 रोजी परत करण्यात आले. तकारदारांनी देखील आपल्या तक्रारीसोबत जॉबकार्डच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्यातील नोंदी देखील याच प्रकारच्या आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या जॉबकार्डमधील नोंदीवरुन असे दिसून येत नाही की, वाहनाचे इंजीनामध्ये काही मुलभूत दोष होता व वाहन सदोष होते. तक्रारदारांचे त्या प्रकारचे कथनही नाही. तक्रारदारांचे असे कथन आहे की, तक्रारीत नमुद केलेले दोष दूर करणेकामी तक्रारदारांना ते वाहन सा.वाले क्र.3 यांचेकडे वारंवार घेवून जावे लागले. केवळ वाहन खरेदीदारास वाहन दुरुस्तीकामी विक्रेत्याकडे वारंवार घेवून जावे लागले यावरुन वाहनामध्ये मुलभूत दोष होता असा निष्कर्ष काढता येत नाही. 9. तक्रारदारांनी वाहनामध्ये मुलभूत दोष होता हे सिध्द करणेकामी वाहन व्यवसायातील तज्ञ/अभियंता यांचेकडून वाहनाची तपासणी करुन घेवून त्याबद्दल शपथपत्र दाखल केले नाही. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(1)(क) प्रमाणे या प्रकारचा पुरावा आवश्यक आहे. जो तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. 10. या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे तकारदारांचे वाहन हे सतत वापरात होते व ते कधीही बंद होते व तक्रारदारांचे गॅरेजमध्ये पडून होते असे दिसून येत नाही. जॉबकार्डमधील नोंदी या संबंधात पुरेसा प्रकाश टाकू शकतात. वाहन खरेदीची दिनांक 22.4.2005 अ.क्र. | दिनांक | किलोमिटर व खरेदीपासूनचा कालावधी | 1 | 28.06.2005 | 5082 2 महिने 6 दिवस | 2 | 06.10.2005 | 11353 1 वर्षे 4 महीने | 3 | 08.06.2006 | 28400 2 वर्षे 4 महीने | 4 | 20.01.2007 | 44691 20 महीने. | 5 | 11.04.2007 | 52339 2 वर्षे | 6 | 22.02.2008 | 67756 34 महीने |
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार 2006 मध्ये दाखल केली. तक्रार दाखल करणेपुर्वी व तक्रार दाखल झाल्यानंतरही वाहन बंद नव्हते. तर ते सतत वापरात होते. वाहनाचा झालेला वापर असे दर्शविते की, वाहन प्रत्यंक महिन्यात अंदाजे 2000 किलोमिटर प्रवास करीत होते. 2008 पर्यत वाहनाने जवळपास 68000 किलो मिटर प्रवास केला. सदोष व मुलभूत दोष असलेले वाहन या अंतराचा प्रवास करु शकणार नाही. 11. या संदर्भात सा.वाले यांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या आर.भास्कर विरुध्द डी.एन.उडानी IV (2006) CPJ 257 या न्यायनिर्णयाचा आधार घेतला. त्यामध्ये वाहन 17 महीन्यात 9808 किलोमिटर चालले होते. मा. राष्ट्रीय आयोगाने असा निष्कर्ष काढला की, वाहनाने 9808 किलोमिटर प्रवास केला असेल तर त्यामध्ये मुलभूत दोष आहे असा निष्कर्ष काढणे अवघड आहे. प्रस्तुतचे प्रकरणात वाहनाचा प्रवास 2008 सालापर्यत 68000 किलोमिटर झालेला होता. त्यावरुन वाहनामध्ये मुलभूत दोष होता असा निष्कर्ष काढणे शक्य होणार नाही. वाहनामध्ये मुलभूत दोष आहे असा निष्कर्ष नोंदविल्याशिवाय वाहन विक्रेत्याने वाहनाची किंमत परत करावी असाही निष्कर्ष नोंदविणे शक्य नाही. 12. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांना वाहनाचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. 13. वरील चर्चेनुसार व निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 56/2006 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 5 आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |