जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 282/2011 तक्रार दाखल तारीख – 23/11/2011
निकाल तारीख - 20/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 02 म. 27 दिवस.
1) श्रीमती सुभद्रा रामप्रसाद सोनी,
वय 61 वर्षे, धंदा – गृहिणी,
पत्ता - प्रोप – आर.आर.सोनी,
मातृछाया, मोती नगर, लातुर.
2) उज्वला हरिप्रसाद सोनी,
वय – 25 वर्षे, धंदा – गृहिणी,
3-1-96/1, शिवपुरी कॉलनी,
साई फंक्शन हॉल जवळ,
एल.बी.नगर, हैद्राबाद.
3) हरिप्रसाद सोनी,
वय – 30 वर्षे, धंदा – प्रोफेसर अॅट आयबीएस,
हैद्रबाद.
3-1-96/1, शिवपुरी कॉलनी,
साई फंक्शन हॉल जवळ,
एल.बी.नगर, हैद्राबाद. ....अर्जदार
विरुध्द
1) दि जनरल मॅनेजर,
इंडियन रेल्वे कॅटरींग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लि.,
9 वा मजला, बँक ऑफ बडोदा बिल्डींग,
16, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली – 110001.
2) दि चिफ कमर्शिअल मॅनेजर,
सीसीएम ऑफीस, HQ सेंट्रल रेल्वे,
न्यु अॅडमिनीस्ट्रेशन बिल्डींग, 5 वा मजला,
सीएसटीएम, मुंबई. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एम.येरटे.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड. एस.व्ही.तापडीया.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- अॅड. एम.डी.बोकील.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्री अजय भोसरेकर,मा.सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा लातुर येथील रहिवाशी असून, तक्रारदाराने दि. 21/11/2009 रोजी लातुर ते हैद्राबाद जाण्यासाठी सामनेवाले क्र. 1 यांच्या मार्फत तीन व्यक्तींचे आरक्षण तिकीट दि. 17/11/2009 रोजी खरेदी केले. सदर तिकीटासाठी तक्रारदाराने रक्कम रु. 1109.62 एवढी रक्कम एस.बी.आय क्रेडिट कार्डद्वारे अदा केली.
तक्रारदाराने सामनेवाले क्र. 2 यांच्या दुरध्वनी क्र. 02382-253056 व 139 या क्रमांकावर दि. 21/11/2009 रोजी संपर्क करुन गाडीच्या वेळासंदर्भात माहिती घेतली. त्यावेळेस सामनेवाले क्र. 2 यांच्याकडुन गाडी 22:45 ला स्टेशनवर येईल व 23:20 वाजता हैद्राबादकडे रवाना होईल अशी माहिती दिली. तक्रारदार 22:30 वाजता लातूर स्टेशनवर गेल्यावर स्टेशन मास्तरकडे चौकशी केली असता, सदर गाडीचे वेळापत्रक बदलल्यामुळे 21:00 वाजता गेल्याची माहिती दिली. त्यावेळेस सामनेवाले क्र. 2 यांचे लातुर कार्यालयात अंदाजे 50 प्रवाशी तक्रार करत होते. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे तक्रार दिल्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास रु. 539.27 परत मिळाले असे म्हटले आहे.
तक्रारदारास सदर रेल्वे निघुन गेल्यामुळे तक्रारदाराने रिझर्व्हेशन चार्जेस रु. 570.35 पैसे, कॅब चार्जेस रु. 550/-, लातुर ते हैद्राबाद चार्जेस रु. 3952/-, टेलीफोन चार्जेस रु. 128/-, नुकसान भरपाई रु. 17,000/- त्यावर 18 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 11/09/2012 रोजी दाखल झाले असून, तक्रारदाराची तक्रार या न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात बसत नाही. तसेच तक्रारदाराची तक्रार ही वसुली खर्चाची असल्यामुळे, ग्राहक संरक्षण कायदयानुसार या न्यायमंचास चालविण्याचा अधिकार नसल्या कारणाने रद्द करावी. सामनेवाले क्र. 2 यांनी दि. 20/11/2009 रोजीच्या स्थानिक वृत्तपत्र, यशवंत, एकमत, पुण्यनगरी इत्यादी वृत्तपत्रात जाहीरातीद्वारे रेल्वे वेळातील बदला बाबत जाहीर प्रगटन दिले होते. सदर गाडी ही दि. 21/11/2009 या तारखेपासुन वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्यामुळे तक्रारदारास दयावयाच्या सेवेत आम्ही कोणताही कसुर केला नसल्या कारणाने, सामनेवाले क्र. 1 हे फक्त सामनेवाले क्र. 2 यांच्या रेल्वे आरक्षणाचे व तिकीट विक्रीचे काम करतात ही सेवा देण्यात आम्ही तक्रारदारास कोणतीही त्रुटी केली नसल्या कारणाने, तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र. 2 यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण तीन वृत्तपत्राचे जाहीराती दाखल केल्या आहेत.
सामनेवाले क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 20/03/2013 रोजी दाखल झाले आहे. त्यात त्यांनी तक्रारदाराची तक्रारी ही या न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, भारतीय करार कायदयाच्या कलम 230 नुसार When the principal is disclosed the agent is not personally liable यानुसार आम्ही सामनेवाले क्र. 2 चे एजंट असल्यामुळे तक्रारदाराकडुन घेतलेली तिकीट आरक्षणाची रक्कम दि. 25/11/2009 रोजी रु. 529/- व दि. 26/10/2010 रोजी रु. 530/- असे एकुण रु. 1059/- तक्रारदारास अदा केलेले आहेत. त्यामुळे तक्रारदारास दयावयाच्या सेवेत आम्ही कोणताही कसुर केला नसल्या कारणाने तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी आपल्या लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ शपथपत्राशिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे दि. 13/01/2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता,
तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 यांच्याकडुन सामनेवाले क्र. 2 यांच्या वाहनातुन प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे तिकीट खरेदी केले. सदर तिकीटाची रक्कम रु. 1109.62 एस.बी.आय क्रेडीट कार्डाद्वारे अदा केली. सामनेवाले क्र. 2 यांचे लेखी म्हणण्यात व सोबत जोडलेल्या स्थानिक वृत्तपत्रातील जाहीरातीचे निरीक्षण केले असता, तक्रारदाराने दि. 17/11/2009 रोजी सामनेवाले क्र. 1 यांचेकडुन तिकीट खरेदी केले. सामनेवाले क्र. 2 यांनी दि. 20/11/2009 रोजीच्या वृत्तपत्रातून गाडीतील वेळेच्या बदलाची माहिती जनतेस दिल्या बाबतची वृत्तपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास दि. 25/11/2009 रोजी रु. 529/- व दि. 26/10/2011 रोजी रु. 530/- असे एकुण रु. 1059/- तक्रारदारास अदा केले आहेत असे म्हटले आहे. यावर तक्रारदारानी कोणतीही हरकत घेतली नसल्याकारणाने, तक्रारदारास सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे हे तक्रारदाराने सिध्द केले नाही. त्याचप्रमाणे सामनेवाले क्र. 2 यांनी दाखल केलेल्या वृत्तपत्राच्या जाहीर प्रगटनावरुन गाडीच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाबाबत जाहीर प्रगटन दाखल असलेल्या कारणाने त्यांनीही तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे हे तक्रारदाराने पुरावा कायदयानुसार योग्य पुराव्याने सिध्द करु न शकल्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.